Mahatma Gandhi Jayanti Information Speech Essay Marathi 2023 : आपल्या भारतात अनेक महापुरुष होऊन गेले.लोकमान्य टिळक ,स्वातंत्र्यवीर सावरकर ,पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस अशी कितीतरी नावे सांगता येतील.या महापुरुषांपैकी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे नाव अगदी अग्रक्रमाने घेतले जाते असे महापुरुष की ज्यांना आपण महात्मा या नावाने ओळखतो ती व्यक्ती म्हणजे अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी होय. 2 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन तथा जयंती म्हणून साजरा केला जातो. आजच्या लेखाच्या माध्यमातून महात्मा गांधी जयंतीनिमित्त Mahatma Gandhi Jayanti Information Speech Essay Marathi 2023 यावर आपण आज प्रकाश टाकणार आहोत.
Table of Contents
शाळा, महाविद्यालये तथा सरकारी कार्यालयांमध्ये गांधीजींची जयंती साजरी करीत असताना आपल्याला महात्मा गांधी यांच्या जीवनातील महत्वाच्या घडामोडी यांची माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपण गांधी जयंतीची माहिती ,गांधी जयंती भाषण करू शकता एवढेच न्हवे तर गांधी जयंती निबंध जरी लिहायचा म्हंटले तरी आपल्याला काही एक माहिती जवळ हवी. चला तर मग सविस्तर माहिती पाहूया.
महात्मा गांधी जयंती माहिती भाषण निबंध मराठी 2023 Mahatma Gandhi Jayanti Information Speech Essay Marathi 2023
आपल्याला महात्मा गांधी जयंतीनिमित्त आम्ही आपल्याला इतरांपेक्षा आगळीवेगळी आणि नाविन्यपूर्ण माहिती देत आहोत. ही माहिती आपल्याला गांधी जयंती 2023 च्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्याविषयी माहिती सांगत असताना किंवा छान असे गांधी जयंती छोटे भाषण करत असताना तसेच गांधी जयंती निबंध लेखन करताना देखील उपयोगी पडेल.चला तर मग सुरुवात करूया ..
महात्मा गांधी जयंती भाषण मराठी 2023 Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi 2023
नमस्कार! मी अबक.आज 2 ऑक्टोबर भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस कारण याच दिवशी महात्मा गांधी यांचा जन्म झाला तो पवित्र दिवस.
महात्मा गांधी यांनी आपल्या भारत देशासाठी जे योगदान दिले, त्या योगदानाबद्दल आजच्या दिवशी सांगावे तेवढे कमीच आहे. त्यांचे कार्य सांगताना अकाशाचा कागद नि समुद्राची शाई केली तरी त्यांची महती वर्णन करता येणार नाही. अशा महान व्यक्तिविषयी मी माझे दोन शब्द सांगणार आहेतरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही नम्र विनंती.
गांधीजी काय होते? हिंदीमध्ये सांगायचे झाले तर असे म्हणता येईल.की
जिनकी सोच एक कमाल थी,
सत्य ,अहिंसा की जलती मशाल थी,
जिन्होने बदल दिये ,
भारत की गुलामी के हाल,
वे बापू थे जीन्होने
किया सारा कमाल.
आपल्याला जग जिंकता येते पण ते हिंसेने नाही तर अहिंसेने जिंकता येते,न्याय देखील मिळवता येतो. असे भूतो न भविष्यती कार्य ज्या महान व्यक्तीने केले ती व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी होय.त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला. महात्मा गांधी यांचे वडील पोरबंदर संस्थानांमध्ये दिवाण म्हणून काम करत होते. गांधीजींचे घराणे वैष्णव धर्मीय होते.गांधीजींच्या आईचे नाव पुतलीबेन होते. महात्मा गांधीजींच्या घरातील वातावरण कर्मठ असून गांधीजींचा स्वभाव मात्र अतिशय हळवा नी प्रेमळ होता.
महात्मा गांधी यांना आपण सत्याचे पुजारी म्हणून ओळखतो. परंतु त्यांच्या लहानपणाविषयी ‘माझे सत्याचे प्रयोग’ या आत्मकथनामध्ये गांधीजी म्हणतात, ” मी लहानपणी बऱ्याचदा खोटे बोलायचो परंतु , जसे माझे वय नी स्व वाढत गेला तसा माझा विकास होत गेला.” नंतरच्या काळात मात्र महात्मा गांधीजी तीळमात्र म्हणजेच एक शब्दही खोटे बोलले नाहीत.त्यांनी अगदी सरळ पद्धतीने संपूर्ण जीवन व्यतीत केले. महात्मा गांधीजींच्या घरातील वातावरण धार्मिक आणि सात्विक असून देखील गांधीजी म्हणतात की, मी लहानपणी मित्रांच्या संगतीमुळे अनेक वाईट गोष्टी केल्या आहेत.परंतु आता मी माझे मन जाणीवपूर्वक चांगल्या मार्गाकडे वळवले आहे. यातून गांधीजींचा सत्यनिष्ठपणा आपल्याला दिसतो.
महात्मा गांधीजी यांचे लग्न झाले,त्यावेळी ते अवघ्या तेरा वर्षांचे असताना त्यांचा विवाह कस्तुरबा गांधी यांच्याशी झाला. महात्मा गांधी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर बॅरिस्टर बनण्यासाठी इंग्लंडला गेले. अतिशय मन लावून त्यांनी आपले बॅरिस्टरकीचे शिक्षण पूर्ण केले. परदेशात शिक्षण घेत असताना मी, मद्य,मांस यांचे सेवन करणार नाही. हे आईला दिलेले वचन त्यांनी मोडले नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर गांधीजी 1891 मध्ये भारतामध्ये आले. महात्मा गांधीजी बॅरिस्टर बनले हे पाहण्याचा योग मात्र त्यांची आई पुतळीबेन यांना आला नाही.
इंग्लंड मधून आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर,महात्मा गांधी बॉम्बे कोर्टात वकिली करू लागले. तेथे त्यांना म्हणावे तसे यश मुंबईमध्ये वकिली करताना आले नाही. त्याच दरम्यान मुस्लिम व्यापाऱ्याची केस त्यांच्याकडे आली. तो दावा लढण्यासाठी महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले.जवळ जवळ एक वर्ष खटला त्या व्यापाऱ्यासाठी लढले. नि पुढे २० वर्षे आफ्रिकेत राहिले.
आफ्रिकेत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे दक्षिण आफ्रिकेत जे भारतीय लोक आहेत त्यांच्यावर इंग्रज प्रशासन जुलूम,जबरदस्ती नि अन्याय करत आहे.याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महात्मा गांधीजी यांनी दक्षिण आफ्रिकेत असणाऱ्या सर्व भारतीयांना एकत्र केले. आणि आफ्रिकेतील सरकार विरूद्ध आवाज उठवला.
महात्मा गांधजीं यांनी हा आफ्रिकेतील लढा अहिंसेच्या मार्गाने लढला व भारतीय लोकांना न्याय मिळवून दिला. महात्मा गांधीजी यांनी जवळजवळ वीस वर्षे दक्षिण आफ्रिकेमध्ये काढली. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांचा एक दरारा निर्माण झाला. कालांतराने ते भारतामध्ये आले आणि सर्व भारतीयांचे महात्मा बनले.
1920 साली लोकमान्य टिळक यांचे निधन झाले टिळकांच्या निधनानंतर हा स्वातंत्र्यलढा व त्याचे संपूर्ण नेतृत्व महात्मा गांधीजीनी स्वीकारावे अशी मागणी होऊ लागली. महात्मा गांधीजी यांनी आफ्रिकेप्रमाणे अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गावर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला बळकटी द्यायचे ठरवले.
गांधीजींनी सर्वप्रथम चंपारण्य या ठिकाणी मळेवाले मजूर वर्गावर जो अन्याय करीत होते त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. मजुरांवरील अन्याय कायमचा दूर केला. आता गांधीजींची ख्याती हळूहळू भारतामध्ये पसरत होती. महात्मा गांधीजी यांनी इंग्रज प्रशासनाला अहिंसा वर सत्याग्रह मार्गाने धडा शिकवत असताना सर्वप्रथम मिठाचा स त्याग्रह केला. मिठावर जे जाचक कर होते. ते कर आम्ही देणार नाही असा पवित्रा आंदोलनात घेतला. या त्यांच्या पवित्रामुळे इंग्रज देखील वरमले.
महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देत असताना सत्याग्रह ,सविनय कायदेभंग , असहकार आंदोलन अशा वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला.सविनय कायदेभंग,असहकार आंदोलन, चले जाओ आंदोलन असे कितीतरी कार्यक्रम त्यांनी हाती घेतले. 1942 च्या मोठ्या आंदोलनामुळे तर इंग्रजांना आता भारत सोडल्याखेरीस पर्याय नाही याची जाणीव झाली. सरते शेवटी वैतागून इंग्रजांनी आपल्या देशाला 150ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य दिले.
मात्र पुढे काही महिन्यांमध्येच दिल्ली या ठिकाणी एका तरुणाने गांधीजींवर गोळ्या झाडल्या आणि एका महान आत्म्याचे अपघाती निधन झाले . आजही बापू त्यांच्या कार्याने आपल्यात आहेत.
सत्य अहिंसा के थे वह पुजारी ,
लाख संकट आये हिंमत कभी ना हारे ,
सौफ दी हमे भारत की आजादी ,
वे थे महात्मा गांधी .
एवढे बोलून आज मी माझे आजचे गांधी जयंतीच्या माझ्या वाढलेल्या भाषणाला विराम देतो.
महात्मा गांधी जयंती निबंध मराठी 2023 Mahatma Gandhi Jayanti Essayin Marathi 2023
आपण महात्मा गांधी जयंतीच्या भाषणात जी माहिती पहिली त्याची सुरुवात आपण सोडली तर सर्व माहिती वापरुन आपण महात्मा गांधी यांच्याविषयी छान मराठी निबंध आणि माहिती देखील लिहू शकता.
एका नजरेत महात्मा गांधीजी यांची माहिती
महात्मा गांधीजी | महत्वपूर्ण माहिती |
संपूर्ण नाव | मोहनदास करमचंद गांधी |
तत्वे | सत्य,अहिंसा व सत्याग्रह |
कार्य | भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा |
घोषणा | चले जावो |
महात्मा गांधी जयंती मराठी भाषण 2023 पीडीएफ | Mahatma Gandhi jayanti speech in Marathi PDF
महात्मा गांधी जयंती मराठी भाषण 2023 व्हिडिओ |Mahatma Gandhi jayanti speech in Marathi video
सारांश
अशा पद्धतीने या माहितीच्या आधारे आपण महात्मा गांधी जयंती माहिती भाषण तसेच निबंध देखील लिहू शकता यात शंका नाही.आपल्याकडे जर यापेक्षा काही नवीन माहिती असेल ती देखील यामध्ये ॲड करू शकता.
आमचे इतर लेख