11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 | 11th online Admission Process 2023 24

विद्यार्थी मित्रांनो यावर्षी दहावी परीक्षा तुम्ही तुमच्याच शाळेतून दिल्याने दुसऱ्या केंद्रावर जाणे वगेरे या सगळ्या व्यापटून तुम्ही सुटले. परीक्षा संपून महिना झाला आता सर्वांनाच 11वी ला कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा याची ओढ लागली  असेल.मुंबई,औरंगाबाद,अमरावती,नागपूर,पुणे यासारख्या ठिकाणी आपल्याला ऑनलाइन अर्ज करावे लागतात. तर आज आपण 2023 ची 11 वी प्रवेशाबाबत जे संभाव्य वेळापत्रक आले आहे त्याची माहिती पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपल्याला ही Fyjc Admission प्रवेशप्रक्रिया ज्या संकेत स्थळावर चालते याची माहिती असणे गरजेचे आहे. Fyjc Admission 2021 देखील याच संकेत स्थळावर झाले होते. 

11 वी प्रवेश अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ | 11 th Admission Website  Fyjc Website 

   वरील विभागातील विद्यार्थ्याना खलील संकेत स्थळावरून आपली माहिती भरणे ,पसंती क्रमांक भरणे व कोणते महाविद्यालयात प्रवेश मिळाला याची माहिती मिळत असते. यासाठी  https://11thadmission.org.in/या संकेत स्थळाला भेट द्यायला हवी.

11 वी प्रवेश 2023 24 संभाव्य वेळापत्रक |11th online Admission Process 2023 24 Time Table Sambhavya Fyje Admission 2023 24  

11 वी प्रवेश प्रक्रिया 2022
11 वी प्रवेश प्रक्रिया संभाव्य 2023 24

1. डेमो अर्ज भरण्याची सोय | Demo Form Practice 

दहावी नंतर 11 वी ला प्रवेश घेताना विद्यार्थी सोडा पालक देखील गोंधळून जातात. आपण भरलेला फॉर्म बरोबर आहे की नाही?तो सबमिट झालाय की नाही?कॉलेज कसे सिलेक्ट करायचे वगेरे यासाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडून वरील Websait वर जाऊन आपण या प्रवेश प्रक्रियेचा डेमो म्हणजे सराव करू शकता. ज्यांनी असे केले नसेल त्यांनी जरूर तो करून घ्या. साधारण मे महिन्याच्या सुरुवातीला ही सोय सुरू होईल.जेणेकरून तुमचा सराव होईल. त्यासाठी जरूर डेमो वरील Website वर जाऊन करू शकता.  

2. प्रारंभीक माहिती | Basic Information : मे पहिला आठवडा 

  डेमो अर्जाचा सराव झाल्यानंतर साधारण 15 मे पासून विद्यार्थी 11 वी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.कॉलेज selection या बाबी निकाल लागल्यानंतर कराव्या लागतात. तोपर्यंत विद्यार्थी आपले नाव सीट no , आपला संपूर्ण पत्ता ,फोन नंबर यासारखी माहिती भरू शकतात. ही माहिती व्यवस्थित भरावी.

3. प्रत्यक्ष अर्ज | Form Bhrane : अंदाजे 20 जून  

                     हा भाग अतिशय महत्वाचा आहे या पायरीवर तुम्हाला कोणत्या शाखेसाठी आर्ट,कॉमर्स ,विज्ञान हे अगोदर फायनल करून आपण जय विभागत अर्ज दाखल करणार त्या विभागत कोणती महाविद्यालये आहेत. ती अनुदानित आहे की विनाअनुदानित आहेत त्यांची फीज वगेरे या बाबी वेळेवर न पाहता आता वेळ आहे या वेळात वरील websit ला भेट देऊन ती माहिती मिळवायला सुरुवात करा. साधरण हा टप्पा दहावी निकल यावर्षी 20 जूनच्या दरम्यान लागल्यानंतर तुम्हाला भरावा लागेल.यात तुम्ही ज्या विद्यालायत फॉर्म भरणार आहात त्याचे कोड टाकावे लागतात.हे ताकत असताना गेल्या वर्षी त्या कॉलेजचे कट ऑफ काय होते याचा देखील विचार करा.

4. पहिली यादी साधारण 15 जुलै 2023 | Pahili Yadi 15 July 

                    कॉलेज पसंती क्रमांक टाकल्यानंतर काही दिवसातच गुण,आलेले अर्ज,राखीव जागा हे सगळे Paramitr पाहून यादी लागते. आपला नंबर लागल्यास Messge किंवा email आपल्याला प्राप्त होतो. असे असले तरी वारंवार Websit ला भेट देऊन खातरजमा करावी व आपला प्रवेश कायम करावा.ही प्रक्रिया साधारण अंदाजे 15 जुलै पर्यन्त असू शकते. 

     वरील सर्व वेळापत्रक संभाव्य आहे.शिक्षण विभागाकडून काही GR,PRIPTRAK,परिपत्रक आल्यास आमच्या dnyanyogi.com तात्काळ उपलब्ध करून दिला जाईल. तूर्तास डेमो Part भरायला सुरुवात करा काही अडचण आल्यास कमेन्ट करा. आपल्या शंकेचे निरसन नक्की केले जाईल. 

प्रवेशाचे टप्पे किंवा पायऱ्या | 11th Admision Steps Payrya 

    या 11 वी प्रवेशासाठी साधारण तीन टप्पे असतील अशी माहिती 11 प्रवेशाच्या मुख्य पानावर देण्यात आली आहे. तर नेमके कोणते तीन टप्पे असतील ते पाहूया. हे टप्पे कोणत्या कालावधीत असतील त्याबबत अजून सूचना आलेल्या नाहीत पण यातून नेमकी कोणती बाब आधि करावयाची आहे याची तुम्हाला कल्पना यायला मदत नक्कीच होईल. 

1. रजिस्ट्रेशन  |  Naav Nondni Registration 

                या 11 वी प्रवेशाचा पहिला टप्पा हा आहे की विद्यार्थ्यानी सर्वप्रथम आपले रजिस्ट्रेशन करून घ्याय चे आहे.यात आपला सीट NUMBER टाकून लोंग इन करून आपला लोंग इन id व पासवर्ड तयार करावयाचा आहे.हा Id पासवर्ड पुढील टप्प्यात तुमच्या कामाला येणार असल्याने नीट नोंदवून ठेवायचा आहे बरेच विद्यार्थी तसे न केल्याने गडबड करतात. जर चुकून तो हरवला किंवा विसरला तर Forget Password वरुण तो मिळवता येतो. थोडक्यात केवळ नोंदणी म्हणजे हा रजिस्ट्रेशन टप्पा पण यापुढील टप्पे अतिशय महत्वाचे आहेत. 

2. प्रत्यक्ष फॉर्म भरणे | Form Fill Karne 

                           निकाल लागल्यानंतर आपल्याला मिळालेले गुण आपोआप या website वर प्रदर्शित केले जातात. ते बरोबर आहेत का याची खातरजमा करावी.आपlaa फॉर्म भरताना टाकलेला प्रवर्ग म्हणजे जात नि आता फॉर्म भरताना असलेली जात किंवा त्याबाबत आपल्याकडे जातीचा दाखला आहे किंवा नाही ,किंवा यादी लागेपर्यंत तो निघेल की नाही ते पहावे अन्यथा ओपन मधून फॉर्म भरावा. याचबरोबर Domisile ,शाळेचा दाखला ,इतर आरक्षण अशी कंगतपत्रे या भागात जवळ असणे गरजेचे आहे. नसतील तरी घाबरून जाऊ नये. अश्या मुलांना तसे हमीपत्र द्यावे लागते की प्रवेशापर्यंत मी सर्व कागदपत्रे सादर करेन. आणि हो न केल्यास आपला प्रवेश रद्द होऊ शकतो. अजून वेळ आहे आपल्याजवळ जी कागदपत्रे नसतील ती लवकरात लवकर काढून घ्या. 

3. पसंती क्रमांक | Option Form Psanti,Krmank 

                   आपण रजिस्ट्रेशन केले आपली इतर माहिती भरली आता या शेवटच्या भागात तुम्हाला जी महाविद्यालये ,किंवा ज्या शाखेत प्रवेश हवा आहे त्यांचे पसंती क्रमांक ,कोड भरावे लागतात.हे भरत असताना आपल्याला जे कॉलेज त्याचे कट ऑफ पाहून जास्त आवडते ते पहिल्यांदा त्यानंतर दुसरे जे आवडते जे जायला यायाल,गुणवत्तेला ,फी यासरख्या बाबी विचार करून कोड भरा.यात चुका करू नका. ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कॉलेज करणारे तुमचे मोठे ताई,दादा शाळेतील शिक्षक यांची मदत घेऊन कॉलेज निवडा.

        या तीन पायऱ्या पूर्ण केल्यानंतर प्रवेशासाठी याद्या लागतात. आपला नंबर लागताच तात्काळ प्रवेश घ्या. नाही लागला तर दुसऱ्या यादीत लागू शकतो त्याची नियमावली येईल ती नीट वाचा.

      वर साधारण प्रवेश प्रक्रिया तिचे टप्पे ,फॉर्म कोणती काळजी घ्यावी,कोणती कागदपत्रे जवळ असावीत याची कल्पना आली असेल.

प्रारंभीक तयारी | Basic Tyari

1. महत्वाची कागदपत्रे | Important Document 

                          निकाल लागण्यापूर्वी,domasile (रहिवास दाखला),आरक्षणाचा लाभ हवा तर जातीचा दाखला अजून काढली नसतील तर अर्ज करा अजून वेळ आहे.व निकाल लागताच शाळा सोडल्याचा दाखला व निकाल ही कागदपत्रे जवळ ठेवा. 

2. इ मेल | e mail  

           आपल्याला आपला फॉर्म भरत असताना किंवा त्याचा id आपल्या फोन व मेल वर येतो त्यासाठी मेल id नसेल तर तो काढून ठेवा. 

3. शाखा व विद्यालय कोड | Shakhaa V  Kod  

                             कोणत्या शाखेत प्रवेश घेणार हे चर्चा व तुमची आवड,निवड,बौद्धिक कुवत यातून ठरवा. आर्ट ,कॉमरस कीन सायन्स ही ठरवा व कोड आधीच काढून ठेवा कारण का आता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. 

4. मोबाईल | Mobile Number 

               या प्रवेश प्रक्रियेत कोणता मोबाईल नंबर द्यायचा हे देखील ठरवून ठेवा कारण प्रवेश मिळाला की नाही त्याची सूचना register mobile वर प्राप्त होत असते. 

5. डेमो फॉर्म | Demo Form  

 सध्या याचा सराव webite वर जाऊन करायला हरकत नाही . हा सराव करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

    https://11thadmission.org.in/ 

  11 वी प्रवेश प्रक्रिया 2022-23 चे संभाव्य वेळापत्रक व आपण करावयाची तयारी याबाबतची माहिती कशी वाटली नक्की कमेन्ट करा. प्रवेश प्रक्रियेबाबत काही शंका असल्यास ,अडचण आल्यास जरूर विचारा. अधिक माहितीसाठी आमच्या Insta ,Wtp,Twiter ,Facebook यांच्या माध्यमातून कनेक्ट व्हा. आपल्याला सुयोग्य माहिती देणे हे आमचे कर्तव्य समजतो.शिक्षण मंडळाकडून काही अपडेट आल्यास नक्की कळवू .अधिक महितसाठी आमच्या dnyanyogi.com ला जरूर भेट द्या.  

11 वी प्रवेश STUDENT REGISTRATION सुरुवात झाली आहे तत्काळ भरून घ्या. 

आमचे इतर लेख 

सरल पोर्टल स्टुडेंट प्रमोशन कसे करावे ? तसेच टॅब सुरू 

2 thoughts on “11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 | 11th online Admission Process 2023 24”

Leave a Comment