रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2023 (100)+शुभेच्छा

raksha bandhan hardik shubhechha 2023 : हिंदू धर्मियांमध्ये बहिण भावाच्या पवित्र नात्याचा गुणगौरव करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन. साधारणपणे श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण रक्षाबंधनासाठी उपयोगी पडतील असा लाजवाब शुभेच्छा घेऊन आलेलो आहोत. 2023 चे रक्षाबंधन साजरे करत असताना फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून आपल्याला इतरांना raksha bandhan  wishesh in marathi देता याव्यात यासाठी आम्ही आपल्यासाठी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश 2023 घेऊन आलेलो आहोत. चला तर मग या राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा आपली वाट पाहत आहेत.

रक्षाबंधन शुभेच्छा संदेश मराठी 2023 I raksha bandhan hardik shubhechha 2023 (Raksha Bandhan Wishes Marathi 2023)

या जगात नाती असंख्य असतील

बहिण भावाच्या नात्यासारखे 

 पवित्र नाते कोणतेच नाही 

रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 

घरामध्ये मी एकटाच होतो 

माझ्या ताईचा जन्म झाला 

एकटेपणा कुठचा कुठे पळून गेला

आज आहे रक्षाबंधन 

या लाडक्या ताईला 

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा! 

आपण दोघे बहिण भाऊ 

एकमेकांशी कायम भांडत राहू

पण संकटकाळी एकमेकांचा आधार होऊ

की पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

रक्षाबंधनाच्या दिनी एक धागा  

मी तुझ्या हातामध्ये बांधला 

दादा कायमच माझ्या 

 संरक्षणासाठी धावला 

दादा तुला रक्षाबंधनाच्या 

 खूप खूप शुभेच्छा!

रक्षा बंधन स्टेटस मराठी 2023 (Raksha Bandhan Status Marathi 2023)

राखी म्हणजे बहिण भावाच्या

 नात्यातील एक प्रेमाचा धागा 

तुझ्या रक्षणाची मी 

अखंड जबाबदारी घेईन 

असा असतो हा वादा

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

रक्षाबंधन मराठी चारोळी कविता 2023 (Rakshabandhan Marathi Charoli Poetry 2023)

श्रावण महिना आला 

मनी आनंद दाटला 

निसर्गाने हिरवा 

शालू पांगरला 

बहिण भावाचे नाते दृढ करणारा

रक्षाबंधनाचा सण आला 

या सणाची आस लागली मला

कधी भेटते माझ्या भावाला

निरोप सांगा दादाला

मला न्यायला ये माझ्या घराला

असा हा सण न्यारा

बहीण भावासाठी तर सर्वात प्यारा

असा हा सण रक्षा बंधन आला

या सणाचा गाऊ तेवढा गोडवा

कमी आहे कारण हा सण

बहीण भावाच्या नात्याची शान आहे

आमची संस्कृति महान आहे

कारण इथे रक्षा बंधनासारखा

पवित्र सण आहे

बहीण भावाच्या नात्याचे

खरे खुरे गुणगान आहे

राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 2023(Happy Rakhi Purnima 2023)

बहीणच असते आपली चांगली मैत्रीण

आणि सर्व काही 

आई-वडिलांनंतर जीवनातील 

 आधारवड असते बहीण 

लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या

 हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

राखी म्हणजे बहिण

भावाच्या नात्याचे प्रतीक 

राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 

या जगामध्ये अनेक नाती आहेत  

अहो!पण नाती कितीही असोत 

बहिण भावाचे नाते 

 लाखात एक आहे 

रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 

द्रौपदीसाठी कृष्ण भाऊ बनून आला 

चला चला रक्षाबंधनाचा सण आला 

ओवाळू भाऊ रायाला 

रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 

बहिणीवर हुकूमत गाजवणारा 

  भाऊच असतो

जिवापाड प्रेम करणारा 

देखील भाऊच असतो 

माझ्या लाडक्या भावाला 

रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 

हे पण वाचा नक्की आवडेल

रक्षाबंधन मुहूर्त भद्रा काळात का करू नये रक्षाबंधन

जगातील सर्वात गोड नाते 

बहीण भावाचे आहे 

कोणतेच नाते इतके

 अनमोल नसेल 

जितके बहिण भावाचे आहे 

रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 

शरीर वेगळे 

परंतु मन एक आहे 

हृदय वेगळे परंतु 

 आर्तता एक आहे 

बहिण भावाचे नाते 

असे काही न्यारे आहे 

म्हणूनच सर्वांना प्यारे आहे 

रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 

बहिणीकडून भावाला (भावासाठी) रक्षाबंधनाच्या शुभेच्छा (Happy Rakshabandhan from sister to brother marathi (for brother)

आज मी आनंदी आहे

आज मी सुखी आहे 

या सुखाचे कारण

 माझा भाऊराया आहे

रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 

प्रिय माझा भाऊ राया 

माझ्या संकट समयी धावून आया 

ऐसा है मेरा लाडला भाई राजा 

माझ्या लाडक्या भावाला

रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

माझा भाऊ माझ्यापासून 

आज जरी दूर आहे 

पण हृदयातून तू 

कायमच माझ्याजवळ आहे 

माझ्या दादाला रक्षाबंधनाच्या

हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 

मला तुझ्यासारखा भाऊ मिळाला

 मी भाग्यवान आहे

 माझ्या लाडक्या भावाला 

रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

मी आज एक सुखी बहीण आहे

याचे कारण माझा भाऊ आहे

माझ्या संकट समई कायम 

माझी माझी ढाल बनलेल्या 

माझ्या भावाला रक्षाबंधनाच्या

 खूप खूप शुभेच्छा!

लहानपणी खूप भांडलो असेल आम्ही 

लहानपणी आम्ही मस्तीही केली असेल खूप 

एकमेकांना रागाची दोन टोके दाखवले असतील खूप 

पण रक्षाबंधन येताच दादा टचकन डोळ्यात येथे पाणी 

पुन्हा गावीशी वाटतात लहानपणीची गाणी 

माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या

भावाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा! 

माझा आधारस्तंभ

माझा मार्गदर्शक

माझा प्रेरणास्त्रोत

माझ्या सुख दुःखांचा साक्षीदार 

माझ्या प्रगतीचा हकदार

असणाऱ्या माझ्या दादाला 

 रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

रक्षाबंधनासाठी भावाकडून बहिणीला हार्दिक शुभेच्छा ( Best wishes in marathi for Rakshabandhan from brother to sister)

देवा मी आज तुझ्याकडे 

काहीच मागत नाही

रक्षाबंधनाच्या बंधनाच्या पवित्र दिनी 

तुझ्याकडे करतो एकच मागणे

माझ्या ताईला दुःखाचा मागमूसही न लागो

लाडक्या ताईला रक्षाबंधनाच्या

 खूप खूप शुभेच्छा!

आपल्या आई नंतर आपल्याला 

आधार देणारी आपल्या सुखदुःखात 

साथ देणारी असते ती आपली ताई

माझ्या लाडक्या ताईला 

रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

मी जसा पुढे चालत होतो

आणि त्याच पद्धतीने

 अभ्यास असो की संस्कार असो

 सगळ्याच बाबतीत माझ्या

 पावलावर पाऊल ठेवून 

आमच्या कुटुंबाची कायम 

प्रतिष्ठा जपणाऱ्या माझ्या

 छोट्या बहिणीला 

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा! 

जीवनात एक तरी आशेचा किरण असावा

 तो आशेचा किरण ताई तू होती

 कुठे चुकलो तर रागावणारी तू होती

 काही छान केलं तर कौतुक करणारी ही तू होती

 तुझ्या प्रेरणेमुळेच आज मी जो काही आहे

 त्याचे सर्व श्रेय फक्त ताई तुला आहे

 ताई तुला रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

रक्षाबंधनाच्या दिनी तू 

बांधलास पवित्र प्रेमाचा धागा

 माझ्या हातामध्ये 

ताई अखंड रक्षण करीन तुझे 

माझ्या लाडक्या बहिणीला

 रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

माझ्या सुखदुःखात माझ्या हसण्याची

 जळण्यात माझ्या रडण्यात 

माझ्या खो-खो हसण्यात

 माझ्यासोबत असणारी एकमेव

व्यक्ती म्हणजे माझी बहीण 

माझ्या बहिणीला रक्षाबंधनाच्या

 खूप खूप शुभेच्छा! 

रक्षाबंधन हार्दिकशुभेच्छा!लेखाचा सारांश (raksha bandhan hardik shubhechha 2023 summary)

थोडक्यात काय तर बहीण भावाच्या नात्यात गोडवा निर्माण करणारा एक सण म्हणजे रक्षाबंधन होय.रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला नक्कीच 2023 ची राखी पौर्णिमा साजरी करताना उपयोगी पडतील यात शंका नाही. या आमच्या raksha bandhan hardik shubhechha 2023 आपल्याला आवडल्या असतील तर इतरांना देखील आवर्जून पाठवा.

आमचे इतर लेख

महाराष्ट्र सरकार कडून दिल्या जाणाऱ्या 31 स्कॉलरशिप माहिती

इयत्ता पहिली ते दहावी वार्षिक नियोजन

आपण केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी या पद्धती वापरा 

असे करा आपले पॅनकार्ड आधार कार्ड एकमेकांना लिंक