गोपाळकाला सणाची मराठी माहिती 2023

Gopalkala Festival Marathi Information 2023 : आजच्या लेखामध्ये आपण गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सव यांची माहिती पाहणार आहोत चला तर मग गोपाळकाला सणाची मराठी माहिती आपण आता तात्काळ पाहूया जेणेकरून गोपाळकाला किंवा दहीहंडी याविषयीची माहिती आपल्याला मिळेल.

Gopalkala Festival Marathi Information 2023

गोपाळकाला कधी साजरा केला जातो

गोपाळकाला हा सण केवळ महाराष्ट्रातच साजरा होतो असे नाही,तर महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये कृष्णाला आराध्य दैवत मानणारे अनेक समुदाय आहेत. अनेक  लोक कृष्णाची  त्याची पूजाअर्चा करत असतात,म्हणून आजच्या लेखामध्ये आपण गोपाळकाला या सणाची माहिती मराठीमध्ये पाहतोय.जेणेकरून तुम्हाला हा सण का साजरा केला जातो?याविषयी माहिती मिळेल. श्रीकृष्ण जन्माष्टमी नंतर येणारा दुसरा दिवस म्हणजेच कृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये विशेषता मोठ्या शहरांमध्ये गोपाळकाल्याच्या निमित्ताने दहीहंडी उत्सव अगदी धुमधडाक्यात साजरे होतात.

लाखोंची बक्षीसे या दहीहंडी उत्सवामध्ये दिली जातात .अनेक सेलिब्रिटी या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होत असतात. थोडक्यात गोपाळकाला धार्मिक,अध्यात्मिक महत्त्व तर आहेच,पण एक आगळावेगळा दिवस जसा कृष्णाचा चरित्र वैविध्यपूर्ण आहे. अगदी त्याच पद्धतीने हा सन देखील मंदिरामध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा होतो .

नक्की वाचा लेटेस्ट मराठा आरक्षण बातमी

मनोज जरांगे याने राज्य सरकारच्या अध्यादेशावर ही घेतली ठाम भूमिका

दहीहंडीच्या रूपाने मोकळ्या मैदानात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो, तर तुमच्या लक्षात आले असेल की कृष्णाचा जन्म ज्या दिवशी झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी जो सण साजरा केला जातो त्याला आपण गोपाळकाला किंवा दहीहंडी म्हणतो  तर आपण गोपाळकाला आणि दहीहंडी यामागे ज्या काही पुराणातील कथा सांगितल्या जातात ते आपण बघूया.चला तर मग gopalkala marathi mahiti आपण वाचली तर आपण वैविध्यपूर्ण माहिती बनवत असतो.

गोपाळकालाबद्दल पुराण कथा story of Gopalkala Festival Marathi Information 2023

    श्रीकृष्ण आणि त्याचा जन्म याविषयी आपल्या सर्वांना माहितीच आहे की,श्रीकृष्णाचा मामा कंस याला अशी आकाशवाणी झाली होती, की माता देवकी हिच्या पोटी  बालक जन्म घेईल ते बालक तुझा घात करेल. म्हणून तो देवकीला जी काही आपत्य होतील. त्यांचा जन्म होताच त्यांना यम सधनी धाडत होता. परंतु देवकीला जे आठवे अपत्य झाले ते म्हणजे श्रीकृष्ण.

आता कंस मामा आपल्या मुलाचा जीव घेणार? म्हणून वसुदेव आणि देवकी विचार करू लागले. आणि त्याचवेळी श्रीकृष्ण अवतारी पुरुष असल्या कारणामुळे कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले.असं सांगितले जाते, अगदी किर रात्रीच्या वेळी नदीला पूर आलेला असताना, वसुदेव बालकृष्णांना घेऊन माता यशोदेकडे गेले गेले. थोडक्यात माता देवकी आणि पुत्र कृष्ण यांना काही मायलेकरांचा सहवास भेटला नाही,मग पूर्ण त्यांचा संभाळ यशोदा मातेने केला. यशोदा व नंदलाल  ही व्यवसायाने गवळी होती. त्यांच्याकडे दूध दही हे विकून काही उत्पन्न कमावले जात होते.याचा संदर्भ या गोपाळकालाशी कसा आहे तो आपण बघूया

गोपाळकाला सणाचे महत्त्व

याबाबत पुराणात एक गोष्ट सांगितलीय, ती पाहण्याआधी काला म्हणजे काय?तर एकमेकांमध्ये मिसळणे. जसे की आपण घरामध्ये काही पदार्थ आणले तर ते एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर ते चवदार बनतात. त्यात एखादा पदार्थ जर बेचव असेल तो देखील पदार्थ आपल्याकडून खाल्ला जातो. असा हा काला होय. 

उदाहरण द्यायचं झालं तर पण बाजारातून कुरमुरे आणतो, भेळ आणतो फुटाणे,शेंगदाणे,  रेवडी आणतो परंतु त्याचा एक एक घास आपण खाल्ला तर आपल्याला तेवढे चवदार किंवा ते चांगलं लागत नाही.परंतु त्या सर्व घटकांना एकत्र केले म्हणजे  त्याचा काला केला , म्हणजे एकमेकांमध्ये  मिसळले तर  मात्र त्याला एक वेगळीच चव असते.

 अगदी त्याच पद्धतीने श्रीकृष्ण त्यांच्या बालपणी आपल्या सवंगड्यांसोबत यमुना नदीच्या किनाऱ्यावर गाई – गुरे,वासरे चारायला घेऊन जात असत.सकाळपासून दुपारपर्यंत गायी वासरांना चारल्यानंतर दुपारच्या वेळी कृष्ण आणि त्याचे सवंगडी, सखे काही खेळ खेळत असतात. खेळ खेळून दमल्यावर मात्र एकत्र जमत असत. तो आठ दहा जणांचा घोळका एकत्र जमल्यानंतर बाकी मंडळी सामान्य कुटुंबातले असल्यामुळे त्यांच्या घरून येणारे जे पदार्थ होते ते अगदी साधे  असायचे.कोणी नुसता भात आणायचे तर कोणी नसती चटणी भाकरी तर कोणी नसते ताक आणायचे सांगण्याचा मुद्दा असा श्रीकृष्णाचे मित्र हे श्रीकृष्णापेक्षा अतिशय गरीब होते मग अशावेळी माझे मित्र हलकं फुलकं, जे मिळेल ते खातात मग मी मात्र माझ्या आईने दिलेली पकवान खाणे योग्य आहे का?

अशावेळी श्रीकृष्ण सर्वांना एकत्र बोलवत मोठा घोळका करत सर्वजण मिळून गोलाकारात बसत आणि गोलाकारामध्ये बसल्यानंतर कृष्ण त्याने आणलेला उत्कृष्ट चवीचा खाद्यपदार्थ आपल्या पोतडीतून बाहेर काढत आणि त्याचबरोबर मित्रांनी आणलेले जे काही इतर पदार्थ असतील ते काढून सर्व एकमेकांमध्ये मिसळत असत, तो काला होय. गोपाळ म्हणजे जो गाई पाळतो तो किंवा ज्याच्याकडे गाई आहेत असा गोपालक असे सर्व सवंगडी आणि अशा गाईंचे पालन करणाऱ्या मुलांनी एकत्र येऊन केलेला काला तो गोपाळकाला होय. कृष्णाला प्रेमाने गोपाल किंवा गोपाळ या नावाने देखील संबोधले जाते तर तुम्हाला गोपालकाला किंवा गोपाळकाला काय आहे ते या कथेमधून समजले असेल. सर्वांनी जात, धर्मपंथ विसरून एकत्र येण्याची भावना म्हणजे गोपाळकाला. आणि अगदी तीच अवस्था आता अलीकडे शहरी जीवनामध्ये दिसत आहे.सर्वजण विसरून लोक गोपाळकाला अतिशय उत्साहात साजरा करत असतात.

दहीहंडी मराठी माहिती 2023 dahi handi means Gopalkala Festival Marathi Information 2023

आता वर आपण गोपाळकाला मराठी माहिती पाहिल्यानंतर आता आपण जरा दहीहंडीकडे वळूया.की दहीहंडी विषयी  काय सांगितले जाते ?तर त्याविषयी असे सांगितले जाते की, कृष्ण हा अतिशय कडकडे बालक होता आणि त्याचे मित्रही त्याच्याच पद्धतीने अतिशय मस्तीखोर होते. कृष्णा आणि त्याचे मित्र,सवंगडी  दुपारच्या वेळी सर्व लोक झोपलेले असताना किंवा शेतामध्ये कामाला गेलेले असताना हळूच कोणा एकाच्या घरी जात असत आणि शिंक्या वरती ठेवले नाही दही, दूध ,लोणी जे मिळेल ते काढत असत.कधी कधी तर असे व्हायचे की ते शिंक्यावरील भांडे हाताला येत नाही.

कृष्णा आणि त्याचे सवंगडी एक  गोल  करत आणि कोणालातरी वरती उभे करून तो दह्या दुधाचा माठ काढायला लावत असत.आणि कधी कधी व्हायचे असे की त्या माठाला हात लागायचा पण काढता येणे शक्य नव्हते त्यावेळी तो सर्वांच्या खांद्यावर चढलेला सवंगडी मटके फोडायचा आणि त्या मटक्यातून दही किंवा तत्सम पदार्थ बाहेर पडायचे ते दही कोणाच्या अंग खांद्यावर पडत असतात अशावेळी ते दही मित्रांच्या अंगावर जरी पडले तरी हाताने एकमेकांच्या अंगावरील दही किंवा अन्य पदार्थ कधी कधी इतरही पदार्थ असायचे म्हणजेच काय तर सर्वजण एकत्र येऊन दही दूध लोण्याची चोरी करायचे, हंडी फोडायचे आणि याचीच आठवण म्हणून आपण दहीहंडी साजरी करतो.म्हणूनच कृष्णाची आठवण म्हणून त्यांच्या सवंगड्यांच्या आठवण म्हणून खूप उंचावरती दहीहंडी बांधली जातात.हीच दही हंडी  त्याची माहिती थोडक्यात आपण बघूया.

दहीहंडी उत्सव

गोपाळकाला म्हटले की आपल्याला आठवतात ती मोठी मोठी दहीहंडी पतके  कित्येक महिने सराव करतात.आठ ते नऊ थर असे विश्वविक्रमी कामगिरी करणारी देखील गोविंदा पथके आहेत, की ज्यांची क्रेझ संपूर्ण जगाला लागून असते. मुंबई सारख्या ठिकाणी तर खास दहीहंडी उत्सवाला परदेशी पाहुणे येतात.थर म्हणजेच मानवी मनोरा  तयार करण्याचे कौशल्य खूप सुंदर आहे. 

मागील दोन वर्षापासून कोरोना काळामध्ये या दहीहंडी उत्सवावरती  कोरोनाची टांगती तलवार होती, मात्र यावर्षी वातावरण आणि परिस्थिती जरा बदललेली आहे. त्यामुळे सर्व सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत त्यामुळे यावर्षी दहीहंडी उत्सवामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असते.

दहीहंडी उत्सव पथके

उंचावरील दहीहंडी,फोडणे, हे वाटते तेवढे सोपे काम नाही. यासाठी अनेक गोविंदा पथके किंवा ज्यांना आपण दहीहंडी मंडळे म्हणतो. ही पथके गोपाळकाल्याच्या आठ दहा दिवस अगोदर किंवा पंधरा दिवस अगोदर एकमेकांवर थर असल्याचे काम करत असतात.खरोखरच सर्व जाती, पंत, धर्म ,भाषा विसरून मंडळी एका छताखाली येणे.सर्वजण अतिशय आनंदाने उत्सव  साजरा करतात.खरोखरच हे आपले भारत देशातच होऊ शकते. कारण अठरापगड जाती ,धर्म ,पंथ, भाषा अशी हर तऱ्हेची  विविधता असून देखील अशा सण उत्सवांच्या वेळी मात्र सर्व भारतीय एकत्र येऊन सण उत्सव साजरे करतात हे आपल्या भारताचे मोठेपण आहे.

गोपाळकाला आणि दही हंडी | gopal kala aani dahihandi

वरील दोन पुराण कथा सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की गोपाळकाला आणि दहीकाला हे शब्दप्रयोग श्रीकृष्णाच्या काळापासून वापरले जात आहेत. आणि आज कित्येक वर्ष झाली गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सवा साजरा केला जात आहे.

गोपाळकाला सणाची मराठी माहिती पाहत असताना एका प्रश्नाकडे मी लक्ष विचलित करू शकतो ते म्हणजे बाळ गोपाळांचा प्रश्न.त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न.

बाळ गोपाळांची सुरक्षा महत्त्वाचा मुद्दा

ज्यावेळी खूप उंचा वरती दहीहंडी त्यावेळी मात्र पथकांची खरी कसोटी लागत असते. कारण मानवी शरीर किती वजन पेलू शकते अशा वेळी आठ नऊ थरांचा मनोरा तयार करणे खरोखरच अतिशय जिकरीचे असते. पथके , मंडळी अनेकदा सराव करून ती बत बघत असतात. या थरातील घातकता  एकच की यामध्ये सर्वात वरच्या थराला कमी वयाच्या मुलाला चढवले जाते,परंतु अलीकडे शासनाने थोडेसे लक्ष देऊन अतिशय लहान मुलांना उंचावरच्या थरामध्ये चढवायचे नाही असे आदेश प्राप्त झालेले आहेत. जी काही दहीहंडी पथकांनी मेहनत करायचे आहे,ती करत असताना त्यामध्ये बालगोविंदा ही पूर्वीची परंपरा होती,ती आता बदलत आहे. आणि खरोखरच ती काळाची गरज होती. कारण ज्यावेळी हे नवी मनोरे ढासळत असतात त्यावेळी जो सर्वात वरती असतो तो अतिशय वेगाने खाली पडत असतो आणि यामध्ये कित्येक बाळगोपाळांचे जीव देखील गेलेले आहेत.

गोपाळकाला उत्सव gopal kala utsav 

गोपाळकाला उत्सव आपण वर पहिल्या पद्धतीने अतिशय धुमधडाक्यात साजरा केला जातो. हजारोंच्या संख्येने बाळ गोपाळ एकत्र जमत असतत्. दिवशी सर्वत्र रंगांची उधळण केली जाते. एकमेकांच्या अंगावरती लोक गुलाल टाकतात.

आम्ही एकोप्याने राहणार आहोत अशीच जणू काही ग्वाही एकमेकांना देत असतात ,पण अलीकडे मोठी दहीहंडी पथके आणि लाखोंचे बक्षीस यामध्ये एक विचित्र अशी स्पर्धा सुरू झालेले आहे ही स्पर्धा कमी होऊन विद्यार्थ्यांचे शोषण कमी झाले लाहीजे. योग्य दिशेने नेले तर मात्र यातून खूप मोठे समाजकार्य उभे राहू शकते हे मात्र नक्की.

आजचा हा लेख गोपाळकाला मराठी माहिती आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा कमेंट करा. आवडल्यास माहिती इतरांना फॉरवर्ड करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

आमचे इतर लेख

आपण केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी या पद्धती वापरा 

वाढत्या तापमानात अशी घ्या आपली काळजी 

असे करा आपले पॅनकार्ड आधार कार्ड एकमेकांना लिंक 

बालिका दिनाची बातमी लिहा

 

 

 

 

Leave a Comment