अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आपला क्रमांक कितव्या स्थानावर कसे पहावे? | akravi prvesh gunvtaa yadi kashi pahavi

अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 पाहत असताना आतापर्यंत आपण आपले स्टुडन्ट रजिस्ट्रेशन करून भाग 1 आणि त्यांनंतर 2 भरला असेल ,आता आपल्याला उत्सुकता लागलेली असेल ती म्हणजे आम्हाला कोणते कॉलेज मिळणार? परंतु त्या प्रक्रियेला अजून वेळ आहे. कॉलेज कोणते मिळाले याची  लिस्ट लागण्याआधी अकरावी प्रवेश प्रक्रियेत एक गुणवत्ता यादी तयार केली जाते. या यादीमुळे आपण एकूण फॉर्म भरलेल्या मुलांमध्ये आपला क्रमांक कितवा आहे हे समजते . या एकत्रित यादीला गुणवत्ता यादी म्हणतात.म्हणूनच आज आम्ही अकरावी ऑनलाइन प्रवेश  2023 24 च्या प्रक्रियेत अंतिम गुणवत्ता यादीत आपण कितव्या क्रमांकावर आहोत ते कसे पहावे ? याविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर मग स्टेप बाय akravi prvesh gunvtaa yadi kashi pahavi स्टेप ही महत्वाची माहिती पाहूया. 
 
 

अकरावी प्रवेशासाठी गुणवत्ता यादीतील आपले स्थान का पहावे ? akravi prvesh gunvtaa yadi kashi pahavi 

अंतिम गुणवत्ता यादी अर्थात final merit list  पाहिल्यानंतर ,आपण एकूण मुलांमध्ये कितव्या क्रमांकावर आहोत तसेच अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये(first round )मध्ये  आपला क्रमांक लागण्याची किती शक्यता आहे? याविषयीचा काही एक अंदाज आपल्याला येऊ शकतो. त्याचबरोबर यावर्षी एकूण किती जागा आहेत? आणि आपला merit list मध्ये कितवा क्रमांक आहे? यावरून देखील प्रवेशबाबत काही एक अंदाज लावता येतो. म्हणून विद्यार्थ्यांनी अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आपला क्रमांक कितव्या क्रमांकाला आहे हे पाहणे गरजेचे आहे. 

गुणवत्ता यादीतील प्रोव्हिजनल मेरिट असे पाहावे |

अकरावी ऑनलाइनच्या संकेतस्थळावरती ऍडमिशन प्रक्रिये बाबत प्रोव्हिजनल मेरी स्टेटस आणि फायनल मेरी स्टेटस असे दोन टॅग देण्यात आलेले आहेत. त्याच्या मदतीने आपल्याला आपण कितव्या स्थानावर  आहोत . याविषयीची काही एक कल्पना येऊ शकते. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आपण गुणवता यादीत  कितव्या क्रमांकावरती  आहोत ते पाहणे गरजेचे आहे..गुणवता यादीत आपण कितव्या क्रमांकावर आहोत ते पाहण्याच्या स्टेप्स पुढीलप्रमाणे आहेत. 

अकरावी प्रवेश 2023 24 गुणवता यादीत आपला क्रमांक कसा पहावा | 

यासाठी आपण खालीलप्रमाणे कृती करा.


1. अकरावी संकेतस्थळावरती वेबसाइट वरती  लॉगिन 

 अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील वेबसाइट वर जाऊन  https://11thadmission.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावरती विद्यार्थ्यांनी लॉगिन करायचे आहे.

 

अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24  अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आपला क्रमांक कितव्या स्थानावर कसे पहावे?
 
2. मोबाइल डेस्क टॉप व्यू  करा 
आपण अकरावी ऑनलाइन प्रवेश या साइटवर log इन केल्यानंतर मोबाईल desktop view करावा.

 3. मोबाईलच्या उजव्या कोपऱ्यातील आडव्या तीन रेषांवर क्लिक करणे 

गुगल क्रोम मधून अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर log in केल्यावर उजव्या बाजूला  तीन टिंबांच्या वरती उजव्या बाजूला या तीन रेषा आहेत त्यावरती क्लिक करून घ्या .


अकरावी प्रवेश dash board
4. अकरावी प्रवेश 2022 23 डॅशबोर्ड वर जा 
 
तीन आडव्या रेषेवर क्लिक केल्यावर डाव्या बाजूला एक डॅश बोर्ड  दिसेल.  त्या डॅशबोर्ड मध्ये अलॉटमेंट अॅडमिशन  या भागामध्ये एक नंबरचा कॉलम आहे  त्यावर क्लिक करून प्रोव्हिजनल मेरीट स्टेटस पाहावे.

अकरावी प्रवेश provisinal मेरिट

5. प्रोव्हिजनल मेरी स्टेटस कसे पाहावे?

डॅशबोर्ड वरती आल्यानंतर ज्या ठिकाणी इंग्रजीमध्ये चेक प्रोव्हिजनल मेरीट स्टेटस check provisinal merit status  लिहिलेले आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर (वरील फोटो पहा) तुमची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्या माहितीमध्ये तुमचे नाव, तुमची जात,लिंग त्याचबरोबर अपंगत्वाचा प्रकार आणि डाव्या बाजूला सर्वात खाली मेरिट नंबर असणार आहे. तो मेरिट नंबर नोंदवून ठेवायचा आहे. त्यावरून काही अंदाज आपण करू शकतो. की आपला क्रमांक कितव्या  नंबरला किंवा स्थानावर  असेल.ते यावरून समजेल. 

6. चेक फायनल मेरिट स्टेटस 

डॅशबोर्ड च्या अलॉटमेंट मध्ये दोन नंबरच्या रकान्यामध्ये चेक फायनल मेरीट स्टेटस यावरती क्लिक करून या मेरिट किंवा गुणवत्ता यादीतील फायनल स्टेटस म्हणजेच आपला या यादीतील मेरिटनुसार कोणता क्रमांक आहे. याची माहिती मिळू शकते, मात्र यादी लागताना सर्व आरक्षणाचा विचार करून यादी लागत असते हे देखील लक्षात घ्या.  परंतु या एकत्रित गुणवत्ता म्हणजे  मेरिट लिस्ट मध्ये मेरीट  नुसार आपण कोणत्या क्रमांकावर आहोत हे समजेल.

फायनल मेरिट लिस्ट
 
अशा पद्धतीने आजच्या लेखाच्या माध्यमातून अकरावी प्रवेश बाबत आपले प्रोव्हिजनल मेरीट स्टेटस आणि फायनल मेरिट स्टेटस म्हणजेच अंतिम गुणवत्ता यादीतील स्थान कसे पाहावे? याविषयी माहिती दिलेली आहे. या माहितीच्या आधारे अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीमध्ये आपला क्रमांक लागेल की नाही? याविषयी विद्यार्थ्यांना मदत होऊ शकते ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कळवा.

अकरावी प्रवेश/डिप्लोमा /iti  प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक

ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कळवा. 

आमचे इतर लेख 

अकरावी  ऑनलाइन प्रवेश नॉन क्रिमीलेअर काढण्याची प्रक्रिया 

अकरावी ऑनलाइन प्रवेश भाग 1 आणि 2 असा भरा 

 
 
 
 

Leave a Comment