jagtik arogya sanghatana information in Marathi :७ एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.आपले आरोग्य किती महत्वाचे आहे हे वेगळ काही सांगण्याची आवश्यकता नाही.कारण का तर मागील दोन वर्षात आलेला कोरोनारूपी राक्षस आपल्याला बरेच काही शिकवून गेला आहे. माणसाचे जीवन क्षणात कसे क्षणभंगुर होते.ते अनेकांनी पहिले असेल.म्हणून आपण आपल्या आरोग्यविषयी दक्ष राहायला हवे. भविष्यात कोरोना सारखी संकटे कायम येत राहतील पण जे आरोग्यविषयी दक्ष आहेत त्यांना मात्र या सगळ्याचा फटका बसणार नाही हे देखील तितकेच खरे आहे.या जाणीव जागृतीसाठीच जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. या जागतिक आरोग्य दिनाची मराठी माहिती 2023 अगदी नावीन्यपूर्ण असून world health day marathi information 2023 आपण आपले मित्र मैत्रीणी यांना सोशल मिडियावरून पाठवा आणि त्यांना आरोग्याचे महत्त्व समजावून सांगा.
चला तर आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने या जागतिक आरोग्य दिवसाची सुरुवात कधी झाली ते पाहूया.
जागतिक आरोग्य दिन माहिती |
जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यामागील इतिहास History behind celebrating World Health Day marathi information
आरोग्य ही बाब केवळ एखाद्या देशाने विचार करून चालत नाही. तर अखिल मानव जातीचा त्यात विचार झाला पाहिजे. एखादा नवीन आजार किंवा वेगवेगळे साथीचे आजार आले तर त्यावर उपाययोजना ही सर्वानी एकत्र येऊन करायला हवी. अशी अनेक देशांना गरज वाटू लागली आणि यातूनच जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली.अगदी सुरुवातीला अनेकांनी ही संघटना उभी करण्याकडे दुर्लक्ष केले मात्र जसजसे आरोग्याचे प्रश्न वाढू लागले व अनेक देश यात सहभाग घेऊ लागलेत. सध्या या संघटनेत १९३ देश सामील झालेले आहेत. थोडक्यात अखिल मानव जातीच्या आरोग्याचा विचार करणारी जागतिक पातळीवरील संघटना म्हणजे जागतिक आरोग्य संघटना या संघटनेनेच जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले नि आज देखील देत आहे.
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो | When is World Health Day celebrated?
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच World Health Orgnaization ची ज्या दिवशी स्थापन झाली तो दिवस म्हणजे ८ एप्रिल १९४८ आणि हाच दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. थोडक्यात जागतिक आरोग्य दिन साजरा होतोय याला 75 वर्षे झाली असे म्हणता येईल.
2023 मध्ये आपण कितवा जागतिक आरोग्य दिन साजरा करत आहोत ? How many World Health Day are we celebrating in 2023?
आपण 2023 मध्ये जो जागतिक आरोग्य दिन साजरा करत आहोत तो 75 वा जागतिक आरोग्य दिन आहे.
जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो मराठी माहिती | Why is World Health Day celebrated? marathi information
जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो ? तर माणूस स्वतच्या आरोग्यविषयी दक्ष नि सजग राहावा यासाठी हा दिन साजरा केला जातो.आपले आरोग्य याविषयी माणूस दक्ष बनावा यासाठीच जागतिक आरोग्य दिन साजरा केला जात आहे.
जागतिक आरोग्य संघटना आपले कार्य करत असताना किंवा हा आरोग्य दिन साजरा करताना दर वर्षी लोकांची जनजागृती करण्याचे काम करते. आरोग्याचा विचार करताना केवळ शरीर ,त्यांचे अपंगत्व यांचा विचार करत नाही. तर शरीर आणि मानसिक आरोग्य यावर देखील भर देताना दिसतात. थोडक्यात अखिल मानव जात सुखी आणि समाधानी व आरोग्य संपन्न कशी राहील यासाठी ही जागतिक संघटना काम करीत असते.
जागतिक आरोग्य दिन थीम 2023 | Jagtik Aarogya Din Theme 2023 world health day theme 2023 marathi information
दरवर्षी ही संघटना आरोगयाबाबत पूर्ण वर्षभर एखाद्या बाबीवर फोकस करीत असते. जसे गेल्या वर्षी म्हणजे 2022 च्या थीम मध्ये our planet our health थोडक्यात आमचा ग्रह आमचे आरोग्य . असा विचार मांडला होता. यात केवळ आमचा देश नाही तर आपल्या ग्रहावरील सर्व लोक सुखी हवेत. त्यांचे आरोग्य महत्वाचे आहेत. थोडक्यात कोरोना सारखी साथ आली तर तर आपण सर्वानी एकत्र यायला हवे असे सांगणारी ही थीम आहे.2023 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने healt for all अर्थात सर्वांसाठी आरोग्य ही थीम घेतली असून. अखिल मानव जातीचे आरोग्य सुधारण्यावर भर दिला आहे.
ह्या थीम त्या त्या वर्षीची आरोग्य समस्या विचारात घेऊन थीम ठरवली जाते. पोलिओ सारखी साथ या आरोग्य संघटनेच्या थीम मधूनच आकारास आली व आज पोलिओ आपल्याला या भूतलावरून नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे किंवा झाला आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. हे सगळे जागतिक आरोग्य संघटणेमुळे शक्य झाले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून कामाचे कौतुक | Jagtik Sanghtnekdun Konache Kautuk
ही संघटना या दिवशी आरोग्याशी संबंधित लोकांचे योगदान त्यांचा आदर सन्मान व तसे कार्यक्रम देखील राबवले जातात.गेल्या वर्षी म्हणजे 2022 ला परिचारिका म्हणजे Nurse व सुइणी यांच्या योगदानाला सलाम करताना हा या वर्षीच आरोग्य दिन दिसत आहे. खरोखर आरोग्य आणि डॉक्टर असे समीकरण आपण जोडत असतो पण त्यानं मदत करणाऱ्या परिचारिका व इतर मदतनीस वर्गामुळेच ते आपले काम बजाऊ शकतात. रात्र रात्र परिचारिका रुग्णांची सेवा करतात. कोरोंना काळात तर अगदी जीव धोक्यात घालून यानि अनेकानी जीवनदान दिलेले आहे तर आपण केवळ यावर्षीच नाही तर कायम त्यांच्या या कार्याची दखल घ्यायला हवी.
2023 चा आरोग्य दिन साजरा करण्यासाठी कल्पना | Ideas to celebrate Health Day 2023
हे सर्व करत असताना ज्या पद्धतीने नववर्ष सुरू होताना आपण अनेक संकल्प करतो अगदी केवळ आरोग्याच्या बाबतीत संकल्प नाही म्हणत, तर काही नवीन चंगल्या सवयी लावणे व आपल्याला लागलेल्या वाईट सवयी सोडणे यासाठी हा दिवस म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. चला तर सुरुवात करूया
जागतिक आरोग्य दिनाचे नवे संकल्प 2023 New resolutions for World Health Day 2023
असे काही संकल्प की जे आपले जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आरोग्य सुधारतील. चला तर मग पाहूया
१. चहा चे प्रमाण कमी | Let’s stop drinking tea
आज आपण बघतो की Dibeties रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. काहीना हा आनुवंशिक आजार असू शकतो पण ते प्रमाण खूप कमी आहे. Type २ म्हणजे आरोग्यविषयी दक्ष नसल्याने हा आजार ओढवून घेतलेल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर या आजाराला आमंत्रण देणारी एक गोष्ट ती म्हणजे चहा व कॉफी यांचे अतिसेवण. मी तर म्हणेन या दोन बाबी इतक्या भयानक असतील तर न पिलेलेच बरे . किंवा त्यांच्या प्रमानावर, गोडपणावर आपण लक्ष द्यायला हवे .
२. ६ तास झोप घेऊया | Let’s sleep for 6 hours
ही देखील आरोग्याच्या दृष्टीने एक महत्वाची सवय आहे. आपल्या शरीराने कितीही काम केले तरी त्याला किमान ६ तासाची झोप ही आवश्यक आहे. नाहीतर अनेक व्याधी होण्याची शक्यता असते. म्हणून लवकर झोपणे व लवकर उठण्याची सवय लावायला हवी असे मला वाटते.
३. मोबाईल मुक्त क्षण | Mobile free moment
बरेचजन दिवसभर मोबाईल पाहत असतात.सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ते मोबईल जवळ ठेवतात. याचा आरोग्यावर तर परिणाम होतोच. पण व्यक्ती घरात ,मीत्र परिवारात असून देखील सतत मोबाईल मध्ये व्यस्त असल्याने कोणाकडे त्यांचे लक्ष नसते. परिणामी घरात ,कामाच्या ठिकाणी आपला संवाद कमी होतो आपले मन मोकळे होत नाही. यावर उपाय काय ? तर दिवसातील काही तास आपण मोबईल ला हातात न घेणे व असे क्षण म्हणजे मोबईल मुक्त क्षण निर्माण केले पाहिजेत. गप्पा गोष्टी सुरू असतील अश्या वेळी सर्वानी आपले फोन काही क्षण एका ठिकाणी जमा केल्यास किती छान होईल. थोडक्यात मोबाईल हे आपले व्यसन झाले आहे .तर ते कमी झाले पाहिजे त्यासाठी मोबाईल मुक्त क्षण याची अमलबजावणी व्हायला हवीय.
४. बाहेरील अन्नपदार्थ वर्ज्य | Fast Food Dangerous To health ,Abstain from outside food
आजकाल पार्टी संस्कृती नव्याने बोकाळत आहे.पार्ट्या व बाहेरील फास्ट फूड खाल्ल्याने अनेक पचन संस्थेचे आजार वाढत आहेत. काहीना तर आतडयाचे कॅन्सर देखील होत आहेत. या शिवाय मधूमेह रुग्ण वाढत आहेत. यासाठी बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे.
५. सकस आहार |Let’s eat healthy
आजकाल मुलांचे आरोग्य नीट राहावे यासाठी पालक मुलांना सकस आहार फळे,भाज्या वगेरे देत असतात पण ते स्वतच्या शरीराकडे लक्ष देत नाहीत.असे न करता घरातील सर्वच लोकानी सकस आहार घ्यावा. कोणत्या आहारतून कोणती जीवनस्तवे मिळतात याची महिती मिळवावी व त्यांचे आहारात सेवन करावे.
६. योगा व ध्यानधारणा | Yoga And Meditation
शरीर लवचिक व निरोगी राहण्यासाठी योगासने ,सूर्यनमस्कार तर मनाच्या व्यायामासाठी ध्यान धारणा करावी . थोडक्यात शरीर व मन यांची निगा राखावी त्यांची काळजी घ्यावी. योगासने टीव्ही वर पाहून न करता प्रशिक्षित व्यक्तीकडून शिकून घ्यावीत हे ध्यानात ठेवावे.
७. व्यसनांपासून लांब राहुया | Stay away from addictions
सवय कोणतीही असो तिचा अतिरेक म्हणजे व्यसन होय. म्हणून कोणतेही व्यसन लाऊन घेऊ नये. आजकाल drink ही फॅशन बनत चालली आहे पूर्वी जे कमीपणाचे होते त्यांना लोक आज चांगले समजून वाईट मार्गाला जात आहेत . थोडक्यात व्यसन असेल तर आपले आरोग्य नीट राहुच शकत नाही म्हणून सवई लाऊ नये ज्याना लागलीय त्यांनी ते हळूहळू कमी करावे.
तर अजूनही काही बाबी आहेत ज्या आपण आंगीकरल्या पाहिजेत पण किमान आज आरोग्य दिनाच्या निमित्ताने यातील काही बाबी जरी आपण सुधारल्या काही नवीन सवयी लाऊन घेतल्या जर जागतिक होवो न होवो आपला आरोग्य दिन पार पडला. आणि हो ह्या सवयी केवळ एका दिवसांसाठी नको बरे त्या आयुष्य भरासाठी हव्यात असा दृढ संकल्प करूया नि आरोग्यम धनसंपदा याचा स्वानुभव घेऊया.
या जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची जनजागृती मोहीम सुरू केलीय त्यात सहभाग घेऊया.आजची ही जागतिक आरोग्य दिनाची माहिती आपल्या मित्र परिवार याना पाठवून त्यांना आरोग्यविषयी दक्ष करूया.world health day marathi information 2023 आपल्याला कशी वाटली हे नक्की कळवा. धन्यवाद !
FAQ आरोग्य दिनाची अधिक माहिती
1. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो ?
7 एप्रिल
2. 2023 ची जागतिक आरोग्य संघटनेची थीम कोणती आहे?
सर्वांसाठी आरोग्य
3. 2023 मध्ये कितवा जागतिक आरोग्य दिन साजरा होत आहे ?
75
आमचे इतर लेख
Khup chhan