शिवराज्याभिषेक सोहळा माहिती निबंध शुभेच्छा पोवाडा मराठी 2023 | Shivrajyabhishek Sohala nibandh wishesh in marathi

आजच्या या लेखातून अखिल हिंदुस्तानासाठी स्वाभिमानाची नव्हे तर अभिमानाची  बाब म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा की जो स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर पार पडला.म्हणूनच आम्ही Shivrajyabhishek Sohala nibandh wishesh in marathi आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 

 त्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यामध्ये मदत करणाऱ्या मावळ्यांसाठी हा दिवस म्हणजे सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस म्हणजे  SHIVAJI MAHARAJ CORONATION अर्थात शिवराज्याभिषेक सोहळा कारण याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना राजेपद मिळाले होते.रयतेला हक्काचा वाली मिळणार होता,छत्र मिळणार होते,म्हणून या शिवराज्याभिषेक दिनाचे हिंदुस्तानच्या इतिहासात विशेष असे महत्त्व आहे.याचे औचित्य साधून आज आपण शिवराज्याभिषेक सोहळ्याची मराठी माहिती पाहणार आहोत ती आपल्याला निबंध लिहीत  लिहीत असताना भाषण करीत असताना नक्कीच उपयोगी पडेल. 

Shivrajyabhishek Sohala nibandh wishesh in marathi
Shivrajyabhishek Sohala nibandh wishesh in marathi

शिवराज्याभिषेक मुहूर्त माहिती | Shivrajyabhishek Muhura

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला शिवराज्याभिषेक ज्या दिवशी आणि ज्या मुहूर्तावरती केला तो दिवस म्हणजे 6 जून 1674 हिंदू. पंचांगानुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंदनाम संवत्सर या शुभ दिनी ब्रह्म मुहूर्तावर हा सोहळा पार पडला. 

शिवराज्याभिषेक 6 जून लाच का करण्यात आला | Shivrajyabhishek 6 Jun Lach Ka 

  शिवाजी महाराजांनी जून महिन्यात  ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शिवराज्याभिषेक का केंला ? असा काहींना प्रश्न पडू शकतो आणि ते बरोबर देखील आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकासाठी 6 जून हा दिवस निवडला कारण का, तर छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला राजे म्हणून घेणार. राज्याभिषेक करणार. ही गोष्ट औरंगजेबाच्या पचनी पडणारी नव्हती.आतापर्यंत  अखिल हिंदुस्तानचा अनभिषिक्त सम्राट केवळ मीच आहे अशी औरंगजेबाची धारणा होती.आपल्याला शिवाजीच्या रूपाने प्रतिस्पर्धी तयार होणार म्हणून मुघल सम्राटऔरंगजेब चिंतेत होता. परंतु असे असले तरी या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डोंगर – दऱ्यांमध्ये असलेल्या रायगडावर आक्रमण करणे शत्रूला  तितके सोपे नव्हते.त्याच बरोबर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रयतेला देखील या सोहळ्याचा आनंद घेता येणार होता. एक म्हणजे हा सोहळा निर्विघ्न पार पडावा.शत्रूने आक्रमण करू नये आणि जरी केले तरी आपल्याला त्याच्यावर मात करता यावी. या एका दूरदृष्टीने सहा जून कोकणात पावसाचे दिवस म्हणून विचारपूर्वक ही तारीख छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकासाठी निवडल्याचे दिसते. 

राज्याभिषेक सोहळ्यासाठी कोणती तयारी केली होती | Shivrajyabhishek Sohalyachi Tayari 

   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची तयारी साधारण कितीतरी वर्षे  अगोदरपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली होती.आपल्या दरबारी असणारे सरदार, माता जिजाऊ यांच्याशी चर्चा करून या सोहळ्याच्या तयारीला सुरुवात केली होती.या तयारीत सर्वप्रथम काय केले असेल तर ज्या रायगडावर हा भूतो न भविष्यती सोहळा पार पडणार होता त्याची डागडुजी करायला सुरुवात केली होती.रायगडाला रंगरंगोटी करण्यात आली होती.या राज्याभिषेक सोहळ्याला अनेक विद्वान लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.हा सोहळा भव्य-दिव्य व्हावा यासाठी स्वराज्याच्या कानाकोपऱ्यातील ब्राह्मणांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.असे सांगितले जाते की जवळजवळ 1 हजार ब्राह्मण त्यावेळी रायगडावर या सोहळ्यासाठी उपस्थित होते.यावरूनच हा सोहळा किती मोठा होता याची आपल्याला कल्पना येते. याच बरोबर आपल्या राजे पदाला मान्यता मिळत आहे. हे परकीयांना देखील कळावे या उद्देशाने डच, पोर्तुगीज, इंग्रज यांच्या वकिलांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.जेणेकरून भविष्यामध्ये या परकीय सत्ता आपल्याला वचकून राहतील. शिवाय राजे पद मिळाल्यानंतर यांच्याकडून कर रूपाने आर्थिक हातभार देखील घेता येईल. हा हेतू यामागे होता. राज्याभिषेकाच्या दिवशी सात  पवित्र नद्यांचे जल आणि आपल्या स्वराज्याच्या चारी कोपऱ्यातील मृदा  यावेळी खास विधी करण्यासाठी आणली होती. थोडक्यात काय तर अतिशय जय्यत तयारी करण्यात आली होती.

शिवराज्याभिषेक रायगडावरील हत्ती बाबतची घटना | Raygdavaril Hattichi Ghatana 

   शिवराज्याभिषेक सोहळया मध्ये राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावरती हत्ती कसे आणले असतील  या घटनेला विशेष महत्त्व आहे. याबाबत हेनरी या इतिहासकाराने आश्चर्य व्यक्त केलेआहे. या दुर्गम किल्ल्यावरती या सोहळ्यासाठी हाती नेमके कुठूनआले? याबाबत अशी एक दंतकथा सांगितली जाते की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे इतके  ताकदवर आहेत की त्यांनी रायगडाच्या पायथ्या पासून आपल्या बाहुमद्धे उचलून इथपर्यंत आणले आहे आणि  हे ऐकून हेन्री विचारात पडला होता.  पण त्यामागील घटना ही थोडी वेगळी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डोक्यामध्ये आपला राज्याभिषेक करून घेणे गरजेचे आहे ही कल्पना आली. त्यावेळी त्यांनी रायगड या किल्ल्याची निवड करून तशी तयारी करायला सुरुवात केली होती. आणि त्याच वेळी रायगडावर हत्तींची छोटी पिल्ले अगोदरपासूनच नेऊन ठेवण्यात आली होती. राज्याभिषेकाची सर्व तयारी जुळवा जुळव करेपर्यंत काही एक जो कालावधी गेला तोपर्यंत ते हत्ती मोठे झाले होते.खरोखरच असा दूरदृष्टीपण असलेला अखिल हिंदुस्थानातील एकमेव जाणते  राजे  म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. यांच्या अगम्य बुद्धिमत्तेला या राज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा.

शिव राज्याभिषेकाच्या सिंहासनाची जबाबदारी | Rajyabhishek Sinhasan Jababdari 

    छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेक,CORONATION साठी  रायगडावर एक खास असे सिंहासन बनवून घेतले होते.ते जवळजवळ बत्तीस मन सोने वापरून तयार करण्यात आले होते. हे सिंहासन अतिशय आकर्षक पद्धतीने तयार करून घेण्यात आले होते.या सिंहासनासाठी अनेक किमती हिरे-मोती वापरण्यात आले होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ही जबाबदारी आपले विश्वासू रामजी दत्तो चित्रे यांच्यावरती सोपवली होती.देवगिरीच्या साम्राज्यानंतर अखिल हिंदुस्तानात सिंहासनाधीश म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या सिंहासनावर बसणारा असल्याने हे बनवताना विशेष अशी काळजी घेण्यात आली होती.

राज्याभिषेक विधींची जबाबदारी कोणी पार पाडली |Shivrajyabhishe Vidhi  Jbabdari 

              देवगिरीचे साम्राज्य नष्ट झाल्यानंतर अखिल हिंदुस्तानात कोणाचाही राज्याभिषेक झाला नव्हता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून पुन्हा एकदा अखिल  हिंदुस्तानचे राजा आम्हीच आहोत याला मान्यता मिळवण्यासाठी राज्याभिषेकाचे नियोजन केले होते. परंतु या आधी कित्येक वर्षे असा विधी पार न पडल्याने हा विधी पार पाडण्यासाठी कोण हुशार आणि विद्वान व्यक्तीची गरज होती.म्हणूनच हे काम काशीचे विश्वेश्वर पंडित अभ्यासू असल्याने तेच हा विधी पार पाडू शकतात. म्हणून एकमताने शिवराज्याभिषेक विधीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. विश्वेश्वर पंडित यांचे वडील त्यांना गागा या नावाने संबोधत होते.आणि या विश्वेश्वर पंडितांनी म्हणजेच गागाभट्ट यांनी शिवराज्याभिषेकाचा विधि पार पडला. शिवराज्याभिषेक कशा पद्धतीने पार पडेल कोणते विधी केले जातील याचा सर्व सखोल अभ्यास गागाभट्ट यांनी केला. त्या संदर्भातील सर्व लेखन त्यांनी आपल्या राज्याभिषेक प्रयोग या ग्रंथात केला असून शिवराज्याभिषेक सोहळा  कसा पार पडणार? याची सर्व मांडणी या ग्रंथात केलेलीआहे. गागाभट्ट यांच्या मदतीला भोसले घराण्याचे पुरोहित प्रभाकर भट्ट आणि त्यांचे पुत्र बाळंभट्ट या विद्वानांच्या मार्गदर्शनाखाली राज्याभिषेकाचा सोहळा विधियुक्त संपन्न होणार होता. 

शिवराज्याभिषेक करण्याला कोणी विरोध केला  | Shivrajyabhishek Sohalyla Virodh 

            छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचे घोषित केले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक करू शकत नाहीत.कारण का तर शास्त्रानुसार राज्याभिषेक किंवा राजेपद हा हक्क केवळ क्षत्रियांना आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीत.असा काहीसा कयास त्याकाळच्या ब्राह्मण वर्गाने काढला.तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना काही काळ याचा सामना करावा लागला. परंतु रयतेसाठी मला राज्याभिषेक करणे गरजेचे आहे या भूमिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या घराण्याचा पूर्वजांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्या शोधातून छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज राजस्थानातील उदेपूर येथील आहेत व ते सिसोदे घराण्यातील असून हे घराणे रजपूत घराणे आहे. म्हणजेच काय तर छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय आहेत. हे यातून सिद्ध झाले.त्यानंतर सर्वानुमते शिवराज्याभिषेकसोहळा करण्याला  संमती मिळाली.या घटनेवरून आपल्याला असे दिसते की चातुर्वर्ण्य व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांना देखील राज्याभिषेक करण्यामध्ये अडसर  ठरली होती. त्याकाळच्या ब्राह्मण वर्गाने या राज्याभिषेकामध्ये अनेक धार्मिक विधींचा खोडा घातला व  त्यामुळे राज्याभिषेकाच्या अगोदर अनेक विधी छत्रपती शिवाजी महाराजांना करून घ्यावे लागले होते जसे की…………….

तुला पुरुषदान विधी | Tula Purushdan  Vidhi 

       तुला पुरुषदान विधी आणि राज्याभिषेक यांचा जवळचा संबंध नसला, तरी राज्याभिषेक करण्या आधी हा विधी छत्रपती शिवाजी महाराजांना करावा लागला होता.आपले स्वराज्य वाढवत असताना ज्या ब्रह्महत्या झाल्या होत्या. त्या  त्याच्या पापक्षालनार्थ किंवा त्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी तुला पुरुषदान विधी छत्रपती शिवाजी महाराज यांना करणे भाग पडले. या विधीमध्ये तुला म्हणजे तोलणे काय तोलणे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वजनाइतके सोने, हिरे,जडजवाहीर हिरे, रूपे, माणिक,मोती वविविध धातूयांनी करण्यात आली. नंतर त्याचे दान करण्यात आले .हेन्री या इतिहासकरच्या जवळजवळ 16000होण इतका खर्च या विधीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना आला. होता थोडक्यात काय आपल्या हिंदू धर्मामध्ये धर्माच्या नावाखाली कशा पद्धतीने अराजकता होती. याचे हे उत्तम उदाहरण यामध्ये एक राजा असून देखील या धर्म व्यवस्थेचा भाग म्हणून हा विधी करावा लागला. एवढेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या अगोदर आपली  मुंज  करून घ्यावा लागळी हद्द म्हणजे सोयराबाई यांच्याशी शास्त्रोक्त पद्धतीने पुन्हा विवाह करावा लागला. खरोखरच विचार करायला लावणारे आहे हे सगळे.असो रयतेच्या कल्याणासाठी काहीही करून छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून घ्यायचा होता व  त्यासाठी त्यांनी राज्याभिषेकाच्या अगोदर वैदिक पद्धतीने सर्व विधी करून घेतले. 

शिवराज्याभिषेक सोहळा कसा पार पडला |Shivrajyabhishek Sohala Varnan 

      राज्याभिषेकाची जय्यत तयारी पाहिल्यानंतर हा सोहळा नेमका कसा पार पडला?असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली असेल. खरोखरच अखिल हिंदुस्तानात असा भव्यदिव्य आणि शून्यातून विश्व निर्माण करणारा सोहळा म्हणजे राज्याभिषेक सोहळा.अतिशय दिमाखात पार पडला हा राज्याभिषेक सोहळा एका दिवसात पार पडला नाही अनेक दिवस हा सोहळा सुरू होता प्रत्येक दिवशी वेगवेगळे धार्मिक विधी होते आणि शेवटी राज्याभिषेक सोहळा मुख्य विधी पार पडला. 

 या राज्याभिषेकाला सुरुवात करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम माता जिजाबाई याना नमस्कार करून त्याचे दर्शन घेतळे नंतर या राज्याभिषेकाच्या विधीला सुरुवात झाली.आईच्या दर्शनानंतर छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले. भवानी मातेचा आशीर्वाद घेतल्यानंतर राज्याभिषेक विधीला सुरुवात झाली. 

राज्याभिषेकाच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा राज्याभिषेक आपण का करत आहोत यासाठीचा संकल्प सोडला. या संकल्प मध्ये असं म्हटल आहे की,मी  माझ्या प्रजेच्या रक्षणासाठी, एक प्रजापालक म्हणून, मी हा राज्याभिषेक करत आहे.हा सर्व राज्याभिषेक परमेश्वराप्रती अर्पण करत आहे. हा संकल्प सोडून राज्याभिषेकाला सुरुवात झाली.या राज्याभिषेकाची सुरुवात गणेश पूजनाने झाली.गणेश पुजनानंतर कलश संस्थापन व इतर विधी करण्यात आले.हे सर्व पहिल्या दिवशी करण्यात आले या दिवसाच्या शेवटी होम-हवन करून विनायक शांति करण्यात आली.

दुसऱ्या  दिवशी इंद्रिय पूजन करण्यात आले.एक राजा म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही निर्णय घेत असताना अगदी विचारपूर्वक घायवे लागतील. त्यासाठी आपल्या मन, भावना, इंद्रियांवर नियंत्रण हवे. यासाठी दुसऱ्या दिवशी हा विधी करण्यात आला.

गणेश पूजन, विनायक शांति केल्यानंतर 6 जून 1674 हा राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. राज्याभिषेक सोहळा सर्व विधी पहाटे पासूनच सुरू होते. विविध मंत्रपठण सुरू होते. प्रात काळी शिवाजी महाराज यांनी अभ्यंगस्नान केल्यानंतर आपल्या कुलदेवतेला वंदन केले, माता जिजाऊ यांचे आशीर्वाद घेतले.अखिल हिंदुस्तानचे छत्र बनू पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक /CORONATION सोहळ्याला सुरुवात झाली.

राज्याभिषेकाच्या वेळी विधी करतअसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी पांढऱ्या शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान केले होते. गळ्यामध्ये सुगंधी फुलांचे हार घालण्यात आले होते. राज्याभिषेकाच्या दिवशी मुख्य कार्यक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक गागाभट्ट यांच्या करवी होणार होता. अभिषेकाच्या वेळी वैदिक पद्धतीने सर्व देव-देवता यांचे पूजन होम हवन झाले त्यानंतर शिवाजी राजे छत्रपती बनणार होते. म्हणून त्यांच्या डोक्यावर  छत्र धरण्यात आले.आता यापुढे या स्वराज्याच्या ते  छत्र बनणार होते.छत्राप्रमाणे आपल्या प्रजेचे रक्षण करणार होते. त्यांच्या डोक्यावर छत्र धरल्यानंतर हर हर महादेव ! छत्रपती शिवाजी महाराज की जय ! या घोषणांनी रायगड कडाडून निघाला.या विधीच्या वेळी रायगडावरती तोफांचे बार उडवण्यात आले.अशी योजना होती की राज्याभिषेकाच्या वेळी सर्वच गड-किल्ल्यांना तोरणे बांधण्यात आली होती नि  एकाच वेळी या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज याना तोफएतुण मुजरा करण्यासाठी किंवा सलाम करण्यासाठी  सर्व गड-किल्ल्यांवर  एकाच वेळी तोफांचे धडाधड बार उडवण्यात आले. हे बार हा आवाज इतका जोरदार होता की  दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या औरंगजेबाला देखील हायसे वाटले असेल, म्हणूनच की काय या राज्याभिषेकाची वार्ता समजल्यानंतर औरंगजेब एका ठिकाणी म्हणतो,

                         या खुदा अब तो हद हो गई I

                         तू भी उस शिवा के साथ हो गया I

                        आज शिवा छत्रपती हो गया I

     औरंग्याच्या या वाक्यातून राज्याभिषेक सोहळा हा किती गरजेचा होता. हे तुमच्या लक्षात आले 

  महाराजांच्या डोक्यावरती छत्र धरण्याचा विधी संपन्न झाल्यानंतर बत्तीस मणांचे जे  सोन्याचे सिंहासन बनवले होते त्या सिंहासनावर ती छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले. नगारे, ढोल, ताशे, सनई, चौघडे, तोफांचा आवाज सर्वत्र जसा दिवाळी दसरा असल्यासारखा आनंद राज्याभिषेकाच्या दिवशी होता. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर तर बाजूला सोयराबाई बसल्या होत्या. या दोघांच्या मागच्या बाजूला थोड्या अंतरावरती शिवपुत्र  स्वराज्याचा छावा म्हणून ओळखले जाते जाणारे संभाजी राजे बसले होते.सप्त नद्यांचे जल आणले होते. त्या जलाचे घट अष्टप्रधान मंडळातील सदस्यांकडे होते आणि या नद्यांचे जल आपल्या राजाप्रती अर्पण केले जाणार होते. या क्षणापासूनच छत्रपती शिवाजी महाराज आज सर्व रयतेचे राजे बनणार होते. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती बसलेली असताना अंगावर लाल रंगाची दिमाखदार वस्त्रे परिधान केली होती. डोक्यावरती राजमुकुट घालण्यात होता.  राज्याचा गुणगौरव म्हणून काही स्त्रियांनी त्यांना ओवाळले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ढाल आणि तलवारीच्या साह्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या ढाल – तलवार आणि धनुष्य यांचे पूजन करण्यात आले.या पूजनानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेचे आशीर्वाद मागितले. शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे,असे आवाहन केले. याच वेळी विद्वान गागाभट्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुकुटावर हात ठेवला आणि त्यांचा राजा शिवछत्रपती म्हणून गौरव केला व दरबारात एकच जयघोश सुरू झाला.  हर हर महादेव !छत्रपती शिवाजी महाराज की जय!असं म्हणतात की हा विधी पार पडणाऱ्या गागाभट्टांना 7000 होऊन दक्षिणा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिली.

 या मुख्य कार्यक्रमानंतर राजांनी  अष्टप्रधान मंडळ व  विविध सरदार यांच्या विविध पदांवर नियुक्त्या केल्या. अशी नियुक्ती पत्रके त्यांना दिली. सोने-नाणे, हिरे माणके,वस्त्रे यांचे खूप मोठे दान त्या दिवशी महाराजांनी केले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली.या  मिरवणूकीतील हत्ती पाहून इतक्या डोंगराळ प्रदेशात हत्तीवर कुठून आले? यांनी अचंबित झालेला हेनरी याचा किस्सा आपण वर वाचलेलाच आहे. खरोखरच हा लेख लिहिताना हे वर्णन करत असताना क्षणभर या राज्याभिषेकाचा मी देखील साक्षीदार आहे.असाच काहीसा भास मला झाला आणि खरोखरच मोगलांच्या कचाट्यातून हिंदवी स्वराज्याची स्थापना करून प्रजेचे रक्षण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

    हा शिवराज्याभिषेक सोहळा व त्याची भव्य दिव्यता पाहून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या, कोणत्याही पदाचा लोभ नसणाऱ्या शिवाजी महाराजांना हा भव्यदिव्य राज्याभिषेक का करावासा वाटला? हा प्रश्न अनेकांच्या मनाला पडतो त्याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला | Shivaji Rajaani Shivrajyabhishek Ka Kela?

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकीय आणि परकीय यांच्याशी संघर्ष करून आपला राज्यविस्तार केला. परंतु त्या काळामध्ये इतका पराक्रम करून देखील त्यांची ओळख एक मोगल सत्तेचे मनसबदार अशीच काहीशी धारणा होती.हे सर्व बदलून औरंगजेबाला आव्हान देणे यासाठी राज्याभिषेक करणे गरजेचे होते. हा राज्याभिषेक करण्यामागे कोणताही मोठेपणा दिखाऊपणा अजिबात नव्हता. हे आपण जाणले पाहिजे इतरही अनेक कारणे होती जसे की…………….

1. राजा म्हणून मान्यता | Raja Mhnun Manyata 

    आपण ज्या प्रदेशांमध्ये आपले स्वराज्य निर्माण केले आहे. त्या प्रदेशाला एक शिस्त लागावी लोकांना एक सुरक्षितता मिळावी.यासाठी आपला कोणतरी राजाही आहे.आपल्याला कोणतरी वाली आहे आणि यासाठीच , म्हणून महाराजांनी आपला राज्याभिषेक करण्याचे ठरवले.

2. प्रजेचा विश्वास संपादन करण्यासाठी | Prajecha Vishvas Milvnyasathi 

      प्रजेला अखंड सुखी ठेवायचं असेल. प्रजेचे रक्षण करायचे असेल. तर प्रजेकडून देखील सहकार्य मिळणे कोणत्याही राजासाठी जास्त गरजेचे असते आणि याच सहकार्याच्या भावनेतून या प्रजेचा विश्वास संपादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. 

3. हिंदवी स्वराज्याचा मान्यता | Hindavi Swrajyala Manayta 

         हिंदवी स्वराज्य स्थापन केले परंतु त्याला कोणी केवळ एक बंड,जहागिरी म्हणू नये एक खोटा लढा म्हणू नये तर ते एक स्वतंत्र राज्य आहे. ते राज्य म्हणजे हिंदवी राज्य आणि हिंदवी स्वराज्य हाच एक वेगळी मान्यता मिळावी तसेच या परिसरातील छोटे-मोठे राजे यांनी औरंगजेबाच्या प्रस्थखाली न राहता छत्रपती शिवाजी महाराज यांना सहकार्य करावे अशी देखील भूमिका यामागे होती.

4. विविध कायद्यांची अंमलबजावणी | Kaydyachi Amalbjavni Krnyasathi 

   जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना प्रजा आपले राजे ही मान्यता मिळत नाही तोपर्यंत त्यांनी केलेल्या कायद्यांचे जनता कसे पालन करणार? आणि म्हणूनच आपल्या स्वराज्याला एक शिस्त लागावी काही कायदे करता यावेत? ही देखील प्रशासकीय बाब या राज्याभिषेका मागे होती.

5. औरंगजेब सत्तेचे वर्चस्व अमान्य करण्यासाठी | Aurangjeb Astitv Amanya Krnyasathi 

  दिल्लीच्या तख्तावर असणारा औरंगजेब हा स्वतःला मीच अखिल हिंदुस्तानचा प्रमुख आहे असे भासवत होता.अशावेळी आपण एवढे मोठे हिंदवी स्वराज्य निर्माण केले.हिंदवी स्वराज्याची  एक वेगळी ओळख असली पाहिजे.आम्ही औरंगजेबाच्या छत्राखाली न राहता आम्ही आमचे स्वबळावर एक वेगळे हिंदवी स्वराज्य निर्माण केले आहे.ही जाणीव औरंगजेबला करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला राज्याभिषेक करून घेतला.

6. परकीयांवर दबदबा निर्माण करण्यासाठी  | Parkiyanvr Dabdab

     व्यापाराच्या निमित्ताने डच, पोर्तुगीज, इंग्रज भारतामध्ये आले होते. त्‍यांच्‍यावरती आपला एक दबदबा असला पाहिजे त्यांच्याकडून आर्थिक बाबींचा फायदा आपल्याला करून घेता आला पाहिजे.त्यांचा हस्तक्षेप कमी झाला पाहिजे.हा  सर्व फायदा करून घ्यायचा असेल तर आपण या देशाचे राजे आहोत. याची जाणीव त्यांना करून देणे गरजेचे होते,म्हणूनच आवर्जून अनेक परदेशी वकिलांना या राज्याभिषेक सोहळ्यासाठी बोलावण्यात आले होते. या सोहळ्यात त्यांचा उचित मान सन्मान करण्यात आला होता. या परकीय प्रतिनिधीनी  देखील छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक नजराणे आणि भेटवस्तू दिल्या.

.  वरील सर्व कारणे  लक्षात घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला? तो करण्यामागे केवळ राजा म्हणून आपल्याला मान्यता मिळावी एवढी स्वार्थी भूमिका त्यांची नव्हती. तर आपल्या प्रजेला छत्र मिळावे. आपला एक दबदबा निर्माण व्हावा. आपली प्रजा सुखी राहावी. अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वराज्य निर्माण केले त्यांचे परिवार सुखासमाधानाने ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. याच भूमिकेतून राज्याभिषेकाचा घाट घालण्यात आला. 

राज्याभिषेक करण्याचे फायदे/परिणाम  | Rajyabhishek Krnyache Fayde,Parinam 

        राज्याभिषेक केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना प्रशासन तर व्यवस्थित रित्या सांभाळत आलेच परंतु इतर देखील अशा अनेक बाबी आहेत की त्या केवळ राज्यभिषेकामुळे शक्य झाल्या. 

1. प्रजा हिताचे कायदे | Praja Kitache Kayde 

 छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकमुळे राजा म्हणजे प्रमुख पद प्राप्त झाल्यामुळे आता जनतेच्या हिताचे कायदे ते करू लागले.त्यामुळे कायदा व सुव्यवस्था निर्माण व्हायला मदत झाली.

2. मोगल सत्ता वाढता दबाव | Moghlanvr Dabav 

   शिवराज्याभिषेक सोहळा ने  छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि लढाऊ बाणा याची दखल मोगल सत्तेला घ्यावी लागली. एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा दबदबा मोघल सत्तेवर वाढला आणि तो केवळ राज्याभिषेका मुळेच.

3. परकीयांचा हस्तक्षेप कमी | Goryancha Hstkshep Kmi 

  मुघलांशी संगनमत करून डच, पोर्तुगीज,इंग्रज  हिंदुस्तानातील राजकारणामध्ये हस्तक्षेप करत होते. परंतु राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या देशाचे प्रमुख झाले आणि साहजिकच त्यांचा हस्तक्षेप कमी झाला.

4. स्वतःच्या चलनाची निर्मिती | Swtachi Chalan Nirmiti 

  राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे नाणे बनवायला सुरुवात केली. कोणतीही देवाण-घेवाण करण्यासाठी तांबे आणि सोन्याची नाणी तयार केली.तांब्याच्या नाण्यांना शिवराई तर सोन्याच्या नाण्यांना शिवराई होन म्हणून ओळखले जाऊ लागले.

5. राज्यकारभारात शिस्त  | shist 

     राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून अनेकांवर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. या जबाबदाऱ्यांमुळे राज्यकारभार करताना छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मोलाची मदत झाली.

     हे सर्व कशामुळे करता आले छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या राज्याभिषकामुळे.वरील सर्व विवेचन पाहिल्यानंतर राज्याभिषेक हा दिसायला जरी सोहळाअसला तरी आपल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी तयार केलेली ही एक चौकट होती. हे विसरून चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अखिल हिंदुस्थानामध्ये एक स्वाभिमान निर्माण करण्याचे काम केले.आणि म्हणूनच की काय आज भारतभर नव्हे तर जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापन, गनिमी कावा युद्धनीती, नेतृत्व निर्णय क्षमता या सगळ्या बाबी अभ्यासल्या जात जात आहेत. 

राज्याभिषेक पोवाडा मराठी  2023  | Shivrajyabhishek Povada marathi 2023 

      पूर्वीच्या काळी आपल्या राजाचे पराक्रम पोवाड्याच्या माध्यमातून वर्णन केले जायचे. त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक घटना पोवाड्याच्या माध्यमातून वर्णन केल्या आहेत.अनेक शाहिरांनी शिवराज्याभिषेक यावर देखील आपल्या पोवाड्यातून मांडला. शाहीर प्रल्हादराव जामखेडकर आपल्या शिवराज्याभिषेकाच्या पोवाड्यात म्हणतात,

              शके 1596 साली सुवेळ आली,

             हिंदभु आली, तिलक शोभतो शिवराया खास,

         पटाईत योद्धा महाराष्ट्रात,प्रल्हादराय नित्य दंग कवणात धृ……..

 

               शिवसिंह झाला भूपाल | राज्य स्थापिल |

               बंड मोडिले | यवणावर केली मात |

        गो ब्राम्हण पालक ख्यात | प्रल्हादराय नित्य दंग कवणात || 

 यात पोवाड्यात फक्त पहिले नि शेवटचे कडवे आहे.हा राज्याभिषेक पोवाडा आहे.अनेक शाहिरांनी शिवराज्याभिषेक सोहळा यावर पोवाडे केलेआहेत.

शिवराज्याभिषेक शुभेच्छा मराठी 2023 | Shivrajyabhishek Shubhechaa marathi wishesh 2023 शिवराज्याभिषेकच्या हार्दिक शुभेच्छा 2023/Shivrajyabhishek Sohala nibandh wishesh in marathi

       आपण आज नवीन वर्ष असो की  कोणताही सण उत्सव असो. शुभेच्छा देत असतो तर आपल्या इतिहासातील एक अजरामर दिवस म्हणून शिवराज्याभिषेकाच्या देखील शुभेच्छा आपण  एकमेकांना दिल्या पाहिजेत.मी अल्पसा प्रयत्न केलाय आपल्याला नक्की आवडेल ……..

              1.झुकला तो संपला ,

               उभा राहिला तो छत्रपती झाला ,

              शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

              2. स्वराज्य हाच ध्यास,

                 स्वराज्य हीच आस ,

                 स्वराज्य हीच आन-बान शान,

                 आणि स्वराज्य हाच माझा अभिमान.

                 शिवराज्याभिषेक  दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

                   3. रायगडावर सनई-चौघडे ढोल वाजले,

                    माझ्या शिवरायांचा पराक्रम पाहुनी,

                   मुघल सोडा तेतीस कोटी देव ही लाजले. 

                  शिवराज्याभिषेक  दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

                 4. ज्यांनी आम्हाला हलक्या घेतले,

                 त्यांनाच आम्ही आमचे सामर्थ्य दाखवले 

                 32 मनाच्या सिंहासनावर,

               हिंदवी स्वराज्य मानाने विराजमान झाले

             शिवराज्याभिषेक  दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

 

 शिवराज्याभिषेक सोहळा पहा Shivrajyabhishek Sohala 

आपल्याला हा विडियो पाहिल्यानंतर या भव्य दिव्य सोहळ्याची अधिक कल्पना येईल. 
 

 

शिवराज्याभिषेक सोहळा या विशेष लेखातून  राज्याभिषेक सोहळ्यात  पार पडलेल्या विधि,सोहळा, शिवराज्याभिषेक का केला? त्यामागे कारणे होती? या राज्याभिषेकाची फायदे किंवा परिणाम अशा सर्वच बाबींवर प्रकाश टाकण्याचे काम केलेले आहे.तसेच शिवराज्याभिषेक पोवाडे ,शिवराज्याभिषेक शुभेच्छा ह्या देखील पहिल्या. आपल्याकडे जर अजून काही अधिकची माहिती असल्यास नक्की कमेंट करा शिवराज्याभिषेक सोहळा इतरांपर्यंत जरूर पोहोचवा. 

आमचे अप्रतिम लेख 

सरल पोर्टल स्टुडेंट प्रमोशन कसे करावे ? तसेच टॅब सुरू इयत्ता पहिली ते दहावी वार्षिक नियोजन 

 

 

  

 

 

 

 

 

 

2 thoughts on “शिवराज्याभिषेक सोहळा माहिती निबंध शुभेच्छा पोवाडा मराठी 2023 | Shivrajyabhishek Sohala nibandh wishesh in marathi”

  1. महत्त्वपूर्ण माहिती.अभ्यास करून लिहिण्यात आलेले आहे.मांडणी आणि भाषा एकदम सोपी नी‌ सुटसुटीत.लेखकाचे अभिनंदन.

    Reply

Leave a Comment