बुद्ध पौर्णिमा माहिती भाषण निबंध शुभेच्छा मराठी 2023

भारतामध्ये विविध सण उत्सव साजरे केले जातात.या सण-उत्सवांपैकीच एक महत्त्वाचा सण म्हणजे बुद्ध पौर्णिमा. बौद्ध धर्मामध्ये जे विविध सण उत्सव साजरे केले जातात. यापैकी सर्वात मोठा सण म्हणजे बुद्ध पौर्णिमा होय.गौतम बुद्धांचे अनुयायी तथा बौद्ध धर्मीय यांच्या दृष्टिकोनातून हा सण अतिशय महत्त्वाचा आहे. यावर्षी बुद्ध पौर्णिमा 5 मे 2023 रोजी आहे.आज कालच्या तरुण पिढीला , आपल्या घरातील लहानग्यांना तसेच आजच्या आधुनिक पिढीला देखील आपण जे सण-उत्सव साजरे करतो ते का साजरे करतो? याविषयीची माहिती नसते म्हणूनच आम्ही आज बुद्ध पौर्णिमा या सणाची मराठी माहिती घेऊन आलेलो आहोत. ही माहिती आपण बुद्ध पौर्णिमेचे भाषण देत असताना किंवा आपल्या घरामध्ये बुद्ध पौर्णिमा विषयी चर्चा करत असताना एकमेकांना नक्कीच सांगू शकता. आपल्याला बुद्ध  पौर्णिमा निबंध लिहीत असताना  त्याचबरोबर बौद्ध पौर्णिमा म्हटल्यानंतर आपण व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम अशा विविध प्रसार माध्यमांच्या साह्याने एकमेकांना बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देखील देत असतो त्यावेळी ही माहिती नक्कीच उपयोगी येईल. आम्ही 2023 मध्ये बौद्ध पौर्णिमा साजरी करीत असताना अगदी अप्रतिम मराठी माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. चला तर मग  buddha purnima marathi information speech essay wishesh पाहूया.सर्वप्रथम बुद्ध पौर्णिमेची माहिती पाहूया. 
बुद्ध पौर्णिमा माहिती भाषण निबंध शुभेच्छा मराठी 2023
बुद्ध पौर्णिमा माहिती भाषण निबंध शुभेच्छा मराठी 2023
बुद्ध पौर्णिमा म्हणजे काय ?
आपण  पाहतो  वर्षभरात प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते , मग नेमकी बुद्ध पौर्णिमा म्हणजे काय ? तर बौद्ध पौर्णिमा म्हणजे गौतम बुद्धांचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा होय. वैशाख महिन्यामध्ये येणाऱ्या वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो.
 

बुध्द पौर्णिमेचे महत्त्व 

आपण पहिले की बुद्ध पौर्णिमेला तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला.त्याच बरोबर गौतम बुद्धांच्या जीवनातील अनेक दोन घटना देखील याच दिवशी घडल्याने बौद्ध धर्मीय या दिवसाला अतिशय महत्व देतात. पहिली घटना म्हणजे बुद्ध पौर्णिमेला म्हणजेच वैशाखी पौर्णिमेला गौतम बुद्ध यांचा जन्म झाला त्याचबरोबर गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि त्यांनी अखिल मानव जातीच्या कल्याणाचा संदेश त्यांनी दिला त्यांना जी ज्ञान प्राप्ती झाली तो दिवस देखील पौर्णिमेचाच होता.गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण म्हणजेच मृत्यू झाला त्या दिवशी देखील पौर्णिमाच होती. म्हणूनच बौद्ध धर्मीय या पौर्णिमेला विशेष महत्त्व देतात. थोडक्यात काय तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी तीन वेगवेगळ्या घटनांचे मिलन आपल्याला पाहायला मिळते.म्हणून ही बुद्ध पौर्णिमा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 
 

गौतम बुद्धांचा जन्म 

गौतम बुद्ध म्हणून ज्यांना पण ओळखतो त्यांचे मूळ नाव सिद्धार्थ होय. गौतम बुद्ध यांचा जन्म सध्याच्या नेपाळमध्ये असलेल्या लुंबिनी या ठिकाणी झाला. त्यांच्या जन्माला आज जवळपास अडीच हजार वर्षे होऊन गेलेलीआहेत. गौतम बुद्ध यांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन होय. ते कोसल साम्राज्याचे अधिपती होते. बुद्धांची आई मायादेवी बाळ गौतम यास जन्म दिल्यानंतर अवघ्या  सात दिवसानंतरच हे जग सोडून गेली.
 
गौतम बुद्ध यांचा जन्म एका राजघराण्यात झाला.त्यांचे बालपण मजेत गेले. नंतर तरुणपणी त्यांनी अनेक मोहिमा देखील यशस्वी करून आपला राज्य विस्तार करण्यावर भर दिला परंतु जसे वय वाढेल तसे गौतम बुद्ध अस्वस्थ राहू लागले.एका वृद्ध माणसाचे दुख पाहून ते व्यतिथ झाले. त्यांनी आपल्या सुखमय जीवनाचा त्याग केला. गौतम बुद्धअंतिम सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. जगामध्ये भरलेलं दुःख पाहून ते स्वतः दुःखी झाले आणि वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी त्यांनी संसाराचा त्याग करून मानवी जातीच्या दुःखा मागील कारणांचा शोध घेण्यासाठी आपला प्रवास सुरू केला. गौतम बुद्ध यांनी आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला खूप मोठ्या कालावधीनंतर त्यांना मानवी जीवनामधील दुःख संपवण्याचा मार्ग सापडला. त्यांनी तो मार्ग अवघ्या जगाला संपूर्ण आयुष्यभर दिला. आणि त्यांच्या विचारातूनच बौद्ध धर्म उदयास आला. गौतम बुद्धांनी संपूर्ण आयुष्यभर माणसाने आपल्या दुःखावर मात करून आनंदाने कसे जगावे? याविषयी मार्गदर्शन केले. गौतम बुद्धांनी करुणा, भूतदया, अहिंसा अशा मार्गांचे अनुसरण करण्याचा लोकांना सल्ला दिला. त्यावर आधारितच अखिल मानवतेचे तत्त्वज्ञान मांडणारा बौद्ध धर्म आकारास आला.
 
 

बुध्द पौर्णिमा ठळक माहिती

बुध्द पौर्णिमा ठळक बाबी
गौतम बुद्ध जन्मस्थान लुंबिनी
जन्मतारीख इ.स.पू. 563
2023 ची बुद्ध पौर्णिमा तारीख 5 मे 2023
बुध्द पौर्णिमा तिथी मुहूर्त सुरुवात 4 मे रात्री 11.44 संपणार 5 मे रात्री 11.03 मी.
बुध्द पौर्णिमेची ओळख बुध्द जयंती,बुध्द पौर्णिमा,वैशाख पौर्णिमा
बुध्द पौर्णिमा महत्त्व गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस
बुध्द जयंती 2585 वी
गौतम बुद्ध मृत्यू इ स पू.483 ते 400 दरम्यान
बुद्धांचे महापरिनिर्वाण कुशी नगर

बुध्दपौर्णिमेस घडलेल्या तीन घटना 

बुद्ध पौर्णिमेला गौतम बुद्ध यांचा जन्म झाला या पौर्णिमेला आपण वैशाखी बुद्ध पौर्णिमा म्हणून देखील ओळखतो. त्याचबरोबर गौतम बुद्ध यांच्या जीवनातील तीन घटना पौर्णिमेच्या दिवशी झाल्यामुळे या पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे. ते म्हणजे गौतम बुद्धांची जयंती गौतम बुद्धांना मिळालेले आत्मज्ञान आणि गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण अशा महत्त्वाच्या तीन घडामोडी याच दिवशी झाल्यामुळे बुद्ध पौर्णिमेला विशेष अशी महत्व देण्यात आलेले आहे. 
गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर आधारित बौद्ध धर्म उभा राहिलेला आहे.बौद्ध धर्मीयांसाठी महत्त्वाच्या  असलेल्या 3  बाबी म्हणजे ज्यांनी या बौद्ध धर्माची उभारणी केली त्यांचा जन्मदिन, त्याचबरोबर बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान मांडण्यासाठी जे आत्मज्ञान प्राप्त झाले तो दिवस म्हणजे देखील बुद्ध पौर्णिमेचा दिवस, आणि अखिल मानव जातीला माणसाने माणसाशी कसे वागावे ?  किंवा माणसाने माणसाशी कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये समानता, करुणा,अहिंसा ,समता यावर आधारित तत्त्वज्ञान मांडणारे गौतम बुद्ध यांचा मृत्यू दिवस म्हणजेच महापरिनिर्वाण देखील पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने बुद्ध पौर्णिमा या दिवसाला बौद्ध धर्मीयांमध्ये विशेष असे महत्व आहे. 
 
आपण ही माहिती आपल्या घरातील लहान मुलांना आवर्जून सांगितली  पाहिजे कारण ,त्यांना बौद्ध पौर्णिमा आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो हे माहीत आहे परंतु ती साजरी करत असताना त्यामागे असणारी पार्श्वभूमी त्यांना माहीत नसते  आपण टी त्यांना  सांगितली पाहिजे. 
 
 

बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली जाते 

आपण जर पाहिले  की भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये बौद्ध धर्मीय लोक बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करत असतात. भारता व्यतिरिक्त नेपाळ,चीन, भूटान, मलेशिया, थायलंड, श्रीलंका, सिंगापूर, इंडोनेशिया, मंगोलिया यासारख्या आशियाई देशांमध्ये देखील बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची स्वतःची एक वेगळी पद्धती आपल्याला पाहायला मिळते.
 
 
साधारणपणे बुद्ध पौर्णिमेला बौद्ध अनुयायी म्हणजेच बौद्धजन या दिवशी बुद्ध विहारांमध्ये जातात. प्रार्थना करतात ,ध्यान करतात तर काहीजण या दिवशी उपवास देखील पकडतात. बौद्ध धर्मीय बुद्ध विहार, घरे या दिवशी रंगबिरंगी फुलांनी रंगबिरंगी ध्वज लाऊन सजवतात कारण गौतम बुद्ध यांना रंगीबेरंगी ध्वज आवडत होते असे सांगितले जाते. 
 
 
गौतम बुद्धांचा हा जन्मदिवस असल्यामुळे बाळ गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे देखील काही भागांमध्ये पूजन केले जाते.बोधगया याठिकाणी महाबोधी मंदिरात आवर्जून लोक भेटी देतात. चीनमध्ये बुद्ध जयंती साजरी करत असताना लोक तेथे असणाऱ्या पॅगोडांना भेटी देतात. त्याचबरोबर गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर धूप, मेणबत्ती लावतात आणि मनोभावे बुद्ध प्रतिमेला वंदन करतात.त्याचबरोबर घरांवरती आपण ज्या पद्धतीने दिवाळी सणाला  काश कंदील लावतो त्या पद्धतीने आकाश कंदील देखील लोक लावत असतात.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म दिवस असल्यामुळे शाळा,महाविद्यालय ,कॉलेजेस अशा सर्व ठिकाणी गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन केले जाते. त्या ठिकाणी अनेक व्यक्ती गौतम बुद्धांच्या कार्याचा आढावा घेत असतात. त्यांना मनोमन वंदन करत असतात.थोडक्यात त्या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेचे छोटे भाषण किंवा मनोगत व्यक्त केले जाते.
 
आपल्याला देखील आपल्या कार्यक्रमाचे स्वरूप पाहून त्या ठिकाणी गौतम बुद्ध यांच्या विषयी माहिती सांगत असताना किंवा भाषण करत असताना आम्ही खाली जो बुद्ध पौर्णिमा भाषणाचा मराठी नमुना देत आहोत. तो आपल्याला नक्कीच कामी येईल. आपल्या कार्यक्रमाचे स्वरूप पाहून आपण यातील काही मुद्दे नक्कीच घेऊ शकता. चला तर मग आपल्या मुख्य विषयाकडे वळूया . 
 
अध्यक्ष ! महाशय! आणि गुरुजन वर्ग तसेच इथे उपस्तीथ बौद्ध अनुयायी सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 
 
आज आपण या ठिकाणी गौतम बुद्ध यांची जयंती म्हणजेच बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. या निमित्ताने गौतम बुद्ध जयंती तथा बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मी माझे मनोगत आपणापुढे भाषण रूपाने सादर करत आहे. ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती!
 
 
बुध्द एक विचार आहे 
दुराचार नाही
बुध्द शांती आहे
हिंसा नाही
बुध्द प्रबुद्ध आहे
युद्ध नाही
बुध्द शुद्ध आहे 
थोतांड नाही 
 
या वरील ओळीच आपल्याला गौतम बुद्धांचे आणि बुद्ध पौर्णिमेचे महत्व सांगायला पुरेश्याआहेत. कारण बुद्ध तत्त्वज्ञान नेमके काय आहे आणि अवघ्या जगाला या तत्त्वज्ञानाने मोहिनी का घातली याचे सर्व स्पष्टीकरण वरील कवितेच्या ओळी अगदी मोजक्या शब्दांमध्ये करतात.
 
संपूर्ण जगामध्ये बुद्ध पौर्णिमा अर्थात गौतम बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते. बौद्ध धर्मियांचा सगळ्यात मोठा सण म्हणून आपण बुद्ध पौर्णिमेला ओळखतो. कारण का तर या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध यांच्या जीवनातील महत्त्वाच्या तीन घटना घडल्या .या तीनही घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत. 
 
 पहिली घटना म्हणजे या पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म या भूतालावर झाला. दुसरी घटना म्हणजे गौतम बुद्ध यांना अखिल मानव जातीच्या दुःखाचे नेमके कारण काय आहे?  याचा शोध म्हणजे आत्मज्ञान ज्या दिवशी झाले तो दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा आणि तिसरा दिवस म्हणजे वयाच्या 80 व्या वर्षी गौतम बुद्ध यांनी आपला देह त्याग केला म्हणजेच गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण झाले तो दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा हॉट. एक प्रकारे आनंद आणि दुःख याने मिश्रित असा हा दिवस कारण याच दिवशी गौतम बुद्ध आपल्याला सोडून गेले म्हणून थोडीशी दुःखाची छटा असलेला दिवस, परंतु याच पवित्र दिनी गौतम बुद्ध भूतला वरती आले आणि मानवतेचा शिकवण देणारा बौद्ध धर्म त्यांनी अवघ्या जगाला दिला. ज्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली हा दिवस देखील बुद्ध पौर्णिमा म्हणून असा तिहेरी संगम असलेला दिवस बौद्ध धर्मियांसाठी मोठी पर्वणी असते.
 
 
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध धर्मीय आपल्या घराची विविध रंगबिरंगी फुलांनी, ध्वजांनी सजावट करतात. घरासमोर छान छान रांगोळी काढतात .गौतम बुद्ध यांच्या बाल प्रतिमेचे देखील धूप,अगरबत्ती यांच्या साह्याने पूजन करतात. काही लोक या दिवशी आवडीने उपवास देखील करतात तर काही लोक गौतम बुद्ध यांच्या विचारांचे स्मरण या दिवशी करतात असा हा दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा.
 
बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. गौतम बुद्ध यांची जयंती भारताबरोबर नेपाळ, बांगलादेश,श्रीलंका थायलंड, मलेशिया यासारख्या देशांमध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गौतम बुद्ध यांचे बालपण एका राजघराण्यामध्ये गेले. गौतम बुद्ध यांच्या वडिलांचे नाव शुधोधन  तर आई मायादेवी यांच्या पोटी गौतम बुद्धांनी जन्म घेतल्यानंतर या दोन्हीही दांपत्यांना प्रचंड आनंद झाला.गौतम बुद्ध सात दिवसांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. परंतु जसजसे दिवस गेले तसे गौतम बुद्ध यांचे मन या ऐश आरामाच्या जिंदगी मध्ये कधी लागलेच नाही.गौतम बुद्ध एके दिवशी घरातून बाहेर पडले त्या दिवशी त्यांना  एक वयोवृद्ध माणूस दिसला आणि त्याला पाहून माणसाच्या जीवनातील दुःख  पाहून ते हतबल झाले. या घटनेने त्यांच्या मनावर खूप मोठा आघात केला आणि त्यानंतर त्यांनी आपली सत्ता, संपत्ती यांचा त्याग करून मानवी जीवनातील सत्याच्या शोधासाठी ते घरातून बाहेर पडले. ते त्यानंतर सिद्धार्थचे गौतम बुद्ध झाले.त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले त्या ज्ञानप्राप्तीचा दिवस म्हणजे देखील बुद्ध पौर्णिमा. गौतम बुद्ध यांना लाखोअनुयायी मिळाले त्यांनी बौद्ध धर्माचे मानवतावादी तत्त्वज्ञान मांडले. पुढे जाऊन उत्तर प्रदेशातील कुशीनगर या ठिकाणी वयाच्या 80 व्या वर्षी गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण झाले तो दिवस देखील बुद्ध पौर्णिमेचा दिवस म्हणूनच बौद्ध धर्मीयांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे.
 
 
आज बुद्ध पौर्णिमा विषयी माझे मनोगत व्यक्त करत असताना आज जर आपण जगातील परिस्थिती पाहिली तर सर्वत्र एक प्रकारचा छुपा साम्राज्यवाद बोकाळलेला दिसत आहे. देशा देशांमध्ये वादाची परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. अहिंसा ,समता यांचे तत्त्वज्ञान सांगणारे गौतम बुद्ध खरोखरच आज अभ्यासण्याची गरज आहे. माणसांमध्ये सत्ता,संपत्ती यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसत आहेत. थोडक्यात दिवसेंदिवस माणूस माणसासारखा वागताना दिसत नाही. लोक एकमेकांवर अन्याय आणि अत्याचार करत आहेत. अशावेळी या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने एकच सांगावेसे वाटते की आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करत असताना एक वेळ हार,तुरे बुद्ध विहारांची सजावट, घरांची सजावट या बाबींबरोबरच गौतम बुद्ध यांचे विचार एकमेकांपर्यंत पोहोचवणे अतिशय गरजेचे आहे. आज गौतम बुद्ध असते तर ते नक्कीच आजच्या स्वार्थी माणसाला पाहून म्हणाले असते ,
 
काय होतास तू
काय  झालास तू 

 

अशी अवस्था आजच्या माणसाची आहे. ज्या गौतम बुद्धांनी शांतीचा मार्ग अखिल विश्वाला दाखवला आज तेच विश्व एका अशांततेच्या खाई मध्ये लोटताना दिसत आहे. म्हणून आज आपण बुद्ध जयंतीच्या तथा बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने एक संकल्प करूया की..  मी माणसाशी माणसासारखा वागेन  आणि या जगामध्ये अहिंसा प्रस्थापित करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करेल. हीच खरी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बुद्ध वंदना असेल. एवढे बोलून मी माझे लांबलेले भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम!
 
 
अशा पद्धतीने आपण buddha purnima Marathi speech या बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमांमध्ये सादर करू शकता. आपल्याला यामध्ये हवा तो बदल करून आपल्याला उपलब्ध असणारा वेळ यांचा विचार करून आपण भाषणाची छानपणे तयारी करावी.
 
 बौद्ध धर्मीयांचा सर्वात मोठा सण म्हणून जास्त सणाला ओळखले जाते तो सण म्हणजे बुद्ध पौर्णिमा होय. ही बुद्ध पौर्णिमा वैशाख महिन्यामध्ये येत असल्याने  वैशाखी पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. बौद्ध धर्मीय लोक या बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्त्व देतात.यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे गौतम बुद्ध यांचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा होय.
 
बौद्ध धर्मीयांच्या दृष्टिकोनातून बुद्ध पौर्णिमा विशेष असण्याचे अजून एक कारण म्हणजे गौतम बुद्धाच्या जीवनातील तीन घटना या पौर्णिमेच्या दिवशी घडल्या. त्यातील पहिली घटना आपण पाहिली ती म्हणजे या वैशाखी पौर्णिमेला गौतम बुद्ध यांचा जन्म झाला.त्याचबरोबर गौतम बुद्ध यांना जी ज्ञानप्राप्ती झाली किंवा अध्यात्मिक ज्ञान मिळाले तो दिवस देखील पौर्णिमेचाच होता व  तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या दिवशी गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण म्हणजेच मृत्यू झाला तो दिवस देखील पौर्णिमेचा दिवस होता म्हणून बौद्ध अनुयायी तथा बौद्ध धर्मीय यांच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा सण म्हणून या बुद्ध पौर्णिमेकडे पाहतात. 
 
बुद्ध पौर्णिमा साधारणपणे इंग्रजी महिन्यानुसार मे महिन्यामध्ये साजरी केली जाते. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात 5 मे 2023 रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी होणार आहे. भारताप्रमाणेच इतर देशात देखील ज्या ठिकाणी बौद्ध धर्माचे अनुयायी राहतात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. नेपाळ, बांगलादेश, थायलंड,इंडोनेशिया, श्रीलंका मलेशिया यासारख्या देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बुद्ध जयंती साजरी केली जाते. एवढच आहे की आपण या सणाला बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखतो त्या सणाला इंडोनेशिया, श्रीलंका आणि मलेशिया या देशांमध्ये मात्र वेसाक म्हणून ओळखले जाते.
 
बुद्ध पौर्णिमा साजरी होण्याची सुरुवात नेमकी कशा पद्धतीने झाली याविषयीचा आपण शोध घेतला तर तैवान सरकारने सर्वप्रथम मोठ्या थाटामाटात  गौतम बुद्ध यांची जयंती अर्थात बुद्ध पौर्णिमा साजरी करायला सुरुवात केली. विविध भागांमध्ये हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी लोक बुद्ध विहारांची, घरांची रंगबिरंगी ध्वजांनी, फुलांनी सजावट करतात. त्याचबरोबर गौतम बुद्धांचा हा जन्मदिन असल्यामुळे काही ठिकाणी तर ज्या पद्धतीने हिंदू धर्मीय  कृष्ण जन्माला म्हणजेच गोपाळकाला या सणाला बालकृष्णाचे पूजन करतात अगदी त्याच पद्धतीने बौद्ध धर्मीय देखील या दिवशी गौतम बुद्ध यांच्या बाल प्रतिमेचे पूजन करतात.बौद्ध धर्मीय  मोठ्या उत्साहात बुद्ध पौर्णिमा साजरी करताना आपल्याला दिसतात. 
 
भारतामध्ये बोधगया या ठिकाणी मोठ्या उत्साहात बुद्ध जयंती अर्थात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने बौद्धधर्मीय या ठिकाणी  एकत्र येतिल. आणि हा गौतम बुद्धांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करततील . बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अनेकजण आवर्जून पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करतात. या दिवशी गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करतात.तसेच काहीजण या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करतात कारण, गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती झाली तो दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा आणि ज्या वृक्षाखाली प्राप्ती झाली तो म्हणजे पिंपळाचा वृक्ष म्हणून अनेक लोक पिंपळाच्या झाडाला मेणबत्ती लावतात तसेच विविध रंगांची फुले देखील अर्पण करतात.
 
अखिल मानव जातीला कर्मकांड यातून बाहेर काढून मानवतेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्ध यांना मानणारे आज करोडो बौद्ध धर्मीय यांच्यासाठी ही बुद्ध पौर्णिमा विशेष सण आहे.एक थोर समाजसुधारक,अहिंसेचे पुजारी म्हणजे गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस  म्हणजे बुद्ध पौर्णिमा होय. गौतम बुद्ध यांनी संपूर्ण आयुष्य अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी खर्ची घातले. गौतम बुद्ध यांचे वयाच्या 82 व्या वर्षी महापरिनिर्वाण झाले. तो दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या दिवस म्हणून या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे.थोडक्यात बुद्ध पौर्णिमा हा दिवस बौद्ध धर्मीय यांच्यासाठी महत्त्वाचा तर आहेच. अखिल मानव जमातीसाठी ज्यांनी मानवतावादी तत्त्वज्ञान मांडून एक आदर्श धर्म आणि त्याचे तत्वज्ञान अवघ्या जगाला दिले त्या महामानवाला कोटी कोटी वंदन!
 
आज दलित वर्गाला जी मानवतेची वागणूक मिळत आहे. ती डॉक्टर बाबासाहेब आंबे डकर यांनी केलेल्या संघर्षामुळे. तसेच या दलित वर्गाला जो माणूस म्हणून सन्मान मिळत आहे तो त्यांनी स्वीकारलेल्या बौद्ध धर्मामुळेच. नाहीतर हिंदू धर्मातील चातुरवर्ण व्यवस्थेने त्यांना कधी सन्मामनची वागणूक दिलीच नसती.अशा मानवतावादी बौद्ध धर्माची उभारणी करणाऱ्या गौतम बुद्ध यांना त्यांच्या जन्मदिनी अर्थात बुद्ध जयंती दिनी त्रिवार अभिवादन!
 
अशा पद्धतीने आपण बुद्ध जयंती/बुद्ध पौर्णिमा मराठी निबंध लिहू शकता.आता आजच्या लेखातील शेवटचा भाग म्हणजे बुद्ध जयंती शुभेचा संदेश मराठी चला तर मग 2023 मधील अगदी नावीन्यपूर्ण बुद्ध जयंती शुभेचा संदेश पाहूया.  
 
 
क्रोधाला प्रेमाने
 पापाला सदाचाराने
 लोभाला दानाने
 आणि असत्याला सत्याने
 जिंकता येते 
अशी अनमोल शिकवण देणारे 
गौतम बुद्ध आज आहे 
त्यांचा जन्मदिवस
 अर्थात बुद्ध पौर्णिमा 
बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
 
 
 
 
बुद्ध धम्म आहे
धर्म नाही
 बुद्ध मार्ग आहे 
कर्मकांड नाही 
बुद्ध मानव आहे
 देवता नाही 
 बुद्ध विचार आहे
 दुराचार नाही असा 
अनमोल मार्ग दाखवणाऱ्या
 गौतम बुद्धांना कोटी कोटी वंदन
 बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!

 
बुद्धम् शरणम् गच्छामि 
धम्मम शरणम गच्छामि 
संघं शरणम गच्छामि 
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
 
 
 
अवघ्या जगाला शांततेचा
 संदेश देणारे दया क्षमा शांती
 आणि मानवता शिकवणारे 
विश्ववंदनीय गौतम बुद्ध 
यांच्या जयंतीनिमित्त अर्थात 
बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
 
 
 
 
बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी
 आपणास मनशांती लाभो 
आपल्या जीवनातील सर्व संकटे
 आपल्यापासून दूर जावो 
आपल्याला बुद्ध जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा !
 
 
 

💫 बुद्ध पौर्णिमा मराठी कोटस  2023 | buddha purnima quotes in marathi  2023

 
 
 
बुद्ध पौर्णिमेला 
आकाशात येणारा शितल चंद्र
आपल्या जीवनातील सर्व दुःख
नाहीसे करो आणि आपल्याला
सुख समाधान आणि शांतता बहाल करो
 आपणास व आपल्या कुटुंबास बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
 
 
 
 
तुमच्या विचारातून आणि जीवनातून 
अज्ञानाचा अंधकार काढून टाका
 आणि माणसाशी माणसासारखे वागा
 अशी शिकवण देणाऱ्या
 गौतम बुद्धांना त्रिवार वंदन
 बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
 
 
 
चला आज बुद्धपौर्णिमा
या  पौर्णिमेला गौतम बुद्धांच्या 
शिकवणुकीचे स्मरण करूया
 आणि आपल्या जीवनामध्ये बंधुता
 शांती आणि करुणा आवर्जून आणूया
 तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
 
 
 

💜 बुद्ध पौर्णिमेसाठी मराठी मेसेज 2023 | buddha purnima message in marathi2023 

 
 
आज आहे बुद्ध पौर्णिमा
 तुम्हाला सर्वत्र सकारात्मक ऊर्जा मिळो
 आणि गौतम बुद्धांच्या दैवी कृपेने
 आपल्या सर्व समस्या नाहीसा होवो 
 आपणास बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
 
 
 
आज बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने
 आपणास बुद्ध जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
 तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला 
शाश्वत सुखा आणि  आनंद कायम
 मिळत राहो हीच प्रार्थना!
 

💧 बुद्ध पौर्णिमा मराठी संदेश स्टेटस |buddha purnima whats app marathi status 2023 

 
 
 
या जगात कोणीही आपल्यासाठी
 काहीही करू शकत नाही
 कारण आपणच आपल्या 
कृतीला जबाबदार असतो 
असा अनमोल संदेश देणाऱ्या
 गौतम बुद्धांना कोटी कोटी प्रणाम
 गौतम बुद्ध जयंतीच्या तसेच बुद्ध 
पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
 
 
बुद्ध पौर्णिमा माहिती भाषण निबंध शुभेच्छा मराठी 2023
बुद्ध पौर्णिमा माहिती भाषण निबंध शुभेच्छा मराठी 2023

 

 
 
 
 
असं म्हणतात एका मेणबत्तीने 
हजार मेणबत्ती पेटवता येतात
 अगदी त्याच पद्धतीने आपल्या ज्ञानाच्या
 सामर्थ्याने हजारो करोडो 
 जणांना मानवतेचा मार्ग दाखवणाऱ्या
 गौतम बुद्धांना कोटी कोटी वंदन
 गौतम बुद्ध जयंतीच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
 
 
 
 
आज बुद्ध जयंतीच्या निमित्ताने संकल्प करा 
सत्याची साथ सदैव द्या 
कायम चांगले बोला 
सर्वांशी मानवतेने वागा 
बुद्ध पौर्णिमेच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
 
 
 
 

💢 गौतम बुद्ध जयंती बुद्ध पौर्णिमा मराठी संदेश | buddha quotes in marathi 2023

 
 
आज बुद्ध पौर्णिमेची प्रकाशमयी  रात्र 
आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार 
कायमचा दूर करून आपल्याला विज्ञानवादी 
मानवतावादी मार्गाकडे घेऊन जावो 
 वैशाख पौर्णिमेच्या म्हणजे बुद्ध पौर्णिमेच्या 
आपल्याला कोटी कोटी शुभेच्छा!
 
 
 
माणसाने भूतकाळात न राहता 
भविष्याची स्वप्न पाहू नयेत 
 तर कायम वर्तमानावर लक्ष द्यावे
 अशी शिकवण देणाऱ्या गौतम बुद्धांना 
कोटी कोटी वंदन 
बुद्ध जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
 
 
 
आपल्या हृदयात गौतम बुद्धांनी
 शिकवलेले मानवतेची पेरणी होवो 
 आपणास बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
 
 
 
 आज आहे बुद्ध पौर्णिमा 
आज चांगले वागण्याचा 
आणि चांगले बोलण्याचा संकल्प करूया
 बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
 
 
 
जीवनामध्ये सुख मिळवायचा कोणताच मार्ग नसतो 
त्यापेक्षा आपण आनंदी राहणे
 हाच सुखी राहण्याचा एकमेव मार्ग आहे
            गौतम बुद्ध 
अशी शिकवण देणाऱ्या महामानवाला 
आज त्यांच्या जन्मदिनी कोटी कोटी वंदन
 बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
 
 
 
 
आज बुद्ध पौर्णिमेचा सण 
आहे जिकडे पाहू तिकडे आनंदी आनंद
आपल्या जीवनातील अज्ञान कायमचे नाहीसे होऊन
आपल्या जीवनामध्ये कायम आनंदी आनंद येत राहो 
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
 
 
 
आज जगाला युद्धाची  नाही
 गौतम बुद्धांच्या शांतीच्या शिकवणुकीची गरज आहे
 आज माणसाला विज्ञानाच्या प्रगतीची नाही
 तर मानवतावादी शिकवणुकीची गरज आहे
 आणि ही महान शिकवण देणाऱ्या गौतम
 बुद्धांची आज आहे जयंती
 बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
 
 

बुध्द पौर्णिमा निबंध भाषण शुभेच्छा पहा | buddha purnima best wishes essay speech marathi 2023

अशा पद्धतीने आज आपण बुद्ध जयंती निमित बुद्ध जयंती विशेष लेखात बुद्ध जयंती मराठी माहिती निबंध भासहण तसेच शुभेच्छा संदेश 2023 ही माहिती पहिली. आपल्याला ही नक्कीच आवडली असेल. आपले मित्र मंडळी यांना ही जरूर पाठवा. धन्यवाद !
 
FAQ 
 
1. 2023 मध्ये बुद्ध पौर्णिमा किती तारखेला आहे?
5 मे
 
2.बुद्ध पौर्णीमा  म्हणजे काय?
बुद्धांचा जन्म झाला तो दिवस 
 
3.2023 मध्ये आपण कितवी बुद्ध पौर्णिमा साजरी करत आहेत.
2085
 
4.बुद्ध पौर्णिमेला कोणत्या नावाने ओळखले जाते ?
बुद्ध जयंती, वेसाक 
आमचे इतर लेख 

Leave a Comment