अकरावी ऑनलाइन प्रवेशावेळी विद्यार्थ्यानी केल्या या मोठ्या दहा चुका ! 11th Admission 10 Biggest Mistakes in First Round

  अकरावी ऑनलाइन प्रवेश २०२३ २४ साठी पहिल्या ROUND साठी  विद्यार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन करून भाग 1  भरला त्यानंतर भाग 2 मध्ये ज्या महाविद्यालयांना आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे त्यांचे ऑप्शन फॉर्म देखील भरले ,परंतु हे करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांकडून  साधारणपणे  दहा अशा मोठ्या चुका झाल्या आहेत. की त्या चुका जर विद्यार्थ्यांनी टाळल्या असत्य  त्या तर कदाचित त्यांना हवे ते कॉलेज पहिल्याच फेरीमध्ये मिळाले असते. म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आपण अकरावी प्रवेश फेरीच्या फर्स्ट राऊंड मध्ये अनेक  विद्यार्थ्यांनी केलेल्या 10 BIG MISTEKES आहेत त्या आपण पाहणार आहोत.

अकरावी दुसऱ्या फेरीला /राऊंड ला सुरुवात कधी होणार ? |When will the eleventh second round start?

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात कधी होणार?असा अनेकांना प्रश्न पडला आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसऱ्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक अकरावी प्रवेशाच्या संकेत स्थळावर सोमवार दिनांक 26 जून 2023 ला  जाहीर होणार आहे. थोडक्यात या फेरीची सुरुवात सोमवार पासूनच सुरू होईल अशी दाट शक्यता आहे. कारण यावर्षी लवकरात लवकर अकरावी प्रवेश पूर्ण करायचे आहेत, कारण प्रवेश लेट झाल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असते.त्याबाबत आलेले अपडेट येताच आम्ही तात्काळ आमच्या wtp ग्रुपला त्या update देत असतो. 

तसेच ज्यांनी अजून पहिल्या फेरीत प्रवेश मिळून घेतला नाही त्यांनी तो तत्काल घ्या. त्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे 26 जून 2023 पर्यन्त आपण प्रवेश घेऊ शकत

अकरावी ऑनलाइन प्रवेशावेळी विद्यार्थ्यानी  केल्या या मोठ्या दहा चुका
अकरावी ऑनलाइन प्रवेशावेळी विद्यार्थ्यानी  केल्या या मोठ्या दहा चुका

अकरावी प्रवेशावेळी झालेल्या दहा चुका 

अकरावी ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरत असताना बऱ्याच मुलांकडून ज्या चुका झाल्या त्यातील जय मेजर चुका आहेत त्या आपल्या माहितीसाठी देत आहोत. दुसऱ्या राऊंड च्या वेळी या चुका करू नयेत.बऱ्याच मुलांकडून यातील छोट्या मोठ्या चुका झाल्या आहेत. चला तर मग स्टेप बाय स्टेप त्या पाहूया.. 

1.अकरावी ऑनलाइन प्रवेश 1 st ROUND 2023 24 च्या  वेळापत्रकाकडे दुर्लक्ष

अकरावी ऑनलाइन प्रवेश  2023 24 प्रक्रिये संदर्भात अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक अकरावीच्या प्रवेशाच्या वेबसाईट वरती जाहीर करण्यात आले होते, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे वेळापत्रक नीट समजून घेतले नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना आपले रजिस्ट्रेशन आणि भाग 1 भरता आला नाही.म्हणून काही विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीपासून वंचित राहिले.

2. अकरावी प्रवेश भाग 1 आणि 2 भरल्यानंतर तो लॉक न करणे

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला आपले रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्राथमिक माहिती असलेला भाग 1 पूर्ण भरल्यानंतर आपल्याला तो लॉक करावा लागतो त्याचबरोबर आपण आपले ऑप्शन फॉर्म भाग 2 मध्ये भरल्यानंतर तो देखील आपल्याला दिलेल्या कालावधीमध्ये लॉक करावा लागतो. प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये काही विद्यार्थ्यांनी भाग 1 विहित  वेळेत LOCK न केल्यामुळे त्यांना भाग 2 भरण्याची संधी मिळालीच नाही. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपला भाग 2 भरला परंतु तो लॉक करायचा ते विसरले.अशा विद्यार्थ्यांना देखील या करावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीपासून वंचित ठेवण्यात आले.या संदर्भात अधिक माहितीसाठी खालील लेख निळ्या अक्षरावर क्लिक करून पहा. 

3. शाळेकडून फॉर्म व्हेरिफाय न करणे 

जे विद्यार्थी कोणत्याही विशेष आरक्षणाचा किंवा सामाजिक आरक्षणाचा लाभ घेतात अशा विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा भाग एक भरल्यानंतर आपला फॉर्म शाळेकडून  व्हेरिफाय करून घेणे अतिशय गरजेचे होते. कारण जर आपण भाग एक व्हेरिफाय करून केला नाही तर आपल्याला भाग दोन भरता येत नव्हता हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नव्हते. आम्ही आशा करतो की अकरावी प्रवेशाच्या नव्याने चालू होणाऱ्या दुसऱ्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी या चुका करू नयेत.

3. शाखा निवडताना गोंधळ

बऱ्याच विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रिया ही नवीन असल्यामुळे आपल्याला नेमके आर्ट, कॉमर्स की सायन्स यापैकी कशाला प्रवेश घ्यायचा आहे. याविषयी संभ्रम होता यामुळेच त्यांनी फॉर्म भरल्यानंतर त्यांना कॉमर्स शाखेमध्ये जायचे होते.त्या  विद्यार्थ्यांकडून सायन्स शाखेसाठी फॉर्म भरले गेले. असा गोंधळ अनेक विद्यार्थ्यांकडून झालेला आहे. यासाठी या सर्व बेसिक गोष्टी माहित करून दुसऱ्या ROUND चा फॉर्म नीट भरावा. 

4. कॉलेजचे  माध्यम

आपल्याला अकरावी कोणत्या मिडीयम मधून करायची आहे? या प्रश्नाचा अर्थ बऱ्याच विद्यार्थ्यांना समजला नाही. काही विद्यार्थ्यांनी असा अर्थ घेतला की तुम्ही दहावीला कोणत्या माध्यमांमध्ये होता?  अशा विद्यार्थ्यांकडून माध्यम निवडत असताना चुका झाल्या. या ठिकाणी आपल्याला अकरावीला मराठी,हिंदी,इंग्रजी,उर्दू कोणत्या माध्यमातून शिकायचे आहे.हे त्या ठिकाणी नमूद करायचे होते.11 वी  प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या राउंडला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपण भरलेला भाग एक अनलॉक करून आपल्याला जे हवे ते माध्यम यामध्ये बदल करून घ्यायचा आहे.

5. कॉलेज कोणासाठी आहे 

आपण ज्या कॉलेजला प्रवेश घेत आहोत ते कॉलेज फक्त मुलांसाठी आहे की  फक्त मुलींसाठी आहे की मुली आणि मुली असे CO  EDUCATION आहे.हा देखील भाग बऱ्याच विद्यार्थ्यांना समजला नाही आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून चुका झाल्याचे निदर्शनास येते.

6.कॉलेजचा प्रकार आणि फी 

अकरावी प्रवेशासाठी ऑप्शन फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉलेज केवळ आपल्याला जाण्या येण्यासाठी सोयीचे आहे. एवढी एकच बाब पाहिले परंतु ते कॉलेज कोणत्या प्रकारचे आहे? कारण कॉलेज कोणत्या प्रकारचे आहे यावरून त्याची फी किती असेल हे ठरत असते आणि याविषयी अनेक  विद्यार्थ्यांना कल्पना नव्हती.  ज्यावेळी विद्यार्थी चांगले गुण मिळून  देखील  संबंधित कॉलेजची फी जास्त असल्याने  प्रवेश करावे लागले यासाठी  साधारणपणे कॉलेजचे खालील प्रकार पडतात ते नीट समजून घ्या.

1. अनुदानित कॉलेज Aided College

असे कॉलेज की ज्या ठिकाणी शासनाकडून त्याला बऱ्यापैकी अनुदान मिळत असते. साहजिकच अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना कमी कमी फी भरावी  लागते.

2. विनाअनुदानित कॉलेज Unaided College

असे कॉलेज की ज्या ठिकाणी शासनाकडून कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य त्या कॉलेजला मिळत नाही अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना  फी भरावी लागते. कधी कधी काही प्रमानात शासन यांना अनुदान देत असते. 

3. स्वयं अर्थसाहित कॉलेज  Self Financing College

असे कॉलेज की, ज्या कॉलेजला विद्यार्थ्यांकडून फी उपलब्ध होत असते आणि त्या फी मधूनच या कॉलेजचा सर्व कारभार चालत असतो.या कॉलेजची फी भरमसाठ 

4. सरकारी कॉलेज Government College

या कॉलेजचा संपूर्ण खर्च शासनामार्फत केला जातो,साहजिकच अशा कॉलेजची संख्या कमी असली तरी या ठिकाणी खूपच कमी विद्यार्थ्यांकडून आकारले जाते.

अकरावी ऑनलाइन  फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉलेज नेमके कोणत्या प्रकारचे आहे ? हे पाहिले नाही. अशा विद्यार्थ्यांनी किमान आता दुसऱ्या फेरीमध्ये सहभागी होत असताना या सर्व बाबी तपासून पाहणे गरजेचे आहे.

7.ऑप्शन फॉर्म मधील क्रम 

बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉलेजचा प्रकार न पाहता कॉलेज निवडले आणि त्याचबरोबर त्याचा ऑप्शन फॉर्म भरत असताना देखील आपल्याला निवडलेल्या कॉलेजमधील आपल्याला सर्वात आवडणारे कॉलेज एक नंबरला हवे, त्यानंतर त्यापेक्षा थोडे कमी आवडणारे दोन नंबरला अशा पद्धतीने सर्वात जास्त आवडणारे सुरुवातीला आणि सर्वात कमी आवडणारे शेवटी असा जो क्रम होता तो विद्यार्थ्यांनी नीट लावला नाही त्यामुळे पहिल्या यादीमध्ये नाव आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना पहिल्या क्रमांकाचे कॉलेज मिळून देखील विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा नाही असे त्यांचे मत आले आणि हे चुकीचे आहे म्हणून अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या राउंड मध्ये विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरत असताना या बाबीचा विचार करावा.ज्या कॉलेजला प्रवेश घेणार त्याच कॉलेजची नावे टाकावीत. आपल्यावर कॉलेज दहाच टाकावीत हे बंधन नाही तर कमीत कमी एक टाकावे अशी अट आहे हे समजून घ्या. 

8. कॉलेजचे कट ऑफ न पाहणे 

आपल्याला मिळालेले गुण आणि गेल्या वर्षीचे त्या कॉलेजचे असलेले कट ऑफ त्याचबरोबर कॉलेजचा प्रकार कॉलेजची फी या सगळ्यांचा एकत्रित विचार करून विद्यार्थ्यांनी आपले ऑप्शन फॉर्म भरायचे असतात. परंतु विद्यार्थी या बाबी तेवढ्या गांभीर्याने घेत नाहीत.साहजिकच त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमी टक्केवारी असून देखील खूप नावाजलेली कॉलेज की ज्यांचे मेरिट खूप हाय असते अशी कॉलेजेस टाकल्यामुळे काही मुलांना  एकही कॉलेज पहिल्या राउंड वेळी मिळाले नाही. कारण का तर त्यांनी त्या कॉलेजचे कट ऑफ पाहिले नाही .आता दुसऱ्या राउंडला सुरुवात होण्याअगोदर  पहिल्या राऊंड कट ऑफ जरूर पहावे .ही बाब सर्वात महत्त्वाची आहे पहिल्या फेरीचे कट ऑफ पीडीएफ खाली देत आहोत ते पाहून दुसऱ्या फेरीचे ऑप्शन फॉर्म भरावेत. 

9. कागदपत्रे अपलोड न करणे 

आपल्याला पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी लागणारे निकाल पत्रक ,शाळा सोडल्याचा दाखला , हमीपत्र, NCL प्रमाणपत्र (ज्यांना लागू आहे त्यांनी) सर्व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे गरजेचे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कागदपत्रे अपलोड केलेल्या त्यांनी तात्काळ ती अपलोड करावीत.

10.PROCEED FOR ADMISSION 

ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्या राउंड/फेरीमध्ये  मध्ये प्रवेश लागलेला आहे .आणि त्यांना त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश घ्यायला जाण्यापूर्वी PROCEED FOR ADMISSION यावरती क्लिक करायचे होते. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा नसून देखील या बटणावरती क्लिक केल्याची चूक केली आहे तर विद्यार्थ्यांनी यापुढे अशी चूक करू नये.

💥पसंतीक्रम ठरविण्यासाठी मार्गदर्शन 

 

1.पसंतीक्रम निश्चित करताना त्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे मागील कट ऑफ, आपणास मिळालेले गुण, हवी असलेली शाखा, फी, माध्यम, अनुदान प्रकार, शिकविले जाणारे वैकल्पिक विषय, निवासापासूनचे अंतर, जाण्यायेण्याची सोय, वसतिगृह सुविधा, क्रीडांगण, इ. बाबींचा साकल्याने विचार करून पसंतीक्रम ठरवा.

2.विद्यार्थ्यास प्रवेशासाठी त्याच्या पसंतीनुसार किमान एक व कमाल दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचे पसंतीक्रम देता येतील. प्रथम पसंतीक्रम मिळाल्यास प्रवेश घेणे सक्तीचे असेल. (नियमित फेऱ्यांमध्ये)

3.पसंतीक्रम ठरविण्यासाठी अगोदर शाखा व माध्यम निश्चित करा व त्यानंतर येणाऱ्या यादीतील आपणास योग्य वाटत असणाऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयांची यादी करा व त्यामधील सर्वात योग्य पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय प्रथम घेऊन त्याप्रमाणे क्रम काळजीपूर्वक ठरवा व नंतरच ऑनलाईन पसंतीक्रम नोंदवा.

4.ज्या विद्यालयात आपणास प्रवेश घ्यावयाचा नाही अशा उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंतीक्रमामध्ये समावेश करू नका.

5.प्रत्येक फेरीला पसंतीक्रम बदलण्याची मुभा असल्यामुळे प्रत्येक फेरी स्वतंत्र असणार आहे. पसंतीक्रम ठरविताना मागील फेरीचे Cut Off तपासा.

6.यासाठी वेब पोर्टलवरील Know your Eligibility या सुविधेचा वापर करा.

7. सर्व दहा पसंतीक्रम भरलेच पाहिजेत असे नाही. तसे शक्य नसल्यास दहापेक्षा कमी पसंतीक्रम दिले तरी चालतील.

8.एकाच उच्च माध्यमिक विद्यालयातील शाखा, अनुदान प्रकार माध्यम विचारात घेऊन त्याला स्वतंत्र सांकेतांक (Code) दिलेले आहेत. त्यामुळे एकाच विद्यालयाला शाखा, अनुदान प्रकार, माध्यम यानुसार एकापेक्षा अधिक वेळा असू शकतात त्यामुळे कॉलेजचे कोड निवडताना दक्षता घ्या.

या सर्व दक्षता पण ऑप्शन फॉर्म भरताना घेतल्या तर त्याला अकरावी प्रवेशाच्या वेळी जे हवे ते कॉलेज मिळू शकते.

आजच्या लेखाचे सार 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पहिल्या फेरीच्या वेळी विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षीचे कॉलेजचे कट ऑफ कॉलेजचे माध्यम त्याचबरोबर ऑप्शन फॉर्म भरताना कोणत्या प्रकारची खबरदारी घेतली नाही म्हणूनच त्यांना पहिल्या फेरीच्या वेळी अडचणी आल्या किंवा काहींना प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन भाग 2 भरण्यासाठी सज्ज राहायचे आहे.

आमचे इतर लेख 

Leave a Comment