लोकमान्य टिळक प्रेरणादायी सुविचार Lokmanya Tilak Inspiring Thoughts

नमस्कार ! आजच्या या लेखामध्ये आपण एक महान व्यक्तिमत्त्व लोकमान्य टिळक यांचे  काही प्रेरणादायी सुविचार पाहणार आहोत.हे Lokmanya Tilak Inspiring Thoughts आपण त्यांच्या जयंती पुण्यतिथि कार्यक्रमात वापरू शकता. मित्र मैत्रिणी यांना पाठवू शकता. 
 
 
लोकमान्य टिळक या महान व्यक्तीमत्वाला समजून घेतानाआपण मागील लेखात लोकमान्य टिळक यांची संपूर्ण माहिती पहिली त्यातून त्यांच्या देशभक्तीची कल्पना आली. तर लोकमान्य टिळक निबंध आणि भाषण  पाहत असताना आपण पाहिले की त्यांनी आपल्या  गुरुजींना दिलेले उत्तर विचार करायला लावणारे आहे. “मी शेंगा खाल्या नसतील तर  मी शेंगाची  टरफले  उचलणार नाही.” यातून त्यांचा निडरपणा  दिसतो.तर लोकमान्य टिळक यांच्या निबंधातून त्यांच्या ठळक कार्याचा आढावा घेतला.
 
 
आजच्या या विशेष लेखातून आपण लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार व त्यांची काही सुवचने म्हणजेच सुविचार आपण आजच्या लेखात स्पष्टीकरणसह बघणार आहोत.ज्यातून आपल्याला लोकमान्य टिळक यांची अधिकची माहिती मिळेल. चला तर मग लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार म्हणजेच motivatioanal thaought किंवा tilak marathi QUOTES बघूया.
 
 
लोकमान्य टिळक सुविचार(toc)  
 
 

लोकमान्य टिळक प्रेरणादायी सुविचार2023
लोकमान्य टिळक प्रेरणादायी  सुविचार
 
 

लोकमान्य टिळक प्रेरणादायी विचार 2023 Lokmanya Tialk Prernadayi Vichar/ tilak marathi QUOTES Lokmanya Tilak Inspiring Thoughts

आजच्या लेखातून लोकमान्य टिळक यांचे सर्वच्या सर्व प्रेरणादायी विचार न घेता काही मोजके पण महत्वाचे म्हणजेच लोकमान्य टिळक 10 प्रेरणादायी विचार आपण पाहणार आहोत. लोकमान्य टिळक यांचे हे प्रेरणादायी विचार मुलाना समजावेत म्हणून त्यांचा अर्थ देखील स्पष्ट केला आहे . 
 
 

टिळकांचे 10 प्रेरणादायी सुविचार  tilak 10th marathi quotes  

 

1. लोकमान्य टिळक प्रेरणादायी विचार एक 

 

“ज्या ठिकाणी बुद्धीचे क्षेत्र संपते त्या ठिकाणी श्रद्धेचे क्षेत्र सुरू होत असते. लोकमान्य टिळक यांचा पहिला प्रेरणादायी विचार.”
 
लोकमान्य टिळक यांच्या या  प्रेरणादायी विचारातून आपण अंधश्रद्धाळू असले पाहिजे असे कुठेच म्हणत नाहीत, तर ज्या ठिकाणी विज्ञान तंत्रज्ञान किंवा जिथे माणसाची बुद्धी संपते तिथून पुढे श्रद्धेच्या ठिकाण सुरू होत असते. याचाच अर्थ कोणतेही कार्य आपल्याला करायचे असेल, तर ते श्रद्धेने केले तर त्या कार्यामध्ये यश हे आपल्याला मिळतेच. आणि खरोखरच लोकमान्य टिळकांचा हा प्रेरणादायी विचार खूप काही सांगून जाणार आहे. आपण कोणतेही काम करत असू ते काम करत असताना त्या कामावरती जर आपली श्रद्धा असेल तर निश्चितच त्या कामांमध्ये यश आपल्याला मिळते. 
 
 

2.  लोकमान्य टिळक प्रेरणादायी विचार दोन 

 

“भारतामध्ये असणारी गरिबी याला कारण भारतातील राजकारण आहे. टिळकांचा दूसरा महत्वाचा प्रेरणादायी विचार” 
 
लोकमान्य टिळक यांच्या असे मत होते की राजकारण हे समाजकारण असले पाहिजे. परंतु भारतीय राजकारणामध्ये समाजकारणापेक्षा स्वार्थ हा त्यांना भारताला स्वातंत्र्य मिळण्या अगोदर देखील दिसला होता. आज जर आपण आपल्या राज्यातील, देशातील परिस्थिती पाहिली तर लोकशाहीला किती मारक सर्व चित्र दिसत आहे, याची आपल्याला कल्पना येते. थोडक्यात लोकमान्य टिळक यांचा हा प्रेरणादायी विचार आजच्या राजकारणावरती भाष्य करतो असेच म्हणावे लागेल. आजकाल जनतेच्या प्रश्नापेक्षा नेत्यांना स्वतःचा फायदा दिसत आहे म्हणून पक्ष,तत्वे या बाबी मागे पडत आहेत.
 

3.  लोकमान्य टिळक प्रेरणादायी विचार तीन  

“आपण उत्सवाशिवाय जगू शकत नाही. उत्सवावर प्रेम करणे हा मानवी स्वभाव आहे. आपण आपले सण जपले पाहिजेत. टिळकांचा तिसरा महत्वाचा प्रेरणादायी विचार” 
 
खरोखरच हा लोकमान्य टिळकांचा विचार आपल्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला दिशा देणारा ठरला आहे. म्हणूनच टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती यासारखे उत्सव साजरेकरायला सुरुवात केली  आणि त्यातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकमानस तयार केले. लोकांना आपण पारतंत्र्यात आहोत याची जाणीव करून दिली. 
 

4. लोकमान्य टिळक प्रेरणादायी विचार चार 

 

“आमच्याकडे सामर्थ्य आहे हे सिद्ध करेपर्यंत आमच्या तक्रारी ऐकण्यासाठी कोणालाही वेळ नाही. टिळकांचा चौथा  महत्वाचा प्रेरणादायी विचार” 
 
लोकमान्य टिळक म्हणतात, आपल्याजवळ ज्या क्षमता आहेत किंवा सामर्थ्य आहेत. त्यांचा आपण जोपर्यंत पूर्ण उपयोग करत नाही. तोपर्यंत आपल्या अडचणी कोणीही जाणून घेणार नाही. थोडक्यात काय कोणत्याही क्षेत्रामध्ये जा त्या ठिकाणी आपण प्रामाणिक असणे अतिशय गरजेचे आहे तरच आपल्याला किंमत प्राप्त होते. असे लोकमान्य टिळक सांगत आहेत.
 

 5″महान कार्य कधी सोपी नसतात आणि सहज होणारी कार्य कधीही महान नसतात. टिळकांचा पाचवा  प्रेरणादायी विचार” 

लोकमान्य टिळकांचा हा प्रेरणादायी विचार खरोखरच मनाला भावनारा आहे, ते म्हणतात की कोणतेही मोठे कार्य कधीच सोपे नसते आणि जर आपण सोप्या कार्यामध्ये समाधान मानणारे  असू तर ते कार्य कधीच महान किंवा आगळे वेगळे म्हणून ओळखले जाणार नाही. म्हणूनच जे कार्य करायचे असेल ते कार्य पूर्ण करेपर्यंत थांबू नका. खरोखरच लोकमान्य टिळकांचे Tilak Marathi QUOTES  विचार आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहेत हे नक्की. 
 

6. “माझा जन्म स्वतंत्र भारतात झाला असता तर मी गणिताचा प्राचार्य बनवून संशोधन कार्य केले असते.Tilak Marathi QUOTES 6th”

लोकमान्य टिळक यांना आपल्या देशासाठी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर नवीन काहीतरी द्यायचे होते, परंतु आपला देश पारतंत्र्यात असल्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे, लोकांमध्ये राष्ट्रीयता निर्माण करणे यालाच त्यांनी प्राधान्य दिले.समजा जर आपला भारत देश स्वतंत्र असता तर त्यांनी काय केले असते?हे सांगताना  हा विचार त्यांनी इथे बोलून दाखवला आहे.
 

7. “तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल. गोनपाटासारखा कराल—-  तर त्यातून परमेश्वर कसा बरं दिसेल ? Tilak Marathi QUOTES 7th”

लोकमान्य टिळक या प्रेरणादायी विचारात असे म्हणतात,की जर आपले कर्म चांगले नसेल तर आपल्याला परमेश्वर कधीच दिसणार नाही. त्यासाठी आपले कर्म हे चांगले असले पाहिजेत.सांग कर्म असले पाहिजेत. म्हणजेच लपवाछपवी लबाडी करणारी कर्म नकोत. थोडक्यात लोकमान्य टिळकांनी  कर्म सिद्धांतावर लक्ष द्यायला सांगितले आहे.  
 

 8.”जर आपण प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यावर दगडफेक केली तर आपण कधीही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही.लोकमान्य टिळक प्रेरणादायी विचार क्रमांक 8″ 

जर जीवनात आपल्याला आपले ध्येय साध्य करायचे असेल तर आपण आपल्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणींकडे लक्ष न देता पुढे चालले पाहिजे. हे समजावताना टिळक कुत्र्याचे उदाहरण देतात. म्हणजेच काय तर आपण जर रस्त्याने प्रत्येक कुत्र्याला दगडफेक करत गेलो तर आपले काम कधीच पूर्ण होणार नाही. एक प्रकारे या प्रेरणादायी विचारातून लोकमान्य टिळक आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराअशी शिकवण देताना दिसत आहेत. 
 

9. “आई-वडील आणि गुरु यांसारख्या पूजनीय पुरुषांची उपासना करणे आणि त्यांची सेवा करणे हा सर्वात मोठा धर्म मानला जातो.लोकमान्य टिळक प्रेरणादायी विचार 9 “

लोकमान्य टिळक या  प्रेरणादायी विचारात म्हणतात,जर खरा धर्म कोणता असेल? तर आपले आई-वडील आणि आपली गुरुजन यांची उपासना करणे व  त्यांची सेवा करणे हाच खरा धर्म आहे.
 

10.”अत्याचार करणारा जेवढा दोषी नाही तेवढा तो सहन करणारा दोषी आहे. लोकमान्य टिळक दहावा व महत्वाचा  प्रेरणादायी विचार”

लोकमान्य टिळक यांच्या मते माणसाने विनाकारण कोणाचे अत्याचार सहन करू नयेत. आणि जर तो माणूस असे अत्याचार सण करत असेल तर तो अत्याचार करणारा पेक्षा अत्याचार सहन करणारा जास्त दोषी आहे.  या ठिकाणी ते ब्रिटिश सरकारला अप्रत्यक्षरीत्या सुनावत आहेत. ब्रिटिश सरकार इथे येऊन आपल्यावरती राज्य करीत आहे. आणि आपण तो अन्याय व  अत्याचार मोकाट सहन करत असू तर आपण चुकीचे वागत आहोत.
 
 
लोकमान्य टिळकांनी असंख्य प्रेरणादायी विचार सांगितलेले आहेत परंतु त्या विचारांपैकी 10 च  प्रेरणादायी विचार आजच्या या लेखमालेतून मी मांडलेले आहेत.  हे विचार विद्यार्थ्यांनाच  नव्हे तर सर्वांनाच जीवनामध्ये उपयोगी पडणारे आहेत. सर्वांनी या विचारानुसार tialk OUOTES नुसार जर आपले जीवन व्यतीत करायला सुरुवात केली तर नक्कीच आपण लोकमान्य टिळक यांच्याप्रमाणे आपल्या कार्याचा देखील ठसा उमटवू शकतो.  गरज आहे ती लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणादायी विचार पुढे घेऊन जाण्याची. आपल्याकडे असेच काही लोकमान्य टिळक प्रेरणादायी विचार असतील तर ते कमेंट मध्ये नक्की पाठवा.या  लेखामध्ये त्यांचा समावेश केला जाईल.चला तर टिळकांचे प्रेरणादायी विचार पाहिल्यानंतर आता आपण त्यांचे सुविचार पाहूया. 
 

लोकमान्य टिळक यांचे सुविचार lokmanya tilak suvichar 

लोकमान्य टिळक यांचे काही प्रेरणादायी विचार आपण पाहिले ते पाहिल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे काही लोकमान्य टिळक यांचे सुविचार किंवा LOKMANYA TILAK QUTOES आपण पाहूया.  आणि त्यांचा अर्थ देखील थोडक्यात पाहूया.
 

टिळक महत्वाचे सुविचार tilak suvichar  

लोकमान्य टिळक यांनी शेकडो सुविचार  म्हणजे चांगले विचार सांगितले आहेत.आपण मात्र त्यातील 10 सुविचार पाहणार आहोत. चला तर मग LOKMANYA TILAK QUTOES पाहूया नि त्यांचा अर्थ देखील समजून घेऊया. 
 

1. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.tilak यांचा पहिला सुविचार 

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवणे ही माझी जशी काही जबाबदारीच आहे हे या लोकमान्य टिळकांच्या विचारातून स्पष्ट होते.
 

2. जेव्हा लोखंड गरम असेल तेव्हाच ,त्याच्यावर प्रहार करा, म्हणजे तुम्हाला निश्चित यश मिळेल.

लोकमान्य टिळक या सुविचाराच्या माध्यमातून हे सांगू इच्छितात  की आपल्या शरीरात उत्साह आहे. त्याच वेळी कोणतेही  काम करायला घ्या. एकदा उत्साह गेला की ते काम तडीस जात नाही. 
 

3. गरम हवेच्या प्रवाहात गेल्याशिवाय कष्ट सोसल्याशिवाय पायाला फोड आल्याशिवाय कधी स्वातंत्र्य मिळू शकत नाही.

देशाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर ते स्वातंत्र्य सहजासहजी मिळणार नाही, त्यासाठी आपल्याला कष्टही घ्यावेच लागतील असा विचार लोकमान्य टिळक या ठिकाणी मांडताना दिसतात.
 

4. फक्त अन्न मिळवणे हे माणसाचे मुख्य लक्ष नाही कारण एक कावळा देखील जिवंत राहतो आणि उष्टे खरकटे खाऊन मोठा होतो. tilk imp quotes 

 
या सुविचारातून लोकमान्य टिळक माणसाचे नेमके लक्षण काय आहे? ते सांगताना दिसतात केवळ खाण्यासाठी जगणे याला ते महत्त्व देत नाही. तर माणसाचा जन्म मिळाला आहे तर आपल्या हातून  काहीतरी चांगले काम झाले पाहिजे.असे लोकमान्य टिळक यांचे मत होते. 
 

5. जर तुम्ही जाऊ शकत नाही तर धावू नका परंतु जे धावू शकतात त्यांचे पाय मागे खेचू नका.tilak suvichar 

अनेक व्यक्तींना स्वतः काम करण्याची सवय नसते, परंतु जर एखादी व्यक्ती काम करत असेल तर त्या व्यक्तीला मागे खेचण्याचे काम काही महाभाग करत असतात.यांच्यावरती लोकमान्य टिळक टीका करतात आणि त्यांना सांगतात जर आपल्याला प्रगती करायची नसेल तर करू नका1 परंतु दुसरा कोण प्रगती करत असेल तर त्याच्या प्रगतीमध्ये अडसर बनू नका.
 

6.  माणसाने माणसाला घाबरणे ही शरमेची बाब आहे. tilak moral thought 

माणसाने माणसा माणसांमध्ये जाती-धर्माच्या नावावर भेदभाव करू नयेत. हे या सुविचाराच्या माध्यमातून लोकमान्य टिळक सांगताना दिसत आहेत. 
 

7. एक जुनी म्हण आहे की जे दुसऱ्याला मदत करतात त्यांना देव मदत करतो.

लोकमान्य टिळक यांच्या मते आपण कायम एकमेकांना मदत केली पाहिजे. जर आपण एकमेकांना मदत केली तर देव देखील आपल्याला मदत करतो.
 

8.आपण आपले रेकॉर्ड मोडा,कारण यश आपल्या स्वतःशी केलेल्या लढाईत असते. tilak self motivational thought 

आज आपण अनेक ठिकाणी केवळ स्पर्धा आणि स्पर्धा पाहत आहोत. परंतु लोकमान्य टिळक एका सुविचार मध्ये सांगतात. ही स्पर्धा स्वतःशी करा! स्वतःच केलेली स्वतःची रेकॉर्ड मोडा. मगच तुम्ही जगामध्ये खूप काही मोठे करून दाखवू शकता. 
 

9. कठीण काळ धोके आणि अपयशाची भीती टाळण्याचा प्रयत्न करू नका ते तुमच्या मार्गात नक्कीच येतील.

आपल्या जीवनात कठीण प्रसंग येणार नाहीत, असे नाही. त्यांच्यापासून लांब पळू नका.उलट त्यांचा सामना करा तरच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता असा quotes टिळक सांगतात. 
 

10.आपण कर्म करत राहा परिणामांकडे लक्ष देऊ नका. tilak good thougt in marathi 

लोकमान्य टिळक आपले कर्तव्य किंवा कामाbविषयी सांगतात हे आपण आपल्या कामावरती लक्ष केंद्रित केले पाहिजे.अमुक काम केल्यावर मला काय मिळेल असा संकुचित विचार करू नयेत. 
 
 
अशा पद्धतीने आजच्या लेखातून आपण लोकमान्य टिळक प्रेरणादायी विचार,किंवा विचारदान व  सुविचार आपण पहिले हे प्रेरणादायी विचार म्हणा की सुविचार नुसते वाचू नका तर ते जीवन जगत असताना आठवा त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा. आजचा हा लोकमान्य टिळक प्रेरणादायी विचार दान सुविचार लेख कसा वाटला हे नक्की कळवा.

FAQ काही प्रश्न 

 
1. लोकमान्य टिळक टर्मिननस कोठे आहे?
 
लोकमान्य टिळक टर्मिननस  मुंबई मध्ये कुर्ला या ठिकाणी  आहे.
 
2. लोकमान्य टिळक यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. 
आमचे इतर लेख 

Leave a Comment