आज शिवाजी महाराज असते तर

aaj shivaji maharaj aste tar : आज आपण तंत्रज्ञान माहिती, शोध यांचा वापर करून चंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत.आज मनुष्य शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध तर झालेला आहे पण सुसंस्कृत झालेला आहे का? हा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा ठरतो.आजची परिस्थिती पाहता, आजूबाजूचे गढूळ वातावरण पाहता आपल्याला कळत नकळतपणे असे वाटू लागते की जर आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर काय झाले असते?..( aaj shivaji maharaj aste tar) याचा मागोवा या लेखातून घेणार आहोत.

भविष्याचा वेध घेत असताना आपण भूतकाळात गेलो तर किंवा भूतकाळांमध्ये अनेकांनी कशा प्रकारच्या रणनीती आखल्या होत्या. त्या सर्वांचा विचार करता मेंदू अनेकदा सुन्न होतो म्हणूनच मनामध्ये आपसूकच एक प्रश्न निर्माण होतो. जर आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर काय झाले असते? जर तुमच्या मनामध्ये देखील हाच प्रश्न आला असेल तर याबद्दल आज आपण जाणून घेऊया जर महाराज असते तर महाराजांनी नेमके काय केले असते याबद्दल…

आज शिवाजी महाराज असते तर (aaj shivaji maharaj aste tar)
SHIVAJI MAHARAJ

आज शिवाजी महाराज असते तर (aaj shivaji maharaj aste tar)

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे अष्टप्रधान मंत्रीमंडळ आपल्या सर्वांना माहिती आहे महाराजांच्या अष्टप्रधान मंडळांमध्ये मंत्र्यांची असलेली स्थिती त्यांचा पद, सन्मान यामुळे त्या काळात देखील राजकारण अत्यंत महत्त्वाचे मानले जायचे परंतु सध्याची राजकारणाची स्थिती पाहता खूपच कीव येते. जर आज महाराज असते तर या सर्व राजकारणांना चांगला धडा शिकवला असता. राजकीय नितीतत्वे मूल्य काय असतात. या मूल्यांची सर्वसामान्य नागरिकांना असलेला आधार याचे महत्त्व त्यांनी समजून सांगितले असते. शिस्तबद्ध कारभार यामुळे राजकारण क्षेत्र त्यांनी आपल्या हातामध्ये घेतले असते. हल्ली राजकारणामध्ये होत असलेली पळवा पळवी त्यांनी भेदून टाकली असती आणि भविष्यात गलिच्छ  राजकारण करण्याचे कुणाची हिम्मत होणार नाही अशी तरतूद देखील केली असती..पण यासाठी aaj shivaji maharaj aste tar हे शक्य झाले असते हे विसरून चालणार नाही.

आज असता आमचा शिवबा

खूप सधन असता महाराष्ट्र

आजच्या राजकारणात नसता

कोणी कोणाचा चमचा

हा आमचा तो तुमचं

हा भेदभाव देखील नसता

आज महाराष्ट्रामध्ये महिलांचे स्थिती फारशी काही वेगळे नाही. महिलांवर होणारे अत्याचार पाहून आज महाराज असते तर काय झालं असतं.. असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य माता जिजाऊ, माता भवानी यांच्या सेवेसाठी आपण केले. स्वराज्य कसे वाढेल व स्वराज्यांमध्ये महिलांची भूमिका किती महत्त्वाची आहे याचे अनेक दाखले देखील स्वराज्य निर्मिती करताना आपल्याला दाखवले,असा राजा की ,

ज्यांनी कायमच

केला महिलांचा

आदर वेळ प्रसंगी

आप्त स्वकीयांचीही नाही

केली कदर असा

राजा दिलदारराजा शिव छत्रपती

परंतु आज महाराजांच्या काळातील स्वराज्याची राजधानी असलेल्या पुण्यात आज महिला सुरक्षित नाहीत.भर दिवसा एक माथेफिरू महिलेवर चाकू घेऊन धावतो तर किल्ल्याच्या पायथ्याशी एक प्रेमासाठी वासनाधीन वेडा झालेला व्यक्ती एका सुशिक्षित गुणवंत हुशार अशा मुलीचा खूण करतो हे फारच लज्जास्पद आहे. आज जर महाराज असते तर मुलींकडे,महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे डोळे काढून टाकले असते. हात पाय कापून वेशीवर त्याचे मुंडके टांगले असते. महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कठोर कायदे आणले असते. या सर्वांमुळे भविष्यात महिलांचे सुरक्षिततेचे धडे आणि त्यांना पाहायला मिळाले असते.

जेव्हा छत्रपती महाराज असताना म्हणजे साडेतीनशे वर्षांपूर्वी देखील देशाचा पोशिंदा शेतकरी हा सुखी होता. महाराजांनी शेतकऱ्याला आपल्या स्वराज्यामध्ये महत्त्वाचे स्थान दिले. शेतकऱ्यावर कधीच भीक मागायची वेळ येणार नाही याची काळजी घेतली होती परंतु आता परिस्थिती मात्र वेगळी झाली आहे. आजचा शेतकरी हा हलाखीची परिस्थिती जगत आहे .शेतकऱ्याच्या  पिकाला योग्य दर मिळत नाहीये. बी बियाण्यांमध्ये होणारी भेसळ, निसर्गाचा प्रकोप, दुष्काळ, पिकाला योग्य भाव न मिळणे यासारख्या विविध गोष्टींमुळे शेतकऱ्याच्या डोक्यांवर कर्जाचा बोजा वाढत आहे. कर्ज वेळेवर फेडता न आल्यामुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त झालेले आहेत.

आज अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत शेतकऱ्यांचे मुले बाळे आजही परिस्थितीशी दोन हात करून जगत आहेत. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर सर्वात सुखी असणारा व्यक्ती हा शेतकरी असता, कारण की महाराजांनी शेतकऱ्यांसाठी खूप सार्‍या चांगल्या योजना अमलात आणल्या असत्या.शेतकरी कसा सुखी राहील त्याचा विचार केला असता आणि म्हणूनच काळाची गरज याकरिता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्माला यावे आणि देशांमध्ये राज्यांमध्ये चाललेली परिस्थिती बदलावी अशीच मनामध्ये एक इच्छा तळमळ अशा अपेक्षा निर्माण होते.

महापुरुष आज आपल्यामध्ये नसतील तरी त्यांचे कार्य मात्र अजरामर असते . शिवाजी महाराज यांनी देखील हेच काम केले ज्या कार्याने आज देखील आपल्याला त्यांची आठवण आल्या शिवाय राहत नाही.आज जर राजे असते तर आज दिसणारी अनागोंदी आपल्याला दिसली नसती. हे नक्की.

सारांश

आजच्या या शिवाजी असते तर या लेखातून महाराजांच्या अंगी असणारे मोठेपण आपल्या ध्यानात आल्या खेरीज राहत नाही. आज आपण त्यांचे विचार नुसते बोलून उपयोगाचे नाही तर ते अंगिकारायला हवेत. त्यांनी दाखवलेला सुराज्याचा मार्ग आपण आपल्या लोकशाहीत देखील जपायला हवा हे नक्की.

आमचे इतर लेख

अहिल्याबाई होळकर संपूर्ण माहिती 

स्वामी विवेकानंद भाषण 

संत गाडगे बाबा मराठी माहिती निबंध 

मी शाळा बोलतेय