स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा घरोघरी तिरंगा उपक्रम |swatntryacha amrut mahotsav har ghar tiranga ghroghari tirnga upkram

आजच्या लेखामध्ये आपण  प्रत्येक राज्यामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्त एक आगळावेगळा कार्यक्रमकिंवा उपक्रम राबवणार आहोत .हर घर तिरंगा  अर्थात घरोघरी तिरंगा.हा उपक्रम 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये राबवायचा आहे. याबाबतची माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. ही माहिती वाचल्या नंतर हर घर तिरंगा म्हणणजेच  घरोघरी तिरंगा  हा उपक्रम यशस्वी झालाच समजा.या आजच्या लेखात शासनाच्या केवळ मार्गदर्शक सूचना आम्ही देत नाही आहोत तर घर घर तिरंगा हा मन मन तिरंगा कसा करता येईल यासाठी कोणते उपक्रम राबवता येतील याची माहिती देखील दिलेली आहे. 

 
घरोघरी तिरंगा उपक्रम
घरोघरी तिरंगा उपक्रम

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे नेमकं काय? | swatntryacha amrut mahotsav mhnje kaay ?

आपल्याला माहित असेलच की कोणत्याही गोष्टीला ज्यावेळी 75 वर्षे पूर्ण होतात.त्यावेळी तो उत्सव अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जातो. आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 साली  स्वातंत्र्य मिळाले.यावर्षी म्हणजेच 15 ऑगस्ट 2022 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणूनच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. आणि या उपक्रमांतर्गतच हर घर तिरंगा म्हणजेच काय तर घरोघरी तिरंगा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे, शासनाने यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. 

तिरंगा फडकवण्याची ठिकाणे | tirnga fadkvnyachi thikane 

हर घर तिरंगा किंवा घरोघरी तिरंगा या उपक्रमा अंतर्गत किंवा अभियानांतर्गत कोणत्या ठिकाणी राष्ट्रध्वज किंवा तिरंगा फडकवता येणार आहे. यासाठी शासनाने परिपत्रक काढलेआहे. यापूर्वी आपण जर पाहिले तर 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला  शाळा, महाविद्यालय, बँका यासारख्या ठिकाणी   राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी देण्यात येत होती परंतु यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अगदी सर्वांच्या लक्षात राहावाआणि एखाद्या सणासारखे त्याला स्वरूप त्याला प्राप्त व्हावे म्हणूनच विविध शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, त्याचबरोबर व्यक्ती आपल्या निवासस्थान किंवा इमारतीमध्ये देखील राष्ट्रध्वज फडकवू शकतात.  हा उपक्रम म्हणजेच घरोघरी तिरंगा किंवा हर घर तिरंगा होय छान कल्पना आहे की प्रत्येकाच्या घरावर तिरंगा किंवा घरोघरी तिरंगा हा उपक्रमच मुळी खूप छान आणि आगळा वेगळा असा आहे. मला तर शासन निर्णय वाचल्या पासून हा दिवस किती नयन रम्य असेल याची उत्सुक्ता लागली आहे. जिकडे पाहू तिकडे तिरंगा. शाळेची websaite,शाळेचे प्रांगण,मुलांच्या छातीवर तिरंगा,इमारती घरे सगळीकडे तिरंगा दिसेल. म्हणून घरोघरी तिरंगा हा उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचवा यासाठी हा लेख लिहीत आहे.   

 घरोघरी तिरंगा उपक्रमासाठी शासनाच्या सूचना | gharoghri tiranga ya upkrmasathi shasnachya suchna 

 

* वेबसाईटच्या टॅग लाईन वरती तिरंगा | website var tiranga

शाळा महाविद्यालये,शासकीय कार्यालये यांची जी संकेतस्थळे आहेत किंवा वेबसाईट आहेत या वेबसाईटच्या दर्शनी भागावर म्हणजे मुख्य पानावर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा लावायचा आहे. किंवा घरोघरी तिरंगा ही टॅगलाईन प्रदर्शित करायाची आहे. या सर्व गोष्टी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान करावयाचे आहेत. 

* सोशल मीडियाच्या आणि हर घर तिरंगा | social media aani har ghar tiranga 

आपण फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर अशा विविध प्रसारमाध्यमांनी जोडले गेलेलो आहोत.तर विद्यार्थी, शिक्षक,अधिकारी,इतर कर्मचारी या सर्वांनी या कालावधीमध्ये आपल्या तिरंग्या विषयी अभिमान व्यक्त करणारे, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याविषयी माहिती देणाऱ्या पोस्ट, चित्र, संदेश किंवा विडिओ  प्रदर्शित करावयाचे आहेत.म्हणजे पाहू तिकडे तिरंगा याला हर घर तिरंगा म्हणूनच नाव दिले आहे.

हर घर तिरंगा व प्रभात फेऱ्यांचे आयोजन | har ghar tiranga v prabhat feryache aayojan 

हर घर तिरंगा किंवा घरोघरी तिरंगा उपक्रम राबवत असताना उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने दिलेल्या सूचनानुसार लोकांमध्ये देखील या उपक्रमाची जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात व्हावी.या उद्देशाने प्रभात फेऱ्यांचे आयोजन करून अधिकाधिक लोकांना या उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यायचे आहे.असे केल्याने घरोघरी तिरंगा हा उपक्रम यशस्वी होण्यास मदत होईल. 

सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन | sanskritik karykram 

घरोघरी तिरंगा या उपक्रमात केवळ तिरंगा असे अपेक्षित नाही तर स्वातंत्र्य लढ्याला उजाळा ही भावना आहे म्हणूनच ,शाळा, महाविद्यालय  व त्यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य  सांस्कृतिक विभागाने देखील गाण्यांच्या,नृत्याच्या,चित्रफितींच्या माध्यमातून ,पोस्टरच्या माध्यमातून हर घर तिरंगा या उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करावयाचा आहे. 

 राष्ट्रध्वजाची म्हणजेच तिरंग्याची  उपलब्धता |  tiranga uplbdhta 

हर घर तिरंगा किंवा घरोघरी तिरंगा उपक्रम राबवत असताना राष्ट्रध्वज आपल्याला कुठून उपलब्ध होणार? असा जर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल ,तर आपल्याला  महसुल विभागामार्फत ,तसेच काही इतर विभागांमार्फत तो पुरवला जाईल. शासनाने अगोदर या विभागांना तश्या  सूचना दिलेल्या आहेत. आणि त्या सूचनानुसार राष्ट्रध्वज म्हणजे तिरंगा स्वस्त दराने राष्ट्रध्वज उपलब्ध होणार आहेत. 

 

घरोघरी तिरंगा उपक्रमाचे फोटो व्हिडिओ अपलोड | ghroghri tirnaga photo upload 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हर घर तिरंगा उपक्रम राबवत आहोत, त्या उपक्रमाच्या फोटो,चित्रफिती यांचे सांस्कृतिक विभागांतर्गत प्रदर्शन करावयाचे आहे. ते राष्ट्रीय सेवा योजना, एमसी सी ,एन सी सी या विभागांना जागृत करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत उपक्रम पोहोचवायचा आहेत. 

हर घर तिरंग महत्त्वाची सूचना |  har ghar tiranga suchna important notice 

आपण जरी सर्व  शाळा ,घर,इमारती,हॉस्टेल असा सर्व पातळीवरती हा उपक्रम राबवत असलो तरी आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान किंवा अवमान होणार नाही याची सर्वांनी जाणीव ठेवायची.शाळा महाविद्यालय, कॉलेजेस यांचे प्रमुख, कुलपती,, कुलसचिव प्राचार्य ,उपप्राचार्य मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी ,पालक असा हा संघटनात्मक उपक्रम सर्वांनी यशस्वी पार पाडायचा आहे.असे शासनाकडून  आव्हान देखील करण्यात आलेले आहे. तर आपण घरोघरी तिरंगा उपक्रम छान पार पाडूया . त्यासाठी आगाऊ तयारी म्हणून काय काय करता येईल ते थोडक्यात पाहूया. 

हर घर तिरंगा उपक्रम आपल्या शाळेत यशस्वी  उपक्रम करण्यासाठी आपण काय करू शकता|  shalet he upkarm rabva 

 

1. चित्रकला स्पर्धेचे आयोजन | chitrkala sprdha 

आपल्याला 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या राष्ट्रध्वजाचे तिरंग्याचे प्रदर्शन करायचे आहे. यासाठी तुम्ही आतापासूनच शाळेमध्ये, चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले तर—- त्या  चित्रांमधूनच क्रमांक काढून भारताच्या स्वातंत्र्यदिना दिवशी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊ शकता. त्याचबरोबर जे चित्रे जमा होतील त्या चित्रांच्या माध्यमातून प्रभात फेरीच्या वेळी चित्रे तुम्हाला उपयोगात येतील. यातून देशप्रेमाची भावना आणि कला गुणांना वाव दोन्ही साधता येईल. 

2. रांगोळी स्पर्धेचे आयोजन | ghroghri tiranga rangoli sprdha 

11 ऑगस्ट किंवा 12 ऑगस्ट या दिवशी किंवा 15 ऑगस्ट यादिवशी तुम्ही शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा आयोजित करू शकता.आणि त्या रांगोळी स्पर्धेचा विषय आपला राष्ट्रध्वज, तिरंगा हा ठेवला तर  विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीचे तिरंगे रांगोळीच्या माध्यमातून साकारतील. साहजिकच त्यांचे फोटो तुम्ही काढू शकता .आणि ते फोटो आपल्या व्हाट्सअप स्टेटसला ठेवू शकता. ते फोटो सूचना फलकामध्ये प्रकाशित करू शकता. एक प्रकारे रांगोळी स्पर्धा पण होईल. आणि दुसरीकडे तिरंग्यांचा संग्रह आपल्याला करायचा आहे. जे प्रदर्शन आपल्याला करायचे आहे त्यासाठी देखील त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. 

3. वर्ग स्तरावर वक्तृत्व स्पर्धा |  har ghar tiranga vaktrutva sprdha 

घरोघरी तिरंगा म्हणा की  हर घर तिरंगा अर्थ एकच आहे. या उपक्रमाची माहिती मुलांना मिळवायला सांगू शकता व  त्या संदर्भात वक्तृत्व स्पर्धेची  तालिम वजा वक्तृत्व स्पर्धा घेऊ शकता. यातून अधिक चित्रफिती बनतील म्हणजे vedeo बनतील. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोठे व्हिडिओ आपल्याकडे येतील. ते व्हिडिओ आपण शाळेच्या वेबसाईटच्या माध्यमातून youtube चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित करू शकता. त्याचबरोबर instagram ,facebook वर देखील त्याला प्रकाशित करू शकता. ज्यामुळे लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण होऊन इतर शाळा देखील अशा पद्धतीने उपक्रमात सहभाग घेतील. 

4. घरोघरी तिरंगा याची माहिती  परिपाठाला देणे | pripathala ghroghri tiranga babt mahiti 

आपल्या शाळेचा  परिपाठ घेत असताना भारत सरकार मार्फत केंद्र पुरस्कृत हर घर तिरंगा हा उपक्रम किंवा अभुयान याची माहिती देऊ शकता. आपल्या भारत देशाला आता स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे होत आहेत, म्हणजेच 2022 हे आपल्या स्वतंत्र्य लढ्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. हे विद्यार्थ्यांना समजावून सांगा. विद्यार्थ्यांना हे समजले तर विद्यार्थी देखील आनंदाने आणि उत्साहाने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील.म्हणजेच काय तर परिपाठातून जाणीव जागृती करा. 

5. विशेष पालक सभेचे आयोजन  | vishesh palak sabha 

शाळेमध्ये ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यामध्येच एका विशेष पालक सभेचे आयोजन करा. या पालक सभेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती याबाबत माहिती सांगत असताना,आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालेले आहेत.त्याबाबत देशांमध्ये अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या अमृत महोत्सवाची कल्पना द्या. आणि उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचे आहे. अशा सूचना द्या. आपल्या घरोघरी तिरंगा फडकवायचा आहे.  याविषयी लोकांना सज्ज करा साहजिकच एखाद्या सणाप्रमाणे स्वरूप याला यायला वेळ लागणार नाही. आणि वर म्हटल्याप्रमाणे घरोघरी तिरंगा तर असेल पण मना मनात तिरंगा जागृत ठेऊया. 

6. वर्तमानपत्रातून प्रसिद्धी  | ghroghri tiranga vartmanpatrat  agau swrupat batmi 

जर आपल्याकडे कल्पकता असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रातून शासनाचा उपक्रम किती स्वागतास पात्र  आहे,याबाबत एखादा छानसा लेख लिहून त्या लेखाचे कात्रण शाळेच्या सूचनाफलकामध्ये लावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना उपक्रमाची माहिती होईल. विद्यार्थी देखील यामध्ये खुश होऊन सहभाग घेतील. 

आयोजन  | ghroghri tiranga vada vivad sprdha 

हर घर  तिरंगा किंवा घरोघरी तिरंगा या निमित्ताने भारताचा स्वातंत्र्यलढा या विषया वरती वादविवाद स्पर्धा तुम्ही घेऊ शकता.या या  स्पर्धेतून अनेक मुद्दे बाहेर येतील, साहजिकच संपूर्ण शाळेमध्ये वातावरण हे तिरंगामाय होईल. विद्यार्थ्यांना घरी शाळेत हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा किंवा मन मन मे तिरंगा असे वातावरण करायचे आहे. हा आगळा वेगळा कार्यक्रम अवघ्या जगाला हादरवून सोडणार आहे.   

8. देशभक्तीपर सिनेमा दाखवणे | desh bhktivr aadharit movie picture 

मराठी हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये आतापर्यंत देशभक्तीवर आधारित अनेक सिनेमा आलेले आहेत त्यातील काही मोजके सिनेमे तिरंगा बॉर्डर, रंग दे .बसंती यासारखे सिनेमे तुम्ही शाळेमध्ये दाखवा विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती किंवा देशप्रेम एकदा जागृत झाले की, शासनाचा उपक्रम घरोघरी तिरंगा हरगड तिरंगा यासाठी आपल्याला वेगळे कष्ट घेण्याची गरजच लागणार नाही.

तिरंगा उपक्रम घेण्यामागील हेतू | tiranga upakram rabvnya magil hetu  

अनेकांना प्रश्न पडला असेल की यावर्षी असं नेमकं काय विशेष आहे? की घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवला जात आहे, तर हा उपक्रम राबवण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य हे असेच मिळालेले नाही आणि या स्वातंत्र्य दिनाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत तर प्रत्येक भारतीय मध्ये एक देश प्रेम किंवा देशप्रेमाची भावना वाढावी हा यामागील उद्देश आहे. 

भारतामध्ये आजादी महोत्सव का साजरा केला जात आहे  | bhartat aazadi ka mhotsav mhnje ghroghri tiranga का साजरा hotoy 

 

भारत देशाला स्वातंत्र्य व 75 वर्षे पूर्ण झालेले आहेत. आणि यालाच कुठेतरी उजाळा देण्यासाठी भारतामध्ये आजादी का अमृत महोत्सव राबवला जात आहे. 

घरोघरी तिरंगा किंवा हर घर तिरंगा उपक्रम परिपत्रक आदेश | ghroghri tiranga har ghar tiranga priltrak aadesh 

घरोघरी तिरंगा किंवा हर घर तिरंगा उपक्रम याचे परिपत्रक आपणास हवे असल्यास खालील  शब्दावर क्लिक करा. 

घरोघरी तिरंगा GR/परिपत्रक/ शासन निर्णय   DOWNLOAD

आपण देखील हर घर तिरंगा म्हणजे, घरोघरी तिरंगा उपक्रमाला किंवा अभियानाला आपण हातभार लाऊन या कार्यक्रमाला यशस्वी बनवूया. 

आजच्या या लेखातून हर घर तिरंगा किंवा घर घर तिरंगा यापुढे जाऊन हर मन तिरंगा, हमारे दिल की धडकन तिरंगा असे म्हणून आपण प्रत्येकजण यात भाग घेऊया. भारत माता की जय. 

इतर लेख  m

Leave a Comment