मी कोकणातील हापूस आंबा बोलतोय!

mi koknatil hapus amba boltoy marathi esaay : आजच्या लेखात आपण मराठी निबंध लेखनातील आत्मकथन या निबंध प्रकारातील एक मराठी निबंधाचा नमूना पाहणार आहोत. तो म्हणजे मी कोकणातील हापूस आंबा बोलतोय !चला तर मग mi koknatil hapus amba boltoy marathi esaay पाहूया.

मी कोकणातील हापूस आंबा बोलतोय!

कोविडच्या दिवसांत असेच बसलो होतो.मे महिना असूनही काही मजा नव्हती.सुट्टी आहे असे वाटतच नव्हते.कुणी घराच्या बाहेर नाही,कोठला आवाज नाही.घरातल्या घरात राहूनच आपला रोजचा दिवस जो तो ढकलताना दिसत होता.मला मागील वर्षाची धमाल आठवली.त्यातच मी गुंग होऊन गेलो.

मे महिना माझ्या विशेष आवडीचा!शाळेला सुट्टी,घरात मस्त जेवायचे,मित्रांबरोबर उनाडक्या करतरो हिंडायचे,निरनिराळे खेळ खेळायचे,गावी जायचे;असा भरघोस कार्यक्रम ठरलेला असायचा.आता लॉकडाऊन झाले.रोजच्या भाजी-दूधाची मारामार झाली.मग रसाळ फळे,उन्हाळ्यातला रानमेवा आणि हो माझा आवडीचा हापूस आंबा साधा बघायलाही मिळेना.

मी कोकणातील हापूस आंबा बोलतोय!(mi koknatil hapus amba boltoy marathi esaay)
मराठी निबंध

मग मात्र माझी घालमेल सुरू झाली.मी रडवेले तोंड करून माझ्या अभ्यासाच्या खोलीत गेलो.खिडकीतून दुपारचा वारा सुटला होता.खिडकीच्या बाहेर आईने लावलेल्या अनेक झाडांच्या फांद्या एकमेकींशी वाऱ्याने बिलगत होत्या.

वारा आला की एकमेकींजवळ येऊन जणू झिम्मा खेळत टाळी देऊन परत आपल्या जागेवर जात होत्या.बाहेर उन्हाळ्याचे ऊन पडले असले तरी झाडांची नवी पालवी,नवे फुटलेले कोंब मात्र डोळ्यांना सुखद गारवा देत होती.आणि हो,आंब्याला काही छोट्या-मोठ्या कैऱ्याही दिसत होत्या.

मी कोकणातील हापूस आंबा बोलतोय!(mi koknatil hapus amba boltoy marathi esaay)

मी खुर्चीत बसल्या बसल्या समोरच्या टेबलावर डोके टेकवले.काही वेळाने कसला तरी आवाज आल्यासारखे वाटले.झाडांच्या पानांची वाऱ्याबरोबर होणारी सळसळ असेल,म्हणून मी दुर्लक्ष केले. तेवढ्यात मला आंब्याच्या झाडापासून कोणीतरी आवाज देतेय,असे पुन्हा वाटले.पण एवढ्या दुपारी कोण असेल,म्हणून मी खुर्चीतच बसल्या बसल्या डोळे किलकिले करून पाहिले.

 तर चक्क आंब्याच्या झाडातून एका छोटा हापूस आंबा मला ʻदादाʼ म्हणून आवाज देत होता.मला खरेच वाटेना!आपण स्वप्नात तर नाही ना,म्हणून मी डोळे नीट उघडत खिडकीच्या जवळ गेले.तर झाडांच्या फांदीतून एक चिमुकला आंबा मला हाक मारत होता.मी चमकून त्या छोटूशा,पिवळसर आंब्याकडे पाहतच राहिलो.तो म्हणाला ओळखले का मला मी कोकणातील हापूस आंबा बोलतोय!

काय दादा!अग,मीच बोलतोय,तुझा आवडता आंबा हापूस!तोंडाचा आ आधी बंद कर.मीच बोलतोय तुझ्याशी.

मला आता खातरी पटली की खरच आपल्याच झाडाचा हा आंबा बोलतोय.मी खूप खूश झालो.तो पुढे बोलू लागला.

घरात बसून खूप कंटाळलायेस ना?मी ʻहोʼ म्हटले.तो म्हणाला,ʻमग, आता तुझा कंटाळा घालविण्यासाठी आपण काय करू शकतो? चल, आपण गप्पा मारू,म्हणजे तुझा कंटाळा तरी दूर होईल.असे बोलून तो गप्पा मारू लागला.

मला खरच तो बोलताय यावरच विश्वास बसत नव्हता.पण कंटाळा तर घालवायचा होता.त्यातून माझं आवडीचे कुणीतरी बोलतेय,तेही चक्क ʻआंबाʼ म्हटल्यावर मी सावरून बसले आणि त्याच्या गोड आवाजात संभाषण ऎकू लागले.

अरे,दादा,मी खरच बोलतोय,तुझे लक्ष आहे ना रे? मी मुक्यानेच मान  हालवीत ʻहोʼ म्हटलं.आपण काय बर बोलूयात.मी म्हटलं,ʻअरे,मी तुझ्याचबद्दल मगाशी विचार करत होतो.कुठे जाताही येत नाही.लॉकडाऊनमुळे तू आमच्या आवडीचा आता आम्हांला खायला तर काय बघायलाही मिळेनासा झालाय.

आंबा थोडासा थांबून म्हणाला की,ʻतुम्ही माणसांनीच ही वेळ स्वतःवर आणली.तुम्ही झाडे तोडली.प्रदूषण केले.प्रमाणाबाहेर निसर्गाची हानी केली.मग आता निसर्गही कोपलाय.ʼ

मी आंब्याच्या बोलण्याचा विचार करू लागलो.आंबा म्हणाला,ʻअरे,आता वाईट वाटून काय उपयोग?आतातरी माणसांनी यातून धडा घेऊन निसर्गाला वाचविले पाहिजे.ʼ

मी शांत झालेलो पाहून आंबा पुढे म्हणाला,ʻअसे हिरमसून नाही चालणार.चल,मी तुला माझी कहाणी सांगतो.म्हणजे तुझे जनरल नॉलेजही वाढेल आणि माहितीतून तू निसर्गसंवर्धन करायचेही शिकशील.

मी कोकणातील हापूस आंबा बोलतोय!(mi koknatil hapus amba boltoy marathi esaay)

आंबा सांगू लागला-  ʻआंब्याला संस्कृतमध्ये ʻआम्रʼ म्हणतात तर इंग्रजीत ʻमॅन्गोʼ म्हणतात.ʻMangifera Indicaʼ हे आंब्याचे बॉटनिकल नाव आहे.माझ्या   जन्माची अनोखी कहाणी आहे.माझ्या झाडाची बी जिला ʻकोयʼ म्हणतात.ती आधी जमिनीत लावावी लागते.तिला वेळेवर इतर झाडांप्रमाणेच खत-पाणी घालावे लागते.

झाडाचे कीड,तण,रोग यांपासून संरक्षण करण्यासाठी त्यावर जंतुनाशक फवारावे लागते.झाडपाला खाण्याऱ्या शाकाहारी प्राण्यांपासून आमचा बचाव करावा लागतो.एकदा मूळ धरले तरी ही सगळी इतर प्रावधान मालकाला पाळावी लागतात.नंतर हळूहळू आमचे रोपापासून झाड, आणि झाडापासून वृक्ष तयार होतो.

कालातरांने झाडाला मोहोर येतो.हा मोहोर म्हणजे झाडाची फुले असतात.नंतर या मोहोरापासून कैऱ्या तयार होतात.या कैऱ्या पिकल्या की गोड,मधाळ आंबे तयार होतात.या कैऱ्याही फार उपयुक्त असतात.या कैऱ्यांपासूनही निरनिराळे खाद्यपदार्थ तयार केले जातात.

उन्हाळ्यात कैरीचे लोणचे,कैरी पन्हे,साखरआंबा,आमचूर,चटणी,गूळआंबा इ.पदार्थ तयार केले जातात.तसेच आयुर्वेद-औषधांमध्येही कैरीचे चूर्ण,आंब्याची पाने,त्याचे गर इ.चा औषधांत खूप चांगल्या प्रकारे वापर होतो.ʼ

मी मन लावून हापूस आंब्याचे  ऎकत होतो.आंब्याचे रसाळ,मधाळ बोलणे ऎकून माझी तंद्रीच लागली होती.मध्येच हापूस मला म्हणाला,ʻअरे दादा,ऎकतोयेस ना?मला सांग,भारतात इंग्रज कधी आले?ʼमी म्हटले,ʻइंग्रज सोळाव्या शतकात आले,असे आम्हांला शाळेत शिकवले आहे.पण त्या अगोदर भारतात युरोपियन आले,त्यात वास्को-द-गामा हा पहिला खलाशी आफ्रिका खंडाला वळसा घालून कालिकत बंदरात उतरला.ʼअसे शाळेत बाईंनी सांगितले होते.ʼ माझे उत्तर ऎकून हापूस अगदी खूश झाला.

मला तो म्हणाला,ʻवा! दादा,तू फारच हुशार आहेस.पहिला आलेला युरोपियन इंग्रज नव्हे तर पोर्तुगीज होता.भारताची पश्चिम किनारपट्टी ही युरोपियांसाठी व्यापारासाठी जास्त सोयीची होती.त्यामुळे तेथून भारतात येणाऱ्या बऱ्याचशा युरोपियांनी याच पश्चिम किनाऱ्यावर आपल्या वसाहती स्थापन केल्या.त्यामुळे त्यांनी त्यांच्याबरोबर खाद्यपदार्थ,पोशाख,संस्कृती असे  सगळेच भारतात आणले.त्यामुळे मी जरी भारताच्या कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने आढळत असलो तरी माझे पूर्वज,मूळ हे पोर्तुगाल देशात आहे.तेथे आंब्याला ʻअल्फान्सोʼ म्हणतात.या अल्फान्सोचे पुढे अपभ्रंश रूप ʻहापूसʼ असे झाले.म्हणजे जरी माझी ओळख ʻकोकणचा राजाʼ अशी जरी असली तरी मी मूळ युरोपातला आहे.

हापूस आंब्याच्या या कहाणीने मी खूप अचंबित झालो.मी त्याला म्हटले,ʻअरे आंब्या,मला तुझी ही मूळ जन्मकहाणी तर अजिबातच माहिती नव्हती.मला खरच खूप गमंत वाटत आहे.ʼ

पुढे आंबा म्हणाला,ʻआमची लागवड जगात अनेक भागात केली जाते.आफ्रिका,आशिया या खंडात तुलनेने उष्ण हवामान असल्यामुळे या भागात आमची लागवड जास्त केली जाते.कोकणात आम्ही मूळ धरले,आणि आता भारतच प्रामुख्याने आंबा उत्पादक देश म्हणून ओळखला जाऊ लागला.महाराष्ट्रात मी कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळतो.

आमच्या हापूस,पायरी,लंगडा,आम्रपाली,बादाम,राजापुरी,दशेरी,मानकुराद,तोतापुरी,मलकोबा,केशर अशा अनेक जाती आढळतात.ʼआंब्याच्या या जातींची नावे ऎकून मी हसू लागलो. माझे हसणे पाहून आंबा पुढे म्हणाला, ʻपण तुम्हां माणसांसारखी आमच्यात भांडणे नसतात,बरं का?ʼ असे म्हणून हापूस आंबा माझ्या प्रतिक्रियेची वाट पाहत राहिला.मी म्हटले,ʻआंब्या,बरोबर आहे रे तुझे,मानव जात या जातीच्या शापातून कधी मुक्त होईल.तुझ्यासारखे आम्हांलाही आमची जात दूर पृथ्वीबाहेर टाकता आली तर फार बरे होईल.

आंब्याचे जनरल नॉलेज तर माझ्यापेक्षा खूपच चांगले होते.मी त्याला तसे म्हटलेही.आंबा पुढे सांगू लागला – ʻआम्हांला भारतातच नव्हे तर देश-विदेशातही खूप मागणी आहे.भारतातून मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यात होते व देशाला परकीय गंगाजळी मिळवून देते.

शेतकरी त्यामुळे सुखावतो.ʼ ʻतू तर  परदेशी वाऱ्या करतोस हं चांगला.मजा आहे तुमची.ʼ मी म्हटले. ʻदादा,तुला काय काय आवडते रे,आंब्यापासून बनविलेले?ʼ मी म्हटले,ʻमला तर सगळेच पदार्थ आवडतात,आंब्यापासून बनविलेले. आंबा बर्फी,आमरस,आंबा मोदक,आंबापोळी हे सर्वच.मी जिभळ्या चाटीत म्हटलं,पण नुसता आंबाही खूप आवडतो.ʼ

मी आंब्याला म्हटले की,ʻआपल्या देशात केळी,मोसंबी,संत्री,पपई,डाळिंब,पेरू,द्राक्षे,फणस,कलिगंड,चिकू,सफरचंद,अशी नाना प्रकारची फळे मिळतात,पण आंब्यालाच फळांचा ʻराजाʼ का म्हणतात,याचे उत्तर आज मला मिळाले.ʼ

आंबा पुढे म्हणाला की,ʻअरे दादा,सगळीच फळे मानवी शरीरासाठी आवश्यक असतात.ती फक्त योग्य ऋतूत खायाला हवी.फळांमध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्त्व असते सांग पाहू.ʼमी त्वरेने सांगितले,व्हीटॅमीन सी,ए.ʼ आंबा म्हणाला,ʻशाब्बासʼ.

ʻअग,तुला माहिती आहे का,की आता जगभरात एखाद्या वस्तूला किंवा पदार्थाला त्या त्या विशिष्ट प्रदेशाचे स्थानवैशिष्ट्य म्हणून नामांकनही दिले जाते.त्याला ʻभौगोलिक नामांकनʼ किंवा इंग्रजीत GI Tag(Geographical Indication)असे म्हणतात.आम्हांला आता ʻदेवगड हापूस आंबाʼ आणि ʻरत्नागिरी हापूस आंबाʼ असे दोन स्वतंत्र भौगोलिक निर्देशांक मिळाले आहेत.ʼहापूस आंबा आता अगदी कॉलर ताठ करून गौरवाने सागत होता.

मी पण खूप आनंदाने आंब्याचे हे गौरवोद्गार मन लावून ऎकत होतो.कारण माझ्या भारत देशाची मानही त्याने गौरविली जात होती ना!! लावून ऎकत होते.कारण माझ्या भारत देशाची मानही त्याने गौरविली जात होती ना!

ʻआणि बर का दादा, आंबा हे भारताचे आणि पाकिस्तान यांचे राष्ट्रीय फळ आहे.बांग्लादेशचे राष्ट्रीय झाड आहे आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे.ʼ

ʻआंब्याला भारतात धार्मिक विनोबा विधीमध्ये सुद्धा खूप महत्त्व दिले जाते.कोणत्याही मंगल,शुभ प्रसंगी आंब्याच्या पानांचे तोरण म्हणजेच डहाळी दाराला बांधली जाते.कलशाचे पूजन करतानाही आंब्याच्या पाने कलशात मांडली जातात.ʼमी आंब्याला मध्येच अडवत म्हटलं,ʻहो,आई दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे हार करताना मध्ये आंब्याची पाने लावताना पाहिलेय मी.बाबा,कलशातही ही पाने मांडतात.ʼआंबा म्हणाला,ʻहो,अगदी बरोबर दादा.असेच निरीक्षणातून शिकत जा.ʼ

आंब्याचे हे ʻआंबापुराणʼ मला खूपच मनोवेधक आणि माहितीपूर्ण वाटले.

आंबा हे सगळे सांगत होता आणि मी ऎकत होते.आंबा म्हणाला,ʻकाय दादा,कसे वाटले हे आंब्याचे आंबापुराण?ʼअसे म्हणून तोही हसू लागला.मी म्हटले,ʻमला तू सांगितलेली ही आंब्याची माहिती अगदी थोडीशीच ज्ञात होती.तुझे खूप खूप आभार.आता माझा कंटाळा तर कुठल्या कुठे पळून गेलाय.इथून पुढे मी नक्की झाडे लावणार,त्यांचे संगोपनही करणार.

सगळ्या मित्र-मैत्रिणींना सोबत घेऊन माझ्या शाळेतही हा वृक्षारोपणाचाही कार्यक्रम राबवणार.मला आता तू दिलेल्या ज्ञानातून कळले की जर मानवाला स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर झाडे- निसर्गसंवर्धनाशिवाय पर्याय नाही.तर पुढच्या पिढ्यांना आंब्यासारखी रसाळ,मधाळ फळे चाखायला मिळतील.ʼ 

ʻशाब्बास दादा,प्रत्येकाने हे मनोरथ अमलात आणले,तर ही कोविडसारखी परिस्थिती निर्माण न होता,पृथ्वी परत सुजलाम,सुफलाम होईल.आणि अशीच आपल्या परिश्रमाची गोड फळे सगळ्या चाखायला मिळतील.

मी कोकणातील हापूस आंबा बोलतोय! निबंधाचा सारांश

पद्धतीने आपण कोणताही आत्मकथनात्मक निबंध लिहू शकता.आज आपण कोकणातील हापूस आंबा आपल्याशी बोलला तर तो कसा बोलेले या निबंधातून हापूस आंबा हा निर्जीव घटक पण मानवी भाव भावना त्याला देणे महणजे आत्मकथन होय.

आमचे इतर लेख

बालिका दिनाची बातमी तयार करा 

मराठीतील महत्वाचे वाक्प्रचार 

आपण केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी या पद्धती वापरा 

असे करा आपले पॅनकार्ड आधार कार्ड एकमेकांना लिंक