महाराष्ट्र दिन कविता मराठी 2023

maharashtra day Kavita in marathi 2023 : एक मे 1961 ला स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि एक मराठी अस्मिता म्हणून महाराष्ट्र राज्याला, या मराठी भाषेला एक वेगळी ओळख मिळाली. मराठी भाषा बोलणारा मुलुख म्हणून महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली.या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले. आपल्या महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. आज आपण 2023 मध्ये महाराष्ट्र दिन साजरा करीत असताना सर्वप्रथम या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली पाहिजे.आज सर्वजण एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या फेसबुक, व्हाट्सअप च्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना दिसतील. या शुभेच्छांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्याची गौरवगाथाच ही शुभेच्छा संदेश सांगत असतात. अगदी तसाच एक साहित्यप्रकार तो म्हणजे कविता. असं म्हणतात शंभर पानांचे काम एक कविता करत असते. कारण त्या कवितेमध्ये दडलेला अर्थ हा अतिशय व्यापक असतो म्हणूनच आज  महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानेआपण महाराष्ट्र दिन साजरा करत असताना महाराष्ट्र दिनावर आधारित व महाराष्ट्र राज्याचे  महत्त्व सांगणारी,गुण गौरव करणाऱ्ऱ्या मराठी कविता पाहणार आहोत. या दोन्ही कवितांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या जमेच्या बाजू समजणार आहेत.आपण ही रचना (maharashtra day Kavita in marathi 2023) आपले मित्रमंडळी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवून त्यांना महाराष्ट्र दिन साजरा करत असताना त्यांचाही आनंद द्विगुणीत करण्याची संधी म्हणजे आजचा हा आजचा हा लेख आहे.ह्या  कविता आपल्याला आपल्या महाराष्ट्र निर्मितीचा इतिहास उलगडून दाखवणार आहे.

maharashtra day Kavita in marathi 2023
महाराष्ट्र दिन कविता मराठी 2023

जय महाराष्ट्र अमर शेख यांची गाजलेली मराठी कविता | jay maharashtra poem in marathi

महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी आणि महाराष्ट्र हे मुंबईसह महाराष्ट्र असावे यासाठी जी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली या चळवळीमध्ये अनेक लेखक, कवी,शाहीर यांचा समावेश होता. यातील एक शाहीर म्हणजे शाहीर अमर शेख आणि यांची त्या काळात गाजलेली एक  कविता की ज्या कवितेने अक्का महाराष्ट्र दणाणून सोडला. ती कविता म्हणजे जय महाराष्ट्र. आज आपण ती कविता पाहणार आहोत. ही कविता पाहिल्यानंतर आपल्या देखील अंगावरती नक्कीच शहारे येतील. चला तर मग शाहीर अमर शेख यांची महाराष्ट्र दिनावर आधारित असलेली मराठी कविता पाहूया.

जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगणरी मराठी कविता Marathi poem on the importance of Maharashtra Day

 

 संयुक्त महाराष्ट्राचा  गाऊ गाणा 

 उंचाऊनी माना घेऊ ताणावर ताना

 

भाषेचा  थाट मराठी अहिराणी, कोकणी, गाठी 

शब्दोचाराची ही  शत्रूला वाटते धासती

ज्ञानेश्वर भिल्ल वारली घेई नित नवरसना 

सौंदर्य महाराष्ट्राचे क्षणाक्षणा प्रत्यय येते

 

माती सुगंध उधळते दरी कपार रिजवी मनाते 

गोमांतक, वेरूळ, अजंठा अमर मानवी स्वप्ना

 

कानडी, हिंदी, गुजराती, आंध्र,ओरिसा ही साथी

राखुनी त्यांच्या हक्काला बांधूनी लोकराज्याला

 

मुंबईपासून नागपूर सुख सनद वाटू सकलाना 

स्वातंत्र्य शांतता स्थापो अवघे जग त्याने व्यापू 

 

फडकवू ध्वज समानतेचा पर्वा न जीवाची करता 

असा आहे महान महाराष्ट्र आमुचा 

 

 शाहीर अमर शेख यांची ही जय महाराष्ट्र  कविता पाहिल्यानंतर आपली  मराठी अस्मिता जागी होते. आपण देखील या महाराष्ट्र लढ्याच्या कौतुकात गुंग होऊन जातो. चला तर अशीच एक महाराष्ट्राची महती सांगणारी कविता पाहूया. 

महाराष्ट्र दिनाची काविता मराठी २ | maharashtra din marathi poem २ 

आपण शाहीर अमर शेख यांची जय महाराष्ट्र ही कविता पाहिल्यानंतर आता  ‘प्रणाम माझा महाराष्ट्राला’ ही एक महाराष्ट्राची गौरवगाथा सांगणारी कविता पाहूया. या कवितेच्या कवयित्री आनंदी खोपडेआहेत.  यांची ही कविता आहे, ती वाचल्यानंतर माझ्या मनाला ती खूप भावली आणि म्हणून संग्रह रुपाने आपल्या समोर ती मी मांडत आहे. कवितेचे सर्वाधिकार कवयित्री आनंदी खोपडे यांनाच आहेत.

 

प्रणाम माझा या महाराष्ट्राला

जिथे लढले शूरवीर

प्रणाम माझा या महाराष्ट्राला

 जिथे आहेत हिरव्या झाडांच्या रांगा

प्रणाम माझा या महाराष्ट्राला

 जिथे आहे संस्कारांचा झरा 

प्रणाम माझा या महाराष्ट्राला

 जिथे असतो मातीचा ओलावा सदा

प्रणाम माझा या महाराष्ट्राला

 जिथे सह्याद्रीच्या डोंगररांगा 

 

 

अशा पद्धतीने या कविता आपण व्हाट्सअप, फेसबुक ,इंस्टाग्राम,ट्विटर यांच्या माध्यमातून आपले मित्र मंडळी विद्यार्थी नातेवाईक यांना कविता रूपी संदेश  पाठवून महाराष्ट्र दिनाचे हे पर्व आपण कवितेच्या माध्यमातून साजरे करू शकता.आमच्या या महाराष्ट्र दिनाच्या मराठमोळ्या कविता आपल्याला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. आपल्याकडे देखील अशा सुंदर महाराष्ट्र दिनाच्या काही छान छान कविता असतील तर त्या आपण आम्हाला नक्की पाठवा. आम्ही ते आपल्या नावासह प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद!

आमचे इतर लेख

Leave a Comment