डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठी कविता 2023 | babasaheb ambedkar jayanti nimitt marathi kavita 2023

सर्व वाचकांना सर्वप्रथम आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा! यावर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती साजरी करत आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी साजरी करत असताना विविध कार्यक्रमांची मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. शाळा, महाविद्यालय ,सहकारी संस्था अशा विविध ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन केले जाते. त्याचबरोबर रांगोळी, भाषण ,वक्तृत्व  स्पर्धा चित्र यांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाते. त्यांच्या कार्याचा परिचय हा करून दिला जातो. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये शायरीच्या माध्यमातून देखील बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गुणगौरव केला जातो.  आंबेडकरांनी सांगितलेले अनमोल विचार व्हाट्सअप ,फेसबुक, इंस्टाग्राम अशा विविध प्रसार माध्यमांच्या साह्याने एकमेकांना पाठवून जणू काही बाबासाहेब आंबेडकर यांचा  महिमा आपण एकमेकांना सांगत असतो. परंतु असे म्हणतात की जर आपल्याला एखादा मोठा संदेश कमी शब्दांमध्ये सांगायचा असेल तर कवितेसारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही. म्हणूनच आज आम्ही (babasaheb ambedkar jayanti nimitt marathi kavita 2023)  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काही मराठी कविता ज्या 2023 मध्ये वाचकांना अधिक आवडतील अशा आहेत.

आंबेडकर जयंतीच्या या मराठमोळ्या कविता 2023 आपल्याला नक्कीच आवडतील. कवितांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य तसेच आजच्या सुशिक्षित वर्गाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या अपेक्षा होत्या. याचा देखील ठाव घेण्याचा प्रयत्न या आंबेडकरी मराठी कवितेच्या माध्यमातून घेतलेला आहे. dr babasaheb ambedkar jayanti nimitt marathi kavita 2023 या अशा पद्धतीने शब्दबद्ध केलेल्या आहेत की यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कार्याचा व विचारांचा गुणगौरव नि महती आपल्याला समजून घेता येईल.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठी कविता 2023
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठी कविता 2023

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठी कविता 2023 | dr babasaheb ambedkar jayanti nimitt marathi kavita 2023 Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Marathi Poetry /poem  2023 |आंबेडकर जयंती चारोळ्या कविता|babasaheb ambedkar jayanti nimitt marathi kavita 2023

आजच्या लेखात केवळ एकच कविता न देता आंबेडकर जयंतीच्या चार मराठी कविता आपल्याला उपलब्ध करून देत आहोत यातील आपल्याला ज्या योग्य वाटतील त्या आपण आपल्या कार्यक्रमाचे स्वरूप पाहून वापरू शकता. 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठी कविता क्रमांक 1 |  babasaheb ambedkar jayanti nimitt marathi kavita 2023 

 

कविता क्रमांक 1 महामानवाची कविता  

म्रुत्यु शून्य किलोमिटर

अशा वाटे वरून प्रवास होता।

मुक्कामाचे  तंबू नव्हते..

नुसता चालण्याचा अट्टहास होता।

 

श्वास सारे..

ऊसणे होते।

अस्तित्व जीवनाचे

असून नसणे होते।

 

पायात साखळदंड..

मग हात कसे करतील बंड।

कुठल्या पसाभर चांदण्या..अन चतकोर चंद्र..

आभाळच जीथे षंढ।

 

किती शोधायची भाकर..

तळहातावर सुर्य घेऊन।

अंधारच झोपलेला ढाराढुर

या कुशीचे त्या कुशीवर होऊन।

 

अंधार चिरण्या..प्रकाश पेरण्या…

सुर्याने बदलले आपले नांव।

डॉ. बाबासाहेब आंबेडकर धारण केले..अन..

ऊधळून गेले अंधाराचे सारे डाव।

 

 

कवी नारायण जाधव खामगाव,महाराष्ट्र  हे महाराष्ट्रातील एक नावाजलेले आंबेडकरवादी कवी आहेत. आंबेडकर जयंती निमित्त ही कविता आम्ही केवळ माहितीस्तव आपल्याला देत आहोत या कवितेचे सर्वाधिकार कवी नारायण जाधव यांनाच आहे.त्यांचे विशेष आभार.

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठी कविता क्रमांक 2 | dr babasaheb ambedkar jayanti nimitt marathi kavita 2023 no 2Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Marathi Poem  2023 no 2 |आंबेडकर जयंती चारोळ्या कविता|ambedkar jayanti charolya Kavita /babasaheb ambedkar jayanti nimitt marathi kavita 2023

 

आंबेडकर जयंती कविता 2 असा तू भीमराया 

 

साऱ्या समष्टीने तुझ्या

प्रबुद्ध पावलांची दिशा ढुंडाळावी. 

असा तू

 

विद्वत्तेची मक्तेदारी घेतलेल्यांना

वाकवलस तू 

विध्वत्तेला चघळून. 

तू म्हणजे 

अंधाराच्या गर्भाशयातून उगवलेला प्रज्ञेचा सूर्य 

जगण्याच्या लढाईचा परिपाक दिगंताचा विश्वास 

समतेचा प्रवास तू

 

कवितेच्या शब्दा – शब्दांतून 

रक्ताच्या कणा – कणांतून

उसळणारा आर.डी.एक्स.तू… 

साऱ्या जगाचे महानत्व 

तुझ्या समक्ष गळून पडावे 

असा, परावर्तित तू.

 

साक्षात कुबेरानेही 

तुझ्या ज्ञानसागरात भिजलेले 

तुझे तळवे चाटावेत. 

 असा तू

 

बुद्धत्वाच्या तहानेने व्याकुळलेले जीव तुझ्या करुनेने तृप्त व्हावेत 

असा तू 

 

कवी अनंत धनसरे,महाराष्ट्र  यांची ही कविता या कवितेचे सारे श्रेय त्यांनाच आहे आम्ही फक्त आंबेडकर यांच्या कार्याचा एक भाग म्हणून कविता देत आहोत.कवींचे विशेष आभार.त्यांच्या facebook वर अनेक कविता आहेत आपण त्या देखील वाचू शकता. 

 

 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठी कविता 2023 क्रमांक 3  | dr babasaheb ambedkar jayanti nimitt marathi kavita 2023 kavita no 3 Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Marathi Poetry 2023 3 

 
 

आंबेडकर जयंती कविता 3 आमचे आंबेडकर 

 

विषमतावादी चौकट आम्हाला कळलीच न्हवती कधी 

या व्यवस्थेने तशी अद्भुत मांडणी अक्कल हुषारीने केली होती 

तू मात्र ज्ञानाच्या साह्याने ही सर्व जाणले 

या व्यवस्थेचे पितळ बाहेर पाडले 

 

मनूस्मृति तर आम्ही ग्रंथ मानत होतो 

त्याच्या विरोधात बोलण्याची हिम्मत आमच्या मनात आणि 

मनगटात देखील नव्हती 

आम्ही फिरायचो वेड्यागत या व्यवस्थेचा भाग म्हणून 

 

तुला राम दर्शन नको होते 

तुला व्यवस्थेत नाकारले जाऊ नये 

यासाठी मानवतेचा लढा तो होता 

असे सारे करणारा आमचा भीमराव होता 

 

आता तुझी चळवळ थंड पडलिय 

कारण शिकून मोठा झालेला तुजा अनुयायी 

आता बऱ्याचदा आपल्याच विकासात मग्न आहे 

 

आज गरज आहे तुझ्या दलित चळवळीला बल देण्याची 

पुन्हा एकदा लेखनी हातात घेण्याची 

मानवते पुढे नवीन प्रश्न आ करून उभे आहेत 

आता भीमराया आम्हाला तुझे आशीर्वाद हवे आहेत. 

  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठी कविता क्रमांक 4| dr babasaheb ambedkar jayanti nimitt marathi kavita 2023 no 4 Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Marathi Poetry 2023

 
 

आंबेडकर जयंती कविता 4 बाबासाहेब आपण काय दिले आम्हाला 

 

बाबासाहेब आपण काय दिले आम्हाला ?

हे एका कवितेत कसे हो सांगू ?

कागद लागलाय भंगू 

हात लागलेत खंगू

आता आपली ख्याती कशी बरे सांगू ?

 

बाबासाहेब आपण दिलात 

आम्हाला मतदानाचा अधिकार 

नाहीतर या व्यवस्थेने केले

 असते आम्हाला आजही  हद्दपार 

 

बाबासाहेब आपण जाणलीत कामगारांची मने 

म्हणून 12 तासावरून

काम आठ तासांवर आले

आपण कामगार वर्गावर किती मोठे उपकार केले..

 

 स्त्री म्हणून तिला वेतन होते कमी 

तुम्हीच समान वेतणाची दिलीत हमी 

स्त्री वर नेहमीच  असेल आपला ऋणी 

आज गोडवे गातोय आपुले आंबेडकर जयंती दिनी 

 

आपण सर्वांत महत्वाच म्हणजे दिली मिळवून मानवतेची वागणूक 

त्यामुळे थांबली आमची अडवणूक 

तुम्हीच आणली लोकशाही आणि निवडणूक 

आता किती करू तुमचे गोड कौतुक 

 

बाबासाहेब आपण इतके दिले की  

त्याचा हिशोब करणे नसे सोपे 

आपण मानवतेची लावली रोपे 

आज जयंती दिनी मनात आठवण दाटून येते 

 

 

आंबेडकर जयंती कविता पहा ambedkar jayantichya marathi kavita video 

 

 

वरील कवितेतील चार क्रमांकाची कविता  रचण्याचा मी स्वत एक प्रयत्न केला आहे. ही कविता किंवा वरील सर्वच कविता  कशा वाटल्या  नक्की कळवा .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठी कविता 2023 आपण इतराना देखील पाठवा आपल्याकडे  आंबेडकर यांच्यावर सुंदर कविता असतील तर नक्की पाठवा . आम्ही त्या आपल्या नावासह प्रकाशित करू. 

आमचे अप्रतिम लेख 

Leave a Comment