jagtik mahila din marathi mahiti 2024 आज आपण संपूर्ण वर्षभरामध्ये विविध सण, उत्सव साजरे करत असतो यापैकीच एक दिवस म्हणजे महिला दिन होय. आजच्या लेखातून आपण जागतिक महिला दिन मराठी माहिती 2024 पाहणार आहोत. ही माहिती पाहिल्यानंतर आपल्याला जागतिक महिला दिवस का साजरा केला जातो.जागतिक महिला दिनाचे महत्त्व तसेच जागतिक महिला दिन साजरा करण्यामागे इतिहास अशी सर्व माहिती मिळणार आहे.
Table of Contents
जागतिक महिला दिन म्हणजे काय? | mahila din mahnje kay | what is women’s day in marathi
महिला दिन म्हणजे काय? असा अनेकांना प्रश्न पडतो तर जागतिक महिला दिन म्हणजे 8 मार्च रोजी संपूर्ण जगामध्ये एक महिलांच्या सन्मानार्थ जो उत्सव साजरा केला जातो त्या उत्सवाला आपण आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक महिला दिन म्हणू शकतो.
जागतिक महिला दिन साजरा करण्याची गरज | jagtik mahila din sajra karnyachi garaj
आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो नेमका तो साजरा करण्यामागे कोणती भूमिका आहे किंवा कशासाठी आपण जागतिक महिला दिन साजरा करतो हे आपल्याला खालील बाबी पाहिल्यानंतर लक्षात येईल की खरोखरच जागतिक महिला दिन साजरा करण्यामागे किती मोठा हेतू आहे.चला तर मग jagtik mahila din marathi mahiti 2024 ला आपण सुरुवात करूया.
१.महिलांचा राजकारणातील सहभाग | women’s performance in politics
जर केवळ भारताचाच नाही तर जगाच्या राजकारणाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या महिलांचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. जगाच्या राजकारणामध्ये पंधरा टक्के महिला देखील पुढाकार घेताना दिसत नाहीत. याचाच अर्थ काय तर सर्व क्षेत्रांचा आपण अभ्यास केला तर महिला अतिशय पिछाडीवर असलेल्या आपल्याला दिसतात.कुठेतरी ही विषमता कमी व्हावी यासाठी महिला सक्षमीकरण करणे गरजेचे आहे नि यासाठीच महिला दिन जगभरात साजरा केला जातो.
2.व्यवस्थापन क्षेत्र आणि महिला | managment field and women’s participation
आपण जर व्यवस्थापनाच्या क्षेत्रात महिलांचा सहभाग किती आहे हे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की केवळ 24 टक्के महिलाच व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये आहे उर्वरित क्षेत्रामध्ये व्यवस्थापन हे पुरुष मंडळीच करतात. कुठेतरी ही विषमता कमी होऊन महिला आणि पुरुष एका समसमान पातळीवर यावे याचे मंथन होण्यासाठी महिलांना त्यांचे हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव होण्यासाठी गणेश साजरा केला जातो.
3.आरोग्य सुविधा आणि महिला | aarogya suvidha ani mahila
जगाच्या पातळीवर महिलांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा आणि पुरुषांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर आपल्या असे ध्यानात येईल की महिलांना आरोग्याच्या बाबतीमध्ये मिळणाऱ्या सुविधा अतिशय कमी प्रमाणात आहेत. थोडक्यात आरोग्याच्या क्षेत्रात देखील खूप मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते आणि अशा काही तपावती कमी करण्यासाठी जाणीव जागृती म्हणून महिला दिन साजरा केला जातो.
4.लिंगभेद कमी करणे | ling bhed kami karane
स्त्री आणि पुरुष असा भेदभाव मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आणि तो भेदभाव म्हणजेच लिंगभेद भाव कमी व्हावा आणि स्त्री आणि पुरुष अगदी खांद्याला खांदा लावून काम करावेत ही देखील भूमिका महिला दिन साजरा करण्यामागे आहे.
5. वेतनातील तफावत | vetnatil tafavt
आज आपण सरकारी नोकऱ्या सोडल्या तर अगदी पूर्वी देखील महिलांना त्या ज्या काम करतात त्यापेक्षा कमी मोबदला देण्याची मानसिकता जनमानसामध्ये अनेक वर्षांपासून रुजलेली दिसते. अमुक व्यक्ती महिला आहे म्हणून तिला कमी रोजंदारी किंवा कमी पगार हे समीकरण समानतेला धरून नाही अशा सर्व बाबींचा पाठपुरावा करण्यासाठी जागतिक महिला दिन हे एक मोठे व्यासपीठ आहे.
6. महिलांना आत्मसन्मान देणे | mahilana aatm sanmaan Dene
बऱ्याचदा पण पाहतो की महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते परंतु असे न होता महिलांना देखील आत्मसन्मानाची वागणूक दिली पाहिजे आणि कुठेतरी या सर्वांविषयी जाणीव जागृती समाजामध्ये होणे गरजेचे आहे म्हणूनच 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय तथा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक महिला दिन साजरा करण्यामागील इतिहास | jagtik mahila dinacha itihas
आपण जर जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी साजरा केला जातो त्यामागे नेमका कोणता इतिहास आहे हे पाहिजे ठरवले तर आपल्या लक्षात येईल की, संपूर्ण जगामध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीला काही ठिकाणी लोकशाही शासन व्यवस्था येऊ पाहत होती मात्र सुरुवातीला महिलांना मतदानाचा अधिकार या पुरुषप्रधान व्यवस्थेने नाकारला होता. 1890 मध्ये द नॅशनल अमेरिकन सप्रेजिस्ट या संस्थेच्या मार्फत महिलांना देखील मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी खूप मोठे काम होत होते. हे काम सुरू असतानाच 1960 रोजी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये महिलांना सार्वत्रिक मतदान करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे अशी घोषणा करण्यात आली आणि तो दिवस होता तो म्हणजे 8 मार्च 1908. या दिवशी महिलांनी न्यूयॉर्क शहरामध्ये खूप मोठी निदर्शने केली आणि महिलांना मतदानाबरोबरच लिंग वर्णमालामत्ता शिक्षण अशा सर्व क्षेत्रांमध्ये समानतेची वागणूक मिळाली पाहिजे अशी मागणी केली गेली. या दिवसाची आठवण म्हणूनच आपण आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो.
भारतातील पहिला महिला दिन | bhartatil pahila mahila din
आपण जगामध्ये महिला दिन कधी साजरा केला हे पाहिल्यानंतर भारतामध्ये नेमका महिला दिन कधी साजरा झाला ही माहिती पाहत असताना भारतामध्ये मुंबई या ठिकाणी 8 मार्च 1943 रोजी मुंबई या ठिकाणी पहिला महिला दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर आठ मार्च 1971 ला पुण्यामध्ये देखील महिलांनी महिला दिनाचा मोर्चा काढला.
जागतिक महिला वर्ष माहिती | jagtik mahila varsha mahiti
जागतिक महिला वर्ष कधी साजरे केले गेले तर 1975 साली युनोने हे वर्ष अधिक महिला वर्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर मात्र हळूहळू अनेक महिला संघटना यापुढे आल्या. कालांतराने बँका शाळा महाविद्यालय या सर्वच ठिकाणी आठ मार्च दिवस महिला दिन म्हणून साजरा व्हायला सुरुवात झाली.
महिला दिन साजरा करण्याची मागणी | mahila din sajra karnyachi magni
1975 हे वर्ष येण्याने जागतिक महिला वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केली त्यानंतर 1977 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनांनी अनेक सदस्यांना आमंत्रित करून आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या दृष्टिकोनातून हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली.
मातृदिन आणि महिला दिन | matru din Ani mahila din
ज्याला जागतिक महिला दिन म्हणतो तोच दिवस काही राष्ट्रांमध्ये मातृ दिन म्हणून साजरा केला जातो. बल्गेरिया आणि रोमानिया या देशात हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो.
महिला दिनाचे महत्त्व | mahila dinache mhattv
महिला दिनाचे महत्त्व याविषयी माहिती सांगत असताना जागतिक महिला दिन खऱ्या अर्थाने समानतेची मागणी करणारा दिवस आहे या दिवशी नव्हे तर वर्षाचे 365 दिवस आपण महिलांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे परंतु समाजात एक जाणीव जागृती म्हणून हा महिला दिन अतिशय महत्त्वाचा आहे आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला आपले योगदान दाखवताना दिसत आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने असा संकल्प केला पाहिजे की स्त्री आणि पुरुष हे भेद निसर्गाने न करता माणसाने केलेले आहेत आपण माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे तो स्त्री आहे की पुरुष आहे या गोष्टींना इतके महत्व देऊ नये हे सर्व समजण्यासाठी महिला दिन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतो.
महिला दिनाच्या शुभेच्छा | mahila dinachya shubhecha
महिला दिनाच्या दिवशी महिलांना भेटकार्ड वेगवेगळे गिफ्ट दिले जातात त्याचबरोबर जागतिक महिला दिनाच्या आदरणीय शुभेच्छा देखील दिल्या जातात.
म्हटलं तर सखी आहेस तू,
रण रागिनी देखील आहेस तू,
या सृष्टीची निर्माती तू,
आधी तू अंत तू
महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
नको आता भेदभाव
आता हवी समानतेची हाव
जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
विधात्याची अप्रतिम निर्मिती तू ,
तूच हे जगत दाखवले ,
जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आमची ही जागतिक महिला दिन मराठी माहिती (jagtik mahila din marathi mahiti 2024)आपल्याला कशी वाटली हे नक्की कळवा.
आमचे हे लेख वाचा