शाळेचे आत्मकथन निबंध मराठी shaleche aatmakathan essay in marathi

shaleche aatmakathan essay in marathi निबंध लेखनात वैचारिक,प्रसंग लेखन व आत्मकथन लेखन हे महत्वाचे बोर्डाच्या परीक्षेत विचारले जातात. त्यातील सर्वात सहज व लिहायला सोपा लेखनप्रकार म्हणजे आत्मकथन होय.आजच्या या लेखात आपण शाळेचे आत्मकथन हा निबंध(मराठी) कसा लिहावा?लिहिताना कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती पाहणार आहोत.चला तर मग shaleche aatmakathan essay in marathi पाहायला सुरुवात करूया.

shaleche aatmakathan essay in marathi
shaleche aatmakathan essay in marathi

मराठी भाषा विषयात अगदी पाचव्या इयत्तेपासून परीक्षेत येणारा लेखनप्रकार म्हणजे आत्मकथन लेखन होय. या लेखन प्रकारात एखादा निर्जीव घटक आपल्याशी बोलत आहे अशी वाक्यरचना करावी लागते. हा लेखनप्रकार लिहिताना खालील काळजी घ्यावी.

शाळेचे आत्मकथन निबंध लिहीत असताना ही काळजी घ्या

  1. या निबंध प्रकारात  केवळ माहिती लिहिणे नव्हे तर निर्जीवस्तू सजीव आहे अशी कल्पना करावी लागते.

      2. आपण ती वस्तू आहोत अशी कल्पना करून लेख

      3. तो घटक आपल्याशी बोलत आहे अशी  मांडणी

                 आकर्षक सुरुवात                                       

                      उदा.

टिकटिक करतो

                         वेळ दाखवतो

                          ओळखा पाहू मी आहे कोण .. 

                          तर घडयाळ 

 तर हा निबंध आकर्षक कसा बनवायचा भाषाशैली कशी हवी ते आपणास खालील शाळेचे आत्मकथन अर्थात मनोगत निबंधाच्या नमुन्यावरून समजेल. 

शाळेचे आत्मकथन निबंध मराठी shaleche aatmakathan essay in marathi

 अवघ्या जगावर एक भलमोठ संकट आले आहे.लोकांचे घरातून केवळ बाहेर पडणे नाही तर जगणेच मुश्किल झाले आहे. ते संकट म्हणजे कोरोना महामारीचे संकट. या संकट काळात सर्व जगच थांबून गेले काही दिवस आमचे शिक्षणही थांबले.पण शिक्षण थांबून कसे चालेल यासाठी ऑनलाइन वर्ग भरू लागले.आता या महामारीची थोडी भीती कमी झाली पण संकट अजून गेलेले नाही. मी माझे लेखीकाम जमा करण्यासाठी एके दिवशी शाळेत गेलो होतो. मी दिलेल्या वेळेच्या आधी गेल्याने सगळीकडे शुकशुकाट होता.

शाळा कितीतरी दिवस बंद असल्याने शाळेच्या परिसरात धूळ,कचरा होता. मी शाळेचे गेट उघडून आत जाणार तेवढ्यात आवाज आला. बाळा तुम्ही सर्वजन यावेळी अचानक कुठे गायब झाला होतात. मी एकडे तिकडे पहिले तर कुणीच नाही. तेवढ्यात पुन्हा आवाज आला घाबरू नको मी तुझी शाळा बोलतेय………अरे ! दर वेळी तुम्ही मला दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्ट्याला जाता माहीत आहे अस  महण्यापेक्षा तुमच्या वर्गात सुट्टीची सूचना

येते ती मीपण ऐकत असते. तुम्हाला होणारा आनंद पाहत असते. मला मात्र ते दिवस खूप बैचेणीचे जातात. पण मी मनाला समजावते येतील काही दिवसांनी शाळेत. मला आठतोय तो दिवस ज्या दिवशी तुम्ही शेवटचे शाळेत आला होतात. तुमचा वार्षिक परीक्षेचा मराठी विषयाचा पेपर होता तुम्ही आनंदात पेपर देत होता.त्याच्या दुसऱ्या दिवशी काय झाले माहीत नाही पण एक नक्की की त्यानंतर शाळेत कोणी देखील फिरकले नाहीत. मला काहीच  समजत नव्हते हे अचानक काय झाले की शाळा बंद पडल्या.

रस्त्यावर वाहनांची वर्दळ बंद झाली. मी खूप विचार केला पण मला काही कळले नाही. सकाळचा परिपाठ,वर्गातील अध्यापन,मधली सुट्टी तुमची मस्ती अचानक सगळ बंद झाले होते.कायतरी भयानक घडले असावे याने मी हदरून गेले होते.तुम्ही सुट्टीला जायचा त्यापेक्षा  ही वेळ मात्र भयानक वाटत होती. पण काय झाले असेल ते समजत नव्हते जून महिन्यात तुम्ही याल म्हणून मी  वाट पाहत होते. तेवढ्यात कोणीतरी ४ ते ५ माणसे एका गाडीतून गेटच्या आत आली. मला तर ती कोण आहेत कळलेच नाही कारण त्यांच्या तोंडावर कोणी रुमाल तर कोणी मास्क लावले होते.सोबत तुमचे शिक्षक पण होते हे मी त्याना त्यांच्या  आवाजावरून ओळखले.

शाळेत किती वर्ग खोल्या ,पाण्याची सोय या सर्व चर्चा सुरू होत्या पण त्या सगळ्याचा काहीच अर्थ लागत नव्हता.नंतर दोनच दिवसानी वर्गातील सर्व बाके,तक्ते काढण्यात आले व कालची शाळा आज दवाखाना बनली.ज्ञान देणारी मी आज जीवनदान देण्याच्या कामी येतेय म्हणून आनंद वाटत होता. त्या महाभयंकर कोरोनाच्या गप्पा ऐकून मला तुमची खूप काळजी वाटत होती. की तुम्ही कायम खेळ,मस्ती यात दंग असता आता मात्र घराच्या बाहेर निघता येत नसेल , घरातकोंडून घेताना किती त्रास होत असेल तुम्हाला.

माझा एकही  दिवस असा गेला नाही  की मला तुमची आठवण आली नाही. तुम्हाला पूर्वी सुट्ट्या म्हणजे मज्जा वाटत असेल ना,पण आत्ता कळले असेल शाळा म्हणजे खरी मज्जा. असो यामुळे माझे महत्व तरी तुम्हाला कळले. काय रे येत होती की नाही माझी आठवणं असे शाळेने विचारताच माझ्या तर डोळ्यात पाणीच आले .

शाळा पुढे बोलूलागली. ही महामारी गेली की मला तुम्हाला मस्ती करताना,खेळताना नि अभ्यास करताना पुन्हा  एकदा बघायचे आहे.बाळा काळजी घे रे स्वतची.शाळा हे वाक्य बोलली व तेवढ्यात माझे मित्र आले. व ते शाळेच बोलणे  बंद झाले.मला पण खूप भरून आले.मनातल्या मनात म्हटल देवा लवकर सुरू कर आमच्या शाळा.थोडक्यात शाळेची जागा कोणीच घेऊ शकत नाही हे खरे. ऑनलाइन वर्गाना शाळेसारखा जिवंतपणा कधी येऊ शकणार नाही.

                        ही आवडते मज मनापासूनी शाळा

                        लाविते लळा ही, जसा माऊली बाळा 

सारांश

अशा पद्धतीने आपण देखील शाळेचे आत्मकथन लिहू शकता ते लिहीत असताना आपल्याला केवळ शाळेची माहिती नाही तर शाळा हा संजीव घटक आहे अशी कल्पना करून सर्व माहिती लिहायची आहे हे ध्यानात घ्या.

आमचे इतर लेख

जागतिक योग दिन का साजरा केला जातो 

सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य  

महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या 31 स्कॉलरशिप माहिती

                 

Leave a Comment