माझा तिरंगा माझा अभिमान निबंध भाषण

maza tiranga maza abhiman nibandh bhashan : भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहे.या सुवर्ण महोत्सवातील तिरंगा विषयीचे प्रेम सर्वत्र जागवले जात आहे, म्हणूनच आज आपण इयत्ता पहिली दुसरी तिसरी किंवा चौथी पाचवी सहावी सातवी आठवी असो एवढेच काय नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त माझा तिरंगा माझा अभिमान निबंध भाषण हा विषय दिला जात आहे.माझा तिरंगा माझा अभिमान भाषण आणि निबंध हा विषय देण्यामागे विद्यार्थ्यांनी इंटरनेट वरती जावे  या विषयावरती माहिती जमा करावी जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये या तिरंगा विषयी स्वाभिमान निर्माण होईल. maza tiranga maza abhiman marathi speech हा विषय इंग्रजी माध्यमाच्या मुलाना देखील कामी येईल.

माझा तिरंगा माझा अभिमान भाषण निबंध,maza tiranga maza abhiman nibandh bhashan
maza tiranga maza abhiman nibandh bhashan

माझा तिरंगा माझा अभिमान भाषण निबंध

माझा तिरंगा माझा अभिमान यासारख्या निबंध आणि भाषणातून विद्यार्थ्यांना आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्व कळणार आहे .त्यांच्यामध्ये एक सजगता निर्माण करण्यासाठी यासारखे विषय अतिशय महत्वाचे आहेत.यावर्षी बोर्ड परीक्षेला महत्त्वाचा निबंध जर कोणता येऊ शकतो तर माझा तिरंगा माझा अभिमान हा येण्याची दाट शक्यता आहे,त्याचबरोबर शाळेमध्ये स्वराज्य उत्सव साजरा केला जात आहे.या स्वराज्यात्सवामध्ये माझा तिरंगा माझा अभिमान हे भाषण किंवा निबंध विद्यार्थी सादर करत आहेत.हा भाषण किंवा निबंध कशा पद्धतीने सादर केला पाहिजे. याचा एक नमुना मी आज आपणास देत आहे. चला तर मग माझा तिरंगा माझा अभिमान भाषण निबंध अशी करा तयारी.तर होईल जाज्वल तुमचा देशा अभिमान.

माझा तिरंगा माझा अभिमान निबंध भाषण | maza tiranga maza abhiman nibandh  bhashan

माझा तिरंगा माझा अभिमान हा निबंध लिहीत असताना आपण अगोदर भारताचा जो स्वातंत्र्यलढा आहे.या स्वातंत्र्यलढ्याची माहिती मिळवणे अतिशय गरजेचे आहे ,कारण माझा तिरंगा माझा अभिमान हा निबंध वैचारिक स्वरूपाचा निबंध आहे. त्यामुळे त्यासाठी आपल्याला माहिती मिळवणे गरजेचे आहे विद्यार्थी आपल्याला अभ्यासासाठी असणारी इतिहासाची पुस्तके किंवा इंटरनेटच्या मदतीने ही माहिती मिळवू शकता आणि ती सर्व माहिती शब्दबद्ध केली की माझा तिरंगा माझा अभिमान हा निबंध अतिशय छान आणि सुंदर तुम्ही लिहू शकता. एकदा का तो माहितीच्या स्वरूपातला निबंध बोलण्याच्या स्वरूपात केला की तो माझा तिरंगा माझा अभिमान भाषण देखील होईल.घरोघरी तिरंगा हा देखील उपक्रम जोरात सुरू आहे. त्यामध्ये जास्त काही फरक नाही.चला तर मग वेळ न घालवता माझा तिरंगा माझा अभिमान हा निबंध असा लिहूया नि स्वातंत्र्य दिन गाजवूया देशाभिमान वाढवूया.

माझा तिरंगा माझा अभिमान निबंध maza tiranaga maza abhiman

माझा तिरंगा माझा अभिमान,

देश माझा मी देशाचा,

तिरंगा आमुचा अभिमानाचा.

आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. तिरंगा हा सर्व देशासाठी सन्माननीय मानला जातो. देशाचा प्रत्येक नागरिक याच्या सन्मानासाठी झटतो.

आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक महान स्वातंत्र्यसैनिकांनी,सुधारक,नेते,क्रांतीकारक यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हजारो लोकांनी आपल्या घरावर  तुळशीपत्र ठेवून लाट्या ,काठ्या खाऊन जेलमध्ये अनंत यातना,त्रास  सहन करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपला देह झिजवला. त्याच्या बलिदानाचे, शौर्याचे ,सेवेचे ,त्यागाचे व राष्ट्राभिमानाचे प्रतीक आपला तिरंगा आहे हे आपले भाग्य आहे.

आपला तिरंगा आकाराने आयताकृती आहे. त्यात प्रामुख्याने तीन रंग आहेत सर्वात वरच्या बाजूला केशरी रंग आहे.हा केशरी रंग त्याग ,साहस ,बलिदान ,शौर्य व देशभक्तीचे प्रतीक आहे. तिरंग्याच्या मधील भागी पांढरा रंग असून तो रंग शांतता, स्वच्छता ,पवित्रता व मानवतेचे प्रतीक आहे. तिरंग्यात सर्वात खाली असणारा हिरवा रंग आहे तो रंग कृषी व धवल क्रांतीचे समृद्धी आणि संपन्नता यांचा प्रतीक आहे. भारताच्या शेतीप्रधान व्यवस्थेचे समर्थन करणारा हरभरा हिरवा रंग आहे. तिरंग्याच्या मध्यभागी पांढऱ्या रंगांमध्ये निळा रंगाचे एक अशोक चक्र आहे त्यात 24 आरे आहेत. ते सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेण्यात आले आहे. ते सदाचरण व प्रगतीशील चळवळीचे प्रतिनिधित्व करते.  

झंडा ऊँचा रहे हमारा,

विजयी विश्व तिरंगा प्यारा,

सदा शक्ती बरसाने वाला.

आपला तिरंगा आपल्या देशाचे महान प्रतीक आहे. तो विविधतेत एकतेचे ही प्रतीक आहे. अशा या आपल्या राष्ट्रध्वजाचा आपण नेहमी आदर केला पाहिजे .राष्ट्रध्वजासाठी काही नियमावली बनवण्यात आली आहे. ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे. तिरंगा आपला अभिमान आहे त्याचा आदर करणे हे प्रत्येक नागरिक असे मोठे कर्तव्य आहे.

२२ जुलै 1947 झलेल्या एका  घटना समितीच्या बैठकीत ‘तिरंगा ध्वज’ हा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला.तिरंगा हा आपला राष्ट्रीय ध्वज देशाच्या एकटेच सेवा आदराचे प्रतीक आहे तो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानांची आठवण करून देतो. माझा तिरंगा माझा अभिमान आहे. या तिरंग्यासाठी मी माझे प्राण ही देईन.

माझा तिरंगा माझा अभिमान कविता  maza tiranga maza abhiman kavita

जे देशासाठी लढले

 ज्यांनी आपुले प्राण अर्पण केले ,

या देशाचे आपण गाऊ गुणगान,

 देश माझा याचा मला आहे अभिमान,

 काय सांगू या भारताची कीर्ती ,

आपले प्राण देशासाठी अर्पण करून 

बनले महान मूर्ती ,

ही माती आमुची माय आहे,

 आमचे सैनिक आमची शान आहे ,

या मातीत श्रीकृष्णाच्या लीला आहे,

 या मातीत शिवाजी महाराजांची वीरता आहे, 

असा आमचा भारत देश महान आहे,

याहून आमचा तिरंगा आमुची जान आहे .

अशा पद्धतीने माझा तिरंगा माझा अभिमान कविता या माध्यमातून तुम्ही माझा तिरंगा माझा अभिमान निबंध आणि भाषण अतिशय चांगल्या पद्धतीने लिहू शकता.भाषण देखील करू शकता.

माझा तिरंगा माझा अभिमान भाषण maza tiranga maza abhiman bhashan

माझा तिरंगा माझा अभिमान निबंध याची तयारी करत असताना आपल्याला ती माहिती जमवून तोंडी स्वरूपात मांडावी लागते. पण माझा तिरंगा माझा अभिमान भाषण करत असताना त्याला माझा तिरंगा माझा अभिमान निबंध थोडी मदत नक्की करेल.लिखित शब्दांना भाषणाची जोड आपल्याला द्यावी लागेल. आपण बोलत आहोत अशा स्वरूपात त्याची मांडणी करावी लागेल.माझा तिरंगा माझा भाषण करत असताना आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे असेल तर माझा तिरंगा माझा अभिमान इयत्ता1,2,3,4,5,7,8,9 आणि दहावी या सगळ्या इयतांचा विचार करूनच आपल्याला या भाषणाचे मार्गदर्शन करावे लागेल.

माझा तिरंगा माझा अभिमान भाषण पहिलीचा विद्यार्थी करणार असेल तर आपल्याला छोटेखानी भाषण करावा लागेल. त्याच पद्धतीने दुसरी,तिसरी,चौथी,पाचवी सहावी,सातवी,आठवी,नववी व दहावी माझा तिरंगा माझा अभिमान भाषण या इयत्तांचा विचार करून त्यांच्या बौद्धिकतेचा विचार करून हे भाषण द्यावे लागेल.तशी तयारी करावी लागेलं जर समजा तुम्ही माझा तिरंगा माझा अभिमान जे विद्यार्थी पहिली नाही त्यांना भाषण दिले आणि तेच भाषण सातवीच्या विद्यार्थ्यांना दिले तर ते भाषण देत असताना त्यामध्ये बदल हवाच चला तर मग आपण एक सर्वसाधारण माझा तिरंगा माझा अभिमान भाषण कशा पद्धतीने लिहिता येईल,त्याचा आढावा घेऊया.या माझा तिरंगा माझा अभिमान भाषणामध्ये वापरलेल्या कवितेच्या ओळी इयत्ता पहिलीचा विद्यार्थी भाषण करत असेल तर त्याला देऊ नका पण जर पाचवीच्या पुढचा विद्यार्थ्या असेल तर त्याला ते भाषण नक्कीच पाठ करायला सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचे भाषण एक कला आहे. हे लक्षात ठेवा चला तर मग एक भाषणाचा नमुना म्हणजेच माझा तिरंगा माझा अभिमान भाषण  नमुना तुम्हाला देत आहे. या पद्धतीने तुम्ही तुमच्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करा.

आज भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव. 15ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन या निमित्त आयोजित  भाषण स्पर्धेमध्ये मी  अ ब क तुम्हा सर्वांना नमस्कार नि वंदन करून माझा तिरंगा माझा अभिमान भाषण आपणापुढे सादर करतो.

 अध्यक्ष ! महाशय ! नि गुरुजन वर्ग आणि माझ्या जमलेल्या बाल मित्रांनो ! या वर्षीचा स्वातंत्र्य दिन म्हणजे जरा आगळा वेगळाच आहे ना कारण का तर यावर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली म्हणून आपण आपल्या स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मला देशाचा गुणगौरव करण्याची अमृत रुपी शब्दातून बोलण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य.राष्ट्रभक्त,देशभक्त  सुधारक ,क्रांतिकारक व आपला तिरंगा यांच्यापुढे नतमस्तक होण्याचा हा दिवस……

माझा तिरंगा माझा अभिमान,

देश माझा मी देशाचा,

तिरंगा आमुचा अभिमानाचा.

बरोबर ना तिरंगा हा आपला अभिमानच नाही तर ती आपली जान आहे. कारणतिरंगा देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. अनेकांनी आपल्या प्राणांच्या आहुती  दिली म्हणून हा तिरंगा मानाने फडकत आहे.  हा तिरंगा फडकत ठेवणे ही आपल्या सर्व नागरिकांचे जबाबदारी आहे.

 माझा तिरंगा माझा अभिमान हे आज जरी आपण स्वाभिमानाने बोलत असलो तरी देखील कोरोना महामारी सारखी महामारी आपण अनुभवली त्यावेळी ऑक्सिजन विना कित्येक लोकांनी प्राण सोडले, पुरेशी औषधे नाहीत म्हणून, अनेकांना औषधोपचार मिळाला नाही म्हणून मग केवळ आपल्याला माझा तिरंगा माझा अभिमान! याचे नारे देऊन चालणार नाही, तर विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास केला पाहिजे. चिकाटीने शिकले पाहिजे. कारण ज्ञान अशी गोष्ट आहे की ते आपल्याला कशावरही मात करायला मदत करेल माझा तिरंगा माझा अभिमान या ऐवजी माझा देश माझा अभिमान 

                 माझ्या देशाची प्रगती

                हीच माझी ध्येय शक्ती. 

या पद्धतीने विद्यार्थ्यांनी राहायला हवे करण अजून काही वर्षांनी हा देश या देशाची उन्नती आपल्या खांद्यावरती येणार आहे. देशाचा विकास करायचा असेल तर आधी स्वतःचा विकास केला पाहिजे. आपले मन प्रगल्भ पाहिजे. आपण सर्व क्षेत्रांमध्ये पुढे असलं पाहिजे तर आणि तरच आपल्याबरोबर आपला देश मोठा होणार आहे. देशसेवा करणे म्हणजे सीमेवरती जाणे असे नाही तर आपण  आपले काम प्रामाणिकपणे करणे आपण ज्या क्षेत्रात जाऊ त्या क्षेत्राला न्याय देणे हे देखील देशभक्ती आहे.

हे जोपर्यंत विद्यार्थ्याला कळणार नाही तोपर्यंत माझा तिरंगा माझा अभिमान याला काही उपयोग नाही चला तर आजच्या भाषणातील माझे मुद्दे थोडेस तिखट होते पण ते सांगणे गरजेचे होते कारण आपण दुसऱ्याकडे एक बोट करायला लगेच तयार असतो पण आपल्याकडे असणारी चार बोटे आपल्याला दिसत नाहीत ही खेळाची बाब आणि आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माझा तिरंगा माझा अभिमान भाषण देत असताना मी यावरतीच लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

आज आपणास माझा तिरंगा माझा अभिमान निबंध भाषण हा लेख कसा वाटला हे नक्की कळवा.कमेंट करा…इतरांना देखील शेअर करा.पुन्हा भेटू एका विषयासह तोपर्यंत धन्यवाद! 

इतर लेख 

स्वामी विवेकानंद भाषण 

संत गाडगे बाबा मराठी माहिती निबंध 

स्वातंत्र्य दिनाची शायरी चारोळ्या 

बाबासाहेब आंबेडकर जयंती शायरी मराठी 

डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया 2023 24 संपूर्ण महिती 

आंबेडकर जयंती निमित्त 5 मराठी कविता 

Leave a Comment