अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 पासून प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित कार्यपद्धती

11th Online Admission Revised Procedure for 2023 24

अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 याबाबत संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.त्यानुसार 25 मे पासून विद्यार्थी स्टुडन्ट रजिस्ट्रेशन आणि भाग 1 भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.यावर्षी म्हणजे यावर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 2023 24 अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित कार्यपद्धती अवलंबली जाणार आहे. अर्थात यावर्षी बदल करण्यात आलेले आहेत. त्यातील काही महत्त्वाचे बदल आपल्या माहितीसाठी देत आहोत.चला तर अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 पासून प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित कार्यपद्धती पाहूया. 

11th Online Admission Revised Procedure for 2023 24
अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 पासून प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित कार्यपद्धती

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 पासून प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित कार्यपद्धती

 

१.अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 साठी वसई,भिवंडी,पनवेल तालुक्यांचा समवेश | 11th Online Admission 2023 – 24 including Vasai, Bhiwandi, Panvel Taluks

शासन निर्णय 9 जून 2022 नुसार मुंबई महानगर विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए MMRAD या क्षेत्रामध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी वरील चारही तालुक्यांचा अर्थात ग्रामीण भागांचा या नवीन प्रवेश प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. हा एक यावर्षीचा नवीन बदल

२.अकरावी प्रवेश 2023 24 प्रवेशासाठी एकाच शाखेची मागणी |11th Admission 2023 24 single branch demand for admission

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 मध्ये विद्यार्थ्याला शाखा निवडत असताना या वर्षी कला, विज्ञान, वाणिज्य / arts,science,comm. या शाखेपैकी एकाच शाखेसाठी मागणी करता येणार आहे. परंतु जर विद्यार्थ्याला शाखा बदलायची  असेल तर ज्यावेळी अर्जाचा भाग 2 भरत असताना शाखा बदलून पुन्हा पसंतीक्रम देता येतील. थोडक्यात एकाच शाखेसाठी यावर्षीपासून एप्लीकेशन करता येणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक

३.अकरावी प्रवेश पसंतीक्रम भरण्याबाबत नवीन बदल | New changes regarding filling of 11th admission preference

विद्यार्थ्यांना आपले पसंतीक्रम म्हणजे ऑप्शन फॉर्म भरत असताना कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहाच विद्यालयांचे पसंती क्रम नोंदविता येणार आहे.

४.राखीव कोटा 

नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या पनवेल वसई या तालुक्यांसाठी एकूण जागांपैकी काही आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला पीडीएफ मध्ये दिलेले आहे.

५.अकरावी प्रवेश 2023 24 मध्ये अनाथ मुलांसाठी १ %आरक्षण | 1% reservation for orphans in 11th admission 2023 24

महिला आणि बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार अनाथ मुलांसाठी खुल्या प्रवर्गातून एक टक्के समांतर आरक्षण ठेवण्यात आलेले आहे.

६.अकरावी प्रवेश  प्रवेश फेरीसाठी पसंती क्रम बदलण्याची सुविधा| Facility to change order of preference for 11th admission admission round

अकरावी प्रवेशाच्या ज्या प्रवेश फेऱ्या होतात. त्या प्रत्येक प्रवेश फेरीच्या वेळी विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची सुविधा दिली जाणार आह

७. अकरावी प्रवेशासाठी कला व सांस्कृतिक कोटा रद्द  |Arts and culture quota for class 11th admission cancelled

शैक्षणिक वर्ष 2018 19 पासून कला व सांस्कृतिक कोट्यासाठी दिले जाणारे आरक्षण रद्द केले आहे

८.अकरावी प्रवेश 2023 24  अर्ज भाग एक मधील दुरुस्ती |11th  ADMISSION 2023 24 CORRECTION IN APPLICATION PART ONE

विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा भाग एक भरत असताना काही चुका झाल्या असतील तर त्या चुका आवश्यक ती कागदपत्रे दाखवून आपल्या संबंधित शाळेकडून त्या दुरुस्ती करून घेण्याची सोय यावर्षीपासून करून देण्यात आलेले आहे.

९.अकरावी प्रवेश विज्ञान शाखेत प्रवेश टक्केवारीची अट | 11th Admission Science stream admission percentage condition

विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांना इयत्ता दहावी मध्ये विज्ञान विषयात कमीत कमी 35 टक्के गुण असणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांना विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेता येणार नाही.

१०. अकरावी प्रवेश 2023 24 साठी प्रवेश  शुल्क | 11th admission fees 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे.

११. SSC बोर्ड सोडून इतर विद्यार्थी आरक्षण लाभासाठी  | For student reservation benefit other than SSC board

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात एसएससी बोर्ड व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांना आरक्षणाचा दावा करण्यासाठी कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतील.

१२.खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 

जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत अशा विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र घेऊन प्रवेश अर्ज अप्रो करावा लागणार आहे

१३.अकरावी प्रवेश तीन नियमित फेऱ्या |11th admission three regular rounds

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे संवर्ग गुणवत्ता आणि उपलब्ध जागा यांच्या नुसार तीन नियमित फेऱ्या होणार आहेत.

अशा  पद्धतीने यावर्षी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये पनवेल आणि वसई या तालुक्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर काही छोटे मोठे बदल आहेत ते देखील वर देण्यात आलेले आहेत.

अकरावी प्रवेश सुधारित कार्य पद्धती 2023 24 pdf |11th admission revised work pattern 2023 24 pdf

अकरावी प्रवेश नवीन नियमवली  pdf 

या पीडीएफ मध्ये सर्व डीटेल तपशील आहे. 

  DOWNLOAD 

आपण यावर्षी झालेले काही नवीन बदल लक्षात घेऊन कार्यवाही करावी.ही माहिती आपले मित्र मैत्रिणी यांना तात्काळ पाठवा.

आमचे इतर लेख 

 
 

Leave a Comment