इयत्ता नववी दहावी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका 2023 24 Class 9th10th First unit Test Question Paper 2023 24

Class 9th10th First unit Test Question Paper 2023 24 :आपल्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जूनला झाल्यानंतर अध्ययन अध्यापन प्रक्रियेची सुरुवात होत असते.ही अध्ययन अध्यापन पद्धती कशा पद्धतीने सुरू आहे. विद्यार्थ्यांचे संबोध पक्के झाले की नाही यासाठी ऑगस्ट महिन्यात घटक चाचणी 1 घेतली जाते.

आजच्या लेखात इयत्ता 9 वी आणि 10 वी या दोन्ही वर्गांसाठी लागणारी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. या आपल्याला 2023 24 चाचणी परीक्षेसाठी खूप कामी येतील.इयता 9 वी 10 वी पहिल्या घटक चाचणीच्या pdf देखील आपल्याला देत आहोत.

9 वी 10 वी प्रथम घटक चाचणी घेण्या मागील हेतू

शैक्षणिक वर्षामध्ये आपण अध्यापन कार्य सुरू केल्यानंतर त्याचा फीडबॅक घेणे अतिशय गरजेचे असते.तरच आपल्या विद्यार्थ्याला संबोध, संकल्पना किती स्पष्ट झाल्या आहेत हे समजते.आपण वर्गामध्ये विकली टेस्ट म्हणजे साप्ताहिक चाचण्या सोडवून घेत असतो, परंतु विद्यार्थ्यांना प्रथम सत्र परीक्षा, वार्षिक परीक्षा या मोठ्या परीक्षा देण्यासाठी त्याचा एक छोटा डेमो म्हणून एक डेमो परीक्षा किंवा  एक सराव असतो.

म्हणून प्रथम सत्रामध्ये सराव चाचणी एक आणि द्वितीय सत्र मध्ये सराव चाचणी 2 या घेतल्या जातात. जुन्या अभ्यासक्रमामध्ये तर प्रथम प्रथम सत्रात दोन आणि द्वितीय सत्रात दोन अशा एकूण चार वार्षिक चाचण्या घेतल्या जात होत्या. आज आपण इयत्ता नववी दहावीच्या प्रथम सत्रातील प्रथम घटक चाचणी नववी दहावी पाहणार आहोत.

प्रथम घटक चाचणी चे महत्व | prtahm ghatak chachni mhatav

कोणत्याही गोष्टीची फलश्रुती काय आहे हे समजल्याखेरीज आपण ते काम नीट करत नाही असा आपल्याला दररोजच्या जीवनातला देखील अनुभव आहे एखादी गोष्ट केल्यानंतर त्यातून मला काय मिळणार तर मला काही मिळत असेल तर ते आपण काम चांगल्या पद्धतीने करतो हाच अनुभव तुम्ही विद्यार्थ्यांच्या समोर मांडायचा आहे जर तुम्हाला इयत्ता नववी मध्ये वार्षिक परीक्षेत इयत्ता दहावी मध्ये बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवायचे असतील तर सराव महत्वाचा आहे. आम्ही आज आपल्याला देत असलेले Class 9th10th First unit Test Question Paper 2023 24 टेस्ट पेपर आपण मन लाऊन सोडवावेत.

आपला सराव कितपत झालेला आहे तो काढण्यासाठी सराव चाचणी एक मग ती नववीची असो की दहावीची ती देखील अतिशय महत्वाची आहे म्हणूनच या लेखामध्ये सराव चाचणीचे काही नमुने आपल्याला दिलेले आहेत याच पद्धतीने आपण देखील आपली सराव चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका काढू शकता किंवा या चाचणी परीक्षांची मदत देखील घेऊ शकता यामध्ये थोडेफार फेरफार करून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने शैक्षणिक वर्ष 2022 23 नववी दहावी घटक चाचणी घेऊ शकता.

प्रथम घटक चाचणी 2023 24 चे आयोजन

आपण जे वार्षिक नियोजन करतो, त्या वार्षिक नियोजनामध्ये प्रथम घटक चाचणीचे आयोजन याला देखील काही भारांश द्यावा लागतो वेळ द्यावा लागतो. प्रथम घटक चाचणी साधारणपणे आपण तीन दिवसांमध्ये  घेतली पाहिजे.या परीक्षेचे वेळापत्रक बनवत असताना साधारणपणे एक भाषेचा पेपर आणि एक इतर पेपर अशा पद्धतीने नियोजन केल्यास अतिशय चांगल्या पद्धतीने चाचणी परीक्षा पार पडू शकते.
 चाचणी परीक्षेच्या आयोजन करताना विद्यार्थ्यांना एका वेळी दोन प्रश्नपत्रिका सोडवायचा असतात. म्हणून एक भाषेचा पेपर की जो विद्यार्थ्यांना सोपा वाटतो आणि एक अवघड पेपर जसे की मराठी आणि गणित, हिंदी आणि विज्ञान,इंग्रजी आणि समाजशास्त्र या पद्धतीने आपण तीन दिवसांमध्ये चाचणी परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने घेऊ शकता.


एका दिवशी एक पेपर या पद्धतीने आपण गेलो तर आपले अभ्यासक्रमातील नऊ दिवस वाया जाण्याची शक्यता असते  म्हणूनच परिषदेमार्फत किंवा बालभारती मार्फत यासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे. चला तर मग प्रथम घटक चाचणी नववी दहावी प्रश्नपत्रिका यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सराव घेऊया आणि त्यांना उज्वल यशाच्या पहिल्या पायरीवर घेऊन जाऊया.

इयत्ता नववी दहावी प्रथम घटक चाचणी 2022 23 पीडीएफ Class 9th10th First unit Test Question Paper 2023 24 pdf

आजच्या  लेखामध्ये  आपल्या सोयीसाठी इयत्ता नववी दहावी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या प्रश्नपत्रिका आपण गुगल ड्राईव्ह वरती सेव करून त्यांच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता. किंवा आपल्या शाळेच्या ग्रुप वरती विद्यार्थ्यांना टाकून एक सराव परीक्षा म्हणून या प्रश्नपत्रिका घेऊ शकता, या चाचणी घेण्यामागील हेतू हाच आहे की,विद्यार्थ्यांचा सराव व्हावा! आणि प्रश्नपत्रिका काढत असताना शिक्षकांना थोडीफार दिशा आणि मदत  मिळावी. अगदी याच प्रश्नपत्रिका देखील तुम्ही थोड्याफार बदलाने वापरू शकता.

प्रथम घटक चाचणी परीक्षेसाठी वातावरण निर्मिती अशी करा

इयत्ता नववी दहावी प्रथम घटक चाचणी 2022 23 आयोजन करण्यापूर्वी विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेत संदर्भात वातावरण निर्मिती करा ,जेणेकरून की विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक वर्षातील इयत्ता नववी व दहावीची ही पहिलीच घटक चाचणी परीक्षा असल्याने ही परीक्षा तुम्ही गांभीर्याने द्या  अशा सूचना द्या. या परीक्षेमध्ये जर तुम्ही पैकीच्या पैकी मार्क पाडू शकला किंवा चांगले मार्क पाडू शकला तर तुमचा आत्मविश्वास हा वाढू शकतो आणि हा आत्मविश्वास तुम्हाला इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेसाठी कामाला येतो.

नववीत चांगले गुण मिळाले की दहावीला अभ्यासाचा उत्साह येतो अशी सर्वही साखळी आहे. आणि त्याच पद्धतीने दहावीच्या विद्यार्थ्याना देखील चाचणी परीक्षेचा श्री गणेशा करत असताना चांगले गुण मिळायला सुरुवात झाली तर तो विद्यार्थी वर्षभर मन लावून अभ्यास करतो, म्हणून मी शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी प्रथम घटक चाचणी घेण्यापूर्वी तशी वातावरण निर्मिती करावी. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेसाठी चाचणी परीक्षेचे गुण लक्षात घेतले जातात.हे समजावून सांगावे मी तर माझ्या वर्गामध्ये संपूर्ण वर्षभरात कोणत्या घटकाला किती गुण दिले जातात.हे विद्यार्थ्यांना अगोदरच सांगत असतो याचा फायदा असा होतो की विद्यार्थ्यांमध्ये आपोआपच गांभीर्य निर्माण होते.


प्रथम घटक चाचणी नववी दहावी प्रश्नपत्रिका पीडीएफ कशा डाउनलोड कराव्यात


प्रथम घटक चाचणी नववी दहावी 2023 24 या प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी आपणास खाली जे डाउनलोड शब्द दिसत आहेत त्या डाऊनलोड शब्दावर क्लिक करायचे आहे डाऊनलोड शब्दावर क्लिक केल्यानंतर आपल्या ड्राइव्ह वरती संपूर्ण प्रश्नपत्रिका असे होतील आणि त्यानंतर त्या प्रश्नपत्रिका आपण व्हाट्सअप च्या माध्यमातून किंवा हार्ड कॉपीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत सदर इयत्ता नववी दहावी प्रथम घटक चाचणी पीडीएफ या नमुन्यासाठी दिलेले आहेत .

याच पद्धतीने तुम्ही यात भर घालून आपल्या प्रश्नपत्रिका तयार करू शकता आपण जर इयत्ता नववी दहावीच्या प्रश्नपत्रिका आमच्या प्रश्नपत्रिकांच्या मदतीने तयार केले असतील आणि आपणास असे वाटत असेल की या प्रश्नपत्रिका संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात तर आपण त्या मला वैयक्तिक स्वरूपात पाठवू शकता आपल्या नावानिशी त्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला जातील याची नोंद घ्यावी.


इयत्ता नववी दहावी प्रथम घटक चाचणी 2023 24 प्रश्नपत्रिका पीडीएफ


  इयता 9 वी 10 वी प्रथम घटक चाचणी 2022 23 प्राप्त करण्यासाठी क्लिक करा.      DOWNLOAD

आमचे इतर लेख जरूर वाचा

इयत्ता पहिली ते दहावी वार्षिक नियोजन

पावसाळ्यात दिले जाणारे रेड ,एलो,ऑरेंज अलर्ट आपल्याला काय सुचवतात  

लोकमान्य टिळक संपूर्ण मराठी माहिती    

बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2023