महाराष्ट्र शासनाकडून लाखो बेरोजगारांना नोकरीची संधी नोंदणी प्रक्रिया सुरू | Job opportunity unemployed by Maharashtra government

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य ,रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राज्यातील बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत असतात.उमेदवारांना  या रोजगाराचा लाभ घेण्यासाठी आपली नोंदणी करणे बंधनकारक आहे.तरी Job opportunity unemployed by Maharashtra government चा लाभ घ्या. 

 

महाराष्ट्र शासनाकडून लाखो बेरोजगारांना नोकरीची संधी नोंदणी प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र शासनाकडून लाखो बेरोजगारांना नोकरीची संधी नोंदणी प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र शासनाचा कौशल्य,रोजगार आणि उद्योजकता विभाग|Department of Skill, Employment and Entrepreneurship, Government of Maharashtra

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार आणि उद्योजकता विभाग दरवर्षी विविध उपक्रमांच्या माध्यमातून बेरोजगारांना कंपन्या,कॉर्पोरेट संस्था यांच्या माध्यमातून रोजगाराचे/नोकरीचे  प्लॅटफॉर्म मिळवून दिले जाते. ज्या संस्थांना कुशल कर्मचाऱ्यांची  आवश्यकता आहे अशा कंपन्या संबंधित विभागाशी संपर्क साधून आपल्या कंपनीसाठी उचित पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी देत असतात 

महास्वयं  वेब पोर्टलवर नोंदणी करा | Register on Mahaswayam web portal

आपण बेरोजगार असाल आणि आपल्याला देखील रोजगार अर्थात नोकरी हवी असेल तर आपण महाराष्ट्र शासनाच्या महास्वयं  या वेब पोर्टल वर जाऊन आपली नोंदणी करू शकता. महाराष्ट्र राज्याचे रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली की 31 मे 2023 पर्यंत जवळजवळ 88 हजार लोकांना यावे पोर्टलच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झालेला आहे.

महास्वययं  वेब पोर्टलची लिंक | Link to Mahaswayam web portal

आपल्याला देखील या वेब  पोर्टलच्या मदतीने रोजगार मिळवायचा असेल तर, त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण संबंधित वेबसाईटला भेट द्या आणि आपली नोंदणी पूर्ण करा.

महास्वयं  रोजगार पोर्टल लिंक 

या संकेतस्थळावर जाऊन आपण आपल्या जवळ असलेली कौशल्य आपले शिक्षण त्याचबरोबर अनुभव या बाबी त्या ठिकाणी अर्जाची नोंदणी करताना व्यवस्थित रित्या भरायचे आहेत.

महास्वयंमार्फत कशी होते भरती प्रक्रिया | How is the recruitment process through Mahaswayam?

ज्या कंपन्यांना कुशल कर्मचाऱ्यांच्या आवश्यकता आहे. त्या कंपन्या या ठिकाणी नोंदणी करतात आणि आपल्यासाठी सर आवश्यक कर्मचारी या ठिकाणाहून उपलब्ध करत असतात.

नोंदणी करण्याची प्रक्रिया | Registration process

आम्ही आपल्याला खाली देत असलेल्या माहितीपत्रकातील सर्व माहिती व्यवस्थित वाचून आपण आपली नोंदणी ऑनलाइन  करावी त्याचबरोबर आपली माहिती देखील अचूक भरावी.

महास्वयं  पोर्टलवर अर्ज करण्यासाठी माहितीपत्रक | Brochure to apply on Mahaswayam portal

 महास्वयम पोर्टलवर अर्ज करण्यासाठी माहितीपत्रक हवे असेल तर ते आम्ही आपल्याला खाली देत असलेले माहितीपत्रक आपण नीट वाचा आणि त्यामध्ये दिलेल्या स्टेप नुसार आपण  आपली नोंदणी पूर्ण  करून घ्या.

नोंदणी अर्ज आकडेवारी 

आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील  61 लाख लोकांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे.तसेच अनेकजण आता देखील नोंदणी करत आहेत.
 

नोंदणी करताना लागणारी कागदपत्रे | Documents required for registration

आपल्याला या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आपले आधार कार्ड गरजेचे आहे.कारण आधार कार्ड वरील माहिती त्या ठिकाणी आपण नोंदवल्यानंतर आपल्या मोबाईल वरती ओटीपी येतो आणि त्या  नंतरच आपल्याला नोंदणी करता येते. त्याचबरोबर तर एकाद्या क्षेत्रामध्ये आपण नोकरी करत असाल तर त्या संदर्भात अनुभवाचे पुरावे ,शैक्षणिक कागदपत्रे या सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपल्याला नोंदवायला लागतात. या अगोदर आपण कोणत्या क्षेत्रामध्ये नोकरी केली असेल करत असाल तर तो तपशील सोबत ठेवावा. या सर्व बाबी महास्वयम पोर्टलवर नोंदणी अर्ज दाखल करण्यापूर्वी सोबत ठेवाव्यात.
 
 
  बेरोजगार उमेदवारांनी तात्काळ आपली नोंदणी करून घ्यावी ही विनंती. भविष्यात येणाऱ्या 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी तरुणांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी महास्वयम वेब पोर्टलवर आजच आपली नोंदणी करावी ही विनंती.
 
बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र शासनाकडून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारे हे पोर्टल या संदर्भात माहिती आपण इतरांना देखील पाठवा ही विनंती.
 
 
आमचे इतर लेख 

Leave a Comment