अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 पहिल्या राऊंड चे कट ऑफ |11th Online Admission 2023 24 Pahila Round Cut off

 आज आपण अकरावी प्रवेश 2023 24  पहिल्या फेरीचे कट ऑफ या विषयी माहिती पाहणार आहोत.अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये आपल्या पसंतीची महाविद्यालय मिळाली, त्या विद्यार्थ्यांनी त्या त्या महाविद्यालयांना प्रवेश निश्चित केला असेल. परंतु अजून ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला हवे ते महाविद्यालय मिळाले नाही त्यांना दुसऱ्या फेरीच्या वेळी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही आज देणार आहोत.

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 पहिल्या  राऊंड चे कट ऑफ
अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 पहिल्या  राऊंड चे कट ऑफ

पहिल्या फेरीतील चुका | Mistakes in the first round

 बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरत असताना अनेक चुका केल्या आहेत त्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 मध्ये विद्यार्थ्यांनी कॉलेजचे गेल्या वर्षीचे 2022 23  कट ऑफ पाहूनच आपला ऑप्शन फॉर्म भरायला हवा होता.आता दुसरी फेरी असणार आहे. या फेरीसाठी मात्र विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीचे कट ऑफ पाहून दुसऱ्या फेरीसाठी आपला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. या माहितीला सुरुवात करण्यापूर्वी ज्या अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीच्या वेळी मोठ्या दहा  चुका/mistkes  केल्या त्या चुका आपण दुसऱ्या फेरीच्या वेळी करू नका. यासाठी या संदर्भात आम्ही जो लेख लिहिलेला आहे तो आपण एकदा जरूर वाचा त्यासाठी निळ्या अक्षरावर क्लिक करा.

यावरील चुका पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आले असेल की, आपल्याला ऑप्शन फॉर्म भरत असताना कट ऑफ पाहणे  किती गरजेचे आहे. कट ऑफ कसे पाहतात ते शिकण्यासाठी आपल्याला  आम्ही दिलेला खालील एक स्वतंत्र  लेख निळ्या अक्षरावर क्लिक करून पूर्ण वाचा . 

आता आपल्या ध्यानात आले असेल की ,आपण कट ऑफ कशा पद्धतीने पाहिजे. हे कट ऑफ पाहिल्यानंतर पहिल्या फेरीच्या वेळी किती गुण असलेल्या  मुलांना अमुक महाविद्यालयाला प्रवेश मिळाला आहे.तसेच आरक्षण, उपलब्ध जागा या सर्वांचा विचार करून आपण अतिशय सावधगिरीने दुसऱ्या राउंडच्या वेळी आपला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे.आता आम्ही आपल्याला विभाग वाईज/region wise  पहिल्या फेरीच्या कट ऑफ  याद्या देत आहोत. त्या आपण डाऊनलोड करायचे आहेत आणि नंतरच आपल्यासाठी ऑप्शन फॉर्मची यादी तयार करायची  आहे. 

अकरावी प्रवेश 2023 24 पहिल्या फेरीचे कट ऑफ |11th Admission 2023 24 First Round Cut Off

 

१. मुंबई विभागाचे कट ऑफ पीडीएफ 

2. पुणे विभागाचे पहिल्या फेरीचे कट ऑफ पीडीएफ 

3. नागपूर विभागाचे पहिल्या फेरीचे कट ऑफ पीडीएफ

4. नाशिक विभागाचे पहिल्या फेरीचे कट ऑफ पीडीएफ

5. अमरावती विभागाचे पहिले फेरीचे कट ऑफ पीडीएफ

या वरील पीडीएफ मधील आपल्या विभागाचे पहिल्या फेरीचे कट ऑफ पाहूनच विद्यार्थ्यांनी आता दुसऱ्या फेरीच्या 2 nd राऊंड च्या  वेळी आपला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. सर्वात महत्त्वाचे ऑप्शन फॉर्म भरत असताना आपण निवडत असलेले कॉलेज आणि आपल्याला मिळालेले गुण त्या कॉलेजचा प्रकार फी या सर्व बाबी आवर्जून पहा. ज्या महाविद्यालया  आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे अशाच महाविद्यालयांची नावे ऑप्शन फॉर्म मध्ये टाका.

बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा समज झाला आहे की,आपल्याला 10  महाविद्यालय ऑप्शन फॉर्म मध्ये टाकायचे आहेत .परंतु तसे अजिबात नाही आपल्याला कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा अशी सोय करून देण्यात आलेली आहे.त्यामुळे दुसऱ्या फेरीच्या वेळी आपल्याला ज्या कॉलेजला प्रवेश घेण्याची इच्छा आहे. मानसिकता आहे आवड आहे आणि तसे गुण आपल्याला आहेत. या सर्वांचा विचार करून विद्यार्थ्यांनी आपले ऑप्शन फॉर्म भरावेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून भाग एक आणि भाग दोन बदला नसेल त्यांच्यासाठी देखील आम्ही त्या संदर्भात दिलेले स्वतंत्र लेख खाली देत आहोत. 

अकरावी प्रवेश भाग 1 असा भरा 

ज्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव अजून आपला 1 एक भरलेला नाही तसेच रजिस्ट्रेशन केलेले नाही त्या संदर्भात आम्ही स्वतंत्र आर्टिकल लिहिलेले आहे अगदी त्यामध्ये डेमो देखील दिलेला आहे तरी आपण खाली निळ्या अक्षरावर क्लिक करून आमचा तो डेमो आणि त्या पद्धतीने सर्वप्रथम आपले रजिस्ट्रेशन करून भाग एक भरून घ्या आणि पार्ट वन आठवणीने लॉक कर 

अकरावी ऑनलाइन प्रवेश भाग दोन कसा भरावा डेमो 

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या भाग दोन मध्ये आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा असतो तो ऑप्शन फॉर्म भरत असताना वरील कट ऑफ ची माहिती आपण नीट समजून घ्या फॉर्म भरताना घाई करू नका तो फॉर्म कसा भरावा ऑप्शन  कसे सिलेक्ट करावे साठी देखील आम्ही दिलेले अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे भाग दोन भरण्याबाबतचे आर्टिकल आपण नीट अभ्यासावे. 

आता आपण कट ऑफ पहिले आपला भाग 1  आणि भाग 2 देखील भरला. यानंतरची पायरी म्हणजे आपल्याला कोणते महाविद्यालय या फेरीमध्ये मिळणार ? ते कसे पाहता येईल .याची  देखील काहींना उत्सुकता असेल तर ते पाहण्यासाठी देखील आम्ही एक स्वतंत्र आर्टिकल दिले  आहे ते आपण आत्ताच बघून ठेवा म्हणजे वेळेवर आपली गडबड होणार नाही.

अशा पद्धतीने दुसऱ्या फेरीसाठी आपल्याला कट ऑफ कसे पाहावे कट ऑफ यादी आणि त्याचबरोबर आपल्या रजिस्ट्रेशन आणि भाग एक भाग दोन भरणे आणि आपल्याला कोणते कॉलेज मिळाले अगदी इथपर्यंत आपण सर्व माहिती पाहिली. 

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली ? यासाठी आम्हाला कमेंट करा तसेच आपल्याला अकरावी प्रवेश या संदर्भात अधिकचे मार्गदर्शन हवे असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.ही माहीती इतरांना देखील पाठवा. धन्यवाद !

आमचे इतर लेख वाचा

Leave a Comment