बौद्ध धर्मियांचा सर्वात मोठा सण बुध्द पौर्णिमा काय आहेत यामागील कारणे ? Buddha Poornima is the biggest festival of Buddhism

भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे. भारतामध्ये विविध धर्माचे लोक राहतात. त्याचबरोबर अनेक भाषा बोलणारे लोक देखील लोक गुण्या गोविंदाने राहतात. एकमेकांचे सण उत्सव साजरे करत असताना लोक विविधतेच्या  सगळ्या बाबी विसरून एकत्र येतात.सर्वजण मिळून विविध धर्मांचे सण उत्सव साजरे करतात. शाळा, महाविद्यालयांमध्ये देखील वेगवेगळ्या नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करताना दिसतात.  थोडक्यात काय तर भारत हा एक वैविध्यपूर्ण असा देश आहे. आजच्या लेखात आपण बौद्ध धर्मीयांसाठी बुद्ध पौर्णिमा हा सर्वात मोठा सण का मानला जातो? याविषयी माहिती पाहणार आहोत.

बौद्ध धर्मियांचा सर्वात मोठा सण बुध्द पौर्णिमा आहे काय आहेत यामागील कारणे?

ज्या पद्धतीने हिंदू धर्मामध्ये दिवाळी ,पाडवा गणेशोत्सव यासारखे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्याचबरोबर ख्रिश्चन धर्मामध्ये नाताळ यासारखा सण तर  मुस्लिम धर्मामध्ये ईद सारखा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो. अगदी त्याच पद्धतीने बौद्ध अनुयायी किंवा बौद्ध धर्मीय लोकांसाठी बुद्ध पौर्णिमा म्हणजे जिला आपण वैशाखी पौर्णिमा म्हणतो ती अतिशय धुमधडाक्यामध्ये साजरी केली जाते. ही बुद्ध पौर्णिमा मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यामागे तीन कारणे प्रामुख्याने आपल्याला सांगता येतात.चला तर मग त्यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊया म्हणजे आपल्याला देखील समजेल की खरोखरच या बुद्ध पौर्णिमेचे बौद्ध धर्मीयांसाठी नेमके काय महत्व आहे.या लेखाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

सर्वप्रथम आपण हे जाणून घेतले पाहिजे की या बुद्ध पौर्णिमेला म्हणजेच वैशाखी पौर्णिमेला गौतम बुद्ध यांच्या जीवनामध्ये तीन महत्त्वाच्या घटना घडल्या.या तिन्ही घटना बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत म्हणूनच बौद्धधर्मीय बुद्ध पौर्णिमेला विशेष असे महत्व देताना दिसतात.

पहिली जर घटना पाहिली तर आपल्या लक्षात येईल की सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी महामानव गौतम बुद्ध यांचा जन्म झाला गौतम बुद्ध यांचा जन्म झाला तो दिवस होता तो म्हणजे वैशाखी पौर्णिमा या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाल्यामुळे बौद्ध धर्मीय ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी करतात हे पहिले कारण आहे की ज्यामुळे बुद्ध पौर्णिमेला विशेष असे महत्व आहे कारण याच दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला.

बुद्ध पौर्णिमेला घडलेली गौतम बुद्धांच्या जीवनातील दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे गौतम बुद्ध यांनी राजत्याग  केल्यानंतर मानवी जीवनातील दुःखाचे कारण काय आहे?या प्रश्नाचे उत्तर किंवा आत्मज्ञान त्यांना ज्या दिवशी प्राप्त झाले तो दिवस होता वैशाखी पौर्णिमेचा. 

माणसाला माणूस म्हणून वागवले गेले पाहिजे त्याला समानतेने जगण्याचा अधिकार आहे. अशी शिकवण अवघ्या जगाला गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माच्या माध्यमातून दिली. आपण जर विचार केला तर भारतामध्ये असणाऱ्या चातुरवर्णी व्यवस्थेमध्ये बहिष्कृत वर्गाला अतिशय हालाकीचे जिने जगावे लागत होते, परंतु ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली कारण का तर मानवतावादी तत्त्वज्ञान स्वीकारणारा ,कोणत्याही प्रकारचे भेदाभेद न करणारा धर्म म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान गौतम बुद्ध यांना ज्या दिवशी आत्मसात झाले तो दिवस म्हणजेच गौतम बुद्धांना आत्मज्ञान प्राप्ती झाली तो दिवस म्हणजे वैशाखी पौर्णिमेचा दिवस. म्हणून बौद्ध अनुयायी गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झालेला दिवस म्हणून या दिवशी ज्या पिंपळाच्या झाडाखाली म्हणजेच बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या वृक्षाची मनोभावे बुद्ध पौर्णिमेला पूजा करतात ही दुसरी घटना आहे की ज्यामुळे बौद्ध धर्मियांसाठी बुद्ध पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आहे.

बुद्ध पौर्णिमेला म्हणजेच वैशाखी पौर्णिमेला घडलेली तिसरी घटना म्हणजे गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण म्हणजेच ते हे जग सोडून पर लोकात गेले तो दिवस म्हणजे गौतम बुद्धांचा शेवटचा दिवस जो होता तो देखील वैशाखी पौर्णिमेचाच दिवस होता. म्हणूनच बौद्धधर्मीय गौतम बुद्धांचा जन्मदिवस ,गौतम बुद्धांचा ज्ञानप्राप्तीचा दिवस आणि गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण असा त्रिवेणी संगम असलेला दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा म्हणूनच बौद्ध धर्मीय अतिशय आनंद आणि उत्साह मध्ये बुद्ध पौर्णिमा साजरी करतात.

खरोखरच एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एखाद्या दिवसाची किती महत्व असते. हे या घटनेवरून आपल्याला जाणवते गौतम बुद्ध यांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या तीनही घटना वैशाखी पौर्णिमेला घडल्यामुळे या पौर्णिमेला विशेष अशी महत्व आहे आमची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद.

आमचे इतर लेख

सोपी योगासने करा आणि आरोग्य संपन्न बना  

Leave a Comment