शाहू महाराज यांची मराठी माहिती 2023 | Shahu Maharaj marathi information 2023

महाराष्ट्र ही शूर वीरांची भूमी आहे.या महाराष्ट्रामध्ये अनेक थोर व्यक्ती होऊन गेल्या अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. यापैकीच उत्तम शासनकर्ता राजा आणि समाज सुधारक म्हणून ज्यांची ओळख आहे ते राजर्षी शाहू महाराज यांची आपण या लेखातून (Shahu Maharaj marathi information 2023 ) मधून ओळख करून घेणार आहोत. 

शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराज जीवन परीचय |(toc)  Shahu Maharajancha Jivan Parichay./Shahu Maharaj marathi information 2023 

   राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला.  त्यांच्या म्हणजे shahu maharaj वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. त्यांचे आडनाव घाटगे असे होते .कोल्हापूर संस्थान चे राजे चौथे शिवाजी यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात राणी आनंदीबाई यांनी राजषी शाहू म्हणजेच पूर्वाश्रमीचे यशवंतराव घाडगे यांना दत्तक घेतले त्यावेळी राजर्षी शाहू यांचे वय होते केवळ दहा वर्षे यशवंतरावांना दत्तक घेतल्यानंतरराणी आनंदीबाई यांनी त्यांचे नाव शाहू असे ठेवले. 

राजर्षी शाहू यांच्या कार्याची ओळख | Shahu Mharaj Yanchi Karye 

                 एखाद्या व्यक्ती विषयी बोलत असताना ती व्यक्ती किती महान आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नसते. त्यांचे कार्य त्यांची ओळख करून देत असते. असेच महान व्यक्तिमत्त्व म्हणजे राजर्षी शाहू महाराज. चला तर त्यांची काही कार्य पाहूया, म्हणजे ते किती महान होते याचा परिचय आपल्याला येईल.

1. अस्पृश्यता निवारण | Asprushyta Nivarn Kayda

   राजर्षी शाहू महाराजांचा काळ म्हणजे त्या काळात जाती-पाती मोठ्या प्रमाणात मानल्या जात होत्या. त्यावेळी स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव केला जात होता. उच्च जातीतील लोक कनिष्ठ जातीतील लोकांवर अन्याय करीत होते. त्यांना कमी लेखत होते. यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी जी  अस्पृश्यता पाळली जात होती ती बंद करण्यासाठी प्रयत्न केले.ते स्वतः देखील स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव करत नव्हते थोडक्यात त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी भरपूर प्रयत्न केले. राजा असून त्यांचे हे कार्य समजाप्रति एक समानतेचा भाव प्रकट करणारे आहे. 

2. अस्पृश्यांसाठी विविध सुविधा | Asprushya Smajasathi Suvidha 

    पूर्वीच्या काळी अस्पृश्य लोकांना सार्वजनिक नळ,विहिरी,तलाव  यात पाणी भरण्यास मज्जा होता.  राजर्षी शाहू महाराज यांनी विहिरी,धर्म शाळा दवाखाने,अस्पृश्यांसाठी खुले करून दिले. त्यांनी हा देखील कधी जातीभेद पाळला नाही. जातीच्या आधारावर शाळा चालत होत्या त्या बंद केल्या व सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र शिक्षण दिले.आंतरजातीय विवाहाना समर्थन दिले.तसे अनेक विवाह त्यांनी घडवून आणले.  

 3.  आरक्षणाची सोय | Aarkshnachi Soy 

     उच्च जातीतील लोकांना शिक्षण मिळत होते. या शिक्षणाच्या जोरावर त्यांना विविध क्षेत्रात नोकऱ्या देखील मिळत होत्या. मात्र शिक्षणाच्या सुविधा नाहीत तर ब्राह्मणेतर लोक नोकरीमध्ये कसे येतील ?यावर त्यांनी चिंतन म्हणून केले व कोणत्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी असतील त्या ठिकाणी ब्राह्मणेतर लोकांना म्हणजेच कनिष्ठ वर्गातील लोकांना 50 टक्के आरक्षण राजर्षी शाहू यांनी सुरू केले. यातून त्यांची दूरदृष्टी आपल्याला पाहायला मिळते.  या आरक्षणाच्या जोरावर आज समाजात जातीभेद यावरून चे आर्थिक दरी होती ती आता कमी होऊ लागली आहे.  पण याचे सर्व श्रेय राजर्षी शाहू यांना द्यावे लागते. 

4. तलाठी पदाची निर्मिती | Tlathi Padachi Nirmiti 

   पूर्वीच्या काळी गावाचा कारभार पाहण्यासाठी कुलकर्णी पद होते.कुलकर्णी हे पद वंशपरंपरागत पद्धतीने पुढे जात होते. सहाजिकच हा कुलकर्णी वर्ग सर्वसामान्य जनतेची लूट करत होता. यावर उपाय म्हणून राजर्षी शाहू महाराज यांनी कुलकर्णी हे पद रद्द करून गावचा कारभार पाहण्यासाठी तलाठी या पदाची निर्मिती केली व जी व्यक्ती सुशिक्षित आहे अशा सुशिक्षित व्यक्तींची नेमणूक तलाठी पदावर केली. ती करत असताना आरक्षणाचा देखील विचार केला व नेमणुका केल्या. 

5. ब्राह्मणेतर चळवळ | Brahmnettr Chalval 

                    कोल्हापुरातील ब्राह्मण मंडळींनी वेदोक्त कार्य करण्याचा अधिकार राजर्षी शाहू यांचा नाकारला या घटनेने राजर्षी शाहू महाराज यांनी या ब्राह्मण वर्ग विरुद्ध ही चळवळ उभी केली त्या चळवळीला ब्राह्मणेतर चळवळ म्हणून ओळखले जाते.या चळवळीच्या माध्यमातून वेदोक्त कार्य करण्याचे प्रशिक्षण देण्याची सोय राजर्षी शाहू महाराज यांनी केली. थोडक्यात जातीच्या नावावर चाललेले शोषण राजश्री शाहू यांना मान्य नव्हते हे तितकेच खरे आहे. 

 .6. सत्यशोधक समाजाच्या कार्याला गती | Satyashodhk Smajachya Karyala Gati 

                महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाज महात्मा फुले नंतर कुठेतरी मागे पडत चालला होता. या सत्यशोधक समाजाचे पुनरूज्जीवन करण्याचे काम राजर्षी शाहू महाराजांनी केले. 1911 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजासाठी भरीव असे कार्य केले. 1913 मध्ये सत्यशोधक विद्यालयाची स्थापना त्यांनी केली

7. शेती क्षेत्रासाठी केलेल्या सुधारणा |  Sheti Kshetrasathi Kelelya Sudharna 

    शेतकऱ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज यांनी पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून अतिशय विशाल असे राधानगरी धरण बांधले. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान माहीत व्हावे शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी त्यांनी कृषी प्रदर्शने भरवायला सुरुवात केली यातून त्यांची दूरदृष्टी आपल्याला पाहायला मिळते. 

8. लोकशाही कारभाराला बळ | Lokshahi Nusar Prashasan 

                   स्वतः राजा असून देखील प्रशासनामध्ये सर्वांचा सहभाग असला पाहिजे आणि तो सहभाग असताना लोकशाही पद्धतीने त्यातील व्यक्तींची निवड झाली पाहिजे असा एक नवा विचार राजर्षी शाहू महाराज यांनी मांडला. 1919 मध्ये कोल्हापूर नगरपालिकेच्या या निवडणुका झाल्यात त्या निवडणुका लोकशाही पद्धतीने झाल्या उमेदवार उभे करत असताना आरक्षणाचा लाभ देखील त्यांना दिला गेला.  थोडक्यात काय सर्वांना सामावून घेणारी व्यवस्था त्यांना अपेक्षित होती. 

 .9. मोफत आणि सक्तीचे शिक्षण | Praathmik Shikshn Mofat Aaani Saktiche 

                      आज आपण पाहतो आपल्याकडे प्राथमिक शिक्षण मोफत आणि शक्तीचे झालेले आहे तसा कायदा देखील संमत करण्यात आलेला आहे. पण राजर्षी शाहू महाराजांनी 1918 मध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे दिले जावे याबाबत एक आदेश काढला होता जेणेकरून शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही कारण का तर माणसाच्या जीवनामध्ये बदल करायचा असेल जातीयता, अस्पृश्यता नष्ट करायचे असेल तर त्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही याची जाणीव त्यांना झाली होती. 

10 वसतिगृहांची स्थापना | Vastigruhanchi Sthapna 

                       राजषी शाहू महाराज यांनी अनेक वस्तीगृह  स्थापन केली. वसतिगृहाच्या माध्यमातून गरीब विद्यार्थी शिकू शकतात. अनेक विद्यार्थी एकत्र राहिले तर जातीभेद विसरून ते माणुसकीच्या नात्याने एकत्र येतील हा व्यापक विचार त्यामागे होता वसतिगृहामध्ये कोणत्या प्रकारचे जातिभेद पाळले जात नव्हते.  1911 मध्ये त्यांनी शिंपी समाजासाठी नामदेव वस्ती गडाची स्थापना केली. 

11. गोहत्या प्रतिबंधक कायदा | Gohtya Prtibandhk Kayda 

                       मोठ्या प्रमाणात होणारी गायींची कत्तल थांबवण्यासाठी आजच्या सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कित्येक वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराज यांनी घेतला होता त्यासाठी त्यांनी 1901 लाख गोहत्या प्रतिबंधक कायदा केला होता. यातून ते किती पुरोगामी विचारांचे होते हे लक्षात येते. 
                       थोडक्यात राजर्षी शाहू महाराज यांची कार्ये  पाहिल्यानंतर ते खरे जनतेचे राजे होते . अस्पृश्य समाजाचे कैवारी होते आरक्षणाचे पुरस्कर्ते होते,माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे असे मानणारे होते. ते राजे नव्हते तर लोकराजे होते. त्यांना जी उपमा दिली जाते ती म्हणजे  लोकराजा राजर्षी शाहू याला साजेशे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. अशा या महान व्यक्तिमत्व 6 मे 1922 रोजी अनंतात विलीन झाले. शाहू महाराज मृत्यू 6 मे 1922 ला झाला. 
                         शब्द सुमनांनी महान अशा लोकराजणा वंदन करून माझे दोन शब्द थांबतो. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह . धन्यवाद. 
 

FAQ  : प्रश्न 

 
1. शाहू महराजांचे मूळ नाव सांगा ?
  शाहू महराजांचे मूळ नाव यशवंतराव घाटगे होते. 
 
2. राजर्षी शाहू यांनी कोणाच्या शिक्षणासाठी मदत केली ?
    राजर्षी शाहू यांनी  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी मदत केली.
 
3. राजर्षी शाहू यांचा जन्मदिन कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?
   राजर्षी शाहू यांचा जन्मदिन 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. 
4. शाहू महाराज याना राजर्षी उपाधी कोणी दिली?
   कानपूरच्या कुर्मी समाजाने शाहू महाराज यांना राजर्षी ही उपाधी दिली. 

Leave a Comment