रक्षाबंधन माहिती मुहूर्त पूजा विधी 2023

raksha bandhan mahiti muhurt pooja vidhi रक्षाबंधन हा आपल्या भारतातील सर्व महत्वाच्या सणांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा सण तसेच उत्सव आहे.रक्षाबंधन हा सण भावा बहिणीच्या मधील प्रेमळ अतुट अशा नात्याचे प्रतीक मानले जाते.

हा सण आपल्या भारत देशात वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या आनंदात अणि उत्साहाने साजरा केला जातो.हा सण आपल्या भारत देशात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातोच.

शिवाय परदेशात देखील जिथे हिंदु धर्मातील लोक वास्तव्यास आहेत अशा ठिकाणी देखील मोठ्या आनंद उत्साहात हा सण साजरा केला जातो.

रक्षाबंधन,राखी पौर्णिमा हा सण बहिण अणि भावाच्या अतुट अणि प्रेमळ नात्याचे प्रतीक मानला जातो.

रक्षा बंधन म्हणजे काय ?

रक्षा+बंधन हया दोन शब्दांपासून हा शब्द तयार होतो याचा अर्थ भावाने बहिणीला नेहमी तिचे संरक्षण करण्याचे दिलेले संरक्षणाचे वचन.

त्यामुळे ह्या दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भावाच्या हातावर रक्षासुत्र बांधत असते.हया बदल्यात भाऊ देखील आपल्या बहिणीला नेहमी तिचे संरक्षण करण्याचे वचन देत असतो.

राखी पौर्णिमेच्या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधत असते.दरवर्षी श्रावन महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.

दरवर्षी रक्षाबंधनाच्या तारखेत हिंदु कॅलेंडर ईअर नुसार बदल होत असतो.

ह्यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी पौर्णिमेचा योग देखील आहे.अणि हा योग रक्षाबंधनाच्या दिवशी अत्यंत खास मानला जातो.

२०२३ मध्ये रक्षाबंधन हा सण कधी साजरा केला जाणार आहे? raksha bandhan mahiti muhurt pooja vidhi

२०२३ मध्ये रक्षाबंधन हा सण ३० ऑगस्ट २०२३ अणि ३१ ऑगस्ट २०२३ रोजी साजरा केला जातो.

रक्षाबंधन साजरा करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे?

शास्त्रात असे सांगितले आहे की भद्राकाळात कुठलेही शुभ तसेच मंगल कार्य करू नये.

हे पण वाचा

रक्षाबंधन अप्रतिम शुभेच्छा! 

३० ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ९ वाजुन १ मिनिटांपर्यत भद्राकाळ असणार आहे.यानंतर रात्री ९ वाजुन २ मिनिटांनंतर रक्षाबंधन साजरा करण्याचा शुभ मुहूर्त आहे.

३०ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ९ वाजुन २ मिनिटांनी रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी ३१ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत हा शुभ मुहुर्त असणार आहे.

म्हणजे ३० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजुन २ मिनिटांपासुन ३१ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेपर्यंत शुभ मुहूर्त असल्याने ह्या कालावधीत बहिण आपल्या भावाला राखी बांधु शकणार आहे.

किंवा ३१ ऑगस्ट रोजी संपुर्ण दिवसभरात बहिणीने आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधली तरी देखील चालेल.

श्रावन पौर्णिमा तिथीला ३० ऑगस्टरोजी सकाळी १० वाजुन ५८ मिनिटांनी प्रारंभ होणार आहे.हा पौर्णिमा तिथी ३१ आॅगस्ट रोजी सकाळी सात वाजता संपुष्टात येणार आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी करावयाच्या पुजेची पदधत –

रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करून सुर्यदेवास जल अर्पण करायचे.

घरातील देवघरात तसेच मंदिरा मध्ये जाऊन देवाचा पाय पडायचा दर्शन घ्यायचे.देवाची पुजा करायची.

घरातील देवघरातील देवांची पूजा करून झाल्यावर राखीसाठी ताट तयार करायचे आहे.राखीसाठी तयार केलेल्या ताटात खालील दिलेल्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत-

रक्षाबंधनासाठी लागणारे साहित्य

१)राखी 

२)नारळ

३) सुपारी

४) कलश

५) अक्षदा

६) चंदन 

७) रोळी

८) मिठाई

९) दही 

१०) तुपाचा दिवा 

इत्यादी वरील दिलेल्या सर्व वस्तु ताटात पूजेसाठी ठेवायच्या आहेत.

यानंतर सर्वप्रथम देवाला औक्षण करून घ्यायचे.राखी बांधायला सुरुवात करण्याअगोदर प्रथम राखी देवाला अर्पण करावी.

देवाला राखी अपर्ण करून झाल्यावर शास्त्रात सांगितलेल्या शुभ मुहुर्ताच्या वेळी बहिणीने आपल्या लाडक्या भाऊरायास पुर्व तसेच उत्तर दिशेच्या बाजुने पाटावर तोंड करून राखी बांधण्यासाठी तसेच ओवाळण्यासाठी बसवायचे आहे.

यानंतर बहिणीने आपल्या लाडक्या भाऊरायाला टीळा लावून घ्यायचा आहे.यानंतर भावाला रक्षासुत्र बांधायचे असते.अणि ताटाने ओवाळून घ्यायचे असते.

भावाला मिठाईचा घास भरवून त्याचे तोंड गोड करायचे आहे.मग रक्षासुत्र बांधुन झाल्यानंतर घरातील वडीलधारी मंडळी तसेच आईवडील ह्या सर्वांचा पाय पडुन आशिर्वाद घ्यायचा आहे.

रक्षाबंधन ह्या सणाचे पौराणिक महत्व

रक्षासुत्र हा तो धागा असतो ज्याला बहिण आपल्या भावाच्या संरक्षणासाठी त्याच्या मनगटावर बांधत असते.

असे म्हटले जाते की राज सुर्य यज्ञाच्या दरम्यान द्रौपदीने एक रेशमी कापडाचा तुकडा भगवान श्रीकृष्ण यांना रक्षासुत्र म्हणुन त्यांच्या हाताच्या मनगटावर बांधला होता.

यानंतरच खरया अर्थाने रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधण्याची प्रथा सुरू झाली.तेव्हापासुन दर श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.

भद्राकाळ म्हणजे काय?भद्राकाळ हा अशुभ काळ का मानला जातो?

भद्राकाळ म्हणजे एक अशुभ काळ असतो.हया काळात कुठलेही पवित्र तसेच मंगल कार्य करण्यास शास्त्रात मनाई करण्यात आली आहे. 

ह्या काळात कुठलेही शुभ कार्य केल्यास ते फळास येत नाही.म्हणुन ह्या काळात कुठलेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे.

म्हणुन भद्राकाळात बहिणीने भावाला राखी बांधु नये असे सांगितले आहे.

भद्रा कोण आहे?

भद्रा ही शनिदेवाची बहिण आहे.जी शनिदेवाप्रमाणेच त्वरीत राग येणारी आहे.अशी मान्यता आहे की रक्षाबंधनाच्या भद्रा पृथ्वीवर येते.

बहिणीने भावाला भद्राकाळात राखी बांधल्यास काय होईल?

भद्रा काळात राखी बांधली तर काय होईल असा समज आहे ?

समजा एखाद्या बहिणीने आपल्या भावाला भद्राकाळात राखी बांधली तर तिच्या भावावर कुठलेही विघ्न येऊ शकते.त्याची धन संपत्ती संपुष्टात येऊन त्याचा सर्वनाश देखील होऊ शकतो.

भद्रा काळात राखी बांधल्याने अनर्थ झाल्याचे दाखले

असे म्हणतात की रावणाची बहिण शृपनखा हिने सुद्धा रावणाला भद्राकाळातच राखी बांधली होती.ज्यानंतर रावणाची सर्व सोन्याच्या लंकेचा नायनाट झाला.

शृपनखेने भद्राकाळात रावणाला राखी बांधली त्यामुळेच हे विघ्न रावणावर आले होते ज्यात त्याची सर्व सोन्याची लंका जळुन खाक झाली.रावणाचे साम्राज्य नष्ट झाले.

2023 भद्राकाळ कधी सुरू होईल? भद्राकाळ कधी संपणार आहे?

भद्राकाळ हा ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ५६ मिनिटांनी सुरू होईल अणि ३० आॅगस्ट रोजी रात्री ९ वाजुन १ मिनिटांनी हा भद्राकाळ संपेल.

भद्रा काळात विघ्ने येऊ नये म्हणून काय करावे असे पुराणात सांगितले आहे ?

भद्राकाळात आपल्यावर विघ्न येऊ नये यासाठी शिवाचे नामस्मरण केले जाते.

अशा पद्धतीने आजच्या लेखात आपण रक्षाबंधनाच्या विषयी सर्व माहिती एकदम सविस्तरपणे जाणुन घेतली आहे.

आमचे इतर लेख

महाराष्ट्र सरकार कडून दिल्या जाणाऱ्या 31 स्कॉलरशिप माहिती

इयत्ता पहिली ते दहावी वार्षिक नियोजन

आपण केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी या पद्धती वापरा 

असे करा आपले पॅनकार्ड आधार कार्ड एकमेकांना लिंक