इंजीनियरिंग डिप्लोमा ऑनलाइन प्रवेश 2023 24 मराठी माहिती |Eng. Diploma Admission 2023 24 Information marathi

 शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी दहावी नंतरच्या प्रथम वर्षाच्या इंजिनिअरिंग डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेच्या  ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र यांच्याकडून 1 जून 2023पासून सुरुवात झालेली आहे. ज्या मुलांना दहावीनंतर वेगवेगळ्या डिप्लोमांना प्रवेश घ्यायचाआहे, त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. शासनाकडून प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया 2023 24 ऑनलाईन स्वरूपात पार पाडली जाते . त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत.आज आपण Eng. Diploma Admission 2023 24 Information marathi पाहणार आहोत. 

(The online application process for Post 10th First Year Engineering Diploma Admission Process for Academic Year 2023 24 has started from 1st June 2023. This information is very important for those children who want to take admission in various diplomas after 10th. First Year Polytechnic Admission Process 2023 24 will be conducted online by Govt. So students have to fill their applications online.) ही प्रक्रिया मुलांनी नीट समजावून घेतली पाहिजे.

इंजीनियरिंग डिप्लोमा ऑनलाइन प्रवेश 2023 24 मराठी माहिती

इंजीनियरिंग डिप्लोमा ऑनलाइन प्रवेश 2023 24 मराठी माहिती Eng. Diploma Admission 2023 24 Information marathi

प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश 2023 24 ऑनलाइन घेण्यासाठी संकेत स्थळ First Year Diploma Admission 2023 24 Online Website in maharashtra 

इंजिनिअरिंग डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी एका अधिकृत संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. https://poly23.dtemaharashtra.gov.in/diploma23/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज ऑनलाइन स्वरूपात भरायचे आहेत.

डिप्लोमा ऑनलाइन प्रवेशासाठी website click here 

 

यावर क्लिक करून आपण प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेश अर्थात विविध डिप्लोमा कोर्सेस यासाठी अर्ज करू शकता.

अकरावी प्रवेश ऑनलाइन //डिप्लोमा / iti प्रवेश प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश/डिप्लोमा /iti  मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक 

महाराष्ट्र राज्यात डिप्लोमा कोर्सेस साठी जागा Seats for Diploma Courses in Maharashtra State

महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी वाजवा 375 संस्थांची नोंदणी झालेली आहे आणि या संस्थांमध्ये एक लाखापेक्षा जास्त जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणार आहेत परंतु ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात पार पडणार आहे.

इंजीनियरिंग डिप्लोमा ऑनलाइन प्रवेश 2023 24 प्रवेश प्रक्रियेचे टप्पे स्टेप  Engineering Diploma Online Admission 2023 24 Steps of Admission Process

1.ऑनलाइन अर्ज भरणे

शैक्षणिक वर्ष 2023 24 डिप्लोमा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.

2.कागदपत्रे पडताळणी 

विद्यार्थ्यांनी दहावीनंतर डिप्लोमा कोर्सेस साठी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईनची कागदपत्रे अपलोड केलेले आहेत ते अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

3. तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे व आक्षेप नोंदवणे 

अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी नंतर  विद्यार्थ्यांची तात्पुरती  गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल आणि त्या संदर्भात विद्यार्थ्यांचे काय आक्षेप असतील तर विद्यार्थ्यांना ते नोंदवता येतील.त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होते. 

4.विकल्प भरणे 

विद्यार्थ्यांना कोणत्या महाविद्यालयामध्ये प्रवेश हवा आहे यासाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ही प्रक्रिया आहे.

5. प्रवेश फेऱ्या 

इंजीनियरिंग डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना त्यांच्या प्रवेशाच्या तीन फेऱ्या घेतल्या जातील.

शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस ऑनलाइन प्रवेश

 वेळापत्रक Engineering Diploma Courses Online Admission Schedule for Academic Year 2023 24

1.डिप्लोमा प्रथम वर्षासाठी अर्ज भरणे /नोंदणी Filling of Application Form for Diploma First Year

प्रथम वर्ष पॉलिटेक्निक प्रवेश देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिनांक 1 जून ते 21 जून 2023 या कालावधीमध्ये आपले अर्ज ऑनलाईन स्वरूपात सादर करावयाचे आहेत. आपल्या कागदपत्रांची तपासणी कशा पद्धतीने करावयाची आहे हे या पहिल्या भागात होणार आहे

2.प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी Verification of documents

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर एक 1 जून 2023 ते 26 जून 2023 या कालावधीमध्ये या कागदपत्रांची ऑनलाइन स्वरूपात पडताळणी केली जाणार आहे. जर विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटींची विद्यार्थ्यांनी तात्काळ पूर्तता करावयाची आहे.

3.तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे Promulgation of Provisional Merit List

विद्यार्थ्यांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचबरोबर कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी ऑनलाईन जाहीर केली जाईल. ती 23 जून 2023 रोजी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित होईल.

4.महितीत तफावत असल्यास दुरुस्ती/आक्षेप घेणे बाबत Regarding rectification in case of discrepancy in information

विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर समजा विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये काही दुरुस्ती असेल किंवा बदल असेल तर त्यांना लॉगिन करून 24 जून 2023 ते 27 जून 2023 या कालावधीमध्ये आपल्या सर्व दुरुस्त्या पूर्ण करून घ्यायचे आहेत.

5.अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे Publish final merit list

29 जून 2023 रोजी विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केले जाईल. या गुणवत्ता यादी नंतर प्रवेश प्रक्रियेचे तीन राऊंड होतील.

इंजीनियरिंग डिप्लोमा ऑनलाइन प्रवेश 2023 24 कोर्सेस ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी प्रवेश शुल्क Engineering Diploma Online Admission 2023 24 Courses Admission Fee for submission of online application

विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पॉलिटेक्निक ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी अर्ज करायचा असेल तर जे विद्यार्थी खुल्या गटातील आहेत त्यांना 400 रुपये प्रवेश अर्ज शुल्क भरावे लागेल त्याचबरोबर जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 300 रुपये एवढे शुल्क आकारले  जाणार आहे.

महाराष्ट्र इंजीनियरिंग डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया 2023 24 साठी मदत केंद्र  maharashtra Help Center for Engineering Diploma Admission Process 2023 24

विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या प्रथम वर्ष वर्ष पदविका प्रवेश प्रक्रियेसाठी काही अडचणी येत असतील आणि त्यांना मदत हवी असेल तर त्यासाठी सुविधा  केंद्र देण्यात आलेले आहेत. त्या सुविधा केंद्रांची यादी  पीडीएफ आपण आपल्याकडे ठेवावी आणि प्रवेश प्रक्रियेत काही अडचण आल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा. 

प्रथम वर्ष डिप्लोमा कोर्सेस २०२३२४ माहिती पुस्तिका Help Center for Engineering Diploma Admission Process 2023 24

शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी इंजिनिअरिंग डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पार पाडत असताना विद्यार्थ्यांना या संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संदर्भात माहिती मिळावी. यासाठी एक माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आलेली आहे ती माहिती पुस्तिका वाचूनच आपण या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करावी.

अशा पद्धतीने यावर्षीची इंजीनियरिंग डिप्लोमा प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे त्याविषयीची माहिती आज आपण पाहिली. माहितीमध्ये या प्रवेश प्रक्रियेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या तारखा आणि एकंदरीतच ही प्रवेश प्रक्रिया कशी पार पडणार आहे त्याचे टप्पे आज आपण पाहिले. आमची माहिती आपल्याला महत्वपूर्ण वाटल्यास इतरांना देखील पाठवा. डिप्लोमा कोर्सेस च्या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेच्या माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि आपली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा.

आमचे इतर लेख 

अकरावीची  सर्व पुस्तके pdf download करा. 

तलाठी भरती 2023 ऑनलाइन अर्ज सुरू  

Leave a Comment