ssc नंतर तात्काळ रोजगार,नोकरी कशी मिळेल

        ssc nantar tatkal rojgar

दहावी पास झाल्यानंतर म्हणजेच SSC नंतर तात्काळ रोजगार मिळावा असे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असते. महाविद्यालयीन शिक्षण घेऊन उगीच पाच वर्षे वाया घालवण्यापेक्षा अनेक विद्यार्थी दहावीनंतर मला तात्काळ रोजगार कसा मिळेल.म्हणजे मी स्वतच्या पायावर लवकर उभा कसा राहील .याकडे विशेष लक्ष देतअसतात. ज्या विद्यार्थ्यांची घरची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे.ते विद्यार्थी SSC नंतर तात्काळ रोजगार मिळावा याच्या प्रतीक्षेत असतात. म्हणूनच काही डिप्लोमा कोर्स व iti कोर्स यांची माहिती पाहणार आहोत. 

 ज्या विद्यार्थ्यांना घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात जसे की घरामध्ये वडील आहेत पण ते आजारी आहेत किंवा वडीलच नाहीत,घरात कोणी कमावणारे नाही म्हणजेच काय तर ज्याना शिक्षनात वेळ वाया न घालवता काही व्ययवसायिक शिक्षण घेऊन लवकरात लवकर नोकरी मिळावी असे वाटत असते त्यांनी SSC नंतर तात्काळ रोजगार /नोकरी मिळवून देणारी क्षेत्रे कोणती आहेत याविषयी हा लेख नक्कीच मार्गदर्शन करेल.

SSC Nantar Tatkal Rojgar
SSC नंतर तात्काळ रोजगार

दहावी नंतर नोकरी रोजगार मिळवून देणारी क्षेत्रे | SSC Nantar Tatkal Rojgar field

     एसएससी(दहावी) नंतर रोजगार म्हणजेच नोकरी तर अशी कोणती क्षेत्रे आहेत की ज्यामध्ये मी काही मोजके शिक्षण घेतले तर मला तात्काळ नोकरीची संधी मिळेल व माझा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल व मला  तात्काळ रोजगार मिळवून देरील अशी  कोणकोणती  क्षेत्र आहेत किंवा असे कोणते कोर्सेस आहेत जे केल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर रोजगार मिळेल तर अशा क्षेत्रांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊयात. SSC परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थी अकरावी बारावी न करता विविध कोर्सेस ला प्रवेश घेतात आणि त्यांचा उद्देश हाच असतो की ससक  नंतर मला तात्काळ रोजगार मिळावी चल तर मग अशा  काही कोर्सेस बद्दल माहिती घेऊया. 

दहावी नंतर करता येणारे डिप्लोमा कोर्स माहिती Information about diploma courses that can be taken after 10th

1. दहावी नंतर प्रशासन सेवेतील डिप्लोमा | after 10th Diplomaa In Administration Services 

                SSC चा निकाल लागल्यानंतरकाही  विद्यार्थी तात्काळ रोजगारासाठी हा कोर्स करू शकतात. या कोर्समध्ये कॉम्प्युटर, इंटरनेट, टेलिकम्युनिकेशन यासारखी तांत्रिक कौशल्य या अभ्यासक्रमात शिकवली जातात. प्रशासक म्हणून एखाद्या  क्षेत्रामध्ये प्रशासन कसे सांभाळावे याबाबतचे प्रशिक्षण Diploma In Administration या डिप्लोमा  अभ्यासक्रमात दिले जाते. 

      हा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर कार्यकारी सहाय्यक, कार्यकारी समन्वयक ,दूरसंचार ऑपरेटर, फ्रंट स्टाफ ऑफिसर यासारख्या पदावर तुम्ही नोकरी करू शकता . अगदी दोन ते तीन वर्षांमध्ये हा डिप्लोमा पूर्ण करून SSC नंतर तात्काळ रोजगार मिळवु  शकता .ज्याना नेतृत्व,प्रशासन पाहायला आवडतेतसेच  शासकीय कामामध्ये आवड आहे  त्यांनी हा diploma कोर्स जरूर करावा.

2. दहावीनंतर इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा | Diploma In Electronic after 10th 

       डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स या  कोर्सेसमध्ये तुम्हाला अभियांत्रिकी क्षेत्रातील ज्ञान दिले जाते.Diploma Electronics  मध्ये वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे  कशा पद्धतीने काम करतात,त्यांची कार्यप्रणाली तेसच त्यातील तंत्रज्ञान ,बिघाड झाल्यास दुरुस्ती याबाबत प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर ट्रांजिस्टर, सेमीकंडक्टर, वेगवेगळी सर्किट्स, यांची माहिती देखील या अभ्यासक्रमात दिली जाते. इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी दहावीला मिळालेले गुण विचारात घेतले जातात.त्या गुणांच्या आधारे  गुणवत्ता यादीmerit लिस्ट  लावली जाते.डिप्लोमा केल्यानंतर वेगवेगल्या  इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या, मीडिया, जाहिरात यासारख्या  क्षेत्रामध्ये तुम्हाला नोकरी लागू शकते. इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, टेलिफोन ऑपरेटर ,रेडिओ पत्रकार ,तांत्रिक प्रमुख असे पद देखील मिळू शकते . ज्यांना इलेक्ट्रॉनिक्समध्ये विशेष आवड आहे ते  विद्यार्थी कॉलेज म्हणजे 11वी – 12 वी न  करता SSC नंतर तात्काळ रोजगार मिळवण्यासाठी हा डिप्लोमा करून लवकरात लवकर स्वतःच्या पायावर ती उभे  राहू शकतात. 

3. दहावीनंतर फॅशन टेक्नॉलॉजी | Diploma In Fashion Desigen

  डिप्लोमा इन फॅशन डिझाईन हा  केवळ एक वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम आहे. ज्यांना फॅशनच्या दुनियेत रस आहे. नवनवीन प्रकारचे पोशाख ते डिझाइन करू शकतात त्यात आवड आहे  तशी कल्पकता त्यांच्याजवळ आहे. ते य दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर  या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. या डिप्लोमा कोर्समध्ये इतर अनेक काही भरपूर असे उपप्रकार आहेत. तुमची आवड पाहून निर्णय घेऊ शकता. या डिप्लोमा च्या माध्यमातून एक डिझाइनर म्हणून तुम्ही काम करू शकता आजचे युग हे फॅशनचे युग असल्यामुळे या क्षेत्रात विशेष अशी मागणी आहे. 

4.दहावीनंतर  डिप्लोमा इन फूड टेक्नॉलॉजी | Diploma In Food Technology 

      आज आपण बघतोय की सगळेच लोक किमान आठवड्याला तरी हॉटेलमध्ये जेवायला जातात.  थोडक्यात काय तर डिप्लोमा इन फूड टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही SSC नंतर तात्काळ नोकरी हवीय तर हा कोर्से करून नोकरी मिळवू शकता. या डिप्लोमा कोर्सेस मध्ये अन्नाचे उत्पादन प्रक्रिया, त्यअन्नाचे संरक्षण ,त्याचे पॅकेजिंग आणि आकर्षक लेबलिंग करणे यासारख्या बाबी शिकवल्या जातात.या क्षेत्रातील डिप्लोमा केल्यानंतर मोठमोठी हॉटेल्स उपाहारगृहे,अन्न प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या, शीतपेय निर्माण करणाऱ्या कंपन्या, मसाले ,अन्न पदार्थावर  संशोधन करणाऱ्या कंपन्या तसेक विविध प्रयोग करणाऱ्या प्रयोगशाळा शा काही क्षेत्रांमध्ये तुम्हाला तात्काळ नोकर्‍या मिळू शकतात उदाहरण द्यायचे झाले तर अमोल, कॅडबरी इंडिया, नेसले ,ब्रिटानिया यासारख्या कंपन्यांमध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते .थोडक्यात अन्न व त्यावरील प्रक्रिया या क्षेत्रामध्ये आज प्रचंड वाढ होताना दिसत आहे तर विद्यार्थी महाविद्यालयीन  शिक्षण न घेता या डिप्लोमा च्या माध्यमातून यापुढे या क्षेत्रातील डिग्री घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतो. 

5. दहावीनंतर इंटेरियर डिझायनर | Interior Desigener Diploma 10th pass out 

                  अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत .यातील  निवारा म्हणजे घर हे केवळ राहण्यासाठी असते ही संकल्पना बदलून happy home म्हणजेच घरात प्रवेश करताच आनंद देणारे घर अशी धारणा आज लोकांची आहे.  थोडक्यात  आज केवळ घर निवाऱ्यासाठी घर असे न राहता त्याला डेकोरेट करण्यावर भर दिला जातो. अनेक मंडळी आपले घर आतून कसे असावे? त्यातील वस्तूंची मांडणी कशी असावी ? घराला कोणता रंग द्यावा ,फर्निचर कसे असावे ?थोडक्या  आपले घर अतिशय आकर्षक  दिसेल यासाठी इंटेरियर डिझायनर चे  मार्गदर्शन घेतात. यावरून या डिप्लोमाचे महत्त्व तुमच्या लक्षात आलेच असेल. दहावीनंतर या क्षेत्रामध्ये डिप्लोमा करत असताना अनेक उपप्रकार देखील आहेत तुमची आवड पाहून अभ्यासक्रम निवडावा.या  क्षेत्रात डिप्लोमा केल्यानंतर टेक्स्टाईल डिझाईनर, किचन डिझायनर, आर्किटेक्चर किंवा आर्किटेक म्हणून देखील नोकरी करू शकता. या क्षेत्राला भारतातूनच नव्हे तर परदेशातून देखील विशेष अशी मागणी आहे.  त्यामुळे एस एस सी उत्तीर्ण झाल्यानंतर या क्षेत्रातील डिप्लोमा व त्यानंतर डिग्री करून तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकता आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकता.

6. दहावी नंतर डिप्लोमा इन ज्वेलरी | 10 th after  Diploma In Jwellary Design 

                  ज्यांना  दाग दागिने डिझाईन करणे आवडते ते डिप्लोमा इन ज्वेलरी हा  डिप्लोमा करून SSC नंतर तात्काळ रोजगार मिळवु शकतात.हा डिप्लोमा दहावी नंतर करून तुम्ही स्वतःचा ज्वेलरी व्यवसाय किंवा नोकरीच्या स्वरूपात देखील करू शकता. डिप्लोमा इन ज्वेलरी  डिप्लोमा केल्यानंतर ज्वेलरी हाऊस,ज्वेलरी डिझायनिंग कंपन्या तसेच ब्रँड मॅनेजर, क्वालिटी कंट्रोलर या ज्वेलरी क्षेत्राशी संबंधित पदावर तुम्ही काम करू शकता.या क्षेत्रात जाण्यासाठी तुम्हाला दागिन्यांवर कलाकुसर त्यातील बारकावे याची किमान माहिती असणे गरजेचे आहे. 

 दहावीनंतर विविध ITI कोर्सेस  |  ITI courses after 10 th 

    आयटीआय कोर्सेस या क्षेत्रात  एकच एक कोर्स नाही तर अनेक लहान मोठे कोर्स म्हणजे अभ्यासक्रम आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्था या विविध व्यवसायांचे प्रशिक्षण आपल्याला देत असतात.  आयटीआय केल्यानंतर विद्यार्थ्यांना तात्काळ नोकरी मिळू शकते.ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा करणे अवघड वाटते,आर्थिक परिस्थिती नाजुक आहे ज्याना  प्रात्यक्षिक ज्ञान मिळवायला आवडते ते iti  क्षेत्र निवडू शकतात. आयटीआय मध्ये मेकॅनिक, ग्राइंडर, फिटर,वेल्डर, टर्नर, डिझेल मेकॅनिकल, फॅब्रिकेशन अशा कितीतरी क्षेत्रांमध्ये कोर्स उपलब्ध आहेत.  दहावीनंतर तुम्ही प्रवेश घेऊन दोन ते तीन वर्षांमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता किंवा महिंद्रा ,टाटा यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये तसेच रेल्वे खात्यामध्ये देखील तुम्हाला तात्काळ नोकरी मिळू शकते.

fics Designe

            आज आपण पाहतो कोणत्या क्षेत्रामध्ये जाहिरातीला विशेष असे महत्त्व या जाहिरात क्षेत्रामध्ये ग्राफिक डिझायनिंग अतिशय गरजेचे असते कारण त्यामुळे जाहिरात आकर्षक बनत असते त्यामुळे SSCनंतर तात्काळ रोजगार मिळवण्यासाठी तुम्ही हे क्षेत्र निवडू शकता. दहावीनंतर तुम्ही ग्राफिक डिझाईनिंग मधील वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस डिप्लोमा तुम्ही करू शकता ग्राफिक्स बरोबर भाषा प्रोग्रामिंग सायबर सुरक्षा या देखील तुम्ही करिअर करू शकता आपला कल व आवड पाहून तुम्ही अशा कोर्सेसला प्रवेश घेऊ शकता. 

 नर्सिंग | Nursing Diploma 

                  कोरोना सारख्या महामारीतून आज प्रत्येकाला आरोग्याचे महत्त्व वेगळे सांगायला नको. आज Multi Specality हॉस्पिटल ची संख्या झपाट्याने वाढत आहे. सहाजिकच डॉक्टर ,नर्स ,आया ,स्वच्छता कर्मचारी यांची मागणी वाढत आहे म्हणूनच SSC नंतर तात्काळ नोकरी मिळवण्यासाठी नर्सिंग क्षेत्र मुलीना स्वतच्या पायावर उभे राहण्यासाठी छान क्षेत्र आहे. तसेच रुग्ण सेवेची संधी व उदरनिर्वाह असा दुहेरी फायदा या डिप्लोमाचा आहे.

इतर क्षेत्रे 

     वरील काही तात्काळ नोकरी मिळवून देणाऱ्या क्षेत्रांबरोबर विविध Beauty Parler ,मेहंदी क्लास,रांगोळी ,विणकाम,भरतकाम ,टेलरिंग यासारख्या क्षेत्रातील काही कौशल्ये हस्तगत करून तुम्ही तात्काळ रोजगार मिळवु शकताहा रोजगार किंवा नोकरी करत करत तुम्ही पुढे Degree व 11 वी 12 देखील बाहेरून म्हणजे Extrenal करू शकता. 

   अशा प्रकारे 11 वी 12 न करता SSC नंतर नोकरी किंवा रोजगार मिळवून देणारी क्षेत्रेव कोर्सेस यांची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तुमची आवड लक्षात घेऊन त्याविषयी सखोल  माहिती मिळवा व आपल्या पायांवर तात्काळ उभे रहा.  

1 thought on “ssc नंतर तात्काळ रोजगार,नोकरी कशी मिळेल”

Leave a Comment