शिक्षक दिन कविता मराठी 2023

teachers day marathi poem 2023 : 5 सप्टेंबर हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी शाळा महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त भाषण,काव्यवाचन,रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले जाते. आज आम्ही आपल्याला शिक्षक दिनाचा कार्यक्रम गाजवण्यासाठी किंवा त्यात आपला सहभाग घेण्यासाठी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी उपयुक्त पडणारी बाब म्हणजे शिक्षक दिनासाठी शिक्षकांचे महत्व सांगणारी मराठी कविता आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.चला तर मग सुरुवात करूया..

5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांना सर्वजण शुभेच्छा देत असतात त्यांनी केलेल्या अध्यापनाच्या कामकाजाचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या जातात कोणी प्रत्यक्ष भेटून शिक्षकांना वंदन करते कोणी फोनच्या माध्यमातून तर कोणी पत्राच्या माध्यमातून अगदी त्याच पद्धतीने कवितेच्या माध्यमातून शिक्षकांविषयी ऋण व्यक्त करणे म्हणूनच आजचा विषय शिक्षक दिन कविता मराठी हा घेतलेला आहे.आमची ही shikshk din kavita marathi स्वरचित असल्याने आपल्याला नक्की आवडेल .

शिक्षक दिन कविता मराठी (teachers day marathi poem)

आपण जर इंटरनेट वरती सर्च केले तर शिक्षकांवरती अनेक कविता सापडतील जर आपण शाळेमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेणार असाल शिक्षकांविषयी आपल्याला आदरभाव व्यक्त करायचा असेल तर नक्कीच आमची शिक्षक दिन कविता मराठी हे आपणाला मदत करेल.चला तर मग teachers day marathi poem आपण पाहूया…….

शिक्षक दिन कविता | shishak din kavita 

      

देतो समाजाला आकार 

घडवूनि नररत्ने थोर

स्थान तुझे मोठे माझ्या आयुष्यात

माता- पित्यानंतर

नमन माझे हे तुज गुरुवर्या सदासर्वकाळ ||१||

 देतो अजाण बालकाला आकार त्यातून घडवितो नागरिक नक्षत्रासमान

उपकार तुझे मोठे या भूमीवर

नमन माझे हे तुज गुरुवर्या सदासर्वकाळ ||२||

नाही केला कसलाच भेद

फोल तुझ्यापुढे जात -धर्म, गरीब- श्रीमंत

सर्व तुजला दिसती एकसमान

नमन माझे हे तुज गुरुवर्या सदासर्वकाळ||३||

दिसतोस मला तू मोठा वटवृक्षासमान

देतोस आधार, सावली थंडगार

शिकविले तुझ्या मुळांनी खोलवर रुजायला

संकटातही तोल सावरायला

नमन माझे तुज  हे  गुरुवर्या सदासर्वकाळ ||४||

रूपे तुझी अनेक गौतम – कबीर – तुक्या समान

माझी निष्ठा तुझ्या चरणी  एकलव्यासम

अवघे विश्व सामावले तुझ्या उदरात

नमन माझे तुज हे गुरुवर्या सदासर्वकाळ ||५||

नाही शिकविली हिंसा ,क्रौर्य 

दिलीत हातात लेखणी, आणि मनात शांती

बुद्धीत भरला विवेक,सदाचार

जागविली ज्ञानाची लालसा

नमन माझे तुज हे  गुरुवर्या सदासर्वकाळ||६||

सारांश

आमचा शिक्षक दिन कविता मराठी(teachers day marathi poem) हा लेख आपणास कसा वाटला हे नक्की कळवा. आपल्या प्रिय शिक्षकांना ही कविता पाठवून त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा द्या. त्यांना नक्कीच आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

आमचे इतर लेख

रक्षाबंधन अप्रतिम हार्दिक शुभेच्छा

आपण केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी या पद्धती वापरा 

वाढत्या तापमानात अशी घ्या आपली काळजी 

असे करा आपले पॅनकार्ड आधार कार्ड एकमेकांना लिंक 

बालिका दिनाची बातमी लिहा 

Leave a Comment