Pनिपुण महाराष्ट्र निपुण भारत” ह्या लक्षवेधी अभियानाच्या अंतर्गत शाळापूर्व तयारी पहिले पाऊल माहिती |catching campaign Nipun Maharashtra Nipun Bharat

निपुण महाराष्ट्र निपुण भारत ह्या लक्षवेधी अभियानाच्या अंतर्गत शाळापूर्व तयारी पहिले पाऊल या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षण विभागाकडून  काही सूचना प्राप्त झाल्या आहेत.चला तर मग catching campaign Nipun Maharashtra Nipun Bharatत्याविषयी माहिती पाहूया.

 

catching campaign Nipun Maharashtra Nipun Bharat
निपुण महाराष्ट्र निपुण भारत” ह्या लक्षवेधी अभियानाच्या अंतर्गत शाळापूर्व तयारी पहिले पाऊल माहिती

निपुण महाराष्ट्र निपुण भारत अभियान उपक्रमाची माहिती catching campaign Nipun Maharashtra Nipun Bharat

शालेय शिक्षणाच्या सबलीकरणासाठी केंद्र शासनाद्वारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व निपुण महाराष्ट्र निपुण भारत अभियान अंतर्गत प्राथमिक स्तरावर सन २०२६ २७ पर्यंत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यावर सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानुसार आपण निपुण महाराष्ट्र निपुण भारत या अभियानातंर्गत वय वर्ष ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करतच आहात. सदर कार्यक्रमामध्ये शासन, ग्रामपंचायत समुदाय सहभाग, स्थानिक पातळीवर कार्यरत सामाजिक संस्था व ग्रामस्थ या मुख्य घटकांच्या समन्वयाने व पुढाकाराने मुलांच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत होण्यास मदत होत आहे. आपल्या मुलांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान वाढीसाठी त्यांच्या पालकांचा हातभार लागल्यास मुलांना निपुण लक्ष गाठण्यास चांगली मदत होते याचा अनुभव आपण आपल्या मागील वर्षाच्या २०२२-२३ च्या पहिले पाऊल शाळापूर्व तयारी अभियानाच्या माध्यमातून घेतला – आहे.

पहिले पाऊल राबवण्या विषयी मार्गदर्शक सूचना 

 शैक्षणिक वर्षात २०२३ २४ साठी आपल्याला महाराष्ट्रातील इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र मुलाना शाळेत दाखल करून घेण्यासाठी ह्या प्रत्येक दाखल पात्र मुलांना शाळापूर्व तयारी पहिले पाऊल” महाराष्ट्रातील प्रत्येक वाडी वस्तीवर प्रभावीपणे राबविण्यासाठी आपल्या स्तरावर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन आपले सहकार्य व सहभाग खूप महत्वपूर्ण आहे.

पहिले पाऊल उपक्रम कार्यवाही

निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत शाळापूर्व तयारी पहिले पाऊल” आपल्या स्तरावरून सर्व जिल्ह्यातील सर्वच शाळात होणार असून सदर शाळापूर्व तयारी मेळाव्यात सर्व अधिकारी  तसेच माता गटांच्या सहभागातून पहिला मेळावा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित तरी आपण ह्या शाळापूर्व तयारी मेळाव्याला भेटी देऊन दाखल पात्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन माता-पालकांना, मुख्याध्यापक व गावकरी यांना मार्गदर्शन करावे. शाळापूर्व तयारी मेळावा पहिले पाऊल यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी आपला सक्रीय सहभाग असणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

पहिले पाऊल” शाळापूर्व तयारी मेळावा माहिती

१) यापूर्वी दिलेल्या सूचनानुसार तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरीय होणार्या शाळापूर्व तयारी प्रशिक्षण व मेळाव्यात सक्रीय सहभाग.

(२) आपल्या क्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांनी शाळापूर्व तयारी मेळावा व माता पालकांना भेट देऊन संवाद साधने गरजेचे आहे.

3.सर्व शाळामधील शाळापूर्व तयारी पहिला मेळावा माहे एप्रिल २३ ते ३० या दरम्यान तसेच दुसरा मेळावा जून महिन्यात होईल यासाठी नियोजन करणे व “पहिले पाऊल” शाळापूर्व तयारी मेळाव्याला भेट देऊन प्रत्येक मुल शाळेत दाखल करुण निपुण महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने उपरोक्त प्रमाणे आपले स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी.

अशा पद्धतीने निपुण भारत उपक्रमांतर्गत पहिले पाऊल शाळा पूर्व तयारी या संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी सर्व शाळांनी या उपक्रमाला उच्च न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि मुलांचे जे प्राथमिक अक्षर ज्ञान संख्या ज्ञान यावर प्रामुख्याने भर देऊन मुलांना शिक्षणाप्रती वडील निर्माण करावी यासाठी शासनाने राष्ट्रीय स्तरावरणीय उपक्रमाला सुरुवात करून राज्यस्तरावर आता त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

पहिले पाऊल उपक्रम राबवण्याबाबत परिपत्रक पीडीएफ

निपुण भारत निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत पहिले पाऊल उपक्रम शाळेत कसा राबवावा याविषयी मार्गदर्शक सूचना देणारे पीडीएफ आपल्याकडे कायम संग्रही राहावे आहे यासाठी देत आहोत.

DOWNLOD

अशा पद्धतीने आज आपण पहिले पाऊल उपक्रमाविषयी आणि त्याची अंमलबजावणी करण्याविषयी माहिती पाहिजे. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करा आणि शैक्षणिक क्षेत्रातील ही महत्त्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा धन्यवाद.

आमचे इतर लेख 

Leave a Comment