लोकमान्य टिळक सूत्रसंचालन जयंती / पुण्यतिथि 2023 सूत्रसंचालन lokmanya tilak sutrsanchalan jayanti punyatithi 2023

आज आपण लोकमान्य टिळक विशेष लेखमालेत आपण आज लोकमान्य टिळक जयंती / पुण्यतिथि सूत्रसंचालन 2023 पाहणार आहोत.

लोकमान्य टिळक यांना सर्वांगाने समजून घेण्यासाठी आपण लोकमान्य टिळक संपूर्ण मराठी माहिती पहिली यात त्यांचे बालपण तसेच  संपूर्ण जीवनपट उलघडून दाखवला.तर दुसऱ्या एका लेखात आपण  लोकमान्य टिळक निबंध आणि भाषण  यातून त्यांचे राष्ट्रप्रेम अनुभवले तर लोकमान्य टिळक यांनी जे तत्वज्ञान मांडले. यासाठी आपण लोकमान्य लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी विचार स्पष्टीकरणांसाह पहिले.आज सूत्रसंचालनाचा  एक नमूना पाहणार आहोत जी  आपल्याला lokmanya tilak sutrsanchalan jayanti punyatithi 2023 साठी कामी येईल. 

 

आज आपण लोकमान्य टिळक यांची जयंती किंवा पुण्यतिथि किंवा स्मृतिदिना निमित आपल्याला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किंवा लोकमान्य टिळक कार्यक्रम निवेदन यासाठी मदत व्हावी या हेतूने  लोकमान्य टिळक जयंती पुण्यतिथि सूत्रसंचालन2023आज पाहत आहोत आजचा लोकमान्य टिळक सूत्रसंचालन हा लेख सूत्रसंचालन करताना आपल्याला नक्कीच मदत करेल. 

 आपल्याला lokmanya tilak sutrsanchalan jayanti punyatithi 2023

तुम्हाला उत्तम सूत्रसंचलन करायचे असेल तर अगोदर कोणताही कार्यक्रम असो शाळा प्रवेश उत्सव ,गुरुपौर्णिमा  कार्यक्रम कसा पुढे जाणार आहे हे लक्षात घेऊन आपली स्क्रिप्ट तयार करा आजचा विषय  लोकमान्य टिळक जयंती /  पुण्यतिथि सूत्रसंचालन घेतला तर कोणत्या क्रमाने हा कार्यक्रम पुढे जाणार याचा आराखडा तयार करा जसे की 

  lokmanya tilak jayanti punyatithi sutrsanchalan 2023 असे करा 

 
 

टिळक जयंती सूत्रसंचालन टप्पे sutra sanchalan tappe 

 

सर्वांचे स्वागत 

 

अध्यक्ष स्थान आणि परवानगी

 

मान्यवर मंडळींना व्यासपीठावर विराजमान (अध्यक्ष ,पाहुणे 

  

दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन 

 

पाहुणे परिचय आणि स्वागत 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक 

 

मुख्य कार्यक्रम (भाषणे,विविध स्पर्धा,मनोगते )

 

प्रमुख पाहुणे मार्गदर्शन 

 

अध्यक्ष मार्गदर्शन 

 

आभार 

 

सांगता – पसायदान /राष्ट्रगीत 

 

हा क्रम लोकमान्य टिळक जयंती /  पुण्यतिथि सूत्रसंचालन करत असताना लक्षात ठेवा. यात थोडाफार बदल देखील करू शकता.  कार्यक्रमाच्या आधीपासूनच सर्व माहितीची जुळवाजुळव क्रम डोक्यात असू द्यावा.म्हणजे ऐनवेळी गडबड होत नाही. उत्तम सूत्रसंचालक कोण ?तर जो कार्यक्रमाच्या अगोदर आपली स्क्रिप्ट तयार करून ठेवतो मी आपणास आज लोकमान्य टिळक जयंती /  पुण्यतिथि सूत्रसंचालन निमित्त एक नमूना देत आहे यात आपण अधिकची भर घालून छान सूत्रसंचालन करू शकता. चला तर मग मुख्य विषयाकडे वळूया. 

 

 

लोकमान्य टिळक जयंती /  पुण्यतिथि सूत्रसंचालन 2023   lokmanya tilak jayanti punyatithi sutrsanchalan 2023

 

कार्यक्रम सुरुवात karyakaram  suruvat  

 

आगतम स्वागतम सुस्वागतम!

 स्वागतम स्वागतम सुस्वागतम!

 

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. असे छातीठोकपणे ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगणारे , राष्ट्रभक्ती म्हणजे टिळक आणि टिळक म्हणजे राष्ट्रभक्ती असे समीकरण भारताच्या इतिहासात निर्माण करणाऱ्या, थोर देशभक्तास म्हणजे केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांच्या जयंती / पुण्यतिथी निमित्त मी अ ब क सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. 

 

अध्यक्ष निवड अध्यक्ष निवड adhyaksh nivad 

आजच्या या लोकमान्य टिळक जयंती/ पुण्यतिथी /स्मृतिदिन  कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे मी ——अबक  स्वागत करतो. तसेच अपार त्याग आणि मेहनत यांच्या बळावरती आपल्या संस्थेला उच्च शिखरावर घेऊन जाणारे श्री ———- यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे. 

 

मान्यवर स्थानापन्न करणे  manyavr sthanapan karane 

 

अध्यक्ष स्थान ग्रहण 

मंजिल जरूर मिलती है I

इरादे बुलंद होने चाहिए I

यानुसार आपली कार्यशैली असणारे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री—- अबक यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. अशी मी त्यांना विनंती करतो. 

 

प्रमुख पाहुणे आगमन 

असं म्हणतात, 

जे न देखे  रवी I

वह देखे  कवी I

 

असेच दूरदृष्टी लाभलेले प्रचंड ज्ञानी आणि आपल्या ज्ञानाच्या जोरावर आपली किर्ती  साता समुद्रा पल्याड  घेऊन जाणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री———- यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो. 

 (इतर मान्यवर असतील तर त्यांच्या देखील थोडक्यात परिचय करून व त्यांचे कार्यकर्तृत्व सांगून त्यांना स्थान आपण करावे त्यासाठी अगोदरच माहिती मिळवावी)

 कार्यक्रमविषयी (थोडक्यात बोलावे)

आज आपण लोकमान्य टिळक यांच्या जयंती / पुण्यतिथी कार्यक्रमासाठी एकत्रित जमलेलो आहोत. ज्या माणसाचे नाव जरी घेतले तरी तो विशाल काय देह आणि 

 

”स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे 

आणि तो मी मिळवणारच .’

 

हे वाक्य आठवल्याशिवाय राहत नाही असे लोकमान्य टिळक व  त्यांचे कार्य अवघ्या भारत देशासाठी असलेले त्यांचे  योगदान यांना कुठेतरी उजाळा देण्यासाठी आपण आज एकत्र जमलेलो आहोत.सर्व  सन्माननीय व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत. आता  आपण हळूहळू कार्यक्रम पुढे घेऊन जाऊया. 

 

दीप प्रज्वलन आणि प्रतिमापूजन dip prajvalan aani pujan 

आजच्या या लोकमान्य टिळक जयंती  पुण्यतिथी किंवा स्मृतिदिन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करून  विद्येची देवता सरस्वती तिचे पूजन करावे. व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला हार घालून वंदन करावे व आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. 

 

एक दिवा पेटला तर ज्योत तयार होते

हजारो दिवे पेटले तर मशाल तयार होते

लाखो दिवे पेटले तर अंगार तयार होतो.

 

असेच काहीसे कार्य करणाऱ्या लोकमान्य टिळक यांना स्मरण करून मान्यवरांनी दीपप्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. दीपप्रज्वलना नंतर सरस्वती पूजन देखील करावे. 

 

( यूट्यूब च्या माध्यमातून किंवा गायक मंडळी उपस्थित असतील तर सरस्वती वंदना घ्यावी)

 

 

व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय आणि स्वागत manyavr parichay swagat 

लोकमान्य टिळक जयंती सूत्रसंचालन करताना मी आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती विराजमान असलेले मान्यवर यांचे शब्द सुमनांनी स्वागत तर झाले आता  पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सुहास्य वदनांनी स्वागत करूया.  चला तर मग मान्यवरांसाठी होऊ द्या जोरदार टाळ्या. 

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वागत अध्यक्षांचे स्वगत 

आजचे आपल्या लोकमान्य टिळक जयंती पुण्यतिथी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अध्यक्ष अ ब क यांचे स्वागत आपल्या शाळेतील श्री यांनी करावे. 

 

प्रमुख पाहुणे यांचे स्वागत 

 

सन्मा. पाहुणे यांचे स्वगत श्री ——— यांनी करावे. 

 

टिळक जयंती /पुण्यतिथि सूत्रसंचालन प्रास्ताविक prastavik 

पुस्तकाची अनुक्रमणिका पाहिले की,

 पुस्तकात काय दडले आहे हे कळते,

आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय हे,

 प्रस्ताविकातून कळते. 

चला तर मग मी श्री अबक—- यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. 

 

प्रस्ताविकातून काय बोलावे ? 

भारताला संपूर्ण स्वराज्य मिळालेच पाहिजे. यासाठी माझा जीव गेला तरी बेहतर.  असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे ,स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच!अशी सिंहगर्जना करणारे,बाणेदार व्यक्तिमत्व म्हणजे केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक होय. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहावीत.असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. राष्ट्रभक्ती काय असते?  हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये पोहोचवणारे निडर व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकमान्य टिळक. तर अशा या महान व्यक्तिमत्त्वाच्या जयंती/ पुण्यतिथी निमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत मी श्री अबक—- आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो. 

 

लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये स्वाभिमानाची भावना वाढीस लागली होती. त्यांच्यामधील स्वाभिमान सांगत असतानाचा एक कीसा सांगतो एके दिवशी लोकमान्य टिळक शाळेमध्ये गेले असताना वर्गातील विद्यार्थ्यांनी मधल्या सुट्टीमध्ये भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या आणि त्या शेंगांची सर्व टरफले वर्गामध्ये इकडे तिकडे फेकली. मधल्या सुट्टीनंतर ज्यावेळी गुरुजी वर्गामध्ये आले आणि त्यांनी वर्गामध्ये हा कचरा कोणी केला?  अशी दरडाऊन विचारणा केली. वर्गातील कोणीही सांगायला तयार होईना, हे पाहून आता मी संपूर्ण वर्गाला शिक्षा करणार!अशी तंबी दिली. वर्गातील मुलांना गुरुजी छड्या देऊ लागले लोकमान्य टिळकांचा नंबर येताच त्यांनी हात पुढे केला नाही.त्यांनी  गुरुजींना सांगितले मी छडया  घेणार नाही. मी टरफले देखील उचलणार नाही. कारण मी शेंगा खाल्लेले नाहीत. आणि मी टरफले का उचलू ? गुरुजी देखील त्यांच्याकडे पाहतच राहिले. या प्रसंगातून टिळकांच्या मधील  निडरपणा स्वाभिमान या गुणांचे आपल्याला जाणीव होते. 

 

लोकमान्य टिळक यांनी आपले पुढील शिक्षण पुणे या ठिकाणी डेक्कन कॉलेजमध्ये पूर्ण केले लोकमान्य टिळकांनी राजकीय सुधारणे बरोबर सामाजिक सुधारणा देखील मोलाचे योगदान दिले शिवजयंती गणेशोत्सव यासारखे उत्सव सुरू केले राजगृहाच्या आरोपाखाली त्यांना सहा वर्षांची शिक्षा देखील झाली अशा या लोकमान्य टिळकांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त आपण आजच्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलेलो आहोत यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे आणि मान्यवरांचे मार्गदर्शन होईल एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक थांबवतो

 

मुख्य कार्यक्रम 

आपण ज्या पद्धतीने नियोजन केले असेल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांची भाषणे, शिक्षकांची भाषणे, नृत्य गाणी किंवा इतर स्पर्धा याविषयी माहिती द्यावी. ही आपापल्या नियोजनाप्रमाणे असणार आहे.

विद्यार्थ्यांच्या भाषणाचा आस्वाद घेतल्यानंतर आता आपण आतुर झाला असाल की आपल्याला कोणी थोडा मोठ्यांनी मार्गदर्शन करावे चला तर मग प्रमुख पाहुणे भाषणाचा आनंद घेऊ या.

 

प्रमुख पाहुणे यांचे मार्गदर्शन  

आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे श्री अ ब क यांनी यांनी मार्गदर्शन करून मंत्रमुग्ध करावे 

स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात,

 देह झिजला लोकमान्यांचा,

त्यांच्याच कार्यक्रमा निमित्त,

आम्हा बाळगोपाळांना,

 मार्गदर्शन करण्याचा मान  प्रमुख पाहुण्यांचा. 

 

(प्रमुख पाहूणे यांनी  मार्गदर्शन केल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनातील ठळक बाबी सूत्रसंचालन करताना बोलाव्यात.) 

 

टिळक जयंती अध्यक्षीय भाषण adhyakshiy bhashan 

 

जोडण्यासाठी हात हवे,

रुसण्यासाठी मित्र हवे,

जगण्यासाठी बळ हवे,

आणि आमच्या जीवनाला,

 योग्य दिशा मिळण्यासाठी,

कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे मार्गदर्शन हवे. 

 

होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या —– आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष  ज्ञानाचा सागर नि  अनुभवाचा डोंगर असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व श्री —– यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय  भाषण करावे.

 

टिळक जयंती /पुण्यतिथि आभार aabhar pradrshan 

फुलांमुळे बागेला शोभा आली,

 श्रोत्यांमुळे आजच्या कार्यक्रमाला रंगत आली,

 आजच्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनामुळे,

 कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली,

 चला चला आता आभार प्रदर्शनाची वेळ झाली. 

 बरोबर ना. घडयाळ हे  कोणासाठीच थांबत नाही,म्हणजेच वेळ कधी कुणासाठी कसी थांबेल.बघा ना पाहता पाहता दोन तास कसे गेले ते कळलेच नाही. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवरांनी जे मार्गदर्शन केले. ते निश्चितच आम्हाला जीवन जगत असताना कामी येईल. आजच्या या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपल्या विनंतीला मान दिला आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून मी अ ब क——- सर्वांचे आभार मानतो.

 

 लोकमान्य टिळक जयंती कार्यक्रमाची सांगता 

कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम,राष्ट्रगीत किंवा पसायदान यापैकी कोणत्या एकाची निवड करावी. अध्यक्षांच्या  परवानगीने मी कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. 

आजचे लोकमान्य टिळक जयंती पुण्यतिथि स्मृतीदिन सूत्रसंचालन कसे वाटले हे कमेन्ट करून सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह  धन्यवाद !

 आमचे हे लेख जरूर वाचा ——– 

 
 
 

 

 

 

Leave a Comment