शिक्षक दिन भाषण मराठी (03+अप्रतिम भाषणे) teacher day speech in Marathi 2023

teacher day speech in Marathi 2023 : नमस्कार ! 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो.शाळा महाविद्यालयामध्ये या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना शुभेच्छा देतात. या दिवशी विद्यार्थी अध्यापनाचे कामकाज करत असतात. शिक्षक आपल्यासाठी मेहनत घेतात त्यांच्या या अनमोल कार्याला सलाम म्हणून मुले छान छान भाषणे देतात.

आज आम्ही म्हणूनच शिक्षक दिनासाठी आपल्याला अप्रतिम 3 भाषणे घेऊन आलो आहोत. यातील आपल्याला आवडणारे भाषण आपण शिक्षक दिनासाठी आपण नक्की उपयोगात आणू शकता.चला तर मग shikshak dianachi marathi bhashane पाहूया..

शिक्षक दिन भाषण मराठी १ teacher day speech in Marathi 2023 speech no 1

सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अजित आहे.आज 5 सप्टेंबर आहे डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.

आज डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत. 

प्रथम आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा!

डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक आदर्श शिक्षक,तत्वज्ञ, तसेच भारत देशाचे राष्ट्रपती देखील होते.

आपल्या देशातील शिक्षक हेच देशातील भावी पिढीला संस्कारक्षम बनवत असतात.एक कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर अशी मूर्ती घडविण्याचे कार्य करतात.

एकदम त्याचप्रमाणे शिक्षक हा आपल्या देशातील सर्व विद्यार्थ्यांच्या जीवणाला आकार देण्याचे त्यांचे व्यक्तीमत्व घडविण्याचे काम करतात.

शिक्षक हे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याचे काम करतात.शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक गुरू अणि मित्र देखील असतात.

आज मी माझ्या सर्व गुरूजणांना नमन करून त्यांच्या कार्याचा गौरव करतो.

जय हिंद !

शिक्षक दिन भाषण मराठी 2teacher day speech in Marathi 2023 speech no 2


अक्षर अक्षर शिकवून तुम्ही आम्हास प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितला…
कधी प्रेमाने समजावून सांगत तर कधी रागावत जीवनाचा मार्ग दाखवला..”
सन्माननीय व्यासपीठ,आदरनीय मुख्याध्यापक वंदनीय गुरूजन वर्ग,माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो…
प्रथम सर्व शिक्षक जणांना माझ्याकडुन शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे पण वाचा

शिक्षक दिनाची अप्रतिम मराठी कविता 

आज ५ सप्टेंबर भारत देशाचे माजी राष्ट्रपती तसेच आदर्श शिक्षक डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ज्याला आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो.

दरवर्षी हा दिवस प्रत्येक मोठ्या आनंद अणि उत्साहात साजरा केला जातो.आजचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी खुपच महत्वाचा आहे.

हा दिवस त्या शिक्षकाला समर्पित दिवस आहे.जो आपल्या दिशाहीन जीवनाला मार्ग दाखवण्याचे काम करतो.शिक्षकाचा वाटा हा आपल्या देशाच्या प्रगतीत विकासात खुप महत्वाचा असतो.

शिक्षकांमुळेच आज कित्येक आदर्श नागरिक घडले तसेच घडताना दिसुन येतात.अणि भविष्यात अजुन आदर्श नागरिक घडतीलही.

देशाच्या विकासासाठी आपले अमुल्य योगदान देणारया ह्याच शिक्षकांच्या सन्मानाचा आदर करण्याचा हा एक महत्वपूर्ण तसेच विशेष दिवस आहे.

“ज्ञानाचा प्रकाश देण्या ..

दिवा अखंड तो जाळतो 

आपणा सर्वांना जीवनाचा खरा अर्थ…

शिक्षकांमुळेच कळतो”

तसे पाहायला गेले तर शिक्षक हा एक फक्त तीन अक्षरी शब्द आहे.पण ह्या तीन अक्षरी शब्दात विद्यार्थ्यांचे जीवन बदलण्याचे प्रचंड सामर्थ्य आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असलेला अज्ञानाचा अंधकार दूर करण्याचे अणि त्यांना ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचे काम एक शिक्षकच करतो.

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात जेवढे महत्व आपल्याला चालायला शिकवणारया आपल्या आईवडिलांना आहे तितकेच महत्व आपल्याला लिहायला वाचायला शिकवणारया शिक्षकांना देखील आहे.

एक शिक्षक,एक पुस्तक,एक विद्यार्थी हे संपूर्ण जगाला बदलण्याचे सामर्थ्य ठेवतात.शिक्षक आपणास ज्ञान तर देताच शिवाय जीवन कसे जगायला हवे याविषयी देखील मार्गदर्शन करत असतात.

आज शिक्षक आहे तर शिक्षणाला महत्त्व आहे शिक्षकांविना आपण कुठल्याही क्षेत्राचे ज्ञान प्राप्त करू शकत नाही कोणतेही शिक्षण घेऊ शकत नाही.

आज सर्व विद्यार्थी आपल्या शिक्षकांमुळेच मोठमोठ्या अधिकारी पदावर कामाला आहेत.आपल्या शिक्षकांकडुन मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आपल्या जीवनात यशस्वी झाले आहेत.

शिक्षक हे आपल्या सर्वच विद्यार्थी वर्गावर कायम ज्ञानाची सावली ठेवत असतात.

शिक्षक म्हणजे ज्ञानाचा अथांग समुद्र…

अपुर्णाला पुर्ण करणारा तो शिक्षक

विद्यार्थ्यांना आपल्या जीवाच्या तळमळीने

शिकवतो ज्ञानाची ओळख करून देतो तो शिक्षक 

मला घडवणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिक्षक दिन भाषण मराठी 3 teacher day speech in Marathi 2023 speech no 3

गुरूविना ना मिळे ज्ञान

ज्ञानाविना न मिळे सन्मान

जीवन भवसागर तराया,

चला वंदुया गुरूराया…

सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक अणि वंदनीय गुरूजन वर्ग अणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींना माझा सप्रेम नमस्कार 

आपणा सर्व विद्यार्थ्यांना नवी दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा देण्याचे काम आपल्या देशातील शिक्षक करतात.

परीक्षेसाठी महत्वाचा प्रश्न नक्की वाचा

कोणत्याही परीक्षेत कायम विचारलं जाणारा प्रश्न

शिक्षक दिन साजरा झाल्याची बातमी बनवा

५ सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती तसेच आदर्श देशातील आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जाणारया सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. 

सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिवसानिमित्त दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो.

शिक्षक दिन हा देशाच्या तसेच समाजाच्या विकासासाठी प्रगतीसाठी घडपडणारया सर्व शिक्षकांच्या सन्मानाचा दिवस आहे.

आज शिक्षकांच्या हातातच आपल्या देशाचे भवितव्य आहे.आज शिक्षकांमुळेच देशाला इंजिनिअर,डाॅक्टर,लेखक,वकिल,शास्त्रज्ञ प्राप्त होतात.

आपल्या देशातील शिक्षकांच्या कर्तव्य दक्षतेमुळे आज आपल्या देशाचा झपाट्याने विकास होताना दिसुन येत आहे.

शिक्षक दिन हा आपणास संस्कारक्षम बनविणारया शिक्षकांचा सन्मान करण्याचा दिवस आहे.

आज शिक्षकदिनी आपण आपल्या शिक्षकांना वंदन करून आपल्या देशाचे नाव जगात उंचावण्याचा प्रयत्न करूया.

देशातील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आमचे इतर अप्रतिम लेख

आपण केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी या पद्धती वापरा

महाराष्ट्र सरकार कडून दिल्या जाणाऱ्या 31 स्कॉलरशिप माहिती

सोपी योगासने करा आणि आरोग्य संपन्न बना  

बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2023