साहित्य अकादमी पुरस्कार 2023 एकनाथ आव्हाड |
साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांना दरवर्षी साहित्य अकादमी कडून हे पुरस्कार जाहीर केले जातात. यापैकी युवा वर्गासाठीचा पुरस्कार कवयित्री विशाखा विश्वनाथ यांच्या ‘ स्वतःला स्वतःविरुद्ध उभे करताना’ या त्यांच्या कवितासंग्रहाला 2023 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे.
एकनाथ आव्हाड यांनी त्यांच्या छंद घेई आनंद’ हा काव्यसंग्रह कसा निर्माण झाला ? याबाबत सांगितले की माझ्या या काव्यसंग्रहामध्ये एकूण 42 कविता आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जगभर कोरोना महामारीने हाहाकार केला होता.सुरुवातीला काही दिवस शाळा व अध्यापन देखील बंद होत्या थोड्या दिवसांनी मुलांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू झाले.अशावेळी या भयग्रस्त वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना घरामध्ये बसणे अवघड जात होते. माझ्या मुंबई महानगरपालिकेत शिकणारा विद्यार्थी हा अतिशय खडतर परिस्थितीशी सामना करत जगत असतो.तो दहा बाय दहाच्या खोलीत कसा राहत असेल. हा प्रश्न मनाला सतावत होता.अशावेळी या विद्यार्थ्यांचा एकटेपणा व घरामध्ये बंदिस्त असणं हे माझ्या कवी मनाला काही पटत नव्हते आणि म्हणूनच कवितेच्या माध्यमातून वेगवेगळे छंद त्यांना माहीत व्हावेत. आणि त्यांचा दिवस आनंदामध्ये,हसत खेळत जावा या प्रेरनेतूनच माझी कविता फुलत गेली. पुढे ते म्हणाले मला मिळालेला हा साहित्य अकादमी पुरस्कार ज्या विद्यार्थ्यांमुळे मला प्राप्त झाला अशा विद्यार्थ्यांना मी तो अर्पण करतो. असे देखील प्रसिद्ध बालकवी तथा शिक्षक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुंबई महानगरपालिका आणि संपूर्ण महाराष्ट्र यांच्याकडून ज्याप्रमाणे शिक्षक कवी एकनाथ आव्हाड यांचे कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे कवी एकनाथ आव्हाड यांचे त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये असणाऱ्या छोट्या दापूर गावांमधील गावकऱ्यांकडून देखील कौतुक केले जात आहे.
कवी श्री एकनाथ आव्हाड यांनी आपला शिक्षकी पेशा सांभाळत कथाकथन, काव्यवाचन या कार्यक्रमांमध्ये देखील सहभाग घेत असतात. मुलांचे हसत खेळत शिक्षण यासाठी देखील त्यांचे योगदान मुंबई महानगरपालिकेसाठी अतिशय मोलाचे आहे.
एकनाथ आव्हाड यांच्या बालसाहित्य विषयी सांगायचे झाले तर त्यांचे बालसाहित्य हे लहान मुलांच्या मानसिकतेला समजून घेणारे आहे. बालकांचे भाव विश्व समजून सांगणाऱ्या त्यांच्या कविता बालांप्रमाणे मोठ्यांना देखील आवडतात. मी देखील त्यांच्या अनेक कविता वाचलेल्या
एकनाथ आव्हाड यांना बालसाहित्याच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथा निवेदकांसाठी दिला जाणारा पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचा आदर्श महापौर शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा बालकवी पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे.
मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षक असणाऱ्या कवी मनाच्या एकनाथ आव्हाड यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन!