अक्षय तृतीया महत्त्व मराठीमध्ये

हिंदू धर्मामध्ये जे मुख्य सण आहेत त्यांना साडेतीन मुहूर्त असलेले सण म्हणून ओळखले जाते. यामध्ये प्रामुख्याने गुढीपाडवा, दसरा ,अक्षय तृतीया यांना पूर्ण मुहूर्त असलेले सण मानले जाते,तर दिवाळीचा पाडवा हा मुहूर्त अर्धा दिवस म्हणून ओळखला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एप्रिल महिन्यामध्ये 22 तारखेला यावर्षी येणारा एक सन म्हणजे अक्षय तृतीया होय.हा  सण सर्वजण साजरा करतात परंतु या अक्षय तृतीया म्हणजे काय? हे जर आपल्याला कोणी विचारले तर आजकालच्या तरुण पिढीला ते सांगता येत नाही म्हणूनच आज अक्षय तृतीयेचे  महत्त्व आणि तेही मराठमोळ्या मराठीमध्ये. म्हणजे आपली मायबोली आहे. त्या बोलीमध्ये आम्ही देत आहोत. आज-काल लोकांना आपली संस्कृती ,त्यातील सण-उत्सव यामागील पार्श्वभूमी समजत नाही. या लेखाच्या माध्यमातून आपल्याला ती समजून घ्यायची आहे.

akshaya tritiya mahatva in marathi
अक्षय तृतीया महत्त्व मराठीमध्ये

अक्षय तृतीया म्हणजे काय | What is Akshaya Tritiya? in marathi information

अक्षय म्हणजेच ज्याचा कधीही क्षय /नाश होत नाही याला अक्षय असे म्हणतात .अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी आपण जे काही पुण्य कर्म करतो ,दानधर्म करतो ते कायम आपल्या सोबत राहते त्यातून मिळणारी पुण्याई अक्षय आपल्या सोबत टिकत असते. म्हणून या सणाला अक्षय तृतीया म्हटले जाते. अक्षय तृतीयेला आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा दिवस मानले गेले आहे.

क्षय तृतीयेचे महत्व मराठी माहिती 2023 | mportance of Akshaya Tritiya Marathi information 2023

अक्षय तृतीया या सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. पण विविध पुराणांचा अभ्यास केला तर या पुराणांमध्ये देखील आपल्याला अक्षय तृतीया या सणाचा उल्लेख केलेला दिसून येतो. हा एकमेव असा सण आहे की या दिवशी आपल्या पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे पूजन केले जाते त्याच जोडीला माता लक्ष्मी आणि विष्णू देव यांचे देखील पूजा केली जाते असा हा दिवस अक्षय तृतीया म्हणून ओळखला जातो.

अक्षय तृतीयेपासून मिळणारी फलप्राप्ती | Benefits from Akshaya Tritiya

अक्षय तृतीया या दिवसाचे महत्त्व सांगत असताना, असे सांगितले जाते की वैशाख महिन्यातील हा तृतीयेचा दिवस अक्षय तृतीया म्हणून आपण साजरा करतो. या अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्य उगवण्या अगोदर जर आपण स्नान करून विष्णू देवाची पूजा केली तर आपण देव पदापर्यंत पोहोचतो. त्यादिवशी गंगेमध्ये स्नान करणारी व्यक्ती मुक्त होते अशी देखील धारणा आहे. व्यक्तीला जीवन जगत असताना अनेक गोष्टी आवश्यक असतात परंतु अक्षय तृतीयेच्या निमित्ताने जर आपण आपल्याला कमतरता भासणाऱ्या गोष्टी अन्नधान्य यांचे जर थोड्या प्रमाणात जरी आपण गोरगरिबांना दान केले तरी वर्षभर आपल्याला याची कमतरता भासत नाही.अशी देखील या सण साजरा करण्यामागे धारणा  आहे. थोडक्यात दिल्याने वाढते असे सांगणारा सण म्हणजे अक्षय तृतीया असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

अक्षय तृतीयेच्या दिवशी कशाचे दान करावे | What to donate on the day of Akshaya Tritiya

अनेकांना प्रश्न पडतो की अक्षय तृतीयेला दान केल्याने पुण्य मिळते परंतु नेमके दान कशाचे करायचे? पुराणातील उल्लेखानुसार या दिवशी अन्न ,धान्य, कपडे ,सोने नाणे याचबरोबर पाण्याचे देखील दान केले जाते.काही लोक तर  मातीचे रांजण ,मडके ,पंखे ,चपला, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लागणाऱ्या  छत्र्या, गहू ,ज्वारी ,बाजरी अशा अनेक बाबी दान म्हणून दिल्या जातात.या बाबींचे दान करणाऱ्या व्यक्तीला स्वर्ग लोकांची प्राप्ती होते अशी देखील भूमिका हा सण साजरा करण्यामागे आहे.

अक्षय तृतीयेचा पूजा विधि | akshaya tritiya pooja vidhi 

तृतीयेच्या दिवशी प्रातःकाळी लोक स्नान करतात गृहिणी सडासमार्जन करून रांगोळी काढतात त्याचबरोबर घरातील पुरुष मंडळी आपले स्नान आटपल्यानंतर एका पाटावर किंवा चौरंगावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या प्रतिमा ठेवून ते प्रतिमांचे पूजन करतात. देव देवतांच्या आरत्या देखील यावेळी बोलल्या जातात.

अक्षय तृतीयेच्या  दिवशी पुराणात  घडलेल्या घटना मराठी माहिती |   Marathi information on events that happened on the day of Akshaya Tritiya in Purana

अक्षय तृतीया या दिवसाला विशेष महत्त्व असल्याचे कारण  पुराणांमध्ये या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्या  कोणत्या घडामोडी घडल्या. याविषयी अनेक उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. 

१.त्रेता युगारंभ 

या सृष्टीवर प्रेता युगाची सुरुवात झाली तो दिवस अक्षय तृतीया म्हणून ओळखला जातो. त्रेता  युगामध्ये सर्व काही आनंददायी असे वातावरण होते म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या दिवसाला एक शुभ दिवस म्हणून स्थान दिले गेले आहे.

2. अक्षय तृतीया आणि परशुरामाचा जन्म

विष्णूचा सहावा अवतार परशुराम की ज्यांनी पृथ्वीने शस्त्रीय करण्याचा प्रयत्न करून समाजामध्ये शांत करण्यासाठी आपले अवघे आयुष्य खर्ची घातले असा विष्णूचा अवतार याच दिनी जन्माला आला म्हणून अनेक परशुराम भक्त या अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुराम देवाची पूजाच्या करतात.

3. गंगेचे आगमन

आकाशातून गंगा जमिनीवर ती आली याची आख्यायिका आपण ऐकले असेल ही गंगा नेमकी कोणत्या दिवशी जमिनीवर अवतरली तो दिवस होता अक्षय तृतीयेचा म्हणून देखील अक्षय तृतीया या सणाला विशेष असे महत्व दिले गेले आहे.

4. अक्षय पात्र आणि पाच पांडव 

पाच पांडव ज्यावेळी वनवासासाठी जात होते त्या वनवासा मधला प्रवासा अतिशय खडतर होता. प्रवासात मध्ये अनेक अडचणी येणार होत्या  हे आणून श्रीकृष्णांनी पांडवांना एक पात्र दिले त्या पात्राला अक्षय पात्र असे म्हटले जाते.या अक्षय पात्रामध्ये जी जी मनोकामना आपण व्यक्त करू तेथे खाद्यपदार्थ उपलब्ध होते अशी आख्यायिका सांगितली जाते तो दिवस म्हणजे देखील अक्षय तृतीयेचा दिवस होता.

5. अन्नपूर्णा देवीचा जन्म

पण आपल्या घरामध्ये अन्नधान्य कमी पडू नये यासाठी अन्नपूर्णा देवीची पूजा करत असतो. अन्नपूर्णा देवीचे वास्तव्य आपल्या स्वयंपाक घरामध्ये असते. अनेक लोक आवर्जून अक्षय तृतीयेला आपल्या स्वयंपाक घरामध्ये अन्नपूर्णा देवीची पूजा करतात. अशी ख्याती आपल्याला अक्षय तृतीया सणाची सांगता येते.

अक्षय तृतीया सणाचे महत्त्व चित्रफित|,akshaya tritiya vIdeo

आमचे इतर लेख

बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2023

लोकमान्य टिळक निबंध आणि भाषण 

लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी विचार  

लोकमान्य टिळक पुण्यतिथि सूत्रसंचालन 

सरल पोर्टल स्टुडेंट प्रमोशन कसे करावे ? तसेच टॅब सुरू 

डिप्लोमा प्रवेश 2023 24 मेरिट लिस्ट /गुणवता यादी जाहीर 

Leave a Comment