स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन घर घर तिरंगा भाषण

swatntryacha amrut mahotsav swatntrya din ghroghri tiranga bhashan : आजच्या लेखातून आपण घरोघरी तिरंगा म्हणजेच हर घर तिरंगा हा जो उपक्रम संपूर्ण भारतभर राबवला जात आहे, त्या उपक्रमाचा भाग म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भाषण व याच विषयावर निबंध पाहणा आहोत. आपण आपले भाषण देऊन स्वातंत्र्याचा अमृत  महोत्सव छान साजरा करू शकता. हे स्वातंत्र्य दिनाचे भाषण शिक्षक, विद्यार्थी यांना देखील उपयोग होऊ शकते. चला तर मग स्वातंत्र्य दिनाचे शिक्षक, विद्यार्थी यांचे भाषण आपण पाहूया. याचा माहितीचा उपयोग भाषण निबंध लिहिताना होईल, bhartacha swatntryadin bhashan v nibandh या विषयाला सुरुवात करूया. 

शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य दिनाचे भाषण  shikshak vidyarthi swatntrya dinache bhashan | independence day speech for student in marathi  

भाषण ही एक कला आहे. अनेकांना भाषण देत असताना अनेक अडचणी येतात. आपल्याला जर आपले भाषण चांगले करायचे असेल तर त्यासाठी आपण अगोदर तयारी केली पाहिजे. त्यासाठी काही मुद्दे शोधले पाहिजेत. आणि नंतर ते मुद्दे क्रमाने शब्दबद्ध केले की आपले भाषण तयार होते. आपणास स्वातंत्र्यदिनानिमित्त म्हणजेच यावर्षी आपल्या स्वातंत्र्य लढ्याला किंवा आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजेच हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. स्वातंत्र्य दिनाचे भाषण म्हणजेच सुवर्ण महोत्सवाचे भाषण असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आणि म्हणून शासन हर घर तिरंगा किंवा घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाचे भाषण म्हणून देखील आपण याचा उपयोग करू शकता. भाषणाच्या सुरुवातीला असलेला भाग आपण वगळला की स्वातंत्र्यदिनानिमित्त चा हा निबंध देखील होऊ शकतो. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा फरक एवढाच आहे, की आपण भाषणाची सुरुवात अध्यक्ष महाशय या पद्धतीने पद्धतीने करतो चला तर मग आपण आता पहिल्यांदा स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाला सुरुवात करूया.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मराठी  भाषण | स्वातंत्र्य दिन भाषण | घर घर तिरंगा भाषण |

swatntryacha amrut mahotsav swatntrya din   ghroghri tiranga bhashan 

अध्यक्ष ! महाशय ,गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला स्वतंत्र्यदिना निमित म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत  महोत्सव निमित्त व आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त काही दोन शब्द सांगणार आहे.  ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती.

आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ दिनी मला भाषणाची जी संधी मिळत आहे. खरोखरच हा एक सुवर्णयोग आहे. कारण आज भारताला स्वातंत्र्य मिळून प्रचंड काळ लोटला आहे.  म्हणजेच काय तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 75 वर्षे झाली  आहेत. इंग्रजांनी आपल्या भारतावर जवळपास  150  वर्षे राज्य केले.  त्या गोऱ्या लोकांनी म्हणजे  ब्रिटिशांनी आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी चलेजाव चा नारा नारा एकूण भारत सोडला नव्हे तर आपल्या भारतातून त्यांना  हाकलून दिले हाच तो दिवस म्हणजे  आपल्या आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन होय. या स्वातंत्र्य दिनाला 15 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून हा आपन आझादी का म्हणजेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अगदी उत्साहात साजरा करतोय. 


स्वातंत्र्य दिन म्हटले की सगळीकडे देशभक्तीपर गीते, भाषणे, समूहगीते ऐकायला मिळतात. आपल्या देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले?याची एक माहिती आपल्याला या दिवशी ऐकायला मिळत असते. अनेक जण भाषणाच्या रूपातून आपले विचार मांडत असतात. म्हणूनच मी देखील माझे विचार आज  स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपणासमोर मांडत आहे. 


आपला भारत देश पारतंत्र्यांच्या बेड्यातून मोकळा झाला खरा परंतु, त्या बेड्या किंवा साकळदंड असेच तुटलेले नाहीत हे ध्यानात घ्यायला हवे. अनेक लाखो लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले , आपल्या परिवाराचा त्याग केला, कोणी अहिंसेच्या मार्गाने ,कोणी क्रांतीच्या मार्गाने देशासाठी लढले, झुंजले  म्हणूनच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले.  हा तिरंगा आकाशात डोलताना दिसत आहे,या तिरंग्यामागे अनेकांची मेहनत, त्याग आहे. खूप मोठे योगदान आहे. हे विसरून आपल्याला चालणार नाही. आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढलेल्या वीर जवानांचे, समाज सुधारकांचे, नेत्यांचे स्मरण आपण आज केले पाहिजे. 


यावर्षीचा म्हणजे ऑगस्ट 2022 या स्वातंत्र्य दिनाला विशेष म्हत्व आहे. कारण आज  भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झालेले आहेत. हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त अगदी भारतभरात हर घर तिरंगा/ घरोघरी तिरंगा या  एका आगळ्यावेगळ्या मोहिमेचे  आयोजन केले.  आहे आज तुम्ही बघा प्रत्येकाच्या व्हाट्सअपचा डीपी,status  तिरंगा असेल. स्टेटसला तसेच  शाळेची वेबसाईट खोला त्याच्यावर देखील तुम्हाला तिरंगा दिसेल. एवढेच काय शाळा ,इमारती, कार्यालय जिकडे पहाल तिकडे तिरंगाच डौलत आहे फडकत आहे. यापुढे जाऊन देखील आपण घरोघरी देखील तिरंगा लावू शकतो. कारण का तर आपल्याला आपल्या आजादीचा अमृत महोत्सव साजरा करायचा आहे. अगदी एखाद्या दिवाळी – दसरा सणासारखे स्वरूप स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आलेले आहे. असे इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. 


मी आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत  महोत्सवी दिनाच्या भाषणा निमित्त तुम्हाला एकच आव्हान करतो, की जरी आपल्याला सर्वत्र सर्व ठिकाणी तिरंगा फडकवण्याची परवानगी मिळाली असली, तरी तो तिरंगा आपल्या मनामनामध्ये हृदयामध्ये फडकला पाहिजे. तो देशाभिमान आपल्या नसानसामध्ये जागा झाला पाहिजे. हाच या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे, तो आपल्याला विसरून चालणार नाही. विशेष म्हणजे या तिरंग्यासाठी लाखोंनी बलिदान दिले आहे, तेव्हा या तिरंग्याचा अवमान होणार नाही याची सर्वांनी घ्या. 


आपला भारत देश भविष्यात कुठे असेल? हे जर कोण ठरवत असेल, तर ते आजचे विद्यार्थी आहेत .  या दिवसाच्या निमित्ताने मी  माझ्या विद्यार्थी मित्रांना एकच आवाहन करतो की, आपल्या भारत देशासाठी जे जे करता येईल ते आपण केले पाहिजे. संशोधन क्षेत्रात असो आरोग्याच्या क्षेत्रात असो की वैज्ञानिक क्षेत्रात असो भारत हा नंबर एकला यायला हवा. 

आपण कोरोना महामारी विरुद्ध जो लढा दिलेला आहे. त्या लढ्यामध्ये सर्वजण जात,,पंथ ,धर्म विसरून एकत्र आले व  खऱ्या अर्थाने ही महामारी आपल्याला माणुसकी काय असते. हे शिकवून गेली. माणुसकी आपण झोपासूया आणि स्वातंत्र्य दिन म्हणजे  15 ऑगस्ट या दिवशी नव्या स्वातंत्र्याचा आस्वाद घेऊया, मुक्त राहूया. या सृष्टीतील सर्वांनाच स्वातंत्र्याचा आस्वाद घेण्याचा अधिकार आहे तो देऊया.
अशा पद्धतीने आज हर घर तिरंगा, घरोघरी तिरंगा या उपक्रमाच्या माध्यमातून तसेच स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य आणि भारताचा अमृत महोत्सव असा त्रिवेणी संगम आणि या त्रिवेणी संगमाच्या निमित्ताने मला भाषणाची संधी मिळाली. आणि माझे दोन शब्द आपण अतिशय शांतचित्ताने ऐकले त्याबद्दल मी आपला आभारी आहे.  जय हिंद! जय महाराष्ट्र! भारत माता की जय. 


अशा पद्धतीने सहज आणि ओघवते  भाषण आपण करू शकता. आपण देखील भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे भाषण करू शकता. हे भाषण. तुम्ही indepence day speech in marathi ची तयारी करा. आजचे हे स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण किंवा स्वातंत्र्य दिनाचे भाषण आपणास कसे वाटले ते नक्की कमेंट करा.

घरोघरी तिरंगा स्वातंत्र्याचा अमृत  महोत्सव स्वातंत्र्य दिन निबंध ghroghri tiranga swatntryacha amrut mahotsav swatntrya din nibandh essay  

15 ऑगस्ट 2022, या दिवशी खरा सुवर्णयोग आलेला आहे. कारण या दिवशी आपल्या स्वातंत्र्यलढ्याला 75 वर्ष होत आहेत. त्या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.  म्हणजेच काय तर याला आपण स्वातंत्र्य दिन निबंध ,घरोघरी तिरंगा निबंध किंवा स्वातंत्र्याचा अमृत  महोत्सव निबंध कोणत्याही प्रकारे प्रश्न आला तरी तुम्ही हा निबंध लिहू शकता. 

स्वातंत्र्य दिन,स्वातंत्र्याचा अमृत  महोत्सव घरोघरी तिरंगा मराठी निबंध 

पिंजऱ्यात अडकलेल्या पोपटाला ,

स्वातंत्र्याचे महत्त्व कळाले,

अनेकांनी प्राणाचे बलिदान दिले ,

तेव्हा हे स्वातंत्र्य मिळाले. 

(भाषणाची किंवा निबंधाची सुरुवात चारोळीने करा. अधिक परिणामकारक वाटेल.)

आज आपला भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे होत आहेत.म्हणूनच आपण स्वातंत्र्याचा अमृत  महोत्सव साजरा करत आहोत.  हर घर तिरंगा, घरोघरी तिरंगा असे आगळे वेगळे उपक्रम साजरे होताना दिसत आहेत.  म्हणून हे  सर्व स्वातंत्र्य वीरांच्या  बलिदानामुळेच  मिळाले. त्यांचे बलिदान विसरून आपल्याला चालणार नाही. जरा आठवण बघा. आपण ज्यावेळी गुलामगिरी मध्ये होतो त्यावेळी आपल्याला कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते. इंग्रज त्यांना वाटेल तसा मनमानी कारभार करत होते.

 भारतीय लोकांमध्ये जाती-धर्माच्या नावाखाली भेदाभेद निर्माण करत होते व फायदा उठवत होते.  आपला देश कसा चालावा? यासाठी कुठलेही नियम आणि कायदे त्यावेळी नव्हते. केवळ अनागोंदी  असे सर्व काही. अशी परिस्थिती होती.  इंग्रज आपल्या देशातून केवळ संपत्तीची लूट करत होते असे नाही तर पिळवणूक देखील करत होते. असे चित्र असताना लोकमान्य टिळक, महात्मा गांधी,सुभाष चंद्र बोस, सावरकर यासारखी अनेक मंडळी परदेशी शिक्षण घेऊ लागली होती.त्यांना सध्या आपण पारतंत्र्यामध्ये आहोत याची जाणीव होऊ लागली. आणि मग सर्वांनी जो संघर्ष केला ,उठाव केला तो सर्व उठाव म्हणजे आपला स्वातंत्र्यलढा होय.

आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काही लोक शांततेच्या मार्गाने लढा देत होते, तर काही विद्रोहाच्या मार्गाने लढा देत होते. या विद्रोहाच्या मार्गामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा समावेश होतो. आयुष्याच्या मार्गाने लढा देणारे महात्मा गांधी आणि त्यांना मदत करणारे त्यांचे अनुयायी होत होत. आज आकाशामध्ये तिरंगा फडकताना दिसत आहे, परंतु तिरंगा हा जरी फडकत असला तरी तो फडकवण्यासाठी किंवा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांच्या आहुति  दिलेले आहे.

जवान लोकानी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले आहे. हे विसरून आपल्याला चालणार नाही. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण त्यांचे स्मरण केले पाहिजे. शाळा,महाविद्यालय विविध कार्यालयामधून ,भाषणांच्या मधून आपण त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला पाहिजे, असा दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन. या स्वातंत्र्यांना दिनाच्या दिवशी संपूर्ण भारतातील वातावरण हे देशभक्तीमय झालेले असते आज आपण पारतंत्र्यात नसलो तरी आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी जे जवान डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहेत,म्हणूनच आपण सुखाचे क्षण अनुभवत आहोत यांचा विसर पडून आपल्याला चालणार नाही तर या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यांच्या देखील कार्याला आपण सलाम केला पाहिजे.


आपला देश मोठा झाला पाहिजे. आपला देश आर्थिक महासत्ता झाला पाहिजे .नुसती  स्वप्न पाहून चालणार नाही तर आजच्या तरुणाईने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मोबाईल, टीव्ही –  इंटरनेट यांचा उपयोग आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी केला पाहिजे.आज बरेचसे विद्यार्थी या सोशल मीडियाचा उपयोग नको त्या कामासाठी करत आहेत. जर आपण असे करत राहिलो तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण आपल्या राष्ट्राने प्रगती किती केली? याविषयी आपण स्वाभिमानाने काही बोलू शकणार नाही. 

आपली तरुण पिढी आज नको इतका वेळ मोबाईल, इंटरनेट,व्हाट्सअप ,फेसबुक यांच्यावरती घालवत आहे.  खरोखरच ही  एक चिंतेची बाब आहे. यांच्या वापरामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत. एकदा का आरोग्याचे प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झाली ,की आपल्या देशाचे रक्षण कोण करणार? सीमांचे रक्षण कोण करणार हे बळकट भाऊ कोठून येणार.या सर्वांचा विचार व्हायला हवा. आपण बौद्धिक आरोग्य इतके शारीरिक आरोग्याला देखील महत्व दिले पाहिजे .असा या स्वतंत्र्य दिनाच्या निमित्ताने संकल्प करूया. आणि आपल्या महान व्यक्तींनी जे स्वप्न पाहिलेला आहे की भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचे ते स्वप्न पूर्ण करूया. 


अंधश्रद्धा ,बेरोजगारी, दहशतवाद व वाढती लोकसंख्या सायबर क्राइम  यासारख्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या समस्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? यासाठी तरुण पिढीने योगदान दिले  तरच आजचा हा स्वातंत्र्याचा अमृत  महोत्सव किंवा हर घर तिरंगा ,घरघर तिरंगा किंवा घरोघरी तिरंगा हा उपक्रम यशस्वी झाला असे सर्व चित्र असेल. चला  तर मग आपण देखील कामाला लागू या. 


अशा पद्धतीने तुम्ही आपल्या पद्धतीने स्वातंत्र्य दिनाचा निबंध,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा निबंध. किंवा हर घर तिरंगा निबंध किंवा घरोघरी तिरंगा निबंध छान पद्धतीने लिहू शकता .वर दिलेल्या एक फक्त नमुना आहे याच पद्धतीने तुम्ही अजून देखील त्यामध्ये भर टाकू शकता .आपल्याला निबंध लेखनामध्ये काही एक दिशा मिळावी आपले लिखाण कसे असावे ? या दृष्टिकोनातून  भारतीय स्वातंत्र्य दिनाचा हा निबंध आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद !

आपल्याला परीक्षेत essay म्हणजे निबंध 8 गुणांसाठी आहे थोडा अभ्यास  केला तरी आपल्याला स्वतंत्र्य दिन निबंध स्वातंत्र्याचा अमृत  महोत्सव निबंध या विषयावर मांडणी करू शकता. 

आमचे इतर लेख 

गुरु पौर्णिमा निबंध 

बालिका दिनाची बातमी तयार करा 

अप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण सोहळा प्रक्षेपण 

Leave a Comment