स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पर्यावरण संवर्धन शपथ व अहवाल | amrut mahotsav paryavran sanvardhan shapatah

आजच्या लेखात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत तसेच स्वराज्य महोत्सव उपक्रम राबवत असताना आपल्याला एक उपक्रम राबवायचा आहे तो म्हणजे पर्यावरण संवर्धन शपथ. तसेच हा उपक्रम राबवल्यानंतर uplod करावयाच्या अहवाला बाबत माहिती पाहणार आहोत. 
पर्यावरण संवर्धन शपथ
पर्यावरण संवर्धन शपथ

पर्यावरण संवर्धन शपथ पार्श्वभूमी | paryavarn shapath parshvbhumi 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशप्रेम तसेच निसर्गाप्रती देखील जागरूकता वाढणे काळाची गरज बनली आहे. पर्यावरण संवर्धनाची शपथ आपल्याला ज्यावेळी आपण शिक्षक पालक संघाची सभा घेऊ किंवा परिपाठाच्या वेळेला विद्यार्थ्यांना ही पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाची प्रतिज्ञा बोलून घ्यायची आहे.तत्पूर्वी पर्यावरण संरक्षण किंवा संवर्धन काळाची गरज यावर मुलांना माहिती देऊया.

पर्यावरण संरक्षण किंवा संवर्धन काळाची गरज| paryavarn sanvradhan kalachi garaj 

1. प्रदूषणाचे वाढते प्रमाण | pradushnache vadhte praman 

आज आपण पाहत आहोत की, प्रदूषणाचे तीन तेरा वाजले आहेत. हवा प्रदूषण, जलप्रदूषण, वायू प्रदूषण या पलीकडे जाऊन ध्वनि प्रदूषण अशा सगळ्याच पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलेले आहे,या वाढत्या प्रदूषणाविषयी विद्यार्थ्यांना सतर्क करणे ही काळाची गरज बनली आहे. यासाठी पर्यावरण संवर्धन गरजेचे आहे.

2. प्रदूषण व  आजारांना निमंत्रण|pradushan v aajarana nimantran  

आज आपण पाहत आहोत की या विविध प्रदूषणामुळे अनेक नवनवीन आजार जसे की फुफुसांचा कॅन्सर,श्वसणाचे आजार  यासारख्या समस्या या केवळ प्रदूषणातूनच निर्माण झालेल्या आहेत.
उदाहरण द्यायचे झाले तर,दिल्ली सारख्या ठिकाणी जी  व्यक्ती कुठल्या प्रकारचे धुम्रपान म्हणजे सिगारेट ओढत नाहीत पूर्णपणे निर्व्यसनी आहेत, अशा लोकांना देखील फुप्फुसाच्या कॅन्सरचा धोका खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कारण का तर तेथील वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झालेले आहे. कारण तुय ठिकाणी असणाऱ्या चार चाकी गाड्या. इंधनातून होणारे प्रदूषण खूप आहे. दिल्लीतील ही परिस्थिती इतकी भयानक आहे की ,त्या ठिकाणी सम आणि विषम तारखांना अमुक परिसरातील वाहने लोकानी  बाहेर काढू नयेत असे पूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे. तरीदेखील वायू प्रदूषणाचा आलेख कमी होण्याऐवजी वाढतच आहे. यासाठी झाडे लावली पाहिजेत.
यावरून पर्यावरणाचा संवर्धन करणे किती गरजेचे आहे?  अन्यथा ही जीवसृष्टी या भूतलावर तडफडून मरेल. इतकी भयानकता यामध्ये येऊ शकते. हे विद्यार्थी दशेपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये यायला हवे.

3. पर्यावरण अवनती व  मानसिक आरोग्य | paryavarn avnati v mansik aarogya 

आपल्या आजूबाजूचे पर्यावरण किंवा वातावरण यांचा माणसाच्या आरोग्यावर देखील खूप मोठा परिणाम होत आहे. जर आपल्या आजूबाजूला सतत गोंगाट, अस्वच्छता आणि प्रदूषण या बाबी असतील तर व्यक्तीचे शारीरिक स्वास्थ्य तर बिघडतेच  परंतु मानसिक स्वास्थ्य देखील बिघडते. त्यामुळे पर्यावरण संवर्धन हाच यावरती एक रामबाण उपाय आहे.

4. प्लास्टिकचा अवाजवी वापर | plastikcha avajavi vapar 

वाढत्या प्रदूषणामध्ये जर सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर ,तो आहे प्लास्टिकचा. प्लास्टिक ही अशी वस्तु आहे की ती कधीही कुजत नाही. त्यामुळे विद्यार्थी दशेपासूनच त्यांना प्लॅस्टिकच्या वापर कमीत कमी करावा अशी जाणीव जागृती करणे गरजेचे आहे म्हणून तर पर्यावरण संवर्धन शपथ बोलून घ्यायची आहे.

5. पर्यावरण अवनती वैश्विक समस्या| paryavarn avnati vaishvik samsya 

अलीकडे पर्यावरणाची अवनती म्हणजे ऱ्हास जो होत आहे. ती फक्त भारताची समस्या राहिलेली नाही तर ती एक जागतिक स्वरूपाची समस्या झालेली आहे. म्हणजेच वैश्विक स्वरूपाची समस्या झालेली आहे. यासाठी सर्वच राष्ट्रंकडून प्रयत्न हे होत आहेत.म्हणून भारताने देखील आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवात शिक्षक पालक सभेला, त्याचबरोबर परिपाठाच्या वेळी नाहीतर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संवर्नाची त्याच्या संरक्षणाची जबाबदारी याबाबत प्रतिज्ञा करावयाची आहे.  विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण ही आपली जबाबदारी वाटायला हवी म्हणून यावर्षी स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव उपक्रम राबवत असताना आपल्याला पर्यावरण संवर्धन या विषयावरची शपथ विद्यार्थ्यांकडून बोलवून घ्यायची आहे. नियोजनात 14 ऑगस्ट तारीख आहे आपण 15 तारखेला सर्व उपस्थित असताना आठवणीने घ्या.

पर्यावरण संवर्धन शपथ उपक्रम|paryavarn sanvrdhan shapath upakram 

पर्यावरण संवर्धन शपथ उपक्रम हा शासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार 14 ऑगस्ट 2022 रोजी आपल्याला राबवायचा आहे. तो राबवत असताना ती शपथ आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांकडून त्याचबरोबर आपल्या शाळेचे विद्यार्थी शिकत आहे त्यांच्या पालकांकडून देखील बोलवून घ्यायची आहे. आपल्याला ती संग्रह स्वरूपात देत आहोत. आपण पर्यावरण संवर्धन शपथ परिपाठाच्या वेळी विद्यार्थ्यांना आणि शिक्षक पालक संघाच्या वेळी आपण पंधरा तारखेला जी प्रभात फेरी काढणार आहोत त्या प्रभात फेरीच्या अगोदर पालकांकडून बोलून घ्यावी त्या आधी वरील सर्व माहिती त्याना द्या जेणेकरून ती समस्या किती गंभीर आहे ते त्यांना समजेल.

पर्यावरण संवर्धन शपथ| paryavran sanvrdhan shapath 

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली म्हणून साजरा होत आहे, परंतु पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीमध्ये आपण खूप मागासलेले आहोत.आपण जर वेळीच पर्यावरण संवर्धन किंवा पर्यावरण संरक्षण केले नाही तर  मानव जात विनाश पावेल. अशी विदारक परिस्थिती आहे म्हणूनच आपण आज या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्याचा  महोत्सव साजरा करत असताना पर्यावरणाची शपथ घेऊया ! चला तर मग मी जी शपथ बोलत आहे ती माझ्यामागे तुम्ही जोरात उच्चारायचे आहे. 

पर्यावरण शपथ के लीये तैयार|  paryavarn shapath ke liye tayar 

थोडे प्रास्ताविक करून शपथ बोलण्यासाठी तयार ही ऑर्डर द्यावी. 

पर्यावरण शपथ | paryavran shapath 

आम्ही भारताचे नागरिक शपथ घेतो की,
आम्ही निसर्गाचे रक्षण करून 
प्लास्टिकच्या वस्तू वापरणार नाही.
 वृक्ष लागवड करून,
 त्यांचे संवर्धन आणि जतन करू. 

ही पर्यावरणाची शपथ आपण तो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव किंवा त्या अंतर्गत राबवला जाणारा स्वराज्य महोत्सव या उपक्रमांमध्ये घ्यावयाची आहे. 

अशा पद्धतीने शाळेमध्ये आपल्याला साधारणपणे शिक्षक पालक संघाच्या सभेच्या वेळी किंवा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण ही पर्यावरणाची शपथ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थीव  पालक या सर्वांनी घ्यायची आहे . शपथ फक्त घेऊन उपयोग नाही तर त्याची अंमलबजावणी देखील करायची  आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी किमान या वर्षभरामध्ये दोन तरी झाडे लावेन आणि त्यांची निगा राखीण त्यांची नीट वाढ करेल असं संकल्प पण करायला लावू शकतो. 
 
अशा पद्धतीने आपण पर्यावरण संवर्धनाची शपथ शाळेमध्ये बोलून घ्यायची आहे. आता राहिला मुद्दा या कार्यक्रमाच्या अहवाल लेखनाचा कारण का तर आपल्याला आपल्या वरिष्ठांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव किंवा स्वराज्याचा महोत्सव उपक्रम राबवत असताना या सर्वांचे रेकॉर्ड आपल्याला ठेवायचे आहे. तसेच amrut mahotsdav ya संकेत स्थळावर या कार्यक्रमाचा अहवाल uplod करायचा आहे. 
 

पर्यावरण संवर्धन शपथ कार्यक्रम अहवाल | paryavaran sanvardhan shapath karyakram ahval 

 आपल्याला संपूर्ण कार्यक्रमांचे फोटो व अहवाल संकलित करून ठेवायचे आहेत.  पर्यावरण संवर्धन शपथ उपक्रम आपण राबवला त्याचा अहवाल आपणास वर्ड स्वरूपात देत आहोत. तो अहवाल आपण आपल्या शाळेचे नाव एडिट करून किंवा त्यामध्ये काही बदलअसतील तर ते बदल टाकूनआपण तो अहवाल जतन करून ठेवायचा आहे.तसेच amrut mahotsav यावर uplod आठवणीने करायचा आहे. 
 

ज्ञानयोगी व्यासपीठाचे दोन शब्द 

 आम्ही विविध लेखाच्या लिहून ज्ञानयोगी व्यासपीठाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं शिकणं सोपं झालं पाहिजे . अगदी त्याच पद्धतीने शिक्षकांना हे जे उपक्रम राबवत असताना त्यांचा जो प्रचंड वेळ जातो तो वेळ कमी करणे आणि त्यांना अध्यापनासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जास्तीत जास्त वेळ वापरता येणे. यासाठी आम्ही प्रयोजन करीत आहोत. म्हणूनच  तर आपणास पर्यावरण संवर्धन शपथ या कार्यक्रमाचा अहवाल वर्ड स्वरूपात देत आहोत .खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि पर्यावरण संवर्धन शपथ या कार्यक्रमाचा अहवाल save करा त्यात एडिट करून uplod करा व कार्यक्रमाची गोड आठवण म्हणून 1 प्रत आपल्याकडे संग्रही ठेवा. 
 

पर्यावरण संवर्धन शपथ कार्यक्रम अहवाल |  paryavarn sanvardhan shapath ahaval 

पर्यावरण संवर्धन शपथ कार्यक्रम अ’हवाल डाऊनलोड करण्यासाठी खालील DOWNLOAD या  शब्दावर क्लिक करा आणि आपल्या शाळेची माहिती आम्ही दिलेल्या नमुन्यात edit करा. 

 
पर्यावरण संवर्धन अहवाल वर्ड फाइल   DOWNLOAd
इतर लेख

Leave a Comment