शाळा प्रेवेशोत्सव 2023 24 प्रवेशोत्सव भाषणे,प्रेवेशोत्सव सूत्रसंचालन व प्रभातफेरीतील घोषणा | Shala Prveshotsav Bhashan Ghoshna V Sutrsanchaalan

 शाळेत जाणे हा एक उत्सव आहे,ती आपल्यावर होणारी जबरदस्ती नाही ही भावना लहान मुलांमध्ये वाढीस लागावी यासाठी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात.आज आपण  शाळा प्रेवेशोत्सव 2023 24 या वर्षामध्ये  प्रवेशोत्सव भाषणे,प्रवेशोत्सव सूत्रसंचालन व प्रभातफेरीतील घोषणा ही माहिती पाहणार आहोत.(Shala Prveshotsav Bhashan Ghoshna V Sutrsanchaalan )हे पाहण्या अगोदर प्रवेशोत्सव साजरा करण्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. 

Shala Prveshotsav Bhashan Ghoshna V Sutrsanchaalan
शाळा प्रवेश उत्सव
शाळा प्रेवेशोत्सव 2023 24 प्रवेशोत्सव भाषणे,प्रेवेशोत्सव सूत्रसंचालन व प्रभातफेरीतील घोषणा

शाळा प्रवेशोत्सव का साजरा केला जातो? | Why is school entrance festival celebrated?

 शाळा प्रवेशोत्सव गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार प्रत्येक शाळेला हा उत्सव साजरा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम 2009 नुसार  शिक्षण हा त्या बालकाचा हक्क झालेलाआहे. याचाच दुसरा अर्थ काय तर 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मूल हे शाळेमध्ये आले पाहिजे.आणि म्हणूनच प्रत्येक मुलांपर्यंत शाळा पोहोचली पाहिजे. याच उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव या उपक्रमाला सुरुवात झाली. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून 9 जून 2015 रोजी स्वतंत्र परिपत्रकदेखील काढण्यात आलेले आहे. या परिपत्रकामध्ये शाळा प्रवेशोत्सव कशा पद्धतीने करण्यात यावा याबाबत निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. ते थोडक्यात पाहूया. 

प्रवेशोत्सव साजरा करण्याबाबत  शासन निर्णय 9 जून 2015 नुसार मार्गदर्शक सूचना | Guidelines as per Government Decision 9th June 2015 regarding the celebration of entry festival

 महाराष्ट्र शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार 6  ते  14  वयोगटातील सर्व बालकांना शाळेमध्ये प्रवेश देणे आणि त्यांना आनंददायी शिक्षण देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, म्हणूनच इयत्ता पहिलीसाठी येणारे मुल रडत शाळेत न येता ते आनंदाने शाळेमध्ये आले पाहिजे. शाळेची त्याला गोडी वाटली पाहिजे. त्याचबरोबर इतर इयत्तामधील जी मुले आहेत ती देखील उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टी वर गेलेली असतात.ती ज्यावेळी शाळेमध्ये येतील त्यावेळी त्यांना शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. शाळेमध्ये यायला त्यांना आनंद वाटला.पाहिजे शाळा म्हणजे तुरुंग अशी भूमिका बदलायला हवीय.शाळा म्हणजे आनंदी आनंद. जिथे मला नाचायला,खेळायला बागडायला भेटणार. जिथे माझे कौतुक होणार!आणि म्हणूनच प्रवेश उत्सवला असे स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

प्रवेशोत्सव तयारी अशी करा  | Shala Prveshotsav Bhashan Ghoshna V Sutrsanchaalan tayari 

यामध्ये शाळा भरण्याच्या एक दिवस आधी गृह्भेटी व शाळा सजावट करावयाची आहे. 
 

1. शाळा प्रेवेशोत्सव गृहभेटी | School Entrance Festival Home Visit

शासन निर्णयानुसार शाळा भरण्याच्या एक दिवस अगोदर खालील  प्रमाणे तयारी करणे अपेक्षित आहे. 

2.फलकावर मुलांची नावे प्रदर्शित करणे | Displaying children’s names on the board

प्रवेशोत्सवाच्या आदल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व सेवाभावी संस्था यांनी सकाळी 7.00  वाजता शाळेमध्ये हजर राहून प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या मुलांची नावे शाळा फलकावर लावायची आहेत. 

3. गृह भेटी | Home visits

वरील  सर्व सदस्यांनी आपल्या शाळेच्या आसपासच्या परिसरात एकत्र किंवा गटागटाने जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी भेट द्यायची आहे.

4. शाळा प्रेवेशोत्सव 2023 24कार्यक्रमाला  उपस्थित राहण्याबाबत पालकांना विनंती| Request to parents to attend School Praveshhotsav 2023 24 program

 गृह भेटी दरम्यान पालकांना विनंती करायची आहे की, शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या पाल्याला शाळेमध्ये उपस्थित ठेवावे.

5. मुलांशी संवाद साधने| Communication tools with children

मुलांशी देखील संवाद साधावा. जर काही प्रवेश पात्र विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित असतील.अशावेळी गृह भेटी दिल्यानंतर त्यांची नावे नोंदवून घेणे.

6. शाळा मुलांच्या दारी ही अभिनव संकल्पना | Door of school children is an innovative concept

 थोडक्यात काय तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत कोणी ना कोणी प्रतिनिधी जाणे हे अपेक्षित आहे. विद्यार्थी शाळेपर्यंत येणे जसे अपेक्षित आहे त्याआधी शाळा विद्यार्थ्या पर्यंत जाणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

7. सकारात्मक वातावरण निर्मिती | Creating a positive environment

या गृह भेटीतून विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांमध्ये सकारात्मकता  निर्माण करणे हा उद्देश देखील आहे. यानंतर आदल्या दिवशी शाळेत देखील काही तयारी करून ठेवायची आहे. 

अशी करा शाळापूर्व तयारी 2023 24 साठी | Do this for Preschool Preparation 2023 24

  साधारणपणे सकाळी नऊ पर्यंत गृहभेटी दिल्यानंतर पुन्हा शाळेमध्ये एकत्र जमायचे आहे व पुढील प्रमाणे कार्यवाही करायचे आहे.

1. शाळा प्रेवेशोत्सव 2023 24 तयारी |School Entrance Festival 2023 24 Prepration 

 प्रवेश उत्सवाची तयारी करत असताना शासन निर्णयानुसार काही स्पष्ट सूचना दिलेले आहेत. 

2. शाळेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणे | Cleaning the area around the school

 शासन निर्णयातील सूचनेनुसार  शालेय व्यवस्थापन समिती, बचत गट, वेगवेगळ्या सेवाभावी संस्था, शिक्षक व पालक यांच्या मदतीने शाळा व शाळेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून घ्यायचाआहे.

3. आकर्षक रांगोळी | Attractive Rangoli

शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक अशी रांगोळी काढायची आहे. एवढेच नव्हे तर आपण ज्या पद्धतीने दसरा दिवाळीला घरावरती तोरणे बांधतो त्याच पद्धतीने वर्ग खोल्यांना तोरणे बांधून वर्ग सजवायचे  आहेत.

 

4.बोलके फळे तयार करा 

फळ्यावर ती देखील छान छान चित्रे काढून मुलांना शाळा एखाद्या पर्यटन स्थळा सारखी वाटली पाहिजे. सजवलेली शाळा पाहून ते शाळेकडे कौतुकाने पाहायला हवेत. ही त्यामागे भूमिका आहे. हे सर्व झाले शाळा सजावटीच्या बाबतीत अशी सर्व तयारी करून ठेवायची आहे. 

शाळा प्रेवेशोत्सव 2023 24 प्रवेशोत्सव शाळेच्या पहिल्या दिवशी करावयाची तयारी 

     शाळेच्या पहिल्या दिवशी  शासन निर्णयानुसार खालील प्रमाणे तयार करायची आहे.शाळेच्या पहिल्या दिवशी सकाळी सात वाजता शाळेच्या लाऊड स्पीकर वरून ज्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतलेलाआहे त्या विद्यार्थ्यांचा परीचय किंवा नावे इतर विद्यार्थ्यांसमोर वाचून दाखवावीत.विद्यार्थ्यांची नावे वाचल्यानंतर साधारणपणे साडेसात वाजता आपल्या गावांमध्ये किंवा शाळेच्या परिसरामध्ये प्रभातफेरी काढायची आहे. या प्रभात फेरी मध्ये देशभक्तीपर गीत, शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या  घोषणा द्यायच्या आहेत. या प्रभात फेरी मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधि , शाळेचे आजी-माजी विद्यार्थी, गावातील तरुण मंडळे, ज्येष्ठ नागरिक यांना देखील सहभागी करून घ्यायचे आहे. प्रभात फेरीनंतर सकाळी 9 च्या दरम्यान शाळेमध्ये पहिलीसाठी प्रवेश घेतलेल्या बालकांचे  गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचे आहे. त्याचबरोबर शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण देखील करायचे आहे. पाठ्यपुस्तक वितरण केल्यानंतर आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही अशी प्रतिज्ञा घ्यायची आहे.मुलांना गोड खाऊ देखील द्यायचा आहे.  आणि त्यानंतर अध्यापनास सुरुवात होणार आहे. 

थोडक्यात काय तर शाळा भरण्याच्या एक दिवस अगोदर आणि ज्या दिवशी प्रत्यक्ष शाळा  भरणार त्यादिवशी योग्य असे नियोजन करणे प्रवेशोत्सवात अपेक्षित आहे. मागील दोन वर्षांमध्ये ऑनलाइन प्रवेशोत्सव झाल्यामुळे शैक्षणिक वर्ष 2023 – 24 मध्ये प्रवेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा आहे. याला एक उजाळा देण्याचा या लेखामागील मानस आहे.प्रवेशोत्सव पूर्वतयारी झाली शाळा सजवली गेली आता राहिली मुख्य गोष्ट ती  म्हणजे शाळेतील प्रेवेशोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार? किंवा मार्गदर्शनपर भाषण कोण करणार ?कारण का तर यातूनच या प्रवेश उत्सवाला एक आगळा वेगळा उत्साह प्राप्त होणार असतो . 
 

शाळा प्रवेशोत्सव भाषण किंवा सूत्रसंचालन | Prveshotsav Bhashn ,Prveshotsav Sutrasanchaaln  

  शाळेमध्ये कोणताही कार्यक्रम असो त्याचे उत्तम असे नियोजन असेल तर या कार्यक्रमाला रंगतदारपणा येतो.यासाठीच  खाली प्रेवेशोत्सव सूत्रसंचालनाचा  एक मी नमुना देत आहे. आपण तो जसा आहे तसा वापरा किंवा त्यात अधिकची भर घाला.पण शाळा प्रेवेशोत्सव 2023 24 खूप सुंदररीत्या पार पाडा. जेणेकरून मागील दोन वर्षात मुलांना आलेली मरगळ निघून जाईल.याचा उपयोग मुले व शिक्षक कोणीही करू शकतात. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया ……….

आगतम !स्वागतम! सुस्वागतम !

आगतम !स्वागतम! सुस्वागतम !

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! शाळेमध्ये कोणताही कार्यक्रम असो, विद्यार्थ्यांनो ! तुमच्या शिवाय त्या कार्यक्रमाला  शोभा नाही.अस म्हणतात ना 

            फुलांशीवाय शोभा नाही बागेला. 

                    तशी मुलांशीवाय शोभा नाही शाळेला. 

हे अगदी खरे आहे. कोणताही कार्यक्रम असो तुमची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. कारण या कार्यक्रमांमध्ये कोणी प्रमुख पाहुणे आले, कोणी मान्यवर व्यक्ती आल्या,व्याख्याते आले तर त्यांचे टाळ्यांचा गडगडाटामध्ये स्वागत असो करणे असो  की त्यांच्या व्याख्यानाला दाद द्यायची असो  या सर्व बाबी आपण करत असता ; पण आजचा दिवस हा जरा वेगळाच आहे. 

   आज  शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ……. शाळेचे मुख्याध्यापक…………. माझे सहकारी ……………..  शिक्षक बंधू भगिनी! तसेच  शाळेचे आजी-माजी विद्यार्थी,……………… सेवाभावी संस्थेचे  प्रतिनिधी आम्ही सगळे आज तुमचा आजचा शाळेचा पहिला दिवस म्हणून तुमच्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत. मी उपस्थिताना विनंती करतो त्यांनी आपल्या या चिमुकल्यांचे, उद्याच्या भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या सानूल्यांचे टाळ्या वाजून स्वागत करावे. आजच्या प्रवेशोत्सवाला आम्ही सर्व मान्यवर मंडळी,तुम्ही सर्व विद्यार्थी शाळेचा पहिला दिवस म्हणून किती छान छान नटून-थटून आलाय. अहो पण बघा ना! आपली शाळा देखील, शाळेतले वर्ग देखील तुमच्या स्वागतासाठी किती छान नटले आहेत. जसी काही ही शाळा म्हणतेय,

 या रे या सारे या,

माझ्या कुशीत सारे या ,

छान गोष्टी ऐका ,गाणी  गा,

ज्ञान घ्या,संस्कार घ्या,

जगाच्या बाजारासाठी शिदोरी घ्या. 

या रे या ———

 जशी काही ही शाळा तुमच्यासाठी आतुर झालीय आणि तुम्ही देखील आतुर झालाय.सगळीकड

आनंदी आनंद आहे. 

यानंतर अमुक अमुक आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे……………. यांनी विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून तिला वंदन करूया. शक्य असल्यास यावेळी एखादी प्रार्थना किंवा सरस्वती वंदना लावावी.  

  सरस्वती पूजनानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक /मुख्याध्यापिका यांनी शैक्षणिक 2023-24 प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. 
 
 आज शाळा प्रेवेशोत्सव 2023 24 या  कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या ……………. पाहुण्यांचा परिचय करून द्यावा.
 
यानंतर पाहुण्यांच्या व शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देण्यात यावे !
 
 तर आजच्या या प्रवेशोत्सव कार्यक्रमात बाळ गोपाळांचे स्वागत.आज नवी शाळा,नवीन नवीन पुस्तके,नवे मित्र – मैत्रीणी, नवीन नवीन शिक्षक नि तुमची पाहिलीची नवी नवी सुरूवात. किती मस्त आहे ना हे सगळे.तसेच इतर मोठी मुले पण वर्षी वर्गात बसून शिकता येणार म्हणून किती किती खुश आहेत.  

       शाळा भरली, शाळा भरली.

      आमची तहान,भूक हरली,

       का म्हणून काय विचारता ?

        त्या कोरोनाच्या पायी, 

         दोन वर्ष आमची पाण्यात गेली 

        आता मात्र शिकायची जिद्दच केली,

        आता आमच्या भविष्याची चिंता कायमची सरली,

          आता आमची शाळा भरली. 

       यानंतर पाहुण्यांचे मार्गदर्शनपर भाषण होईल. आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे जात आहोत श्री/श्रीम ———- यांनी आभार मानावेत .शेवटी ज्ञानेश्वरांच्या आता विश्वातमके देवे या पससायदानाने कार्यक्रम समाप्त होईल. 

अशा पद्धतीने किंवा यापेक्षा सुंदर रीतीने शाळा प्रेशोत्सव भाषण व सूत्रसंचालन आपण करू शकता. 

प्रेवेशोत्सव  2023 24 च्या प्रभात फेरीसाठी  काही घोषणा Some Announcements for Prabhat Round 2023 Praveshhotsav 24

      1. शाळेत मुले ,

        नि बागेत फुले. 

       2. शिक्षण आमच्या हक्काचे,

        नाही कुणाच्या बापाचे .

      3. आता शाळेतून छडी निघून गेली,

          नि पहिल्याच दिवशी आमच्या हाती कॅडबरी आली. 

       4. चला चला १५ तारीख आली ,

          शाळेत नटून थठुन जायची वेळ झाली. 

        5. एक दोन तीन चार 

         ———– शाळेचा जयजयकार.(उदा. अशोकनगर)

        6. खाली मुंडे वर पाय,

           शाळेत जाऊन योगा करायची 

            आता झालीय आम्हाला  घाय. 

   अशा पद्धतीने  आजचा लेख आपल्याला शाळा प्रेवेशोत्सव 2023 – 24 प्रेवेशोत्सव भाषणे,प्रेशोत्सव सूत्रसंचालन व प्रभात फेरीतील घोषणा यांची उत्तम तयारी करण्यासाठी नक्कीच या लेखाची मदत होईल.

आमचे इतर लेख

इयत्ता पहिली ते दहावी वार्षिक नियोजन 

3 thoughts on “शाळा प्रेवेशोत्सव 2023 24 प्रवेशोत्सव भाषणे,प्रेवेशोत्सव सूत्रसंचालन व प्रभातफेरीतील घोषणा | Shala Prveshotsav Bhashan Ghoshna V Sutrsanchaalan”

  1. सन्मानीय प्रशांत शिपकुले सर….. खूप छान महत्वपूर्ण माहिती… वेळोवेळी काहीतरी नावीन्य आणण्याचा आपला प्रयत्न खूप छान आहे… असेच. आपले प्रयत्न सुरु राहावेत.. नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

    Reply
  2. अतिशय उत्कृष्ट माहिती या माहितीमुळेच प्रवेशोत्सव अगदी जोरात साजरा झाला.

    Reply

Leave a Comment