Sprdha Parikshesathi Ati Mahtvache Vakprchar : मराठी व्याकरणातील महत्त्वाचा घटक म्हणजे वाक्प्रचार होय. वाक्प्रचार शालेय जीवनातील आणि दहावी, बारावी बोर्डाला हमखास असणारे, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा घटक असलेले वाक्प्रचाराचा अभ्यास करणार आहोत. बोर्डाच्या परीक्षेमध्ये वाक्प्रचाराचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करणे असे प्रश्न विचारले जातात तर स्पर्धा परीक्षेसाठी फक्त त्याचा अर्थ विचारले जातात त्याचा अर्थ त्यातून शोधून एक पर्याय निवडावा लागतो.
तरीही अनेकांचे या वाक्प्रचारातील गुण जातात त्यासाठी ते व्यवस्थित समजून घेऊन अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. व्याकरणातील मो. रा. वाळिंबे सुगम मराठी व्याकरण आणि बाळासाहेब शिंदे यांचे तसेच स्कॉलरशिप परीक्षा पुस्तके यांचा देखील अभ्यास करा.स्पर्धा परीक्षेसाठी अति महत्वाचे वाक्प्रचार हे परिपूर्ण मराठी व्याकरण या दोन पुस्तकांचा अभ्यास केला तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेतील कोणत्याच घटकाची अडचण भासणार नाही. त्याच पुस्तकाच्या आधारे आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. आपणही या दोन पुस्तकांच्या आधारेच व्याकरण घटक पाहणार आहोत.
स्पर्धा परीक्षेसाठी अति महत्वाचे वाक्प्रचार |
1 ) हट्टाला पेटणे – मुळीच हट न सोडणे
2) हात देणे – मदत करणे
3) हात चोळणे -चरफडणे
4 )पार पाडणे – पूर्ण करणे
5 ) साखर पेरणे – गोड गोड बोलून आपलेसे करणे
6 )पादाक्रांत करणे – जिंकणे
7 )साक्षर होणे – लिहिता वाचता येणे
8 ) सुताने स्वर्गाला जाणे – थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे
9 ) पाढा वाचणे – सविस्तर हकीकत सांगणे
10 – सोन्याचे दिवस येणे – अतिशय चांगले दिवस येणे
11) संधान बांधणे – जवळीक निर्माण करणे
12) संभ्रमात पडणे – गोंधळात पडणे
13 ) स्वप्न भंगणे – मनातील विचार कृतीत न येणे
14 ) स्वर्ग दोन बोटे उरणे – आनंदाने,गर्वाने अतिशय फुगून जाणे
15 हमरीतुमरीवर येणे – जोराने भांडू लागणे
16) हरभऱ्याच्या झाडावर चढणे- खोटी स्तुती करुन मोठेपणा देणे
17 ) हसता हसता पुरेवाट होणे – अनावर हसू येणे
18 ) हस्तगत करणे – ताब्यात घेणे
19) हातपाय गळणे – धीर सुटणे
20) हातचा मळ असणे – सहज शक्य असणे
21 ) हात ओला होणे – फायदा होणे
22 )हात टेकणे – नाइलाज झाल्याने माघार घेणे
23 ))हात देणे – मदत करणे
24 )हाय खाणे – धास्ती घेणे
25) हात मारणे – ताव मारणे
26) हातावर तुरी देणे – डोळ्यादेखत फसवून निसटून जाणे
27) हात हलवत परत येणे – काम न होता परत येणे
28) हात झाडून मोकळे होणे – जबाबदारी टाकून मोकळे होणे
29) हाता पाया पडणे – गयावया करणे
30) हातात कंकण बांधणे – प्रतिज्ञा करणे
31) हाताला हात लावणे — कष्ट ना घेता फुकटचे श्रेय घेणे
32 ) हातावर शीर घेणे – जीवावर उदार होणे
33 )हात धुऊन पाठीस लागणे – चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे लागणे
34 )हुल देणे – चकवणे
35 ) पोटात ब्रह्मराक्षस सुटणे – खूप खावेसे वाटणे
36) प्रश्नांची सरबत्ती करणे – एकसारखे प्रश्न विचारणे
37)प्राण कानात गोळा होणे – ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे
38 )प्राणावर उदार होणे – जीवाची परवाना करणे
39) फाटे फोडणे – उगाच अडचणी निर्माण करणे
38) बट्ट्याबोल होणे – विचका होणे
39 )बारा वाचणे – पूर्ण नाश होणे
40 )बत्तीशी रंगवणे – जोरात थोबाडात मारणे
41 ) बुचकळ्यात पडणे – गोंधळून जाणे
42 )बेत हणून पाडणे – बेत सिद्दीला जाऊ न देणे
43) बोचणी लागणे- एखादी गोष्ट मनाला लागून राहणे
44) बोटावर नाचणे – आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे
45)बोल लावणे – दोष देणे
46)बोळ्याने दूध पिणे – बुद्धीहीन असणे
47) भान नसणे – जाणीव नसणे
48) भारून टाकणे – पूर्णपणे मोहून टाकणे
49 )मान ताठ ठेवणे – स्वाभिमानाने वागणे
50) माशा मारणे – कोणताही उद्योग न करणे
51) मिशीवर ताव मारणे – बढाई मारणे
52) मूग गिळणे – उत्तर न देता गप्प राहणे
53) मधाचे बोट लावणे – आशा दाखवणे
54 ) मनात घर करणे – मनात कायमचे राहणे
55) मनाने घेणे – मनात पक्का विचार येणे
56) मन साशंक होणे -मनात संशय वाटू लागणे
57)मनावर ठसणे – मनावर जोरदारपणे बिंबणे
58)मशागत करणे – मेहनत करून निगा राखणे
59 )रक्ताचे पाणी करणे- अतिशय मेहनत करणे
60 )मात्रा चालणे – योग्य परिणाम होणे
61) रक्ताचे पाणी करणे -अतिशय मेहनत करणे
62 )राईचा पर्वत करणे – क्षुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे
63) राख होणे – पूर्णपणे नष्ट होणे
64) राब राब राबणे – सतत खूप कष्ट करणे
65) राम नसणे -अर्थ नसणे
66)राम होणे – शेवट होणे
67) लष्कराच्या भाकर्या भाजणे – दुसऱ्याच्या उठाठेवी करणे
68) लहान तोंडी मोठा घास घेणे – आपणास न शोभेल अशा प्रकारे वरचढपणा दाखवणे
69) लक्ष वेधून घेणे -लक्ष ओढून घेणे
70)लक्ष्मीचा वरदहस्त असणे – लक्ष्मीची कृपा असणे
71)लौकिक मिळवणे -सर्वत्र मान मिळवणे
72) वकीलपत्र घेणे -एखाद्याची बाजू घेणे
73) वाट लावणे – विल्हेवाट लावणे
74)वाटाण्याच्या अक्षता लावणे – स्पष्टपणे नाकारणे
75) वठणीवर आणणे – ताळ्यावर आणणे
76)वणवण भटकणे- एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप फिरणे
77) वाचा बसणे -एक शब्दही बोलता न येणे
78) विचलित होणे – मनाची चलबिचल होणे
79) विसंवाद अsणे – एकमेकाशी न जमणे
80) वड्याचे तेल वांग्यावर काढणे – एकाचा राग दुस-यावर काढणे
81)विडा उचलणे – निश्चय करणे
82)वेड घेऊन पेडगावला जाणे – मुद्दाम ढोंग करणे
83) शहानिशा करणे – एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे
84 )शिगेला पोहोचणे- शेवटच्या टोकाला जाणे
85)शंभर वर्ष भरणे – नाश होण्याची वेळ येणे
86) श्रीगणेशा करणे – आरंभ करणे
87)सहीसलामत सुटणे -दोष न येता सुटका होणे
88) दगा देणे – फसवणे
89)दबा धरून बसणे -टपून बसणे
90) दाद मागणे — तक्रार करून न्याय मागणे
91)दात धरणे – वैर बाळगणे
92) दाढी धरणे- विनवणी करणे
93) दगडावरची रेघ – खोटे न ठरणारे शब्द
94) दातांच्या कण्या करणे – अनेक वेळा विनंती करून सांगणे
95) दाती तृण धरणे – शरणागती पत्करणे
96) पाठ न सोडणे- एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे
97) दातखिळी बसणे – बोलणे अवघड होणे
98) द्राविडी प्राणायाम करणे – सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाण
99 दुधात साखर पडणे – अधिक चांगले घडणे
100) दातओठ खाणे – द्वेषाची भावना दाखवणे
101) दोन हाताचे चार हात होणे- विवाह होणे
102) दुसर्याच्या ओंजळीने पाणी पिणे – दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे
103) दातास दात लावून बसणे – काही न खाता उपाशी राहणे
104) दुःखावर डागण्या देणे – दुःखी झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे
105) धरणे धरणे – हट्ट धरून बसणे
106)धारातीर्थी पडणे – रणांगणावर मृत्यू येणे
107) धाबे दणाणणे – खूप घाबरणे
108) धूम ठोकणे – वेगाने पळून जाणे
109)धूळ चारणे – पूर्ण पराभव करणे
110) नजरेत भरणे – उठून दिसणे
111) नजर करणे – भेटवस्तू देणे
112) नाक घासणे – स्वतःचे कार्य साधण्यासाठी दुसर्याचे पाय धरणे
113) नाक ठेचणे – नक्षा उतरवणे
114) नाक मुरडणे – नापसंती दाखवणे
115) नाकावर राग असणे – लवकर चिडणे
116) नाक वर असणे -ऐट, दिमाख असणे
117) नाकाने कांदे सोलणे – स्वतःमध्ये दोष असून उगाच बढाया करणे
118) नक्राश्रु ढाळणे – अंतर्यामी आनंद होत असता बाह्यतः दुःख दाखवणे
119) नक्षा उतरवणे – गर्व उतरवणे
120) नाकाशी सुत धरणे – ता मारतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे
121) पाठीशी घालणे – संरक्षण देणे
122) पाणी पडणे – वाया जाणे
123)पाणी मुरणे – कपटाने काहीतरी लपवून ठेवणे
124) पाणी पाजणे – पराभव करणे
125) पाणी सोडणे -आशा सोडणे
126) पदरात घेणे – स्वीकारणे
127)पदरात घालणे – चूक पटवून देणे
128) पाचविला पूजणे -त्रासदायक गोष्टींची कायमची सोबत असणे
विद्यार्थी मित्रांनो वाक्प्रचारचा अभ्यास करून आपण शालेय जीवनातील परीक्षासाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा घटक आहे .तर आजचा हा स्पर्धा परीक्षेसाठी अति महत्वाचे वाक्प्रचार हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल.पुन्हा भेटूया एका नवीन विष्यासाह. धन्यवाद.
आमचे इतर लेख