महाराष्ट्र वारसा स्थळे मुंबई माहिती |maharashtra mumabi varasa sthale mahiti

 आपण स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना आपल्याला आपल्या परिसरातील ऐतिहासिक इमारती ,किल्ले यांची माहिती किंवा शक्य असल्यास त्या स्थळांना भेटी द्याव्यात. हा एक दिवसाचा उपक्रम आहे .यामधे मुंबई व महाराष्ट्रातील वारसा स्थळे यांचा परिचय या लेखातून करून देत आहोत.

महाराष्ट्र वारसा स्थळे मुंबई माहिती
महाराष्ट्र वारसा स्थळे मुंबई माहिती

मुंबईतील ऐतिहासिक स्थळे| mumbi eitihasik thikanehistorical place in mumbai

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. एवढेच नाही तर भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे.अनेक परकीय वसाहतीना देखील मुंबईचे आकर्षण होते. आज कितीतरी परकीय पर्यटक मुंबईला भेटी देतात.मुंबई मध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत की ज्या आपण मुलांना दाखवू शकतो त्याविषयी माहिती सांगू शकतो. चला तर मग महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातील मुंबईतील वारसा स्थळे व ऐतिहासिक वास्तू यांची माहिती मिळवूया. शक्य झाल्यास आपण मुलाना मुंबईतील  या स्थळांना भेटीसाठी नेऊ शकता.

मुंबईतील महत्वाची वारसा स्थळे | mumbai mhtvachi varsa sthale

1)गेटवे ऑफ इंडिया | gate way of india

गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील एक स्मारक आहे .सन डिसेंबर 1911 मध्ये ब्रिटिश सम्राट राजा जॉर्ज पंचम आणि महाराणी मेरी यांच्या मुंबईत येणार होते त्यांच्या आगमनाच्या निमित्ताने या वास्तूची निर्मिती केली गेली आहे. ही वास्तू मुंबई च्या दक्षिण दिशेला समुद्राच्या किनारी उभी आहे. गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईमधील कुलाबा मध्ये स् असलेल्या अपोलो  बंदर या ठिकाणी आहे. गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ आहे.

गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा केव्हस  म्हणजे पुरातन गुंफा या ठिकाणी जाण्यासाठी सागर मार्ग म्हणजे समुद्र मार्गे जावे लागते. आ या वास्तू पुरातन व डोंगरात असून तिची  उंची सुमारे आठ मजली इमारतीएवढी आहे. या वास्तूमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोन्हींच्या वास्तुकलेचा उपयोग केलेला दिसतो आपण मुलाना आशा ठिकाणी नरल्यास स्थळाला भेट तर होईलच पण सर्वधर्म समभाव ही भावना वाढीस लागेल.
आपण ट्रेन ने मुलाना या ठिकाणी भेट देऊन या वास्तूंचे बांधकाम त्याची शैली मुलांना समजेल .शक्य असल्यास हे वारसा स्थळ मुलाना दाखवण्यासाठी आपण नक्की न्यायचा प्रयत्न करा.पिकनिक प्लस वारसा स्थळ दोन्ही साध्य होतील .बरोबर ना चला पुढील वारसा स्थळ किंवा ऐतिहासिक स्थळ याची माहिती पाहूया.

2) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस chatrapati shivaji maharaj terminans |CST

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसटी याचे पूर्वीचे नाव विक्टोरिया टर्मिनस होते. म्हणजेच व्हिटी हे मुंबईतील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. CST हे मुंबईच्या बोरीबंदर परिसरात आहे. या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन मे 1888 करण्यात आले. रेल्वे स्थानक रेल्वे मंत्रालय आणि भारतीय रेल्वे यांच्या मालकीची आहे.
या रेल्वे स्थानकामध्ये 18 प्लॅटफॉर्म आहेत. 18 पैकी एक ते सात हे मुंबई उपनगरी मार्गावरील स्थानके आहेत आणि आठ ते अठरा हे स्थानके आहेत. येथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर आणि जलद गाड्या जातात. जागतिक वारसा स्थळ म्हणून ही इमारत घोषित करण्यात आली आहे .या इमारतीचे जतन आणि संवर्धन आपल्या सर्व मुंबईकरांची भारतीयांची जबाबदारी विसरून चालणार नाही तर लक्षात जागतिक वारसा स्थळाला त्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण भेट देऊ शकता.

3) कान्हेरी लेणी  | kanehri leni

कान्हेरी लेणी म्हणजेच कानेरी केव्हज होय .ही मुंबईतील बोरिवली भागातील नॅशनल पार्क म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान  पार्क या ठिकाणी आहेत. ही लेणी किंवा गुफा नॅशनल पार्कच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सहा किलोमीटर अंतरावर आतमध्ये  आहेत.
ही लेणी काळया डोंगरातील दगडांमध्ये बनवलेली आहेत. काळा डोंगर म्हणजे संस्कृत मध्ये कृष्णगिरी असे म्हटले जाते. कान्हेरी हा शब्द कृष्णगिरी या शब्दावरूनच तयार झाला आहे असे मानले जाते.या लेण्यांमध्ये एकूण 109 गुफा म्हणजेच लेणी आहेत. बौद्ध धर्मीयांचे स्तूप आढळून येते. दगडाची बनलेली आहे. या लेण्यांमध्ये दगडाच्या मोठ्या खांबांनी बनवलेली मोठे सभागृह आहे. पुरातन काळात पावसाचे पाणी साठवण्याकरता या ठिकाणी पाण्याचा पाठ आणि हौद तयार केलेल्या दिसून येतो. बौद्ध भिक्खूंसाठी या ठिकाणी सभागृह,खोल्या बनवलेल्या दिसतात. डोंगरात कोरलेले दगडी बांधकाम अखंड वाचतो म्हणून कान्हरी गुंफा किंवा एक ऐतिहासिक स्थळ किंवा पुरातन वास्तू म्हणून आपण पाहू शकतो मुंबईतील जे विद्यार्थी पश्चिम उपनगरात राहतात किंवा वेस्टर्न लाईनला राहतात त्या विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी अतिशय चांगले वारसा स्थळ येण्या जाण्यासाठी सोयीचे असलेले आहे तरी शिक्षकांनी याविषयी विचार करावा आणि या स्थळाला शक्य झाल्यास भेट द्यावी.

 4)एलिफंटा केव्हज |elifanta caves

एलिफंटा केव्हज भारतातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. या लेणी मुंबई तील गेटवे ऑफ इंडिया पासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या घारापुरी या बेटावर आहेत. म्हणूनच या लेण्यांना घारापुरी लेणी असे सुद्धा म्हटले जाते. अनेक पर्यटक लांब लांबून या  लेण्या पाहण्यासाठी येतात. गेटवे ऑफ इंडिया पासून एलिफंटा केव्हज ला  जाण्यासाठी बोटीतून प्रवास करावा लागतो गेटवे ऑफ इंडिया पासून अवघे पाऊण ते एक तासाचे अंतर आहे. खूप मोठ्या परिसरात दगडांमध्ये या लेण्या बनवलेल्या आहेत.
या लेण्यांमध्ये भगवान शंकराच्या तीन भव्य मूर्ती दिसून येतात यावरूनच या लेण्या भगवान शंकरांना समर्पित असल्याचे समजते. लेण्यांमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या लेण्या आढळून येतात. त्याच्या एका प्रकारात हिंदू धर्म आणि दुसऱ्या प्रकारात बौद्ध धर्म यांच्याशी निगडित लेण्या दिसून येतात. या लेण्यांमध्ये एकूण सात लेण्या दिसून येतात त्यापैकी पाच लेणी हिंदू धर्माशी तर दोन लेणी बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. या ऐतिहासिक वास्तू आपल्याला केवळ ऐतिहासिक पुरातन वास्तू म्हणून बघायला जायचे नाही तर त्यामागील इतिहास त्या बातम्या मागील उद्देश काय आहे हा आपला आपल्या राष्ट्राचा आपल्या देशाचा इतिहास त्यातून उजागर व्हायला हवा या भूमिकेतून शिक्षकांनी असताना भेटीसाठी विद्यार्थ्यांना घेऊन जायचे आहे विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना विद्यार्थ्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी समजले पाहिजे त्याचबरोबर त्या वस्तूंचा संवर्धन ही आपली जबाबदारी आहे अशी भावना निर्माण व्हायला हवी.

5) मरीन ड्राईव्ह | marin drive

हिंदी सिनेसृष्टीमध्ये किंवा एकंदरीतच मुंबईचे आकर्षण असलेला समुद्रकिनारा म्हणून जो ओळखला जातो तो म्हणजे मरीन ड्राईव्ह मुंबईचे समुद्रकिनाऱ्यावरून जर आपल्याला दर्शन घ्यायचे असेल व आपण जे चित्रपट पाहतो त्या चित्रपटांमध्ये सर्वात जास्त शूटिंग परिसराचे होते ते म्हणजे मरीन ड्राईव्ह एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला गगनचिंबी इमारत लाथांनी उठणारा समुद्र आणि त्या रस्त्याची आकर्षक अशी बांधणी ही देखील विद्यार्थ्यांना आपण दाखवू शकता मुंबई सारख्या गर्दीच्या ठिकाणी असा समुद्रकिनारासने म्हणूनच हे ठिकाण आपण एक उल्लेखनीय ठिकाण म्हणून दाखवू शकता.

6) छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय| shivaji sangrhalay

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय याचे पूर्वीचे नाव किंवा मूळ नाव प्रिन्स ऑफ वेल्स असे होते. सन 1998 मध्ये याचे नाव बदलण्यात आले. हे मुंबईच्या दक्षिण भागातील गेटवे ऑफ इंडिया च्या जवळ फोर्ट या ठिकाणी आहे या वास्तु संग्रहालयाची स्थापना 10 जानेवारी 1922 रोजी झाली. या वास्तु संग्रहालयात  जवळजवळ 50 हजार भारतीय प्राचीन   इतिहासातील प्रदर्शनी मांडलेले आहेत. तसेच परदेशी वस्तू सुद्धा आपल्याला तीन प्रकारात या ठिकाणी आढळून येतात. जसे कोल्हापुरातत्व आणि नैसर्गिक इतिहास या ठिकाणी गेल्यावर आपल्याला समजतो. एकंदरीतच भारतातील कृषीप्रधान संस्कृती तिचा होत गेलेला विकास तिथे राज्य करणारे राज्यकर्ते अशी सर्व माहिती या संग्रहालयातून विद्यार्थ्यांना मिळते या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने अशा स्थानांना भेटी देणे म्हणजे विद्यार्थ्यांना वास्तवज्ञान आपल्या राष्ट्राच्या उजागर परंपरा दाखवणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.
प्राचीन भारतातील अनेक अवशेष आपल्याला या ठिकाणी आढळून येतात जसे मोर्य,गुप्त,राष्ट्रकुट,चालुक्य यांच्या काळात असणारी  सिंधू संस्कृती च्या कलाकृती या प्रदर्शनामध्ये दिसून येतात.

7) संजय गांधी नॅशनल पार्क| sanjay gandhi national park

संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबईतील बोरवली या ठिकाणी आहे. बोरवली स्थानकापासून पूर्वेकडे एक किलोमीटर अंतरावर हे नॅशनल पार्क आहे. या नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वारा पासून सहा किलोमीटर अंतरावर कानेरी गुफा आहेत. नॅशनल पार्क मधून कान्हेरी गुफा कडे जाण्यासाठी बसची सोय केलेली आहे
या नॅशनल पार्क मध्ये अनेक प्रकारचे सस्तन प्राणी 250 प्रकारचे पक्षी सरपटणारे प्राणी उभयचर प्राणी आहेत. येथे हजारो प्रकारचे वेगवेगळे वृक्ष आहेत. जर आपण कानेरी गुंफा विद्यार्थ्यांना दाखवली तर एक प्रकारे ऐतिहासिक वास्तूचे दर्शन आणि त्याचवेळी त्या मार्गातच असलेले संजय गांधी उद्यान दाखवले तर एक नैसर्गिक वारसा नैसर्गिक वनस्पती पशुपक्षी प्राणी आणि यांचे जतन आपली कशी जबाबदारी होत चाललेली आहे अनेक प्राणी आज दुर्मिळ होत चाललेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे त्याची जाणीव होण्यासाठी अशा स्थान आपण भेटी द्यायला हव्यात.

8.बृहन्मुंबई महानगरपालिका इमारत| mumbai mahnagarpalika imart

ब्रिटिशांनी आपल्या भारतावर दीडशे वर्षे राज्य केले आणि राज्य करत असताना आपल्याला प्रशासन नीट चालवता यासाठी अनेक इमारती बांधल्या या इमारतींमधीलच ज्या ठिकाणी सद्यस्थितीत मुंबई महानगरपालिकेचे कार्यालय आहे एक वास्तू म्हणून आपण या इमारतीला भेट देऊ शकता ही मला त्याची रचना इमारतीचे वापरलेले साहित्य किती पुरातन असून आजही इमारत लोक राहणे योग्य आहे आजही मुंबई महानगरपालिकेचा कारभार याच इमारतीतून होतो ही इमारत आली टीव्ही वरती पाहिली तरी मुंबई महानगरपालिका आणि तिचा कारभार या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात अतिशय भव्य दिव्य अशी इमारत ही विद्यार्थ्यांना पण दाखवू शकता की स्थापत्य कला कशी असावी याचा एक आदर्श नमुना विद्यार्थ्यांना कळावा यासाठी आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ शकतो त्याचबरोबर आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका इलादेखील एक ऐतिहासिक दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो या संस्थेची माहिती मिळू शकतो शक्य असल्यास स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मुंबईच्या स्थळाला आपण भेट द्यायला हरकत नाही.

9.मुंबई विद्यापीठ mumabi university

एक शैक्षणिक विद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठाची ख्याती संपूर्ण भारतभर आहे या विद्यापीठाची इमारत अतिशय पुरातन असे आहे या इमारतीच्या बाजूला असलेले दोन टॉवर जे अतिशय आकर्षक आहेत त्याचबरोबर त्या इमारतीमध्ये असणारे भले मोठे घड्याळ विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा बिंदू होऊ शकतो इंग्रज कालीन शिक्षण व्यवस्था कशी होती याविषयीची त्यांना काही कल्पनावि शकते यासाठी मुंबई युनिव्हर्सिटी म्हणजेच मुंबई विद्यापीठाच्या इमारतीला आपण वारसा स्थळ म्हणून भेट देऊ शकता.

10.मुंबई उच्च न्यायालय mumbi high court

महाराष्ट्रातील एक उच्च न्यायालय म्हणून मुंबई उच्च न्यायालय ओळखले जाते सीएसटी मुंबई महानगरपालिका मुंबई विद्यापीठ या पद्धतीने ही देखील ब्रिटिशकालीन वाचतो आहे आपल्या राज्याचे हायकोर्ट कसे आहे त्या ठिकाणचा कारभार कसा चालतो याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी किंवा गाव पातळीवर चालणारे केसेस अगदी सर्वोच्च न्यायालयात जाण्या अगोदर या कोर्टामध्ये कशा पद्धतीने चालतात याची काही कल्पना आपण देऊ शकतो त्याचबरोबर कोर्टाची पायरी ते कशा पद्धतीने आपल्याला त्रास देऊ शकते म्हणून शक्यतो जीवनामध्ये समझोता ही भूमिका समाजाची भूमिका किती गरजेचे आहे हे विद्यार्थ्यांना तुम्ही यातून समजावू शकता.

11.मुंबईतील इतर स्थळे mumbi itar sthle

आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातील ऐतिहासिक वार्षिक वास्तू किल्ले यांना भेटी द्यायचे आहेत साध्या पण मुंबईचा विचार केला तर तो आकडा आपला अजून वाढवायचा म्हटलं तर कितीतरी पुढे जाऊ शकतो म्हणून काही एक कल्पना किंवा वारसा स्थळे नेमके कोणते आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण घेऊन जाऊ शकतो आणि भारताचा किंवा मुंबईमधील काही एक इतिहास शैक्षणिक इतिहास स्थापत्यशास्त्राचा इतिहास याची कल्पना विद्यार्थ्यांना येण्यासाठी आपण अशा वारसा स्थळांना ऐतिहासिक वास्तूंना भेटी द्यावयाचे आहेत मुंबईमध्ये या स्थळांबरोबर दादासाहेब फाळके फिल्म नगरी गोरेगाव राजाबाई टॉवर डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम बोरिवली स्थित पॅगोडा अशा अनेक कितीतरी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण भेटी देणं त्यांना आपला इतिहास समजावणं ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाची जबाबदारी समजावणं यासाठी हा सर्व घाट आहे हे लक्षात घेऊन शिक्षकांनी वारसा स्थानांना भेटी द्याव्यात आणि अमृत महोत्सवांतर्गत स्वातंत्र्याचा महोत्सव हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम यशस्वी करावा या दृष्टिकोनातून मुंबईतील वारसा स्थळांची माहिती आजच्या लेखातून दिलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील अनेक वारसा स्थळे आहेत.

@@ स्वातंत्र्य दिन ,अमृत महोत्सव 50 अप्रतिम घोषणा @@

महाराष्ट्रातील वारसा स्थळे| mharashtratil varasa sthale

मुंबईप्रमाणेच महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वारसा स्थळे आहेत संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे तेव्हा महाराष्ट्रातील वारसा स्थळे याविषयीची माहिती जर आपल्याला हवे असेल तर आपण अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून महाराष्ट्रातील संपूर्ण वारसा स्थळांची माहिती मिळू शकतात आणि आपापल्या परिसरात विद्यार्थ्यांना घेऊन भेटी देऊ शकता त्या ठिकाणची माहिती देऊ शकता आणि पर्यावरण संवर्धन ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धन ही आपली कशी जबाबदारी आहे अशी वातावरण निर्मिती करू शकता त्यांना महाराष्ट्रातील वारसा स्थळे विषयी माहिती हवी आहे त्यांनी खालील लिंक वर क्लिक करा आणि ती माहिती वाचा आमचे लेख आपणास कसे वाटतात ते आम्हाला नक्की कळवा.

महाराष्ट्रातील वारसा स्थळांची माहिती ( निळ्या अक्षरांवर क्लिक करा माहिती उपलब्ध होईल)

आमचे हे लेख जरा चाळून बघा m

Leave a Comment