अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी 2023

akshaya tritiya shubhechha in marathi 2023 : हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात यातील एक महत्त्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया होय. अक्षय तृतीया म्हणजे काय याचा अर्थ या सणाच्या नावामध्येच दडलेला आहे अक्षय म्हणजे ज्याचा कधीच क्षय म्हणजे नाश होत नाही संपत नाही त्याला अक्षय म्हणतात.अक्षय तृतीया सण नेमका कधीपासून सुरू झाला ? याविषयी अनेक पुराणातील कथा सांगितल्या जातात.थोडक्यात अक्षय तृतीया सण हा अगदी पुराण काळापासून साजरा होत आहे.अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर अनेक नवीन वस्तू खरेदी केल्या जातात. त्याचबरोबर वेगवेगळ्या वस्तू दान देखील केल्या जातात. वस्तू दान करीत असताना त्यामागे एक धारणा आहे त्या दिवशी ज्या वस्तू दान करतो त्या वस्तू आपल्याला वर्षभर कधीही कमी पडत नाहीत,त्या अक्षय राहतात म्हणूनच की काय आपल्या घरादाराला बरकत राहावी म्हणून या दिवशी थोडे का होईना प्रत्येक कुटुंब सोने घेण्याचा प्रयत्न करते  अशी अक्षय तृतीया सणाची पार्श्वभूमी सांगता येते. त्रेता युगाचा प्रारंभ झाला तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया, विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्म देखील अक्षय तृतीया या सणा दिवशी झाला, तसेच गंगा भूतलावर अवतरली तो पवित्र दिवस देखील अक्षय तृतीयेचाच होता एवडेच नव्हे तर महर्षी व्यासांनी महाभारत ग्रंथाचे लेखन सुरुवात केली तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया होय.अन्नपूर्णा देवीचा जन्मदिवस म्हणून अक्षय तृतीया सण साजरा केला जातो. थोडक्यात काय तर अक्षय तृतीया सण साजरा होण्यामागे अशी विविधांगी पार्श्वभूमी असलेली दिसते. 

अलीकडच्या धावपळीच्या युगामध्ये लोकांना आपली संस्कृती ,सण – उत्सव हे नेमके का साजरे केले जातात? याविषयीची तितकीशी माहिती नसते. जे लोक अजून गाव गाड्याला चिटकून आहेत त्यांना मात्र घरातील वडीलधारी माणसे या सणांची पार्श्वभूमी सांगत असतात परंतु शहरी भागातील कुटुंबांना या विषयी माहिती खूप जुजबी स्वरुपात असते. म्हणूनच आज आम्ही आपल्याला अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी घेऊन आलेलो आहोत. या सर्व शुभेच्छा 2023 मधील अगदी नाविन्यपूर्ण अशा शुभेच्छा आहेत. आपण ज्या पद्धतीने हॅपी न्यू इयर साजरे करतो अगदी त्याच पद्धतीने हॅपी अक्षय तृतीया 2023 देखील साजरे करायला हवे. तरच आपल्या संस्कृतीचे जतन होईल. आम्ही आपल्याला देत असलेले मराठमोळे अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश आपण आपले मित्र नातेवाईक यांना देऊन त्यांचा देखील आनंद द्विगुणीत करू शकता. akshaya tritiya shubhechha in marathi 2023 पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ,खरोखरच अक्षय तृतीया सण किती महत्त्वाचा आहे. याची आपल्याला पुरेपूर कल्पना या लेखाच्या माध्यमातून आल्याशिवाय राहणार नाही. व्हाट्सअप ,फेसबुक इंस्टाग्राम, प्रसारमाध्यमांवर आपण अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश जर एकमेकांना आवर्जून पाठवले तर या सणांविषयी अधिक जाणून घेण्याची ओढ प्रत्येकाला लागेल आणि आपल्या संस्कृती विषयी स्वाभिमान आणि अभिमान जागृत होण्यासाठी याची  नक्कीच मदत होईल चला तर मग अप्रतिम अशा अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा आपण पाहूया. या akshaya tritiya wishesh in marathi आपल्याला अगदी संग्रही स्वरूपात आम्ही देत आहोत.

अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी 2023
अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी 2023

अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी 2023 | akshaya tritiya shubhechha in marathi 2023 

 

साडेतीन मुहूर्तांपैकी 

एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया 

या सणाच्या निमित्ताने 

आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना 

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

आपण हाती घेतलेले काम सदैव पूर्ण होवो

आपले कोणतेच काम अपूर्ण न राहो 

आपली सर्व स्वप्न पूर्ण होवो 

आपल्या घरात लक्ष्मीचा सदैव वास राहो 

अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!

भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी

 यांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो 

आपल्याकडे अक्षय आरोग्य आणि धन विराजमान हो 

अक्षय तृतीया सणाच्या खूप खूप शुभेच्छा

हॅपी अक्षय तृतीया मराठी 2023| happy akshaya tritiya in marathi 2023

 
 

अक्षय तृतीयेला चारी दिशा उजळत राहो

आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो 

आपली  कोणत्याही इच्छा अपूर्ण न राहो 

हॅप्पी अक्षय तृतीया !

आपल्यावरील संकटांचा नाश होऊन 

आपल्या  कुटुंबावर सदैव धन बरसात होवो 

तुम्ही सदैव खुशीचे गीत गावो 

आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो 

अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा !

अक्षय तृतीया मराठी संदेश 2023 | akshaya tritiya marathi message 2023 

सुख समृद्धीचा सण अक्षय तृतीया 

आला आहे आनंदाची भरभराट घेऊन 

अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा! 

सोन्याचा रथ 

चांदीची की हो पालखी 

त्यात बसूनी आली लक्ष्मी देवी 

धनधान्य द्यावया आपल्या कुटुंबास  

अक्षय तृतीयेच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला 

वंदन करतो  लक्ष्मी मातेला 

जे हवे ते दे  आमच्या मित्राला 

यावर्षीच्या अक्षय तृतीयेला 

अक्षय तृतीया सणाच्या खूप खूप शुभेच्छा!

अक्षय तृतीया काही खास मराठी मेसेज| akshya tritiya special (khas) marathi message 2023 

 

अक्षय तृतीया सणाला विनंती करतो माता लक्ष्मीला

माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो

धनाचा वर्षाव कायम वाढत  राहो  

अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा !

या अक्षय तृतीयेला तुमच्या नवीन समृद्ध जीवनाला सुरुवात होवो

आपण जे कार्य हाती घेवो

 ते तात्काळ पूर्ण होवो 

आपणास सदा सर्वकाळ यश मिळत राहो 

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा !

अक्षय तृतीया मराठी विशेष 2023 | akshaya tritiya 2023 marathi wishesh | अक्षय तृतीया मराठी कोटस akshaya tritiya marathi quotes 2023   

आशा आहे अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी 

आपल्या जीवनात नवचैतन्य येवो 

आपले जीवन आनंदी आनंदमय होवो

अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!

 

अक्षय तृतीयेच्या दिवशी 

पैशाने  भरलेला असो तुमचा खिसा 

आपण कायम आनंदाने हसा 

आपल्यावर होवो वर्षाव प्रेमाचा 

हॅप्पी अक्षय तृतीया !

अक्षय तृतीया मराठी फोटो 2023 | akshaya tritiya 2023 marathi image 

साडेतीन मुहूर्तांपैकी 

एक मुहूर्त आहे अक्षय तृतीया 

अक्षय तृतीयेला एकच मागणे 

आपण आणि आपले कुटुंब 

राहावे कायम सुख समाधानी 

अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा !

आपल्या घरात अक्षय राहो धनसंपदा 

आपल्या घरात अक्षय राहो शांतता 

आपल्या घरात अक्षय राहो सुख समाधान 

ह्याच अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा!

अक्षय तृतीया मराठी फोटो 2023
अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी 2023 फोटो

अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | akshaya tritiyechya hardik  shubhechha 2023 

तुमच्या घरात लक्ष्मीचा वरदहस्त राहो 

धनाचा तर वर्षाव हो वो

सुख शांतीचा दरवळ येवो 

अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा !

आपल्या जीवनात अक्षय सुख समृद्धी नांदो

अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा !

 

अक्षय तृतीयेला अक्षय राहो आपले आरोग्य

अक्षय राहो आपले सुख समाधान 

अक्षय राहो आपले नातेसंबंध 

अक्षय राहो आपले प्रेमरुपी नाते

आपल्याला व आपल्या कुटुंबाला 

अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!

अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश मराठी 2023 | akshaya tritiya shubhechha sandesh in marathi  2023 

 

आपल्यासारखी प्रेमळ माणसे 

आमची नातेवाईक आहेत 

अक्षय तृतीयेला एकच मागणे 

आपले हे नाते असेच अक्षय राहो 

हॅप्पी हॅप्पी अक्षय तृतीया !

अक्षय तृतीयेच्या मंगल प्रसंगी 

आपल्या कुटुंबाला व आपल्याला आमच्याकडून 

अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 

 

आपल्या जीवनात 

कायम अक्षय आनंदा नि  समाधान राहो 

अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा !

जगात संपत आहे मानवता

अक्षय तृतीयेला हेच मागणे भगवंता 

क्षय कर अमानवतेचा

आणि प्रसार कर  माणुसकी आणि सुख समृद्धीचा 

अक्षय तृतीयेच्या  खूप खूप शुभेच्छा !

अक्षय तृतीया म्हणजे केवळ नवे  घेणे  नसावे  

या दिवशी करा अनेक वस्तूंचे दान  देखील असावे 

खरोखर  आपल्याला पुण्य लागेल महान 

अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!

विष्णूचा अवतार याच दिनी जन्मास आला

परशुराम म्हणुनी तो नावारुपास आला 

अक्षय तृतीयेच्या  खूप खूप शुभेच्छा! 

 

अक्षय तृतीयेच्या मराठमोळ्या शुभेच्छा | 2023 akshaya trutiya marathmolya shubhechha 2023

 

या अक्षय तृतीयेला संकल्प करूया 

पैसा  खूप जोडला 

आता थोडी माणुसकी जोडूया 

अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा! 

अक्षय तृतीयेला धना बरोबर

परमेश्वर आपल्याला उत्तम

आरोग्य देखील देवो 

अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!

 

अक्षय तृतीया मराठी स्टेटस 2023| akshaya tritiya marathi status 2023 

 

अक्षय तृतीयेच्या दिनी  

आपण राहूया  सर्वांचे ऋणी 

नको व्हायला नुसते धनी 

माणुसकीचा भाव हवा मनी 

अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा !

एकमेकांना मदत म्हणजे अक्षय तृतीया 

प्रेम ,माणुसकी यांचा क्षय न होऊ देणे

 म्हणजे अक्षय तृतीया 

केवळ धनाचा नव्हे

मनाचा  मोठेपणा म्हणजे अक्षय तृतीया

मराठमोळ्या अक्षय तृतीया सणाच्या खूप खूप शुभेच्छा!

अक्षय तृतीया  शुभेच्छा मराठी 2023 पहा | happy akshaya tritiya in marathi 2023 video 

आज आपणास या akshaya tritiya shubhechha in marathi 2023 च्या माध्यमातून अक्षय तृतीया सणाचे महत्त्व नक्की लक्षात आले असेल . ही माहिती आपले मित्र परिवार यांना जरूर पाठवा. 

 आमचे इतर लेख 

Leave a Comment