11वी ऑनलाइन प्रवेश विशेष फेरी एकचे वेळापत्रक 2023 | 11th admission special round one timetable 2023 mumabi Pune nagpur nashik

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो !अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या  नियमित तीनही फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या तीनही फेऱ्यांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना आपल्या मनाप्रमाणे कॉलेजेस मिळाले नाहीत.अशा विद्यार्थ्यांसाठी आज आम्ही अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे स्पेशल राउंड जे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्या वेळापत्रका विषयी माहिती घेऊन आलेलो आहोत.हे वेळापत्रक अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या सर्वच विभागांसाठी(11th admission special round one timetable 2023 mumabi Pune nagpur nashik) एक सारखे असणार आहे. आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतला नाही. त्या विद्यार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन करून भाग 1 कसा भरावा त्याच बरोबर भाग 2 देखील कसा भरावा,अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या या विशेष फेरीचे वेगळेपण काय आहे .अशी सर्व  माहिती आपण आजच्या या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या स्पेशल राउंड एकचे वेळापत्रक पाहताना सविस्तरपणे पाहणार आहोत.

(latest news announced the schedule of special round 1 of eleventh online admission. We have come with the information about that time table. This time table is going to be the same for all sections of eleventh online admission process (11th admission special round one timetable 2023 mumabi pune nagpur nashik).

11वी ऑनलाइन प्रवेश स्पेशल फेरी एकचे वेळापत्रक 2023
11वी ऑनलाइन प्रवेश स्पेशल फेरी एकचे वेळापत्रक 2023

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 | विशेष फेरी म्हणजे काय?What is 11th Online Admission 2023 Special Round?

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये नियमित तीन फेऱ्या झाल्या आणि आता या  विशेष फेऱ्यांना सुरुवात झाली आहे.  अनेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडू शकतो की, अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या विशेष फेऱ्या अर्थात स्पेशल राउंड म्हणजे काय ? तर विद्यार्थी मित्रांनो अकरावी प्रवेशाचे असे राऊंड की ज्या राऊंडमध्ये या अगोदर वेगवेगळ्या आरक्षणाचा विचार केला जात होता आणि विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता परंतु या विशेष फेऱ्यांमध्ये कोणत्याही आरक्षणाचा विचार न करता विद्यार्थ्यांनी जे गुण मिळवले आहेत अर्थात मेरिट च्या आधारे विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळणार आहेत. ज्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त गुणांची टक्केवारी असेल अशा विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कॉलेज मिळण्याची संधी म्हणजे हे स्पेशल राउंड आहेत.

अकरावी ऑनलाइन प्रवेश स्पेशल राउंड का घेतले  जातात | Why 11th Online Admission Special Rounds Are Conducted

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना तात्काळ आपला प्रवेश निश्चित करून अकरावीची कॉलेजेस लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी नियमित फेऱ्यानंतर हे स्पेशल राउंड घेतले जातात.

अकरावी ऑनलाइन प्रवेश स्पेशल राउंड चे विशेष वेगळेपण | Special distinction of 11th online admission special round

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या या विशेष राऊंडचे वेगळेपण म्हणजे आपण वर पाहिल्याप्रमाणे यामध्ये कोणतेही आरक्षण नसेल त्याचबरोबर या अगोदर पहिल्या पसंती क्रमाचे कॉलेज मिळाल्यानंतर त्याला जर प्रवेश घेतला नाहीतर पुढील राऊंडला प्रतिबंधित करण्याची जी अट होती ती अट देखील या विशेष राहुल साठी लागू असणार नाही.

अकरावी ऑनलाइन प्रवेश विशेष फेरी सविस्तर वेळापत्रक | 11th Online Admission Special Round Detailed Schedule

 

1. अकरावी ऑनलाइन  प्रवेश विशेष फेरी एक साठी भाग 1&2 भरण्यासाठी कालावधी |Period to fill Part 1&2 for 11th Online Admission Special Round One

आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आपले रजिस्ट्रेशन केले नाही त्याचबरोबर आपल्या अर्जाचा भाग एक देखील भरला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना या स्पेशल राउंड मध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक 17 जुलै 2023 ते 20 जुलै 2023 या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाचे रजिस्ट्रेशन त्याचबरोबर भाग एक आणि भाग दोन भरावयाचे आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रिया रजिस्ट्रेशन आणि भाग एक भरण्यासाठी आम्ही स्वतंत्र लेख दिलेला आहे हा पाहून आपण तात्काळ आपला भाग एक भरून घ्यावा यासाठी आमचा खालील लेख आपण वाचू शकता.

अकरावी ऑनलाइन प्रवेश विशेष  फेरी 1 साठी  भाग 2 अर्थात पसंती क्रम कसा भरावा | How to fill Part 2 ie Preference Order for XIth Online Admission Special Round 1

आपल्याला अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या विशेष फेरी 1 मध्ये आपल्याला आपले पसंतीक्रम अर्थात ऑप्शन फॉर्म भरायचे असतील तर ते ऑप्शन फॉर्म कसे भरायचे ? यासाठी आपण या संदर्भात आम्ही एक डेमो लेख दिलेला आहे तो पाहून अगदी आपण बिनधास्तपणे आपला अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरू शकता.

आता आपल्या लक्षात आले असेल की ,आपल्याला अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सुरुवातीला आपले रजिस्ट्रेशन करून भाग एक आणि भाग दोन भरावयाचा आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेश स्पेशल राऊंड एकसाठी  साठी महत्वाची सूचना |Important Notice for 11th Online Admission Special Round One

या अगोदर झालेल्या तीनही नियमित फेऱ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळाला नाही.अशा विद्यार्थ्यांना आपोआपच आपण भरलेल्या ऑप्शन फॉर्म च्या आधारे दुसऱ्या फेरीसाठी विचार केला जात होता.ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये देखील प्रवेश मिळाला नाही आणि त्या विद्यार्थ्यांनी आपला ऑप्शन फॉर्म यामध्ये कोणताही बदल केला नाही,तरी त्यांचा देखील विचार नियमित फेरी अर्थात Rgular round 3 साठी विचार केला गेला होता.परंतु या अकरावी प्रवेशाच्या स्पेशल राउंड साठी आपल्याला आपल्या अर्जाचा ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तो ऑप्शन फॉर्म लॉक करणे गरजेचे आहे अन्यथा आपल्या अर्जाचा स्पेशल राउंड मध्ये विचार केला जाणार नाही. तरी विद्यार्थ्यांना आम्ही विनंती करतो की या स्पेशल राउंड मध्ये आवर्जून आपल्या अर्जाचा भाग एक आणि भाग दोन लॉक करावा.

अकरावी ऑनलाइन प्रवेश स्पेशल राउंड एक गुणवत्ता यादी जाहीर करणे | Announcing a Merit List for Eleventh Online Admission Special Round

11वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक फेरीमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. जेणेकरून विद्यार्थ्यांना या गुणवत्ता यादीतील आपले स्थान कोणत्या क्रमांकावर आहे हे समजावे. परंतु बरेच विद्यार्थी आपले गुणवत्ता यादीतील स्थान कोणते आहे हे समजून घेत नाहीत आणि आपले कॉलेजेस निवडत असतात यासाठी विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आपल्याला जर आपल्या पसंती क्रमांका मध्ये काही बदल करावयाच्या असतील तर विद्यार्थ्यांनी ते करणे गरजेचे आहे. यासाठीच ही गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. अकरावी ऑनलाइन प्रवेश विशेष फेरी एक  ची गुणवत्ता यादी २१ जुलै 2023 ते 23 जुलै 2023 या कालावधीमध्ये अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाई। 

अकरावी ऑनलाइन प्रवेश विशेष फेरी 1 कॉलेजची यादी कधी जाहीर होणार | When will the 11th  online admission special round 1 college list be announced

ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या स्पेशल राउंड एक साठी आपला ऑप्शन फॉर्म भरलेला आहे. अशा विद्यार्थ्यांना कोणते कॉलेज मिळाले .या संदर्भात त्यांच्या मोबाईल वरती एसएमएस येऊ शकतो. काही कारणास्तव एसएमएस आला नाही तर असे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने आपल्याला कोणते कॉलेज मिळाले ते चेक करू शकतात.ते कसे चेक करायचे या संदर्भात आम्ही एक स्वतंत्र लेख लिहिलेला आहे तो आपण लगेचच वाचून घ्या म्हणजे प्रवेशाच्या वेळी आपल्याला अडचण येणार नाही.अकरावी ऑनलाइन प्रवेश स्पेशल राउंडमध्ये विद्यार्थ्यांना कोणते कॉलेज मिळाले हे 24 जुलै 2023 रोजी जाहीर केले जाईल.

अकरावी ऑनलाइन प्रवेश स्पेशल राउंड एकसाठी प्रत्यक्ष कॉलेजला प्रवेश घेण्याच्या तारखा | Actual College Admission Dates for 11th Online Admission Special Round One

ज्या विद्यार्थ्यांचा या पहिल्या विशेष फेरीमध्ये प्रवेश निश्चित झालेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन निश्चित करावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांनी दिनांक 24 जुलै 2023 ते 27 जुलै 2023 या कालावधीमध्ये संबंधित महाविद्यालयाला भेटून आपला प्रवेश निश्चित करावयाचा आहे. अकरावी प्रवेशासाठी संबंधित महाविद्यालयाला भेट देण्यासाठी गेल्यानंतर काही कागदपत्रे आपल्याजवळ असणे आवश्यक आहे ती कागदपत्रे कोणती यासाठी आम्ही दिलेला एक स्वतंत्र लेख आपण पहावा आणि आपला प्रवेशाचा मार्ग सुकर करून घ्यावा.

अकरावी ऑनलाइन प्रवेश स्पेशल राउंड एक आपला प्रवेश पक्का करण्यासाठी या बाबी आठवणीने करा |11th Online Admission Special Round One Keep these things in mind to ensure your admission

ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला हवे ते कॉलेज मिळालेले आहे आणि त्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिन मध्ये जाऊन proceed for admission यावरती क्लिक करून आपला प्रवेश निश्चित करावा. त्याचबरोबर लागणारी आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.

विशेष फेरी एक महत्वाचे वेगळेपण | An important distinction of special rounds

या अगोदर झालेल्या फेऱ्यांमध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या पसंती क्रमाचे कॉलेज मिळून, त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही तर अशा विद्यार्थ्यांना त्या पुढील फेरीसाठी प्रतिबंधित केले जात होते.

उदाहरणार्थ 

एका विद्यार्थ्याला त्याने भरलेल्या ऑप्शन फॉर्ममध्ये जे पहिल्या क्रमांकाचे कॉलेज होते ते मिळाले परंतु त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा नाही.अशा विद्यार्थ्याला दुसऱ्या फेरीसाठी प्रतिबंधित केले जात होते.

या विशेष फेऱ्यांमध्ये प्रथम पसंती क्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला अथवा प्रवेश रद्द केल्यास अशा विद्यार्थ्यांना यापुढील कोणत्याही फेरीमध्ये प्रतिबंधित केले जाणार नाही असा हा महत्त्वाचा बदल विद्यार्थ्यांनी लक्षात यावा.

परंतु आम्ही आपल्याला आवाहन करतो की, आपण पसंती क्रम भरत असतानाच अतिशय विचारपूर्वक भरावेत. ज्या  महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आहात. त्याचबरोबर त्या महाविद्यालयाचे कट ऑफ आणि आपल्याला मिळालेले मार्क त्यांचादेखील विचार करून ऑप्शन फॉर्म भरला तर अशा अडचणी येत नाहीत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.आपण आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा, कारण या अगोदर तीन राउंड पूर्ण झालेले आहेत आणि अजून देखील आपल्याला प्रवेश मिळाला नाही यामुळे विद्यार्थ्यांनी आपला पसंती क्रम विचारपूर्वक भरावा आणि आपले प्रवेश निश्चित करावेत.

11वी ऑनलाइन प्रवेश विशेष  फेरी एकचे वेळापत्रक 2023 pdf|11th admission special round one timetable 2023 mumabi Pune nagpur nashik pdf 

विशेष फेरीचे वेळापत्रक पाहण्यासाठी खालील पीडीएफ आपण पहा यात सर्व माहिती दिलेली आहे. 
 

आमचे इतर लेख 

आमचे इतर लेख

Leave a Comment