भारताचे नवे शैक्षणिक धोरण २०२० | New Education Policy 2020 marathi information

भारताचे नवे शैक्षणिक धोरण 2020 कसे असेल ? याची अनेकांना उत्सुकता लागली आहे कधी लागू होईल या धोरणाची अमलबजावणी वगेरे वगेरे. कोणी एका शैक्षणिक विचारवंताने म्हटले आहे . मला कोणता देश भविष्यात किती प्रगती करेल हे पाहण्यासाठी त्या देशात जाण्याची गरज नाही, तेथील लोक,राजकारणी यांना पण भेटण्याची गरज नाही . मला फक्त त्या देशाचे शैक्षणिक धोरण काय आहे? याची माहिती द्या. थोडक्यात शैक्षणिक धोरण ही त्या राष्ट्राचे भविष्य सांगणारी कुंडली असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. थोडक्यात शैक्षणिक धोरण हा त्या राष्ट्रासाठी एक महत्वाचा भाग आहे हे नक्की. एखादे राष्ट्र किंवा त्या राष्ट्राची प्रगती किती वेगाने होणार किंवा होत असते. हे आपल्याला त्या राष्ट्राच्या शैक्षणिक धोरणावरून समजत असते. आज आपण पाहिले तर जगात फिनलँड देशाची शिक्षण प्रणाली अतिशय पुढारलेली दिसते. त्या तुलनेत भारतीय शिक्षण प्रणाली अजून तितकीशी प्रगत झालेली आपणास दिसत नाही. भारतात आजपर्यंत अनेक शैक्षणिक धोरणांनी आपापल्या परीने विचार मांडून शिक्षण प्रणाली बळकट करण्याचा प्रयत्न केला मग त्यामध्ये सर्व शाळांना पायाभूत सुविधा असाव्यात यासाठी आलेली खडू फळा मोहीम त्याच बरोबर अशा अनेक योजना आपणाला पाहायला मिळतात. या योजना शैक्षणिक धोरनातूनच आकार घेत असतात.

             आज आपण जो घटक अभ्यासणार आहोत. तो म्हणजे भारतातील नवे शैक्षणिक धोरण २०२०.या धोरणानुसार भारतीय शिक्षण प्रणालीत कोणते बदल घडणार आहेत व ही शिक्षण प्रणाली योग्यरीत्या राबवली गेली. तर  भारताचा विकास नक्कीच वेगाने होण्यास मदत होईल. चला तर मग आपल्या बदललेल्या शिक्षण प्रणालीतील काही महत्वाच्या ठळक बाबी आज आपण पाहूया.धोरनाच्या  मसुदयात अनेक बाबी स्पष्ट दिल्या आहेत.

नवे शैक्षणिक धोरण 2020
भारताचे नवे शैक्षणिक धोरण

भारत सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाला गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय कॅबिनेटने म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. सुमारे 3४ वर्षानंतर एका नव्या शिक्षण प्रणालीचा भारताने स्वीकार केला आहे. भारताचे हे नवे शैक्षणिक धोरण खरोखरच एका उदात्तने तयार केल्याचे आपणास दिसते. या धोरणातून पुर्वापार चालत आलेल्या शैक्षणिक पद्धतीला छेद देण्याचे काम हे धोरण करताना दिसत आहे हे नक्की.या नवीन शैक्षणिक धोरणानुसार भारतीय शिक्षण प्रणालीत कोणकोणते ठळक व महत्वाचे बदल होणार आहेत  यावर एक प्रकाश टाकूया.ही New Education Policy 2020 marathi information पाहिल्यानंतर आपल्याला झालेले नवीन बदल लक्षात येतील.

भारताच्या नव्या शिक्षण धोरणाची माहिती New Education Policy 2020 marathi information

१.दहावी बोर्ड परीक्षा संपुष्टात | Board Pariksha Bund

  या नव्या शैक्षणिक धोरणानुसार झालेला सर्वात महत्त्वाचा व मोठा बदल म्हणजे दहावीचे बोर्ड यापुढे असणार नाही. या निर्णयामुळे विद्यार्थी शिक्षणाबरोबर इतर कलागुणांना वाव देऊ शकतील.यापूर्वी जर आपण पाहिलं तर साधारण वयाच्या पंधराव्या वर्षी विद्यार्थी बोर्ड परीक्षा देत होते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर म्हणावी तेवढी पक्वता या वयात त्यांच्याकडे नसते.अगदी याचा विचार करून बोर्ड परीक्षा जी दहावी साठी होती ती बंद करण्यात आली आहे.

३. बारावी साठी बोर्ड परीक्षा | Bord Exam 12th std 

 या नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी इयत्ता बारावी मध्ये इयत्ता बारावी मध्ये बोर्डाची परीक्षा देणार आहेत. हा अतिशय महत्त्वाचा बदल हा या धोरणानुसार होणार आहे.

४. पाचवी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेत | Education In Our Mothertoung,Matrubhashetun Shikshan

 हे या नव्या शैक्षणिक धोरणातील अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. याचे अनेक दूरगामी चांगले परिणाम आपणास पाहायला मिळतील. सध्याची शिक्षण प्रणाली होती. त्या शिक्षणप्रणालीत विद्यार्थी आपली मातृभाषा सोडून इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत होता त्यामुळे त्याच्या विचारांची जडणघडण नीट होत नव्हती कारण का तर घरातील लोक जी भाषा बोलतात.

तो मुलगा रोजचे व्यवहार करतो ती भाषा शिक्षण घेताना नव्हती. त्यामुळे एक वेगळीच घुसमट त्या विद्यार्थ्यांची होत होती. पण या नवे शिक्षण प्रणालीने सक्तीचे  मातृभाषेतून शिक्षण केल्याने विद्यार्थ्यांचा भाषिक तसेच, बौद्धिक विकास होण्यासाठी नक्कीच मदत होईल. अनेक पालकांना मनोमन वाटत होते की मुलांचे शिक्षण हे मातृभाषेतूनच हवे परंतु इंग्रजी किंवा परकीय भाषांचा प्रचंड सोस किंवा उत या शिक्षण प्रणालीत आला होता तो कमी करण्याचे काम या नव्या धोरणाने केली आहे. या निर्णयामुळे मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम होण्यास खूप मदत होईल यात शंका नाही

 

४. एम फिल डिग्री हद्दपार | M.Phil Degree Bund

या नवीन धोरणानुसार  एम फील ची डिग्री आता हद्दपार करण्यात आली आहे. यापुढे  ज्याला संशोधनाची आवड आहे. त्याला पीएचडी करता येणार आहे त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे मास्टर डिग्री करत असताना तो विद्यार्थी पीएचडी करू शकतो.  संशोधनाच्या बाबतीत भारताला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी हा बदल अतिशय महत्त्वपूर्ण आहे थोडक्यात काय तर या शिक्षण प्रणालीने एक वेगळी लवचिकता आणण्याचे काम केलेले आहे.

५. आकृतीबंधात बद्दल | Akrutribandhat Badal 

 पूर्वी जो 10 अधिक 2 असा  आकृती बंद होता तो बदलून 5*3*3*4 या कृती बंधाचा

स्वीकार करण्यात आला आहे. सुरुवातीची पाच वर्षे ही पायाभूत शिक्षणासाठी देण्यात आले आहेत. ज्यातून मुलाचे लेखन-वाचन किंवा मूलभूत संकल्पना स्पष्ट होतील यावर भर देण्यात आला आहे.

६.  वार्षिक परीक्षेचे महत्व कमी | Final Exam Bund

 या नवीन शैक्षणिक धोरणानुसार यापूर्वी असणारे वार्षिक परीक्षेचे महत्त्व कमी करून सेमिस्टर पद्धती चा अवलंब केला जाणार आहे. सेमिस्टर पद्धतीमुळे मुलांना केवळ वार्षिक परीक्षा म्हणजेच मुख्य परीक्षा ही धारणा कमी होऊन विद्यार्थी पूर्ण वर्षभर अभ्यासाकडे लक्ष देतील. सजग राहतील हा यामागील मुख्य हेतू आहे.

 

7. लवचिकता | Flexiblity ,Lavchikta

ही नवीन शिक्षण प्रणाली लवचिकतेवर आधारित आहे .एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला व त्याला तो अभ्यासक्रम आवडत नसेल किंवा कठीण जात असेल तर तो विद्यार्थी तो अभ्यासक्रम सोडून दुसऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. अभ्यासाच्या ताणातून होणाऱ्या आत्महत्या या निर्णयामुळे नक्कीच कमी होतील.

      यापूर्वी म्हटलं जायचं आनंददायी शिक्षण हवे ; पण ते घेण्याची सोय मात्र या शैक्षणिक धोरणात नव्हती या नवीन शैक्षणिक धोरणाने ही सोय करून दिली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलाला सुरुवातीची काही वर्षे आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेता येत असल्याने जो वेगवेगळ्या माध्यमातून होणारा भेदभाव कमी झाला आहे. सहाजिकच शिक्षणातील विषमता या धोरणाने घालवली असे मला वाटते. पालक वर्ग देखील आपल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास,  त्याचा कल आवडीनिवडी  या मातृभाषेतून शिक्षणामुळे ओळखू शकतात. अजून सांगायचे झाले तर मुलाचे पायाभूत शिक्षण मजबूत कसे होईल यावर यावर हे नवे शैक्षणिक धोरण काम करताना दिसते. आत्तापर्यंतच्या धोरणांमध्ये शिफारशी होत्या पण त्या काम चलाऊ होत्या. या शैक्षणिक धोरणाचे मात्र तसे नाही.

हे भारताचे नवे शैक्षणिक धोरण भारतीय शिक्षण प्रणालीला भारतीय शिक्षण प्रणालीला एका वेगळ्या उंचीवर नेईल यात शंकाच नाही. शासनाने किंवा सरकारने नवे शैक्षणिक धोरण मांडले आता गरज आहे हे नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थी, पालक यांच्यापर्यंत नीट पोचवणे अन्यथा याचेदेखील राजकारण आपल्या भारत देशात होते ही मोठी खेदाची बाब आहे. काल-परवाच वर्तमानपत्रातून अशी चर्चा ऐकली की शाळेतून अमुक अमुक ग्रंथातील धडे द्यावेत. त्या ग्रंथातील विचार  भलेही व्यापक असतील परंतु  भारत हा देश बहुधार्मिक आहे, बहुभाषिक आहे या सर्वांचा विचार  होणे अपेक्षित आहे. आज आपल्या भारत देशात कोणत्याही गोष्टीवरून राजकारण करणे असा एक नवीन पायंडा पडला आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी पाहिलेले भारत एक आर्थिक महासत्ता हे स्वप्न सत्यात उतरवायचे असेल तर राजकारण न करता समाजकारण. आपल्या समाजाचा विकास, देशाचा विकास, अखिल मानवजातीचा विकास यातून होणार आहे या बाबींना बिनशर्त पाठिंबा द्यायला हवा तर आणि तरच प्रचंड मनुष्यबळ असलेला भारत एक दिवस नक्की आर्थिक महासत्ता बनेल यात तिळमात्र शंका नाही.

               नवे शैक्षणिक  धोरणाला कॅबिनेट ची मंजुरी मिळाली. आपण देखील तनाने, मनाने या शिक्षण प्रणालीचा या नव्या धोरणाचा स्वीकार करूया. कारण कोणत्याही देशाची प्रगती त्याने स्वीकारलेल्या शैक्षणिक धोरणावर अवलंबून असते. चला तर मग नवे शैक्षणिक धोरण 2020 चे स्वागत करूया. 

हे धोरण येईल बदल होतील पण शिक्षणाचा किंवा शिक्षण कशासाठी द्यावे ? किंवा मुलांनी देखील ते का घ्यावे याचे मूळ जाणून घेण्यासाठी आमचा खाली लिंक दिलेला लेख जरूर वाचा.शिक्षण नेमके कशासाठी यातून शिक्षणाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी तुम्हाला नक्की मिलेळ.

 आमचे इतर लेख

1 thought on “भारताचे नवे शैक्षणिक धोरण २०२० | New Education Policy 2020 marathi information”

  1. छान, भारतीय शिक्षण प्रणालीत मुलांच्या भवितव्याचा विचार करून बदल घडवून आणण्यात आला आहे हे वाचून खरोखरच खूप आनंद झाला.

    Reply

Leave a Comment