15 august swatantrya din sutrasanchalan 2023 : आजच्या विशेष लेखातून आपण 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन (स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ) याचे कशा पद्धतीने सूत्रसंचालन करू शकता याविषयी माहिती पाहणार आहोत.15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनाचे निवेदन करताना ही माहिती अतिशय उपयुक्त आहे.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन,अमृत महोत्सव सूत्रसंचालन |15 स्वतंत्रता दिवस कार्यक्रम समारोह 15|august swtntrya din sutra sanchalan | swatntryacha amrut mahotsav sutr sanchaln| indipendance day programme planing | swatntrya din smaroh jankari marathi me
यावर्षी भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन म्हणून त्याला अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे सूत्रसंचालन असे देखील म्हणता येईल. चला तर मग 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे धमाकेदार सूत्रसंचालन कशा पद्धतीने करता येईल. हे आपण पाहूया मी आपणास 15 ऑगस्ट सूत्रसंचालन नमुना देत आहे. हा नमुना आपल्याला शाळेतील 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कामी येईल. याच पद्धतीने आपण 15 ऑगस्ट किंवा इतर शाळेतील कार्यक्रमांचे देखील सूत्रसंचालन अतिशय छान पद्धतीने करू शकता.
15 ऑगस्ट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपरेषा
15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना कार्यक्रमाची रूपरेषा अगोदर आपल्या डोक्यामध्ये हवी.तरच सूत्रसंचालक सूत्रसंचालन चांगले करू शकतो. साधारणपणे 15 ऑगस्ट या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असते …..थोडाफार बदल देखील असू शकतो.
मान्यवरांचे स्वागत
अध्यक्षांची निवड
ध्वजारोहण
मान्यवरांचा परिचय
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
मुलांची भाषणे
अध्यक्षांचे मार्गदर्शनपर भाषण
आभार प्रदर्शन
स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा
अशा पद्धतीने आपल्याला 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन ,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करावयाचे आहे.चला तर मग भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिनाचे सूत्रसंचालन अगदी छान पद्धतीने करूया.
सुरुवातीची निवेदन
(कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सूत्रसंचालकाचे पहिले काम आहे की आपण कोणत्या कार्यक्रमासाठी एकत्र येत आहोत याबाबतची थोडक्यात माहिती द्यावी)
आज आपल्या देशासाठी प्रत्येक नगरीकससाठी गौरवाची बाब म्हणजे आज 15 ऑगस्ट. भारताचा स्वातंत्र्य दिन.याही पलीकडे जाऊन भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन. म्हणून यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाला प्रचंड महत्व आहे. संपूर्ण भारतभर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खचाखच कार्यक्रम सुरू आहेत. आज प्रत्येकाचे व्हाट्सअप,फेसबुक,ट्विटर इन्स्टाग्राम आज सगळीकडे तिरंगामय वातावरण झालेले आहे. एवढेच काय यावर्षी तर भारत सरकारने ‘हर घर तिरंगा मोहीम’राबवून किंवा घरोघरी तिरंगा ही मोहीम राबवून जन माणसांमध्ये एक वेगळाच आवेश नि उत्साह संचारला आहे. चला तर मग आपण आपल्या 15 ऑगस्ट च्या कार्यक्रमाला सुरुवात करूया.
इंग्रजांनी दीडशे वर्षे जुलूम,
नि अत्याचार केला,
अखेर आमचा भारत देश,
लाखोंच्या बलिदानाने स्वतंत्र झाला.
असा हा आमचा भारत देश लाखोंच्या बलिदानाने स्वतंत्र झाला. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 होय.या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.चला हळू हळू कार्यक्रम पुढे नेऊया……
आमची उपयुक्त माहिती वाचा
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सूत्र संचालन |15 august swatntrya din amrut mahotsav सूत्रसंचालन
15 ऑगस्ट कार्यक्रम मान्यवरांचे स्वागत
आगतम! स्वागतम !सुस्वागतम !
स्वागतम! स्वागतम ! सुस्वागतम!
आज 15 ऑगस्ट भारताच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस. कारण याच दिवशी आपल्या भारत मातेची दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांकडून मुक्तता झाली. सोने की चिडिया म्हणून जगात ओळख असलेला भारत देश गुलामीच्या बेड्यांमध्ये अडकला होता. त्या गुलामीच्या बेड्या आणि साखळदंड अखेरचे तोडले गेले. इंग्रजांना चले जाव चा नारा देण्यात आला.आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले या स्वातंत्र्य दिनाचा आज अमृत महोत्सवी सोहळा या सोहळ्यानिमित्त मी—– अ ब क— 15 ऑगस्ट अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व अतिथ गणांचे, मान्यवरांचे, विद्यार्थी मित्र -मैत्रिणी तसेच इतर उपस्थित पालक वर्ग या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आणि या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो.
जहा डाल डाल पर सोनेकी चिडीया I
करती है बसेरा व भारत देश है मेरा I
अशा सुसंपन्न अशा भारत देशामध्ये माझा जन्म झाला, याचा मला स्वाभिमान व अभिमान आहे. परंतु या भारतभूमीला पारतंत्र्यामध्ये ढकलण्याचे अनेक परकीय लोकानी प्रयत्न केले. त्यामध्ये सर्वात जास्त सुमारे 150 वर्ष आपल्यावरती राज्य करणारे इंग्रज या देशातून पळून लावण्यात आले. तो दिवस म्हणजे आजचा 15 ऑगस्ट दिवस होय. म्हणूनच या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे. आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या आणि विशेष करून स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते,
आमच्याकडे असेल नसेल,
ते जवो अथवा राहो,
पण या भूतलावर अखंड ,
तिरंगा मात्र डौलाने फडकत राहो.
हीच अपेक्षा कारण हा तिरंगा लाखोंच्या बलिदानाचे प्रतीक आहे.अनेकांच्या त्यागाचे प्रतीक आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस ,भगतसिंग ,राजगुरू ,सुखदेव अशी कितीतरी नावे घेता येतील की ज्याच्या बलिदानावरती तिरंगा डौलाने फडकत आहे. म्हणून संपूर्ण भारतभर आजचा दिवस म्हणजे जणू एक उत्सव अशी सर्व परिस्थिति आहे.
आपल्याला नक्की आवडतील जरूर वाचा
स्वातंत्र्य दिनाच्या अप्रतिम शुभेच्छा लेटेस्ट
अतिथीगनांनी स्थानापन्न होणे | atithi pahune sthaan grahan
आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या अतिथींना प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की,त्यांनी स्थानापन्न व्हावे. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक —-अ ब क—– यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. अशी मी त्यांना विनंती करतो.
कोणतेही कार्य असो, ज्या पद्धतीने जर आपण समुद्रातून प्रवास करत असू, तर त्या जहाजाचा कॅप्टन चांगला असेल तर आपला प्रवासा सुखरूप होतो. अगदी त्याच पद्धतीने कायम कॅप्टनच्या रोलमध्ये असणारे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक —-अ ब क—- यांनी याच पद्धतीने खूप मोठ्या संघर्षातून आपली शाळा आज एवढ्या उंचावर नेऊन ठेवली आहे की जिचे नाव सगळीकडे घेतले जाते. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि आपल्याला दिलेल्या विहित जागेवर आसनस्थ व्हा
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी | karykrmache mukhya atithi sthaan grahan
आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय नगरसेवक—- अ ब क— यांनीदेखील आपल्या जागेवरती विराजमान व्हावे.
समाजसेवा हाच आमचा ध्यास,
याचसाठी आम्ही बनलो नगरसेवक खास,
जनता आणि मुलांच्या कल्याणाची आहे आम्हाला आस,
आजच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाची बातच काही खास.
आजच्या प्रमुख अतिथी आणि मान्यवर यांच्या विषयी बोलायला शब्द देखील अपुरे पडतात, शब्दांना देखील कोडे पडते. इतके महनीय व्यक्तिमत्व आज आपल्याला ध्वजारोहण किंवा 15 ऑगस्ट कार्यक्रमासाठी लाभलेले आहे.
( अशाच पद्धतीने इतर मान्यवर असतील त्यांचा देखील परिचय करून द्यावा व त्यांना स्थान ग्रहण करण्याची विनंती करावी. मी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांना स्थानापन्न करताना त्यांच्या विषयी कसे बोलावे याचा एक नमुना दिलेला आहे)
दीप प्रज्वलन प्रतिमापूजन ध्वजारोहण
( सर्व शाळांमध्ये किंवा अन्य ठिकाणी असेच नियोजन असेल असे नाही.तर आपल्या शाळेमध्ये भारत मातेची प्रतिमा असेल तर त्या प्रतिमेचे पूजन करावे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दीपप्रज्वलन देखील बऱ्याच शाळांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये होत नाही. डायरेक्ट ध्वजारोहण होते यामध्ये आपल्याला जे योग्य वाटेल \
भारत हा देश नाही तर ती भारतमाता आहे. या भारतमातेची आम्ही लेकरे आहोत. ही भारतमाता मराठी,बंगाली,कर्नाटकी, तमिळी अशा अनेक आपल्या लेकरांना घेऊन विश्वामध्ये आपले एक आगळीवेगळी ओळख निर्माण करत आहे. इथे आमचा प्रत्येकाचा रंग वेगळा, धर्म वेगळा, प्रांत वेगळा, भाषा वेगळी मात्र आम्हाला एकत्र आणणारी आमची माता म्हणजे भारतमाता व आमचा तिरंगा चला तर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना आणि उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी भारतमातेची ( सरस्वती पूजन ) पूजन करावे.
भारत मातेच्या पूजनानंतर आपला तिरंगा राष्ट्रध्वज हा राष्ट्रध्वज म्हणजे लाखोंच्या बलिदानाचे प्रतीक आणि आमच्या स्वातंत्र्याचे निशाण. आमचा सार्थ अभिमान. अशा राष्ट्रध्वजाचे तिरंग्याचे देखील पूजन प्रमुख पाहुण्यांनी करावे व शाळेचे झेंडावंदन करावे.
स्वातंत्र्य दिन मुलांसाठी सूचना देणे
प्रमुख पाहुणे ज्यावेळी झेंडावंदन करत असतील किंवा ती दोरी खेचत असतील, त्यावेळी मुलांना टाळ्या वाजवून राष्ट्रध्वजाचे स्वागत करायला लावणे. त्याचबरोबर पाहुण्यांनी राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर
राष्ट्रध्वज को सलामी देंगे एक.
राष्ट्रगीत सुरू
हात नीचे
(यानंतर आपण झेंडा गीत देखील घेऊ शकता)
भारत माता की जय! यासारख्या घोषणा मुलांकडून बोलवून घेणे .आणि कार्यक्रमांमध्ये एक जान आणणे हे सूत्रसंचालकाचे काम आहे.
आमची आन-बान शान तिरंगा है
आमचा श्वास तिरंगा आहे.
प्रमुख पाहुणे किंवा मान्यवरांचे स्वागत
आत्ताच आपण ध्वजारोहण केले,आजच्या या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर आपण हळूहळू कार्यक्रम पुढे घेऊन जात आहोत. चला तर मग आपण आपल्या पाहुण्यांचे स्वागत करूया……
माझा विद्यार्थी हेच माझे दैवत,
माझ्या शाळेची प्रगती हेच माझे व्रत.
या न्यायाने आम्हाला मार्गदर्शन करणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष —-अ ब क—- यांचे स्वागत xyz — यांनी करावे.
यांनीच एक रोपटे लावले ,
आज त्याचा वटवृक्ष झाला,
मुलांचाही त्याला बहर आला,
तयार आहोत आम्ही आपल्या स्वागताला.
असे आपल्या शाळेचे संस्थापक —अ ब क— त्यांच्या स्वागतासाठी मी xyz यांना विनंती करतो की, त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे.
आपल्या परिसरातील समाजसेवेची आवड असणारे तरुण तडफदार स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी/सरपंच /xyz यांनी
बोलने से कुछ नही होता I
जो होता है अपने काम से होता है I
अशी कामातून आपली ओळख निर्माण करणारे. आपले प्रतिनिधी यांचे स्वागत —xyz— यांनी करावे अशी मी विनंती करतो.
( अशाच पद्धतीने इतर पाहुणे मंडळी असतील त्यांना देखील समोर बोलवावे आणि एकेकाचे स्वागत करून घ्यावे. त्यांच्या कार्याची ओळख थोडक्यात करून द्यावी शक्य नसल्यास फक्त नावे आणि त्यांचे पद सांगावे आणि त्यांचे स्वागत करावे)
मान्यवरांचे स्वागत गीतातून
यासाठी विद्यार्थ्यांची मदत घ्यावी. त्यांना स्वागतासाठी आमंत्रित करावे शक्य असल्यास youtube च्या मदतीने एखादे स्वागत गीत आपण सादर करू शकता. अशा पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत करावयाचे आहे.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय | pramukh pahunyancha parichay
असं म्हणतात चेहरे पे क्या लिखा है,
आदमी की पहचान तो उसके हुनर से होती है I
म्हणजेच काय तर कोणत्याही माणसाची ओळख ही त्याच्या कामाप्रती असलेल्या प्रेमातून होत असते. असेच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे –अ ब क—- यांचा परिचय करण्यासाठी मी आपल्या शाळेतील शिक्षक— xyz — यांना विनंती करतो,की त्यांनी आपल्या पाहुण्यांचा परिचय करून द्यावा.
( अशा पद्धतीने मान्यवरांचा परिचय करून द्यावा. जर मान्यवर दोन असतील तर दोन प्रतिनिधींना समोर बोलून त्यांचा परिचय करून द्यावा. हा परिचय करून देणे अगोदर संबंधित व्यक्तींना त्यांच्याविषयी माहिती तरी असणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्य दिन कविता | swatntrya din kavita
आज आकाशामध्ये तिरंगा डौलाने फडकत आहे.
कारण माझा सैनिक राजा सीमेवरती
डोळ्यात तेल घालून उभा आहे.
अशा शूरवीर जवानांचा.
आम्हाला अभिमान आहे.
त्यांच्या त्या त्यागाच्या नि.
बलिदानाचे आज गुणगान आहे.
आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे,
नव्हे नव्हे अमृत महोत्सव दिन आहे.
म्हणूनच तर पहा ना
सर्वत्र एक उत्साहाची लहर आहे.
स्वातंत्र्य दिना दिवशी विद्यार्थ्यांच्या मनात
तर देश प्रेमाचा कहर आहे. कहर आहे.
असा हा अजरामर दिवस म्हणजे 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत.
स्वातंत्र्य दिन प्रास्ताविक | swatntrya din prastavik
मी आपल्या शाळेचे प्रतिनिधी श्री —अबक— यांना विनंती करतो, की त्यांनी आजच्या 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे.
आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मी —अ ब क— आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतो, आताच आपण ध्वजारोहण त्याचबरोबर मान्यवरांचे स्वागत केलेले आहे. तर आज आपण एकत्र का जमलेलो आहोत?कारण आज 15 ऑगस्ट भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस. याच दिवशी आपण स्वतंत्र झालो. या स्वातंत्र्याची किंमत काय असते? हे पारतंत्र्यात गेल्याशिवाय कळत नाही. म्हणूनच या पारतंत्र्यातून आपल्याला मुक्त करण्यासाठी लाखोंनी घर, परिवार, नोकरी, व्यवसाय या सर्वांचा त्याग करून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा सर्वांविषयी आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस म्हणून या दिवशी या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची भाषणे होतील.विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अतिथी यांची मार्गदर्शन पर भाषण होतील.सरते शेवटी भारत मातेविषयी जाज्वल्य अभिमान निर्माण करणाऱ्या घोषणा होतील. आणि कार्यक्रमाची सांगता होईल. अशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडणार आहे. तरी इथेच मी माझ्या प्रास्ताविकाला विराम देतो.
स्वातंत्र्य दिन विद्यार्थी व शिक्षकांची भाषणे | swtntrya din vidyarthi v shikshak bhashne
(हा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातील मुख्य भाग असल्यामुळे सूत्रसंचालकाने विद्यार्थी जे भाषणे देतील त्या भाषणातील काही मुद्दे टिपून ठेवावेत आणि नंतरच्या विद्यार्थ्याला बोलवत असताना अगोदरच्या विद्यार्थ्यांनी भाषणामध्ये काय सांगितले स्टार मध्ये सांगण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी शिक्षक यांची भाषणे घ्यावीत)
15 ऑगस्ट इतर कार्यक्रम | 15 august itar karykram
भाषणाबरोबरच, समूहगीत, विद्यार्थ्यांची नृत्य, नाटिका यासारखे कार्यक्रम आयोजित केलेल्या असतील तर ते कार्यक्रम देखील या मधल्या भागामध्ये घ्यावेत.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणारे, लढता लढता सीमेवर आपला प्राण सोडणारे, वीर जवान, देशभक्त, क्रांतिकारी ,समाज सुधारक, नेते हे आपल्याला एकच सांगू इच्छितात
कर चले हम फिदा जाने तन साथियो I
अब तुम्हारे हवाले वतन साथियो I
म्हणजेच काय ? तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आम्ही लढलो. संघर्ष दिला आणि आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आता ते स्वातंत्र्य टिकवणे ही तुमची जबाबदारी आहे. याची कुठेतरी जाणीव आपल्याला आजच्या दिवशी असली पाहिजे. खरोखरच जे आयतं मिळते, त्याची किंमत नसते. आपल्याला स्वातंत्र्य अनेकांच्या बलिदानाने मिळालेले आहे, म्हणूनच आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ज्या ज्या नररत्नांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या सर्वांना सलाम करतो.
स्वातंत्र्य दिन मुख्य अतिथी भाषण | swatntrya din mukhy atithi bhashn
आजच्या या 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन, अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन या दिनाच्या निमित्ताने आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे —अ ब क— यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
मान्यवरांचे भाषण | manyavr ,pahune bhashan
खरोखरच आज मान्यवरांनी आपल्याला आपल्या देशापुढील सर्व समस्या सांगितल्या. या समस्या वर उपाय म्हणजे आजचा विद्यार्थी आहे. कारण आजचा विद्यार्थी उद्याचा अधिकारी असणार आहे, उद्याचा शास्त्रज्ञ असणार आहे, म्हणजे उद्या जे काही असणार आहात ते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही असणार आहात. देशाने केलेली सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे शिक्षण आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना हा तिरंगा डोळ्यासमोर ठेवा आणि या तिरंग्याला देखील स्वाभिमान वाटेल असं कार्य मला करायचा आहे असं समजून आपल्या काही महान विभूतींनी भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचे जे स्वप्न पाहिलेले आहे ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करूया. प्रमुख पाहुण्यांनी जी अशा आपल्याकडून व्यक्त केलेली आहे ती अशी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया.
( अशा पद्धतीने 15 ऑगस्ट किंवा स्वातंत्र्य दिनाचे सूत्रसंचालन करत असताना आपण ऑन द स्पॉट बोलण्याचा सराव करायचा आहे.तरच आपले स्वातंत्र्य दिनाचे सूत्रसंचालन प्रभावी होऊ शकते.मी एक वरती नमुना दिलेला आहे तोच वापरावा असे बिलकुल नाही परंतु या पद्धतीने आपण 15 ऑगस्ट अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे सूत्रसंचालन अगदी छान पद्धतीने करू शकता)
याच पद्धतीने एकापेक्षा जास्त मान्यवर असतील तर मान्यवरांना बोलवावे आणि त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे विद्यार्थ्यांना पुन्हा पटवून सांगावेत.
स्वातंत्र्य दिन अध्यक्षीय भाषण | swatntrya din adhyakshiy bhashan
आज बिलकुल घाई नाही आम्हाला,
स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम संपण्याची,
अहो आता आम्हाला ओढ लागली आहे,
आमच्या अध्यक्षीय भाषणाची.
आजच्या आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक —- अबक — यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने आमच्या बाळगोपाळांना मंत्रमुग्ध करावे.
अध्यक्षांनी अमुक अमुक अपेक्षा व्यक्त केल्या त्या सर्व अपेक्षा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया..
( अध्यक्षांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करायचे आहेत आणि विद्यार्थी ते पूर्ण करतील अशी आशा देखील व्यक्त करायचे आहे)
15 ऑगस्ट आभार प्रदर्शन | swatntrya din aabhar pradrshan
कार्यक्रम हा कार्यक्रम असतो,
हार तुरे कशाला,
आम्ही तर आपलेच आहोत की ,
हो आमचे आभार कशाला !
अगदी असेच आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय नगरसेवक ,अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक त्याचबरोबर या कार्यक्रमाला शोभा आणणारे ,विद्यार्थी मित्र मैत्रिणी, भाषण देणारे विद्यार्थी त्याचबरोबर इथे उपस्थित सर्व मान्यवर आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये एवढेच म्हणेन,
मेरी आन तिरंगा है I
मेरी जान तिरंगा है I
मेरा सब कुछ तिरंगा है I
मेरे जीने का वजूद तिरंगा है I
मेरा स्वाभिमान तिरंगा है I
अशी सर्व भावना या तिरंग्या विषयी, राष्ट्रध्वजा विषयी. विविधतेतून एकता असा हा आपला भारत देश. अवघ्या जगाला ज्याचा हेवा वाटतो की बहुभाषिक, बहुधर्मीय असून देखील येथे लोक गुण्यागोविंदाने नांदतात हीच तर खरी आपली जगामधली ओळख. लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने आपण पुढे जात आहोत हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करणे आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे, मी तर म्हणेन या कार्यक्रमाला आभार मानण्याची आवश्यकताच नाही ,कारण हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, परंतु एक कार्यक्रमाचा भाग म्हणून इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि काही घोषणा देऊन आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल असे जाहीर करतो. पुनश्च एकदा सर्वांचे आभार धन्यवाद.
सूचना
वर दिलेले सूत्रसंचालन 15 ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिनाचे सूत्रसंचालन हा एक शाळा हा घटक पुढे ठेवून दिले आहे. आपण ज्या व्यासपीठावर कार्यक्रम साजरा करणार आहात त्याचा थोडा अंदाज घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा ठरवा. कारण झेंडावंदनाचे कार्यक्रम काही ठिकाणी खूप छोटे क असतात.प्रमुख पाहुणे येतात झेंडावंदन करतात भाषण देतात व पाच दहा मिनिटांमध्ये कार्यक्रम संपतो. म्हणून तुम्ही सूत्रसंचालकांनी 15 ऑगस्ट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना आपली कार्यक्रमाची पार्श्वभूमी काय आहे? हे समजून तयारी करावी. अगदी छानपणे सूत्रसंचालन करावे. कारण सूत्रसंचालक हाच कार्यक्रम फुलवणारा जादूगार असतो. आणि त्याने जर छानपणे कार्यक्रम फुलवला तर कार्यक्रमाची रंगत वाढत असते, म्हणून सूत्रसंचालन करणे ही एक कला आहे असे म्हणतात , त्या कलेसाठी प्रचंड वाचन प्रचंड मेहनत घेणे गरजेचे असते. तुम्ही ती घेत आहात.
विशेष सूचना
या लेखातील चारोळी, कविता ह्या माझ्या स्वरचित आहेत. आपण सूत्रसंचालन करतांना वापरल्या तर त्यासारख्या आनंद नाही.परंतु शब्द रूपाने कोठेही प्रकाशित करत असताना परवानगी घेणे गरजेचे आहे.
आमचे स्पेशल 15 ऑगस्ट साठी लेख
स्वातंत्र्य दिनाच्या 50 अप्रतिम रांगोळ्या
स्वातंत्र्य दिनाच्या गाजलेल्या 50 घोषणा /घोषवाक्य
स्वातंत्र्य दिनाचे सूत्रसंचालन
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात पंडित नेहरू यांचे योगदान
माझा तिरंगा माझा अभिमान निबंध भाषण
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा (१००पेक्षा जास्त)
खूप छान माहिती दिली सर