आषाढी वारी 2023 ला जाणाऱ्या वारकऱ्यांना व पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांना पथकरातून सूट | Exemption road tax devotees going to Ashadhi Wari

2023 च्या आषाढी  वारीबाबत एक महत्वाची माहिती आज आम्ही घेऊन आलो आहोत. पालख्यांना , वारकरी तसेच भाविकाच्या वाहनांना पथकरातून Exemption road tax devotees going to Ashadhi Wari सूट देणेबाबत 13 जानेवारीला महाराष्ट्र शासनाकडून एक आदेश काढण्यात आला आहे.या आदेशात कोणाला सूट आहे याची माहिती पाहूया


आषाढी वारी 2023 ला जाणाऱ्या  वारकऱ्यांना व पंढपुरला जाणाऱ्या भाविकांना पथकरातून सूट
आषाढी वारी 2023 ला जाणाऱ्या  वारकऱ्यांना व पंढपुरला जाणाऱ्या भाविकांना पथकरातून सूट

आगामी सन २०२३ च्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाच्या स्थानकांवर मानाच्या पालख्यांना व वारकरी तसेच भाविकाच्या वाहनांना पथकरातून सूट देणेबाबत.महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शासन परिपत्रक क्रमांक खाक्षेस २०२२/प्र.क्र.३१ / रस्ते – ९मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ यांनी दिनांक: १३ जून २०२३ परिपत्रक काढले असून यात असे म्हटले आहे की ,आगामी सन २०२३ च्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाच्या पालख्या तसेच भाविकांच्या व वारकन्यांसाठीच्या सोयी-सुविधा, त्यांचे वाहनांना पथकरातून सूट देणे, तसेच वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयाच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षतेखाली दि. ०१ जून २०२३ रोजी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये खालीलप्रमाणे चर्चा होऊन मा. मुख्यमंत्री महोदयांनी विविध विभागांना त्या अनुषंगाने सुचना व निर्देश दिलेत, त्यास अनुसरुन सर्व संबंधितांना या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पुढीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे. 

पथकरातून सूट मिळण्यासाठी व योग्य व्यवस्थापन यासाठी शासनाच्या सूचना  सूचना Government notices for exemption from road tax and proper administration (Exemption road tax devotees going to Ashadhi Wari suchna )

 1.वाहनावरील स्टीकर बाबत 

 पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांना “आषाढी एकादशी २०२३ गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस / पोलीस संबंधीत आर.टी.ओ यांचेशी समन्वय साधून पोलीस स्टेशन्स, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ ऑफीसेस मध्ये दि. १३ जून २०२३ पासून उपलब्ध करून द्यावेत. थोडक्यात नोंदणी करून घ्यावी लागेल. 

2. पथ करातून सूट मिळण्याचा कालावधी 

पंढरपूरला जातेवेळी व परत पंढरपूरहुन येतेवेळी आज दि.१३.०६.२०२३ ते दि.०३.०७.२०१३ या कालावधीत ही सवलत पालख्या, भाविक ते व वारकऱ्यांच्या हलक्या जड व वाहनांसाठीच असेल, अशा सूचना दिल्या आहेत, तसे स्टीकर्स / पास वर नमूद करण्यात यावे. सदरचे पास परतीच्या प्रवासाकरिता ग्राह्य धरण्यात येतील ,याप्रमाणे स्टीकर्स तयार करण्यात यावेत. ( नमुना सोबत जोडला आहे.) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांनी याबाबत सर्व पोलीस अधिकान्यांना गृह विभागामार्फत अवगत करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.

3.नाक्यावरील चोख पोलिस व्यवस्था 

सर्व पथकर नाक्यांवर स्वतंत्र पोलीस यंत्रणा ठेवावी. तसेच परिवहन विभागास देखील जादा बसेस गाड्या सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीकोनातून HSP (Highway Security Patrolling) मार्फत पथकर नाक्याजवळ पोलीसाची व्यवस्था करावी. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) डेल्टा / MSSC (Maharashtra State Security Council) फोर्स जास्त संख्येने तैनात करण्याचेही निर्देश दिले आहेत. 3. आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्ग तसेच राज्यातील इतर सर्व संबंधित रस्ते/ महामार्गावर रुग्णवाहीका व क्रेनची व्यवस्था करण्यात यावी. मुंबई-कोल्हापूर- बंगलोर, पुणे- सोलापूर इ. राष्ट्रीय मार्गावर सुद्धा क्रेनची व्यवस्था करण्याचे निर्देश MSRDC, NHAI, PWD च्या सर्व संबंधित अधिकान्यांना त्वरीत कळविण्याचे आदेश दिले आहेत.

 

वारीचा आनंद घेताना वारकरी व्हिडिओ

 

 

4.जड वाहन नियोजन कसे करावे 

 तसेच गरज पडल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी जड वाहनाला  आवश्यक असल्यास बंदी घालण्याबाबत परिवहन विभागाने योग्य ती कार्यवाही करावी.

5.रस्त्यांची दुरुस्ती आणि मार्गदर्शक फलक 

 महाराष्ट्र राज्यभरातून पंढरपूरला जाणारे रस्ते [उदा. मुंबई मधील सायन ते पनवेल महामार्ग, मुंबई- पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई बंगलोर राष्ट्रीय महामार्ग, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा- कोल्हापूर ते राज्य सिमेपर्यंतचा महामार्ग इ. महामार्ग तसेच मुंबई-पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग व मुंबई-पुणे-सोलापूर राष्ट्रीय मार्गाला जोडणारे नवीन राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामिण रस्ते इ.] या सर्वांचे खड्डे भरणे, दुरुस्ती कामे सुचना फलके लावणे इत्यादी कार्यवाही त्या त्या कार्यान्वयीन यंत्रणांनी (सा.बां. विभाग, म.रा.र. वि. महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, NHAI इ.) करावीत. 

६. रस्त्यांची देखभाल 

सदर कालावधीत रस्ता सुस्थितीत आणण्याची कामे राष्ट्रीय महामार्ग विभाग व NHAI ने तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत.

7.  पोलिस आणि आरोग्य सोई 

दर २०-२५ कि.मी. अंतरावर पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग इ. यंत्रणांनी संयुक्तिक रुग्णवाहीका, रस्ते खड्डे भरण्यासंबंधी मटेरीअल क्रेन इ. व्यवस्था ठेवावी. तसेच बन्याच महामार्गावर रस्ते सुधारण्याचे काम प्रगती पथावर आहेत, अशा कामांवर वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व संबंधित महामार्ग प्राधिकान्यांनी आवश्यक ती उपाययोजना करावी.

8. एसटी महामंडळ बसला करातून सूट 

महाराष्ट्र राज्यातून पंढरपूरकडे येणारे सर्व पथकर नाक्यांवर उपरोक्त कालावधीत पथकर माफी नसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सुट द्यावी, असे ठरले व राज्य परिवहन (S.T.) विभागाच्या अधिकान्यांनी गरजेप्रमाणे संबंधीत पोलीस ठाणे इ. कडे या अनुषंगाने कुपन / पास प्राप्त करून घ्यावेत. महाराष्ट्र राज्यभरातून पंढरपूरला जाणारे भाविक, वारकरी तसेच पालख्यांच्या वाहनाना संबंधित जिल्ह्यातील व शहरातील सर्व पोलीस ठाणे व वाहतुक विभाग / शाखा / चौकी येथून भाविकांचे मागणीप्रमाणे पथकर माफ (टोल फ्री) पासचे वाटप करण्यात यावे.

९.वाहनाचा  तपशील

 ग्रामीण पोलीस / आर.टी.ओ यांचेमार्फत दिले जाणारे कुपन्स / पावती यांची संख्या बाबतीत एकत्रित माहिती संबंधित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास / सा.बां. विभागास / NHAI कार्यालये याना माहितीकरीता सादर करावी. जेणेकरून भाविक व वारकरी वाहनांना पथकरातून सवलत दिल्यानंतर संबंधित उद्योजकांना State Budget मधून नुकसान भरपाई देणेत येईल. 

१०.वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी विशेष खबरदारी 

 पथकर नाक्यांवर वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ, ट्रॅफीक वार्डन व हैंड होल्डींग मशीन ठेवण्यात यावेत, ज्यामुळे या कालावधीत पथकर नाक्यांवर वाहतुक कोंडी होणार नाही,याबाबत सर्व संबंधित महामार्ग प्राधिकारी, पथकर कंत्राटदार यांनी कार्यवाही करावी.

११ मोफत पास सुविधा .याबाबत जाहीर प्रसिध्दी

 पोलीस व परिवहन विभागाने आषाढी एकादशीच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेस होण्याकरिता आवश्यकतेप्रमाणे अधिसूचना / जाहीर प्रसिध्दी करावी. या सुचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात याव्यात.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०६१३१२४२१४६६१८ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

आषाढी वारी 2023 ला जाणाऱ्या  वारकऱ्यांना व पंढपुरला जाणाऱ्या भाविकांना पथकरातून सूट परिपत्रक मिळण्यासाठी  अर्जाचा  टोल फ्री पास नमूना  पीडीएफ

आपल्याला देखील या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर शासनाकडून दिलेला अर्ज नमूना प्रिंट करा आवश्यक माहिती भरून त्यावर सही घ्या. 

DOWNLOAD  👈

वारकरी आणि भाविक यांच्यासाठी ही अतिशय आनंद देणारी माहिती त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचवा.  

 आमचे लेख 

लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी विचार  

Leave a Comment